• पर्यटन भूगोल

    पर्यटन भूगोल ही मानवी भूगोलाची अतिशय नाविन्यपूर्ण अशी शाखा आहे. 1950 च्या दशकापर्यत पर्यटन भूगोलाला स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून स्विकारले गेले होते. संयुक्त संस्थाने व जर्मनीतील वैज्ञानिक कार्यात पर्यटन भूगोलाचे अभ्यास क्षेत्र आधोरेखित केले गेले. भूगोल तज्ञांनी नव्या क्षेत्रांचा अभ्यास करुन पर्यटन भूगोलाची अचूकता सुधारण्यास मदत केली. सध्याच्या काळातील ‘पर्यटन’ हा शब्द प्रयोग 13 व्या शतकापासून प्रचलित झाला.
    पर्यटनासाठी पर्यटक हा महत्वाचा केंद्र बिंदू आहे. पर्यटन हा मानवाचा अत्याधुनिक आर्थिक व्यवसाय असुन तो फार झपाट्याने विकसित होत आहे. पर्यटन व्यवसाय पर्यावरणाशी संबधित आहे. पर्यावरण व त्यातील बदल मानवाचे आर्थिक व्यवहार व साधनसंपत्ती त्याचे स्थळ व काळ संदर्भातील अध्ययन भूगोलशास्त्रात केले जाते. त्यातूनच पर्यटन भूगोल हि शाखा निर्माण झाली.

    प्रस्तुत पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख, पर्यटनात आधुनिक आणि पर्यटन प्रकार, पर्यटनाचे परिणाम, भारतातील पर्यटन, कोकणातील पर्यटन विकास, खान्देशातील पर्यटन विकास, गुजरात राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्रातील गड किल्ले इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केल्याने सर्वांसाठी ते उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

    Paryatan Bhugol

    275.00
    Add to cart
  • पर्यटन भूगोल

    पर्यटन परिचय : 1.1 व्याख्या आणि स्वरूप, 1.1.1 पर्यटन, पर्यटक, पर्यटन भूगोलाच्या व्याख्या, 1.1.2 पर्यटनाचे स्वरुप, 1.1.3 पर्यटनाचे महत्व, 1.2 पर्यटनाची व्याप्ती व विस्तार, 1.2.1 पर्यटन व प्रवास मानवी पायाभूत गरज, 1.2.2 पर्यटन आणि विकास, 1.2.3 पर्यटन एक उत्पादन, 1.3 पर्यटन विकासात भूगोलाची भूमिका, 1.3.1 भौगोलिक घटकांचे अध्ययन, 1.3.2 पर्यटनाचा भूगोलाच्या इतर ज्ञानशाखांशी संबंध.
    पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक : 2.1 प्राकृतिक घटक, 2.1.1 भूरचना, 2.1.2 हवामान, 2.1.3 जंगले, 2.2 सामाजिक व सांस्कृतिक घटक, 2.2.1 धार्मिक घटक, 2.2.2 ऐतिहासिक घटक, 2.2.3 क्रीडा किंवा खेळ, 2.3 राजकीय घटक, 2.3.1 धोरणे, 2.3.2 पर्यटकांची सुरक्षा, 2.3.3 सुलभता/सुगमता.
    पर्यटनाचे वर्गीकरण व संकल्पना : 3.1 पर्यटनाचे वर्गीकरण, 3.1.1 राष्ट्रीयत्वानुसार पर्यटनाचे प्रकार, 3.1.2 कालावधीच्या आधारावर पर्यटनाचे वर्गीकरण, 3.1.3 हेतूच्या आधारावर पर्यटनाचे वर्गीकरण, 3.2 पर्यटन संकल्पना-1, 3.2.1 कृषी पर्यटन, 3.2.2 पर्यावरण पूरक पर्यटन, 3.2.3 वन्यजीव पर्यटन, 3.3 पर्यटन संकल्पना-2, 3.3.1 निरोगीपणाचे पर्यटन, 3.3.2 आरोग्य/वैद्यकीय पर्यटन, 3.3.3 क्रीडा पर्यटन.
    पर्यटन विकासातील वाहतूक आणि दळणवळणाची भूमिका : 4.1 वाहतुकीची साधने, 4.1.1 रस्ते वाहतूक, 4.1.2 रेल्वे वाहतूक, 4.1.3 जल वाहतूक, 4.1.4 हवाई वाहतूक, 4.2 संदेशवहन/दळणवळण, 4.3 प्रवास आणि पर्यटन एजन्सी.
    पर्यटनामध्ये निवासाची भूमिका : 5.1 निवासाचे प्रकार, 5.1.1 खाजगी निवासस्थाने, 5.1.2 शासकीय निवासस्थाने, 5.1.3 खाजगी व अनधिकृत निवासस्थाने, 5.2 निवासाच्या निवडीवर परिणाम करणारे घटक, 5.3 पर्यटन विकासात निवासाची भूमिका.
    पर्यटनाचे परिणाम : 6.1 पर्यटनाचे आर्थिक परिणाम, 6.2 प्राकृतिक व पर्यावरणीय परिणाम, 6.3 सामाजिक व सांस्कृतिक परिणाम.
    पर्यटन विकासाचे नियोजन व धोरणे : 7.1 जागतिक पर्यटन संघटना (), 7.2 भारतीय पर्यटन विकास महामंडळ (), 7.3 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ().
    भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांचा अभ्यास : 8.1 भारतातील गिरीस्थाने, 8.1.1 मनाली, 8.1.2 महाबळेश्वर, 8.2 ऐतिहासिक स्थळे, 8.2.1 ताजमहाल, 8.2.2 रायगड किल्ला, 8.3 राष्ट्रीय उद्याने, 8.3.1 काझीरंगा अभयारण्य, 8.3.2 मेळघाट अभयारण्य (व्याघ्र प्रकल्प).

