• समाजशास्त्र : परिचय व मूलाधार

    समाजशास्त्र : परिचय व मूलाधार

    मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. शारीरिक गरजांच्या सोबतच त्याला मानसिक व भावनिक गरजांची पुर्तता करावी लागते. मानवाचे सामाजिक संबंध हे अत्यंत क्लीष्ट किंवा गुंतागुंतीचे असतात. ह्या संबंधांचे स्वरूप स्थिती व कालसापेक्ष स्वरूपात आढळून येते. विविध संकल्पनांमुळे आपणास त्या घटकाचे सूक्ष्म व समग्रज्ञान आत्मसात होते. नैसर्गिक वा भौतिक शास्त्रांप्रमाणेच सामाजिक शास्त्रातही संकल्पनांचा वापर केला जातो. जगाच्या पाठीवरील प्रत्येक समाजाला स्वत:ची एक स्वतंत्र संस्कृती असते. बाह्य वातावरण व संस्कृती यांचे व्यक्तीच्या मनावर सतत संस्कार होत असतात. जन्म, मृत्यू आणि विवाह या मानवी जीवनातील महत्वपूर्ण घटना मानल्या जातात. व्यक्ती कुटुंबात जन्म घेते व कुटुंब मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यात रुपांतर करते. जगभरातील प्रत्येक समाजात धर्माचे अस्तित्व आढळून येत असते. समाजाचे स्वरूप हे व्यक्तींच्या साधर्म्यातून तयार होते. सामाजिक संबंधांच्या आंतरक्रियेतून समाजव्यवस्थेची निर्मिती होत असते. सामाजिक संरचनेच्या घटकात नेहमी रचनात्मक व कार्यात्मक बदल होत जातो.

    Samajshastra Parichay Aani Muladhar

    Rs.250.00
    Add to cart
  • समाजशास्त्र परिचय

    समाजशास्त्र परिचय

    आधुनिक युगात समाजशास्त्रामध्ये नवीन परिवर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे समाजशास्त्राशिवाय सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य नाही. समाज, सामाजिक जीवन, सामाजिक घटना, व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्र हे पायाभूत सामाजिकशास्त्र असल्यामुळे त्याचे महत्त्व सर्वत्र मान्य करण्यात आले आहे. भारतीय सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्यामध्ये समाजशास्त्र विषयाचे विशेष योगदान आहे. समाजशास्त्र सामाजिक घटना व प्रक्रियांचे अध्ययन करते. समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे सामाजिक घटना व सामाजिक प्रक्रियांचा परिपूर्ण अभ्यास होतो. समाजशास्त्र नवनवीन परिस्थितीचे आयोजन करण्यास शिकविते. भारतात सर्वप्रथम 1919 मध्ये मुंबई विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर पॅट्रीक गिडीस व 1924 मध्ये डॉ. गोविंद घुर्ये यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली.
    सदरील पुस्तकात अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मूलभूत संकल्पना, समाजाचा सभासद असणार्‍या मानवी प्राण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान देत असलेल्या निरनिराळ्या सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचन, विचलन तसेच सामाजिक नियंत्रण, सामाजिक चळवळी, सामाजिक स्तरीकरण व परिवर्तन इ. घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

    Samajshastra Parichay

    Rs.295.00
    Add to cart