• मुलभूत बँकिंग

    मुलभूत बँकिंग

    भारत सरकारने 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहिर केले त्यात पदवी अभ्यासक्रम कालावधी चार वर्षाचा करण्यात आला. या धोरणात बहुआयामी, बहुविषयी दृष्टिकोन स्विकारण्यात आला. या मागील उद्देश विद्यर्थ्यांना सर्व विषयाचे किमान व्यावहारिक ज्ञान देवून एक संपन्न मानवी संसाधन निर्माण करणे आहे. विद्यापीठाने 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण स्विकारुन जुन/जुलै 2024 पासून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करुन त्यांची कार्यवाही केली. विद्यापीठात मानव्य विद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्या शाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, अशा तीन प्रमुख विद्या शाखा आहेत. यांच्यांत समन्वय निर्माण करण्यासाठी काही विषय Multidisciplinary म्हणून स्विकारणे निश्चित झाले.
    Fundamentals of Banking हा असा विषय आहे. ज्यात सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रस निर्माण, होईल. खरे तर भारताला जर 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करायची असेल तर देशातील सर्व नागरिकांमध्ये बँकींग विषयाचे ज्ञान आणि जाण असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम विद्यार्थी आणि नागरिकामध्ये जाण निर्माण करण्यात निश्चितच यशस्वी ठरणार.

    Rs.220.00
    Add to cart
  • मूलभूत आणि बोधात्मक मानसशास्त्र

    मूलभूत आणि बोधात्मक मानसशास्त्र

    मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‌‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. अगदी इ.स.पूर्व काळातील ग्रीक तत्ववेत्त्वे प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा अभ्यास केला. फ्राईडने मनोविश्लेषण सिद्धांत मांडून अबोध प्रेरणेचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तत्वज्ञ जॉन लॉक आणि थॉमस रेड यांनी अनुभववादाचा पुरस्कार केला. जर्मन तत्वचिंतक हर्बार्ट ‌‘मानसशास्त्र हे शरीरशास्त्र व तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे आहे’ असे मत मांडले. जर्मन शरीरशास्त्रज्ञ हर्मन हेल्महोल्टझ्‌‍ यांनी ‌‘शरीरशास्त्रीय साधनांच्या आधारे मानसिक घटनांचे स्पष्टीकरण करता येते’ असे मत मांडले. जर्मन शास्त्रज्ञ फेक्नर यांनी ‌‘एश्रशाशपीीं ेष झूीलहेहूीिळली’ हा ग्रंथ 1860 मध्ये लिहून मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्रीय कक्षेत आणले. म्हणून त्यास ‌‘मानसभौतिकीचा जनक’ मानतात. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळे विल्यम वुडण्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. अशा प्रकारे तत्त्वज्ञानाशी बांधलेले मानसशास्त्र आज एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले.

    Rs.325.00
    Add to cart