    Paryatan Bhugol

    160.00
    Add to cart
  • पर्यटन भूगोल

    आजच्या जागतिकीकरणाच्या काळात बहुतेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा वाढला असून आज पर्यटन ही जागतिक स्तरावरील एक महत्वाची आर्थिक क्रिया बनली आहे. सुरुवातीस उदरनिर्वाह, व्यापार, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा वेगवेगळ्या कारणांनी पर्यटन होत असे. सध्या मौजमजा, विरंगुळा, आनंद तसेच समाधान मिळविण्यासाठी पर्यटन केले जाते. मानवाला निसर्ग सौंदर्य, प्राकृतिक भूरूपे, ऐतिहासिक वास्तू, शिल्पे, धार्मिक स्थळे, उत्सव, शैक्षणिक ठिकाणे, स्मारके, आरोग्यदायी हवामान असे वेगवेगळे घटक आकर्षित करत असतात. मानव अशा आकर्षित करणाऱ्या घटकांना प्रतिसाद देऊन त्या स्थळांना भेट देण्यासाठी प्रवास करतो. या सर्व क्रियेतून त्याला आनंद तसेच समाधान मिळते. एकविसाव्या शतकात जगातील अतिशय वेगाने विकसित होणारा आणि भरपूर उत्पन्न मिळवून देणारा एक उद्योग म्हणून पर्यटन उद्योग विकसित होत आहे. कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाची निर्यात न करता देशाला परकीय चलन मिळवून देणारा पर्यटन हा जगातला एकमेव उद्योग आहे.

    Paryatan Bhugol

    225.00
    Add to cart
  • पर्यटन भूगोल

    ‌‘पर्यटन भूगोल’ या पुस्तकाच्या माध्यमातून पर्यटन भूगोलाचे महत्त्व विविध अंगांनी समजून घेता येईल त्यात जगातील विविध स्थानांची भौगोलिक स्थिती, वैशिष्ट्ये, आणि पर्यावरणीय परिस्थिती. पर्यटन क्षेत्राचा विकास केल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना, रोजगाराची संधी आणि त्यामुळे स्थानिक व्यवसायांना मिळणारे प्रोत्साहन. पर्यटनामुळे स्थानिक संस्कृती, परंपरा आणि कला यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होते, कारण पर्यटक स्थानिक सांस्कृतिक आकर्षणांचा अनुभव घेतात. याचबरोबर पर्यटन भूगोलामुळे विविध देशांमधील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होते, ज्यामुळे जागतिक संबंध समजून घेण्यास मदत होते. याशिवाय पर्यटन भूगोलातील अभ्यासाने पर्यटन स्थळांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होते, ज्यामुळे पर्यटन स्थळे सुरक्षित आणि आकर्षक राहतात. या सर्व कारणांमुळे पर्यटन भूगोलाचे महत्त्व व्यापक पातळीवर फायद्याचे ठरते.
    पर्यटन भूगोल या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध विवेचन सोप्या भाषेत केले असून हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक यांनाच उपयुक्त नसून समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त आहे.

    140.00
    Add to cart
  • पर्यावरण अभ्यास

    21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरण अभ्यास या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
    मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
    पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.

    235.00
    Add to cart
  • पर्यावरण भूगोल

    Paryavaran Bhugol

    175.00
    Add to cart
  • पर्यावरण भूगोल

    मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याची स्वयंचलित व स्वनियंत्रित यंत्रणा निसर्गाजवळ आहे. परंतु अलीकडच्या काळात निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे असंतुलन निर्माण झाले. त्यातून अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्यात. ह्या पर्यावरणीय समस्या विश्वव्यापी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळेच 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या जागतिक परिषदेत पर्यावरणीय समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली व तेव्हापासूनच जगातील सर्व देशांचे लक्ष ह्या जागतिक समस्येकडे वेधले गेले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक असल्याची जाण प्रत्येक राष्ट्र, शासन व समाजाला होऊ लागली. यातूनच पर्यावरण अभ्यासास महत्त्व प्राप्त झाले. पर्यावरणविषयक जागृती व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला पर्यावरणाचे महत्त्व कळावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करू शकतो? पर्यावरण संतुलन ढासळल्यामुळे किती भयानक समस्या निर्माण झाल्यात? या संबंधीची माहिती प्रत्येकास व्हावी, या दृष्टिकोनातूनच प्रस्तुत पुस्तकाची मांडणी केली आहे.
    या पुस्तकाच्या माध्यमातून जैवविविधतेचे महत्व, राष्ट्रीय पर्यावरण धोरण, धोरणावर आधारित अंमलबजावणी, वने व वन्यजीवांचे संवर्धन, विकसित व विकसनशील देशातील पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न अशा महत्वपूर्ण मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व स्वच्छ पर्यावरणासाठी या सर्व बाबींचे आकलन समाजाला होणे आवश्यक आहे. ही माहिती समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सारे प्रयत्न करू या.

