• भारतीय लष्करी इतिहास

    भारतीय लष्करी इतिहास

    भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अतीप्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. आधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैशिक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. प्रस्तुत ग्रंथात युद्धविषयक निरनिराळे घटकांचे योग्य विश्लेषण करून, आकलन करून लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Rs.150.00
    Add to cart
  • भारतीय लष्करी इतिहास (भाग 2)

    भारतीय लष्करी इतिहास (भाग 2)

    मुघल आक्रमक बाबरने तोफांचा वापर केल्याने त्याला भारतात विजय मिळवून मुघल साम्राज्य स्थापन करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मुघल व आदिलशहा यांना आव्हान मिळाले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत आधुनिक युद्धतंत्राचा उपयोग करण्याचा मराठ्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. एकोणिसाव्या शतकात महाराजा रणजीतसिग यांनी शिख सेनेच्या रूपाने ब्रिटिशांसमोर मोठे आव्हान उभे केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात स्थापन केलेले सैन्य हे आजच्या आधुनिक सेनादलांचे प्रारंभिक स्वरूप मानावे लागेल. भारतात आलेल्या एका व्यापारी कंपनीने ऐतदेशीय लोकांचेच सैन्य स्थापन केले. या सैनिकांनीच इंग्रजांना हा देश जिंकून दिला… म्हणूनच विद्यार्थ्यांनी भारताचा लष्करी इतिहासाचे अध्ययन केल्याने ते राष्ट्रीय संरक्षणाबद्दल जागरूक होतील. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय लोकांनी दीर्घकाळ सीमांच्या संरक्षणाकडे व एकूणच देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेले आहे. परिणामी त्यांना परकीयांची गुलामगिरी करावी लागली. त्यामुळे त्यांना देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांची जाणीव करून देणे आवश्यक ठरते.

    Rs.150.00
    Add to cart