• माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्य

    माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्य

    भारतात वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी इ. माध्यमं ही प्रभावी प्रसारमाध्यमं म्हणून ओळखली जातात. या तिनही प्रसारमाध्यमांचा विचार केला तर जागतिकीकरणाच्या या कालखंडात मुद्रित आणि श्राव्य माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. यात वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम आहे तर आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी हे अनुक्रमे श्राव्य व दृकश्राव्य प्रसारमाध्यमं आहेत. विशेषतः आकाशवाणी व दूरचित्रवाणी यांचा विचार केला तर चोवीस तास चालणार्‍या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी, व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांचा आवाका व वेग इतका प्रचंड आहे की, त्यांच्या स्पर्धेत वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम टिकणार नाही अशी एक भीती निर्माण झालेली होती. परंतु ही भीती फोल ठरली. वृत्तपत्रांनी ऑनलाईन रूप धारण केलेले आहे तर श्राव्य माध्यमे ही चोवीस तास याप्रमाणे प्रसारित होत आहे. म्हणजेच या माध्यमांमधून व्यवसायाची मोठी संधी निर्माण झालेली दिसते. परंतु या माध्यमामध्ये काम करावयाचे असेल तर या माध्यमांसाठी आवश्यक असणारे लेखन कौशल्य हस्तगत करणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र? व कोणती पथ्य पाळायची? यासाठी सदर पुस्तक मार्गदर्शकाची भूमिका बजावेल यात शंका नाही.

    Madhymasanthi Lekhan and Sanvad Kaushalya

    Rs.95.00
    Add to cart
  • माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्ये (भाग-2)

    माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्ये (भाग-2)

    आधुनिक समाजमाध्यमे ही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, ट्विटर, यूट्युब या आधुनिक समाज माध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृक्श्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केलेले नाही तर या माध्यमांना अधिक विकसित व प्रगत बनवले. सोशन मिडिया म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख व स्थान निर्माण केले. व्यक्तिकेंद्री असणार्‍या सोशल मिडियाने सामाजिक अभिव्यक्तीला रचनात्मक व प्रयोगशील बनवले. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला. आशयाचे विविध पदर उलगडले. एवढेच नव्हे तर आभासी विश्वाला तसेच त्यावर नोंदवल्या जाणार्‍या मतांना वास्तवात दखल घेण्यास भाग पाडले. म्हणून मानवी संज्ञापन क्रांतितील सोशल मिडिया हा महत्वाचा टप्पा ठरतो.

    Madhyamasathi Lekhan V Sanvad Kaushalye (Bhag 2)

    Rs.155.00
    Add to cart