    Paryavran Bhugol

    175.00
    Add to cart
  • पर्यावरण शिक्षण

    20 व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात खर्‍या अर्थाने पर्यावरण शिक्षणाच्या संकल्पनेला गती मिळाली. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती आहे. मानव, प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्या सभोवतालच्या परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरणात केवळ एकाच घटकाचा समावेश होत नाही तर त्यात अनेक प्रकारचे घटक असतात. यामध्ये भौतिक, जैविक व रासायनिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो. पर्यावरण स्थळ-काळानुसार बदलते. एका सजीव जातीला अनुकूल असलेले पर्यावरण दुसर्‍या सजीव जातीला प्रतिकूल असू शकते. सद्य:स्थितीत नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अनिर्बंध वापरामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज या नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य पद्धतीने जतन केले तरच भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आपल्याला भावी पिढीसाठी हा निसर्गाचा ठेवा सुरक्षित ठेवायचा असेल तर नैसर्गिक साधनसंपत्तीचे व एकूणच पर्यावरणाचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

    पर्यावरण आणि पर्यावरण प्रदूषण हा आज कळीचा मुद्दा झालेला आहे. या प्रदूषणापासून आपणच आपल्या सुंदर पृथ्वीला वाचवायचे असेल तर सामूहिक बदलांऐवजी वैयक्तिक बदल महत्त्वाचे आहेत. आपण वेळीच याबाबत दक्ष राहिलो नाही तर येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी धोकादायक असणार आहे. आपला आजचा प्रत्येक दिवस पर्यावरण रक्षणासाठी मोलाचा आहे. प्रत्येक मानवाने आपली जीवनशैली बदलली तर स्वतःपासून केलेला हा बदल एक चळवळ बनायला वेळ लागणार नाही.

    सदरील पुस्तकात पर्यावरण व पर्यावरण शिक्षणाशी संबंधित सर्वच मुद्यांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सखोल विचारमंथनातून अभ्यास व संशोधनातून प्रस्तुत पुस्तक तयार झालेले आहे. विविध उदाहरणे तसेच सध्याच्या वेब युगाचा विचार करुन भरपूर प्रमाणात आकृत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यासक, संशोधकांनासुद्धा पुस्तकाचा उपयोग होणार आहे.

    Paryavaran Shikshan

    180.00
    Add to cart
  • पर्यावरण शिक्षण

    मानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.

    295.00
    Add to cart
  • पर्यावरणशास्त्र परिचय

    21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरणशास्त्र परिचय या संदर्भग्रंथात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
    मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, एड्स बाबतीतील जनजागृती व सद्य परिस्थिती, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
    पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.

    Paryavaranshastra Parichay

    375.00
    Add to cart
  • पर्यावरणीय भूगोल

    पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर काही कालावधीनंतर येथे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. या सजीवांच्या उत्क्रांतीमधूनच मानवाची देखील निर्मिती झाली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, हे घटकांची गरज असून हे घटक सजीवांना त्यांच्या सभोवतालच्या परिसरातून मिळतात. पर्यावरण ही संकल्पनाच बहुव्यापक, बहुसमावेशक व बरीच गुंतागुंतीची आहे. पर्यावरण एक किवा अनेक सजीवांचे बनलेले असते. तसेच ते एक किंवा अनेक घटकांनी मिळून बनलेले असते. पर्यावरण ही संकल्पना स्थल व कालसापेक्ष आहे. कारण भूपृष्ठावर सर्वत्र सारखेच पर्यावरण नसते. अलीकडे पर्यावरण ही बहुचर्चित संकल्पना बनली असून ती अध्ययनाचा, संशोधनाचा व चिंतेचा एक प्रमुख विषय ठरत आहे.
    सदरील पुस्तकात पर्यावरणीय भूगोलाचा परिचय, परिसंस्था, जैवविविधता व तिचे संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरणीय समस्या, पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणे इ. महत्त्वपूर्ण घटकांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.

