-
भारतीय अर्थव्यवस्था
Rs.225.00भारतीय अर्थव्यवस्था (भाग 3 व 4) या पुस्तकातील भाग-3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील पंचवार्षिक नियोजन, 12 वी पंचवार्षिक योजनांचे यश-अपयश, नीती आयोग, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वैशिष्टे, सहकार चळवळ, प्रादेशिक असमतोल, जलव्यवस्थापन इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तर भाग-4 मध्ये तसेच दारिद्य्राच्या संकल्पना, कारणे, बेरोजगारी प्रकार कारणे, दारिद्रय निर्मूलनाचे उपाय व बेरोजगारी निर्मूलनाचे उपाय इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तसेच यात प्रात्यक्षिक सबंधित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी मार्गदर्शक तत्वे, प्रात्यक्षिक लिखाण नमुना प्रात्यक्षिके दिलेली असून सोबतच प्रात्यक्षिक गुण विभागणी दिलेली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकनाचा नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
-
भारतीय अर्थव्यवस्था (1980 पासून) (भाग – 2)
Rs.425.00भारताचा विदेश व्यापार प्राचीन व अर्वाचीन काळापासून अनेक देशांशी चालत आलेला आहे. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. गोळा झालेला निधी कर्ज, उधारी, गुंतवणूक रूपाने उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्यासह आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंमत स्थैर्य आणि बँकींग क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या वस्तू किंवा सेवांचा उत्पादनखर्च तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो, अशा वस्तू उत्पादनात श्रम विभागणी आणि विशेषीकरण केले जाते, श्रम विभागणी आणि विशेषीकरणातून उत्पादनात वाढ होते. जागतिक पातळीवर जगातील बहुतांश देशांनी 1970 च्या दशकापासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतली आहे. आर्थिक सुधारणांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना बहुराष्ट्रीय कंपन्या महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. भारताने जुलै 1991 पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतीय वित्तीय प्रणाली, बँकिंग, विदेश व्यापार व व्यवहारतोल, जागतिकीकरण, संघीय वित्तीय प्रणाली, सरकारचा महसूल, खर्च, कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा इ. मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे.Bharatiya Arthavyavastha