• प्रादेशिक नियोजन आणि विकास

    प्रादेशिक नियोजन आणि विकास

    प्रादेशिक नियोजनाकरीता भूमी उपयोग, कृषी क्षेत्राचे संरक्षण, ग्रामीण व शहरी भागांचा विकास, औद्योगिक वसाहती, दळणवळणाचे मध्यवर्ती स्थान, पायाभूत सुविधा, लष्करी तळ आणि रिकाम्या जमिनी किंवा क्षेत्रांची आवश्यकता असते. यांच्या आधारे प्रादेशिक नियोजन साधले जाते. प्रादेशिक नियोजन हे एखाद्या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधा व पट्ट्यांची कार्यक्षमप्रणाली राबविणारे शास्त्र आहे. नियोजनांतर्गत एखादा ‘प्रदेश’ प्रशासकिय किंवा अंशतः कार्यशील असू शकतो आणि त्यात वस्ती आणि क्षेत्रीय नेटवर्कची वैशिष्ट्ये समाविष्ट असतात. एखाद्या प्रदेशाचे नियोजन हे त्या प्रदेशातील प्रादेशिक गरजा व उपलब्ध संसाधने यांना विचारात घेऊन केले जाते.

    भारतातील प्रादेशिक विकासात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, प.बंगाल, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत तर मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश व ओरीसा ही राज्ये मागासलेली आहेत. या सर्व राज्यांना समान पातळीवर आणण्याकरीता प्रादेशिक नियोजनाच्या माध्यमातून संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून केला जात आहे. प्रादेशिक नियोजन ही अलीकडच्या काळात प्रगत झालेली एक लोकप्रिय व आधुनिक संकल्पना आहे. ज्यात मर्यादित साधनांचा जास्तीत जास्त व पर्यायी उपयोग करून अधिकाधिक गरजांची पूर्तता करणे व जास्तीत जास्त लोकांना मुलभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवन सुखमय करयाच्या हेतूने संतुलित विकास साधून संबंधित प्रदेशातील लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्याचा स्वीकृत मार्ग म्हणजे ‘प्रादेशिक नियोजन’ होय.

    ‘प्रादेशिक नियोजन व विकास’ या विषयावरील शक्यतो प्रत्येक घटकावर या पुस्तकात चर्चा करण्यात आलेली आहे. पुस्तकात बर्‍याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सोप्या करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून आपल्याला हे कळेलच. याशिवाय नियोजनाचे प्रकार, उद्देश, दृष्टीकोन, विकास योजना, ग्रामीण विकास, आदिवासी विकास व विकासाचे प्रतिमान व सिद्धांत या बाबतीतले लिखाण या पुस्तकातून आम्ही केले असल्याने प्रादेशिक नियोजनाची व्याप्ती आपल्या लक्षात येईल.

    Pradeshik Niyojan aani Vikas

    Rs.150.00
    Add to cart
  • प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)

    प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)

    इतिहास हा विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने मनोरंजक, गोष्टीरूप व आनंददायी आहे. म्हणूनच तो लहानांपासून थोरांना आवडणारा विषय आहे. प्राचीन भारताच्या इतिहास अध्ययनातून आपल्याला भारतीय संस्कृतीची जडणघडण कशी झाली, याची माहिती प्राप्त होते. प्राचीन काळी या भूमीस ‘भारतवर्ष’ असे म्हटले गेले. प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात अश्मयुगापासून झाली. ताम्रपाषाण युगाच्या अखेरच्या काळात हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. प्राचीन भारताची सांस्कृतिक दृष्टीने जडणघडण होण्यास प्रामुख्याने आर्यांच्या काळात सुरुवात झाली. राजकीय दृष्टीकोनातून टोळ्यांचा काळ संपून विभाजित लोकसमूह एकत्र येण्याला या काळात सुरुवात झाली. याच कालखंडात प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनास चालना प्राप्त झाली. भगवान गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांनी अनुक्रमे बौद्ध व जैन धर्माची स्थापना केली. याच काळात बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा उदय, अलेक्झांडरची स्वारी या महत्वपूर्ण घटना घडल्या. मौर्य युगापासून प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासास सुरुवात झाली. मौर्य, कुशाण, सातवाहन, गुप्त, वाकाटक, हर्षवर्धन तर दक्षिणेत चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल इत्यादी कर्तबगार अशी राजघराणी प्राचीन भारतात होऊन गेली. भारतात वेळोवेळी आलेल्या ग्रीक, शक, पहलव, हूण इ. परकीय सत्तांनी भारतीय समाजव्यवस्था, कला, वास्तुशास्त्र, साहित्य यांच्या विकासात मोठी भर घातली. वैदिक, बौध्द, जैन, द्रविड यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून संयुक्त स्वरुपाची भारतीय संस्कृती उदयाला आली. म्हणून भारताच्या प्रारंभिक इतिहासाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

    Praranbhik Bharat (Progaitihasik Kal te Rashtrakut Kal)

    Rs.250.00
    Add to cart