-
भारतातील प्रवास आणि पर्यटन
Rs.250.00प्राचीन काळापासून ‘प्रवास’ ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आढळून येते. हळू-हळू मानव उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला, तसतसे त्याचे भ्रमंतीचे उद्देश्य तसेच वाहतूकीची साधनेही बदलत गेलीत. मोटारी, रेल्वे, विमान, जहाज इ. प्रगत व आधुनिक वाहतूकीची साधने उपलब्ध होत गेल्याने जगभर प्रवास करणे सुकर होत गेले. परिणामतः पर्यटन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वपूर्ण आर्थिक उद्योगक्षेत्र म्हणून विकसित झाले. सुक्ष्म नियोजन केल्यास पर्यटन क्षेत्राच्या साहाय्याने देशाचा आर्थिक व एकूणच सर्वांगीण विकास साध्य करणे कठीण नाही. भारतासारख्या भौगोलिक विविधता, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वप्राप्त देशात पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य स्थळे आहेत.
प्रस्तुत पुस्तकात पर्यटनाचा अर्थ, स्वरूप, उद्दिष्ट्ये, प्रकार, भूमिका, नियोजन, वाहतूक साधने, निवास व्यवस्था, मार्गदर्शक या संबंधीचे सचित्र विवेचन सविस्तररित्या केलेले असून भारतातील महत्त्वपूर्ण व निवडक अशा धार्मिक स्थळे, लेण्या, किल्ले, स्मारके इत्यादींची उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे.Bharatatil Pravas And Paryatan
-
भारतातील वस्तुसंग्रहालयांचा परिचय
Rs.350.00वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. युरोपात कालांतराने अनेक खाजगी वस्तुसंग्रहालये स्थापन झाली. फे्ंरच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये खाजगी संग्रहालयाचे रूपांतर सार्वजनिक संग्रहालयात करण्यात आले आणि ही प्रथा कालांतराने भारतात सुरू झाली. भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालने इ.स. 1814 मध्ये पहिले वस्तुसंग्रहालय कलकत्ता येथे स्थापन केले आणि या संग्रहालयात सर्व प्राचीन वस्तूंचा संग्रह करून ठेवण्यात आला. यानंतरच्या काळात वस्तुसंग्रहाच्या कक्षा रुंदावल्या आणि पारंपरिक संग्रहालयाची जागा आधुनिक संग्रहालयाने घेऊन पारंपरिकरीत्या वस्तूंचा संग्रह करण्याची पद्धती मागे पडून राष्ट्रीय, प्रांतीय, स्थानिक, संस्थात्मक पातळीवर वस्तूंचा संग्रह करून वस्तुसंग्रहालये हे ज्ञान देणार्या संस्था बनलेल्या आहेत. भारतातील विविध वस्तुसंग्रहालयात पाच हजार वर्षांच्या कलाविषयक, सांस्कृतिक व समृद्ध इतिहासाचा ठेवा जपून ठेवलेला आहे. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने व विषयवार आकर्षक पद्धतीने वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. संग्रहालयामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडण्यास मदत होते. मानवी स्वभाव, संस्कृती, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, करमणुकीची साधने, आहार-विहार इत्यादींसारख्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडते. प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक व पुरातत्वविषयक वस्तुसंग्रहालयाचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Bharatatil Vastusangrahalyancha Parichay