    Paryavaraniya Bhugol

    325.00
    Add to cart
  • पालकत्व शिक्षण

    पालकत्व शिक्षण या पुस्तकात एकूण चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यात पालकत्व शिक्षणाचा अर्थ, स्वरुप, व्याप्ती, उद्दिष्ट्ये, मार्ग, गरज, महत्व तसेच पालकांचा बालकाच्या शिक्षणात व शाळेत सहभाग, पालक शिक्षक संघ, पालकांची भूमिका व जबाबदार्‍या, कुटूंबाचा, सामाजिक व आर्थिक स्थितीचा परिणाम, पालकत्व शैली, पालकत्व शिक्षणातील नवप्रवाह यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

    या पुस्तकातून पालकत्व शिक्षणाबद्दल अपेक्षित व तपशीलवार मुद्देसूद माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून संपूर्ण अशी माहिती किंवा ज्ञान आपणास मिळणार नाही. परंतु याचा शिक्षण क्षेत्रातील उपयोग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना या पुस्तकाद्बारे एकाच ठिकाणी पालकत्व शिक्षणाचे साहित्य उपलब्ध होईल व त्यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल अशी खात्री आहे.

    Palaktva Shikshan

    160.00
    Add to cart
  • पालकत्व शिक्षण

    पालक बनणे हे व्यक्तीच्या जीवनात खूप आनंद देणारी बाब आहे, तरी पालकत्वाची जबाबदारी पार पाडणे तेवढीच कठीण आहे. आपल्या बालकाला वाढवणे, त्याच्या योग्य विकासाला दिशा देणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. आपल्या मुलांसोबत चांगला संवाद असणे आजच्या इंटरनेटच्या युगात दुरापास्त झाले आहे. पालक अशिक्षित असो वा सुशिक्षित, गरीब वा श्रीमंत सर्वांना आपापल्या बालकांविषयी काही ना काही समस्या, शंका जाणवतात. या शंका कशा दूर कराव्यात. समस्या कशा सोडवाव्यात हे कोणत्याही स्तरावरील शिक्षणात शिकवले जात नाही. कारण पालकत्व ही नैसर्गिक गोष्ट मानली जाते.

    पालकत्वाचे शिक्षण ही संकल्पना भारतीयांसाठी नवीन आहे. पाश्चात्य देशात या शिक्षणाची मुळे रूजली आहेत. भारतात परंपरेने कुटुंबाकडून बालकाचे संगोपन, शिस्त, त्याचे भविष्य याविषयी निर्णय घेतले जातात. इथेच पिढीतील अंतराची ठिणगी पडते. बालहक्कांची घुसमट होते, हे सर्व होवू नये म्हणून पालकत्व शिक्षणाची रूजवात भारतात झाली.

    प्रस्तुत पुस्तकात पालकत्व शिक्षण संकल्पना, अर्थ, गरज, महत्व, व्याप्ती, पालक शिक्षणाचे विविध दृष्टिकोन, विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले उपागम, पालकांची भूमिका, जबाबदार्‍या यांचे तपशीलवार विवेचन केलेले आहे. भारतातील समाजात अस्तित्वात असलेल्या विविध कुटुंबातील आंतरक्रिया बालकांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, भारतातील पालक शिक्षण, पालकत्व शैली, पालकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा बालकावर होणारा परिणाम या बाबी नवीन नसल्या तरी त्यांची मांडणी पालक, शिक्षणाच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

    Palakatv Shikshan

    195.00
    Add to cart
  • पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.
    प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अ‍ॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.

    Pashchimatya Rajkiya Vicharwant

    235.00
    Add to cart
  • पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.
    प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, लॉक, रुसो, हेगेल, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स यांचा समावेश करण्यात आला असून त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.

    Pachimatya Rajkiya Vicharvant

    275.00
    Add to cart
  • पुराभिलेखागार

    21 व्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरातील सर्व तर्‍हेची माहिती महाजालामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेली असली तरी जुनी कागदपत्रे जपणारे पुराभिलेखागार आजही महत्वाचे आहेत. पुराभिलेख म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आलेख दर्शविणारी साधने.
    इ.स.पू. 327 च्या सुमारास अलेक्झांडरबरोबर भारतात आलेल्या निआर्कसने ‘हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात’ असे लिहून ठेवले आहे. भारतात मध्यकाळापासूनच कागदपत्रे जतन करून ठेवण्याची पध्दत रूढ असल्याचे दिसून येते. पूर्वी संस्थानात कायम सांभाळून ठेवण्याजोगी कागदपत्रे लाल रुमालात बांधत तर पस्तीस, बारा व तीन वर्षे राखून ठेवण्याची कागदपत्रे पांढर्‍या रुमालात बांधत असत. इ.स. 1818 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली. यावेळी करण्यात येत असलेला सरकारी पत्रव्यवहार, जनतेचे तक्रार अर्ज व इतर कागदपत्रे सरकार दरबारी जमा होऊ लागली.
    सदरील पुस्तकात अभिलेखागारविषयक सर्व उपयुक्त माहितीसोबतच मुंबई अभिलेखागार, मुंबई, पुण्याचे पेशवे दफ्तर (पुणे अभिलेखागार) आणि इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथील पुराभिलेखागारांचाही समावेश आहे. ‘डिजिटल अभिलेखागार’ या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थी, शिक्षक व नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल असा विश्वास आहे.

