-
प्रात्यक्षिक भूगोल – II
Rs.295.00आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वंतत्र अस्तीत्व असणारी प्रमुख शाखा आहे. पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणाऱ्या अनेक घटनाबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. प्राचीन काळापासून ग्रीक व रोमन भूगोलकारांनी भौगोलीक ज्ञानाचा प्रसार केला. मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कांट या जर्मन तत्ववेत्याच्या भौगोलिक विचारांचा विशेष प्रभाव दिसून आला. त्याचप्रमाणे बफन व बूचर यांचेही भौगोलिक विचारांचे योगदान महत्वाचे ठरले. कालांतराने अठराव्या-एकोणाविसाव्या शतकात भूगोलकारांनी भूगोलाच्या विकासात वैज्ञानिक पद्धतीने सहभाग घेतला. सहाजिकच भूगोलाच्या अभ्यासात वाढ होत जाऊन भूगोलाच्या विस्तारात वाढ होत गेली. त्याचप्रमाणे पृथ्वीगोलावरील असलेली वेगवेगळी स्थळे, भूरूपे, वस्त्या, त्याच्यातील अंतरे, त्याचा आकार, विस्तार, त्या स्थळाची लांबी व रूंदी, प्राकृतिक व सांस्कृतिक सांकेतिक चिन्हे, इत्यादीची मोजमाप करत असतांना त्यातूनच प्रात्यक्षिक भूगोलाचा उगम होवून विस्तार होत गेला. प्रस्तुत पुस्तकात प्रत्येक घटकांचा ऊहापोह साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केल्याने विषय समजण्यास मदत होईल. आवश्यक तेथे आकृत्या व माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याने प्रात्यक्षिक भूगोलाचे ज्ञान व आकलन सहजतेने होईल.
Pratyakshik Bhugol
-
प्रादेशिक नियोजन आणि विकास
Rs.150.00प्रादेशिक संकल्पनाच्या विकासातील महत्वाचा टप्पा म्हणजे 20व्या शतकाचा प्रारंभ होय. या शतकात प्रादेशिक भूगोलांच्या अध्ययनावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला होता. 20 शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्स मधील प्रसिद्ध तज्ज्ञ विदाल-द-ला-ब्लाश, यांनी प्रादेशिक भूगोलाच्या अध्ययनावर लक्ष केंद्रीत करून या शाखेचा विकास घडवून आणला.
प्रादेशिक नियोजनाच्या संदर्भात नियोजन प्रक्रियांचा विचार करताना त्यामध्ये सर्व समावेशक घटकांची एकत्रित मांडणी आवश्यक असते. नियोजनाचा उपयोग वेगवेगळ्या विषयामध्ये अनेक वर्षापासून होत असला तरी प्रादेशिक नियोजन ही संकल्पना मात्र 20व्या शतकात प्रामुख्यान विकसित झालेली संकल्पना होय. सर्व साधारणपणे गेल्या 50 वर्षात जगातील विविध देशांनी सामाजिक व आर्थिक पातळ्यांवर एकत्र येऊन नियोजनाच्या माध्यमातून विकासाच्या संदर्भात विविध योजना तयार करण्यास सुरुवात केलेली दिसते. यातूनच प्रादेशिक नियोजनाची आवश्यकता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रादेशिक योजनाचा उपयोग विकसित व विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
प्रादेशिक नियोजनाची संकल्पना, वैशिष्ट्ये, महत्व, प्रादेशिक नियोजनाचे प्रकार, प्रादेशिक विकास, प्रादेशिक विकासाची आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय निर्देशके, प्रादेशिक विकासाचे सिद्धांत व प्रतिमाने, या सोबतच भारतातील प्रादेशिक नियोजन व विकासाशी संबंधित घटकांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे. निती आयोगाची सखोल माहिती देखील विविध संदर्भांच्या सहाय्याने नमूद करण्यात आली आहे.
Pradeshik Niyojan aani Vikas