• लोकप्रशासन

    लोकप्रशासन

    प्रशासनाच्या व्यापक क्षेत्रातील लोकप्रशासन हा एक भाग आहे. लोकप्रशासनाचा सरळ अर्थ म्हणजे सरकारद्वारे केले जाणारे उपक्रम राबविणे. त्यालाच प्रशासकीय उपक्रम असेही म्हणता येते. लोकप्रशासनात ‌‘विकास प्रशासन’ या संकल्पनेचा समावेश दुसऱ्या जागतिक महायुध्दानंतर तुलनात्मक लोकप्रशासनाबरोबर झाला. ही एक गतिशील आणि परिवर्तनशील संकल्पना आहे; जी विशेषत: विकसनशील समाजात आर्थिक, सामाजिक, राजकीय परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकप्रशासनाच्या अभ्यासात विविध दृष्टीकोनांचा समावेश होतो. या दृष्टीकोनांमुळे लोकप्रशासनाच्या कार्याची व्याप्ती व ओळख होण्यास एकप्रकारे मदतच होते. लोकप्रशासनात सु-शासन, नोकरशाही, सेवक प्रशासन, उत्तरदायित्व आणि नियंत्रण या महत्त्वपूर्ण संकल्पनांचाही समावेश होतो. लोकप्रशासनात आर्थिक प्रशासन (बजेट) हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रशासकीय यंत्रणा संपूर्णपणे आर्थिक प्रशासनावर आधारित असते. सर्व वित्तीय प्रशासनाचे पूर्ण विचार अंदाजपत्रक हे केंद्रस्थानी असते. शासन कार्यात व त्या अनुषंगाने येणाऱ्या लोकप्रशासनाचे दिवसेंदिवस महत्त्व वाढते आहे. त्यामुळे यातील विविध प्रवाहाचा विस्तृत विचार करण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.

    Lokprashasan

    Rs.250.00
    Add to cart
  • लोकरंगभूमी

    लोकरंगभूमी

    लोकसाहित्य अभ्यासाची एक महत्वपूर्ण शाखा असलेली ‘लोकरंगभूमी’ आजच्या विज्ञानवादी युगात महत्वाची ज्ञानशाखा म्हणून पुढे आलेली आहे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतवस्थेत लोकसाहित्याचा महत्वाचा वाटा आहे. निसर्गाच्या अलौकिक रूपाच्या आर्त आळवणीतून लोकसाहित्य जन्मले. व्यक्त होणे ही मानवी प्रवृत्ती. व्यक्त होण्यामागे मानवी भावनांचा कार्यकारण भाव असतो. भावनांची अभिव्यक्ती केवळ मौखिक नसते तर ती शारीर पातळीवरही असते. म्हणूनच निसर्ग पूजनाच्या मौखिकतेला शारीरिक अभिव्यक्तीने दृश्यरूप दिले. त्यातूनच लोककलांचा म्हणजेच लोकरंगभूमीचा जन्म झाला. रंजन करणे हाच केवळ लोकरंगभूमीचा उद्देश्य नव्हता तर उदात्त मानवी मुल्यांच्या प्रसारासाठी म्हणजेच प्रबोधनासाठीही लोकरंगभूमी झटलेली पाहावयास मिळते. धार्मिक विधीनाट्य ते रिंगणनाट्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’ हा प्रबोधनाचा वसा लोकरंगभूमीने सोडलेला नाही.

    – डॉ. अक्षय घोरपडे

    Lokrangbhumi

    Rs.175.00
    Add to cart