    Purabhilekhagar

    160.00
    Add to cart
  • प्रकाशन, संपादन आणि लेखनकौशल्ये

    ग्रंथांचे म्हणजेच पुस्तकाचे मानवी जीवनात काय व किती महत्त्व आहे, हे आज सर्वांनाच माहित आहे. ग्रंथांना प्राचीन अशी दीर्घ परंपरा आहे. हस्तलिखित स्वरूपात आणि विविध विषयावर विविध प्रकारात होणारे ग्रंथलेखन छपाई कलेमुळे, सुबक, नेटके व देखणे रूप घेऊन अवतरले. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, ते आकर्षक छायाचित्र, गुळगुळीत, चमकदार कागदाने शोभिवंत बनले, कलात्मकतेने सजले आणि तशाच नव तंत्रज्ञानाच्या मार्गाने आज वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. लेखकाने केलेल्या ग्रंथ लेखनाइतकीच, त्याला पुस्तक रूप देऊन वाचकांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था म्हणून प्रकाशन व्यवस्थाही तितकीच महत्त्वाची आहे. एवढेच नव्हे तर, अनेकांच्या सहभागाने ग्रंथ निर्मितीचे कार्य संपन्न करणारी ही प्रक्रिया एक ‌‘सांघिक प्रक्रिया’ आहे. म्हणजेच अनेक छोट्या व्यावसायिकांच्या, कलाकार व कारागिरांच्या सहकार्य, समन्वय व सुसंवादातून चालणारा असा ‌‘प्रकाशन व्यवसाय’ आहे.

    225.00
    Add to cart
  • प्रकाशवाटा : स्वरूप आणि चिंतन

    Prakashwata : Swarup Aani Chintan

    250.00
    Add to cart
  • प्रगत विपणन

    ‘प्रगत’ हे पुस्तक क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.कॉम.II
    (सत्र-3) वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2024-25 पासून सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी माध्यमातून लिहिलेले पाठ्यपुस्तक आपल्या हाती देताना आनंद होत आहे.
    प्रस्तुत पुस्तकात प्रगत विपणनाची ओळख- प्रगत विपणनाची ओळख – संकल्पना, महत्त्व, आव्हाने आणि ट्रेंड. व्युहरचनात्मक विपणन नियोजन – नियोजनाची भूमिका, विपणन वातावरणाचे विश्लेषण, रणनीती आणि युक्त्या.
    ग्राहक संबंध व्यवस्थापन – महत्त्व, ग्राहक धारणा धोरणे आणि तंत्रज्ञान. बाजार संशोधन आणि ग्राहक वर्तन – संशोधनाचे संचालन, ग्राहक वर्तनाची विश्लेषण.
    ब्रँड व्यवस्थापन आणि विपणन संप्रेषण- ब्रँड इक्विटी, पोझिशनिंग, एकात्मिक विपणन धोरणे. डिजिटल मार्केटिंग आणि आंतरराष्ट्रीय विपणन – डिजिटल स्वरूप, ऑनलाइन ग्राहक वर्तन, जागतिक आव्हाने इत्यादी घटकांविषयी विस्तृत माहिती स्पष्ट करण्यात आलेली आहे. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे.

    250.00
    Add to cart
  • प्रतिनिधि लघुकथाएँ एक अध्ययन

    कहानी कहने की प्रवृत्ति मनुष्य में चिरकाल से विद्यमान रही है। आपबीती और जगबीती को सुनने-सुनाने की परम्परा सभ्यता की विकास-यात्रा के साथ-साथ सभी देशों की सांस्कृतिक निधि रही है। कहानी साहित्य की लोकप्रिय विधा है। कथा की परम्परा बहुत पुरानी है। पहले के जमाने में जनसाधारण का ज्ञान संकुचित और सिमीत था, अतः उन्हें बहुत ही सरस व लोचदार तरीके से समझाने की आवश्यकता थी। इसका निर्वाह कहानी ने बडी सफलता से किया। पहले कथा और बाद की कहानी काफी लम्बी और वर्णनात्मक हुआ करती थीं किन्तु कालान्तर में इनका कलेवर संकुचित होता गया, क्योंकि एक तरफ जनसाधारण के ज्ञान का विस्तार होता गया तो दुसरी और उसकी व्यस्तता भी बढती गई, समय का अभाव भी होता गया। अतः कथा अब लघु आकार की होने लगी और लघुकथा के नाम से ख्यात होने लगी।
    इस पुस्तक में कहानी एवं लघुकथा का उद्भव एवं विकास, कहानी एवं लघुकथा के तत्वों का विवेचन, कहानी एवं लघुकथा में अंतर और हिंदी की प्रतिनिधिक 20 लघुकथाओं का संकलन किया गया है। जो शोधार्थी एवं विद्यार्थियों को लिऐ महत्वपूर्ण है।

