-
समाजशास्त्र परिचय
Rs.310.00समाजशास्त्राचा अभ्यास ही आधुनिक काळाची गरज आहे. समाजशास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजाचा जसाजसा विकास होत गेला तसतश्या सामाजिक घटना, घडामोडी व सामाजिक समस्या यातील जटीलता वाढली. त्यामुळे सामाजिक घटना व घडामोडीचा काल सुसंगत अर्थ लावून निरनिराळ्या सामाजिक समस्यांची कारणे शोधून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समाजशास्त्रात काळानुरुप नवनवीन दृष्टीकोन विकसित होत गेले व मानवी समाजजिवन सुखकर करण्यास समाजशास्त्राची मदत होत गेली. समाजशास्त्रात ‘समाज’ हा शब्द एक संकल्पना म्हणून उपयोगात आणली व संकल्पना म्हणूनच ‘समाज’ हा शब्द समाजशास्त्रात अभ्यासल्या जाते. मानवाच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, गरजापूर्तीसाठी माणुस स्वैर वर्तन करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा स्वैर वर्तनाने समाजात अराजकता निर्माण होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. व समाजजिवन विस्कळीत होईल असे होवू नये म्हणून सामाजिक नियंत्रणाच्या पद्धतीचे अध्ययन केले जाते.
प्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरुप व व्याप्ती तसेच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन देण्यात आली आहे. तसेच मानवाला जिवंत राहण्यासाठी विविध गरजांची परिपुर्ती करावी लागते. गरजांच्या परिपुर्तीसाठी मदत करणाचा विविध सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचलन, विचलन, सामाजिक नियंत्रण व्यक्तीमत्व विकास, सामाजिक चळवळी, सामाजिक स्पष्टीकरण व परिवर्तन, महिला सक्षमीकरण इत्यादी बाबींची समाजशास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे.Samajshastra Parichay
-
समाजशास्त्राचा परिचय
Rs.195.00समाजशास्त्राच्या बाबतीत 18 वे शतक हे एक संस्मरणीय शतक म्हणून ओळखले जाते. कोणत्याही समाजातील व्यक्तींचे पारस्पारीक संबंध कसे आहेत, त्या संबंधांचा मुलाधार कोणता आहे, ते संबंध परस्परांना प्रभावित करतात की नाही या बाबींचा अभ्यास समाजशास्त्रात करणे वर्तमानकाळाची गरज आहे. एकविसाव्या शतकाकडे झेपावणाऱ्या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. या शोधांमुळे मानवाचे अर्थशास्त्र, आहारशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान विकसित झाले. आधुनिक काळात समाजशास्त्र हा विषय एक उपयोजनात्मक विषय व व्यावहारवादी विषय मानला जात असल्यामुळे या विषयाचे अध्ययन व संशोधन करणाऱ्या अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तंत्रशिक्षण, व्यवस्थापन, प्रशासन, उद्बोधन, संगोपन, समुपदेशन व जाणीवांचा जागर करणाऱ्या व्यक्तीस ह्या विषयाचे महत्व पटू लागल्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासकांची संख्यात्मक व गुणात्मक वाढ होत आहे. प्रस्तुत ग्रंथात जुन्या आणि नवीन सिद्धांत व संकल्पनांचा सुरेख संगम साधला आहे. मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचे यथायोग्य विश्लेषण केले आहे.