    125.00
    Add to cart
  • प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती

    प्रिय वाचक मित्रांनो, ‌‘प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती’ (Corporate Law and Secretarial Practice) हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुनर्रचित अभ्यासक्रमाअंतर्गत लिहिलेले पुस्तक आपल्याकडे सोपवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
    प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने प्रमंडळ निर्मितीसाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबीचे सविस्तर विवरण करण्यात आलेले आहे. कोणत्याही देशातील औद्योगिक क्षेत्र हे त्या देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक घटक असतो. त्यामुळे कंपनीच्या अंतर्गत नियमावलीच्या संदर्भात त्याचप्रमाणे विशेष करून सचिवाच्या कार्यपद्धती संदर्भात या पुस्तकांमध्ये पूर्णपणे विवेचन करण्यात आलेले आहे. सचिव हा कोणत्याही प्रकारच्या कंपनीतील उच्च पातळीवरील व्यवस्थापनातील महत्त्वाची व्यक्ती असतो. प्रमंडळाच्या यश अपयशामध्ये सचिवाने घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत असतो. खरे तर सचिवाद्वारे कोणत्याही कंपनीची कायदेशीर धुरा सांभाळली जात असते. कंपनी कायदा 1956 नुसार व्यवसायाच्या संदर्भातील संपूर्ण तरतुदी त्याचप्रमाणे कायदेशीर संकल्पनांचा या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे. कंपनी कायदा 2013 मधील जे ठळक बदल आहेत त्यांचाही अंतर्भाव सदर पुस्तकांमध्ये दिसून येईल. कंपनी कायदा 2013 मधील काही ठळक वैशिष्ट्यांपैकी प्रमाणाच्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि इतरच्या बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कंपनीवर आणि त्या कंपनीच्या विकासावर या कायद्याचा परिणाम होत असताना दिसून येतो.

    110.00
    Add to cart
  • प्रसारमाध्यमे आणि मराठी

    1990 नंतर आलेल्या ‘खाउजा’ धोरणामुळे परिवर्तन पावलेल्या परिस्थितीने ‘जग हीच एक बाजारपेठ’ बनली. काळ जसा झपाट्याने पुढे जाऊ लागला तसे जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये बदल जाणवू लागले. संगणक-इंटरनेटचे जाळे पसरले. गुगलवर माहितीचा साठा आला. दूरध्वनी ऐवजी मोबाईल आले. त्यांनी स्मार्ट रूप धारण केले. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर असे सोशल मीडियाचे एक जाळे पसरले. तंत्रज्ञान प्रगत, अद्ययावत झाले. पाहता पाहता या तंत्रज्ञानाने जगातील सर्व क्षेत्रावर पकड मजबूत केली. जग जवळ आणण्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरली ती नवतंत्रज्ञानाचे बळ लाभलेली प्रसारमाध्यमे. प्रसारमाध्यमांच्या स्वरूप व वापरात होत गेलेल्या या बदलाबरोबरच त्याद्वारे अभिव्यक्त व सादर होणार्‍या कार्यक्रमांतही बदल होत गेले. या बदलांना अनुसरून जनमनावर गारुड करणार्‍या या प्रसारमाध्यम क्षेत्रात मोठी उलाढाल होऊ लागली. रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी निर्माण झाल्या. स्वाभाविकच, त्याबाबतचे तंत्र व कौशल्ये शिकवण्याची गरज निर्माण झाली. तंत्र व कौशल्ययुक्त कारागिरीला नवकल्पनायुक्त सर्जनशीलतेची, भाषिक कौशल्याची जोड लाभली तर; प्रसारमाध्यमांच्या विस्ताराबरोबरच सांस्कृतिक जीवन संपन्न करणार्‍या उज्वल भविष्याचेही चित्र उभे राहू शकते…

    Prasarmadhyame Aani Marathi

    350.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोल

    प्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्‌‍य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.
    प्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.

    Prakurtik Bhugol

    595.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोल

    प्राकृतिक भूगोल या पुस्तकात भूगोलाच्या विविध अंगाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीचे अंतरंग, भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबंधित सिद्धांत, खडक आणि विदारण, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याशिवाय वातावरणाचा अर्थ, वातावरणाची घटना आणि संरचना, तापमान, सौरशक्ती, वायूभार, वारे व वाऱ्याचे प्रकार, आर्द्रता, वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार, महासागर तळरचना, या तळरचनेमध्ये हिंदी व अटलांटिक महासागराच्या तळरचनेचा अभ्यास, सागरी प्रवाह, हिंदी व अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाचे चक्र इत्यादी घटकाविषयी अतिशय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
    विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

    Prakurtik Bhugol

    285.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण आणि जलावरण)

    नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतूदींच्या अनुषंगाने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकृतीबंधानुसार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश असलेले ‌‘प्राकृतिक भूगोल’ हे पुस्तक विद्यार्थी मित्र, अभ्यासक आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
    प्रस्तुत ग्रंथात प्राकृतिक भूगोलाची ओळख, आपली पृथ्वी, खडक व विदारण पृथ्वीच्या शक्ती, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वाटा यांचे स्पष्टीकरण तसेच वातावरणाचा परिचय, सौरशक्ती आणि हवेतील तापमान, वातावरणीय दाब आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, जलावरणाचा परिचय, महासागरजलाच्या हालचाली इत्यादी घटकांचे योग्य विश्लेषण, आकलन करुन लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनाचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून हा ग्रंथ भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

    310.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण व जलावरण)

    सूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे अवघे विश्व कसे निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले, विश्वाची व्याप्ती किती आहे आदींसारखे अनेक प्रश्न मानवाला सुरुवातीपासून भेडसावत होते. त्याअनुषंगाने प्राचीन काळापासून ते आजतागायत पुष्कळशा परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत. अठराव्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. पृथ्वीचे अंतरंग हे निसर्गातील सर्वात मोठे गुढ आहे. भूकवचात बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने काही शक्ती अथवा प्रेरणा करीत असतात हे स्पष्ट होते.
    प्रस्तुत ग्रंथात काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, पृथ्वीचे अंतरंग, खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, खडक आणि विदारण, नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य, वातावरण आणि सौरशक्ती, वायुभार आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, सागरतळ, समुद्रप्रवाह इ. विविध मुद्यांचा परामर्ष घेतलेला असून साध्या-सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

    Prakurtik Bhugol (Shilavaran, Vatavaran V Jalavaran)

    295.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके

    प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

    120.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके

    भूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

    130.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे

    प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयात समाविष्ट असलेल्या संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्यामुळे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्राच्या इतर शाखांचा अभ्यास सोपा होण्यासाठी, प्राथमिक पातळीवर प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच संकल्पनांची मांडणी सोप्या व सुसंगत पद्धतीने केली आहे.
    विद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा सखोल अभ्यास करता यावा, म्हणून त्यात सूर्यकुल (सूर्यमाला), ग्रहण, पृथ्वीच्या गती, अक्षांश व रेखांश, वेळेचे मापन, चंद्र आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. तसेच विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या सहाय्याने केले आहे, त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. पुस्तकात एकूण 66 आकृत्या दिलेल्या आहेत, या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
    प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत, ज्यामध्ये भौगोलिक संकल्पनांची उपयोजनेची गहनता दिसून येते. हे प्रश्न एम.पी.एस्सी., यु.पी.एस्सी., नेट-सेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.

    250.00
    Add to cart
  • प्राकृतिक व मानवी भूगोल

    प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा असून या शाखेत मानवी निवास, स्थान व भौगोलिक पर्यावरण लक्षात घेऊन पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचे अध्ययन केले जाते. मानवाची प्रत्येक कृती प्राकृतिक घटकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निगडीत असल्याने मानवी क्रियांचेही अध्ययन महत्त्वाचे आहे. परंतू मानवाला अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. म्हणून प्राकृतिक पर्यावरणाचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्याचा विकास केला व त्यातून प्राकृतिक भूगोलाचा पाया घातला गेला. प्राकृतिक भूगोलात भूपृष्ठ रचना, भूरुपे, हवामान, हवेचे आविष्कार, जलाशय, वनस्पती आणि प्राणी जीवनांचा अभ्यास समाविष्ट होतो. विशेषत: शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या चार प्रमुख घटकांचा व त्यांचा मानवी जीवनावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. मानवाने कितीही प्रगती केली असली तरी अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्यांचा वापर व विकास करून प्राकृतिक भूगोलाचा विकास केला गेला आहे. पृथ्वीवरील सर्व घटकांचे ज्ञान मिळविण्यासाठी प्राकृतिक भूगोलात विविध विभाग केलेले आहेत. त्यात पृथ्वीची घनरूप अवस्था म्हणजे शिलावरण, पृथ्वीची द्रवरूप अवस्था म्हणजे जलावरण, वायु अवस्था म्हणजे वातावरण आणि पृथ्वीवरील सजिवांचे अस्तित्व असलेले म्हणजे जीवावरण होय. वरील सर्व अवस्थांचा शास्त्रशुद्ध अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. या शाखेत निसर्गतः निर्माण झालेल्या घटकांचा अभ्यास केला जाऊ लागला. यात विविध भूरूपे (पर्वत, पठार, मैदान आणि त्यांची निर्मिती), हवामान, मृदा, जलाशय, खनिजे, वनस्पती आणि प्राणी इ.नैसर्गिक घटकांचा समावेश प्राकृतिक भूगोलात केला गेला.

    Prakritik V Manavi Bhugol

    250.00
    Add to cart
  • प्राकृतिक व मानवी भूगोल

    प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल ह्या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी व पृथ्वीशी संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. या मध्ये प्रामुख्याने शीलावरण, वातावरण, जिवावरण, व जलावरण या प्रमुख बाबींचा समावेश होतो. पृथ्वीचे भुकवच, पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या बाहेरील असणारे वातावरण, त्या वातावरणाचे विविध घटक, पृथ्वीवरील वायुभार पट्टे, त्यांचा इतर अनेक घटकांवर होणारा परिणाम अभ्यासला जातो. तर मानवी भूगोल या विषयामध्ये मानव व पर्यावरण यामध्ये असणार्‍या सह संबंधांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलाचे महत्व, स्वरूप, व्याप्ती, याशिवाय त्यामध्ये मानवी लोकसंख्या, मानवी वसाहत, शेती इत्यादी मानवी जीवनाशी निगडीत बाबींचा अभ्यास केला जातो. मानवाच्या सभोवताली असणारे नैसर्गिक पर्यावरण, त्या पर्यावरणातील अनेक घटक मानवी जीवनावर परिणाम घडवून आणतात. लोकसंखेच्या बाबत भारतीय लोकसंख्या, तिची रचना, वितरण, त्यावर परिणाम करणारे घटक, जागतिक दृष्टिकोणातून लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत, भारतीय लोकसंख्या वाढीचे गुण दोष, तर भारतातील विविध वसाहतींचे प्रकार, आकृतीबंध, नागरीकरण, नागरीकरणाचे स्वरूप, देशात व राज्यातील नागरीकरणाची स्थिति, भारतीय शेती आणि शेतकरी यांची परिस्थिती, शेतीवर परिणाम करणारे घटक, शेती आणि शेतकरी यांच्या समस्या इत्यादी दृष्टीने अनेक बाबींचा ऊहापोह या विषयात विविध उदाहरणांच्या सहाय्याने करण्यात आला आहे.

    भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.

    Prakritik V Manavi Bhugol

    225.00
    Add to cart
  • प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)

    प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.

    प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.

    Prachin Bhartacha Itihas (BC 3000 to CE 1200)

    325.00
    Add to cart
  • प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1206)

    प्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथाच्या आधारे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेच MPSC, UPSC व NET, SET सारख्या महत्वपूर्ण स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रारंभीपासून सर्व परीक्षांच्या दृष्टीने असणारे महत्वपूर्ण घटक अगदी मुद्देसूद पद्धतीने स्पष्टीकरण केले असून सोप्या शब्दात वर्णन केले आहे.
    या ग्रंथात प्राचीन इतिहासाच्या उपलब्ध साधनांनुसार सिंधु संस्कृती, वैदिक संस्कृती, जैनधर्म, बौद्ध धर्म यासोबतच पूर्वीची राजकीय जीवनपद्धती, महाजनपदे आणि प्राचीन काळातील सर्वच महत्वपूर्ण राजघराण्यांविषयीची माहिती दिली आहे. प्राचीन भारतावर बौद्ध धर्माचा पडलेला प्रभाव स्वतंत्र प्रकरणाच्या अनुषंगाने दिला आहे. याशिवाय प्राचीन भारताचे सुवर्णयुग (गुप्तकाळ) सविस्तरपणे वर्णन केले आहे. तसेच भारतीय संस्कृतीची प्रारंभीची शैक्षणिक वाटचाल विविध विद्यापीठांची माहिती देऊन स्पष्ट केली आहे. प्राचीन स्त्रीजीवन, समाज, राज्य, अर्थ, संस्कृती व न्यायव्यवस्था याविषयीही योग्य ती माहिती सदर ग्रंथात दिली आहे.

    Prachin Bharatacha Itihas (Praranbhapasun Te CE 1206)

    225.00
    Add to cart
  • प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास

    जगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‌‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.

    160.00
    Add to cart
  • प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली

    मानवी सभ्यतेत ज्ञानाचे व शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या मानवी समुहाने आत्मसात केलेले ज्ञान हे त्याच्या प्रगतीचे व मानवी सभ्यतेचे द्योतक असते. भारतीय ज्ञानप्रणालीचे शिक्षण संक्रमणातील स्थान व एकूणच शैक्षणिक उत्क्रांतीतील महत्त्व व मानवी सभ्यतेचे ऐतिहासिक उल्लेख लक्षात घेता भारतीय ज्ञानप्रणाली व तिचे महत्व जाणून घेणे अगत्याचे आहे. मौखिक ज्ञान परंपरा, मानवी संस्कृतीला विविध आयाम प्रदान करणाऱ्या चालीरीती, सण-उत्सव, धार्मिक ग्रंथ, परंपरागत व्यवसाय, प्राचीन तंत्रज्ञान याद्वारे भारतीय ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांकडे संक्रमित होतांना दिसते. अर्थात भारतीय ज्ञानप्रणालीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. या ज्ञानप्रणालितूनच भारत एक राष्ट्र म्हणून सांस्कृतिक एकात्मतेच्या बहुसांस्कृतिक धाग्यात जोडला गेला आहे. भारतीय राष्ट्रवादाचे अधिष्ठान ‌‘भारतीय संस्कृतीत’ आहे, असे डॉ. राममनोहर लोहिया यांनी म्हटले आहे.

    – राजेंद्र नन्नवरे
    वन्यजीव अभ्यासक

    175.00
    Add to cart
  • प्रात्यक्षिक भूगोल

    Pratyakshik Bhugol

    475.00
    Add to cart