-
Fundamentals of Chemistry – I
We are happy to place the first edition of CHE 101-T (MJ) Fundamentals of Chemistry – I, under faculty of Science and Technology, Savitribai Phule Pune University Pune, according to new syllabus implemented from year 2024-2025, as per National Education Policy – 2020.
This book is written as per New syllabus introduced from 2024-25. We have tried to explain the concepts and information in easy language so that students could understand it easily. We feel that the information is presented in a simple form for the better understanding of students.
This book includes explanation for each point, number of illustrative examples are given and exercise is given at the end of each topic for the benefit of students. In our view the book will fulfil the expectations of students and teachers.
We express our sincere thanks to our colleagues and persons who have helped us directly or indirectly during writing this book. -
आधुनिक जगाचा इतिहास (1453 – 2000)
अमेरिकन, फ्रेंच, औद्योगिक व रशियन क्रांतीला जगाच्या इतिहास महत्त्वपूर्ण स्थान आहे. अमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. अमेरिकेला यादवी युद्धाच्या संकटातुन अब्राहम लिंकनने सुखरुप बाहेर काढले; पण त्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागला. एकोणिसाच्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले.
बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात झाले. या महायुद्धाचे मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करुन सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतात राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करुन घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला. इजिप्त व इंडोनेशिया हे दोन्ही देश अनुक्रमे बिटिश आणि डचांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्त झाले. या सर्व घटनांचा सविस्तर इतिहास प्रस्तुत पुस्तकात देण्यात आला आहे.
Adhunik Jagacha Itihas (1453 – 2000)
-
-
आधुनिक जगातील घडामोडी
अमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. एकोणिसाव्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले. बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात होऊन मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करून सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतता राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करून घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांंततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला.
प्रस्तुत पुस्तकात प्रबोधनाचे युग, धार्मिक सुधारणा चळवळी, अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, इटाली व जर्मनीचे एकीकरण, मेईजी क्रांती, पहिले महायुद्ध व साम्यवादाचा उदय, विविध शांतता परिषदा, राष्ट्रसंघ, रशियन राज्यक्रांती, शीत युद्ध आणि सोव्हिएत रशियाचे विघटन इ. विविध मुद्द्यांचा सखोल विचारविमर्श केलेला आहे.Adhunik Jagatil Ghadamodi
-
आधुनिक भारताचा इतिहास (1757 ते 1857)
पूर्वेकडील राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी इ.स. 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यामुळे त्याचवर्षी व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रवेश केला आणि व्यापाराच्या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. या काळात भारतात अनेक लहान-लहान राजवटी होत्या. त्यांच्यात परस्परात नेहमी संघर्ष होत असत. यामधूनच राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच अस्थिरतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतात इ.स. 1757 मध्ये सत्ता स्थापन केली. इ.स. 1858 पर्यंत कंपनीने भारतावर राज्य केले. याच वर्षी कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन ती ब्रिटिश राजसत्तेच्या ताब्यात गेली. प्रस्तुत ग्रंथात कंपनीच्या राजवटीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Adhunik Bharatacha Itihas (1757 to 1857)
-
आधुनिक भारताचा इतिहास (1858 – 1947)
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला असला तरी येथील अराजकतेचा फायदा घेऊन कंपनीने आपले राज्य स्थापन केले. कंपनीने भारत देशाचे आर्थिक शोषण सुरु केले. परंतु पुढे भारतीय लोकांमध्ये सामाजिक, राजकीय व आर्थिक जागृती झाली. यामधुनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली. यापूर्वीच इ.स. 1858 मध्ये भारतावरील कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन व येथे ब्रिटनची सत्ता स्थापन झाली होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन केले. याच आंदोनालात क्रांतिकारक व स्त्रियानीही महत्त्वाचे योगदान दिले. शेतकरी व आदिवासी लोकांनी केलेले उठाव व केलेल्या चळवळी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात. संस्थानातील जनतेनेही प्रतिगामी राजवटींच्या विरोधात चळवळी केलया होत्या. राष्ट्रीय चळवळीपासून मुस्लिम लीग दूर राहीली. यामधूनच पुढे पाकिस्तान या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. इ.स. 1858 पासून इ.स. 1947 पर्यंतचा भारताचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विविध स्पर्धा परिक्षा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. व विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरणार आहे.
Adhunik Bharatacha Itihas
-
-
दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास (1206 ते 1526)
भारताचा सर्वप्रथम अरब आक्रमणांनी आक्रमणे केली. मुहम्मद बिन कासिम यांनी भारतावर पहिले आक्रमण केले. यानंतर तुर्कानी भारतावर आक्रमणे केली आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली. कुतुबुद्दीन ऐबक हे महंमद घोरी यांच्या भारतातील राज्याचे प्रतिनिधी होते. महमंद घोरी यांच्या मृत्युनंतर इ.स. 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतःला राज्याभिषेक करुन सुलतान ही पदवी धारण केली. त्यांच्या राज्याची राजधानी दिल्ली होती. ऐबक यांनी स्थापन केलेले हे राज्य भारतातील पहिले मुस्लिम राज्य होते. हे राज्य इ.स. 1526 पर्यंत अस्तित्वात होते. इ.स. 1206 ते इ.स. 1526 हा काल खंड दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. याचकाळात गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी राजवंशाने राज्य केले. याचकाळात दक्षिण भारतात विजयनगर व बहमनी राज्य होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व प्रशासन, कला आणि वास्तुकलेचा इतिहास दिला आहे.
Delhi Sultanshahicha Ithihas (1206 te 1526)
-
प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभ ते इ.स.1318)
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास लाखो वषार्र्ंचा आहे. मानवाला प्रगती करण्यासाठी अनेक घडामोडींतून वाटचाल करावी लागली. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन पंथांचा उदय झाला. या अनेक संप्रदायांपैकी (पंथ) जैन व बौद्ध धर्म हे प्रमुख आहेत. भारतीय संस्कृतीचा विदेशात प्रसार करण्याचे श्रेय बौद्ध धर्माला जाते. बौद्ध धर्माचे अनुकरण करून कालांतराने जैन, हिंदू, शैव व वैष्णव पंथांनी कलेच्या क्षेत्रात भरीव प्रगती केली.
इ.स.पू. सहाव्या शतकात भारताच्या सीमेवर परकीयांची आक्रमणे होण्यास सुरवात झाली. यानंतर ग्रीक, शक, कुशाण या सत्तांनी भारतावर आक्रमणे करून आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. मौर्य, गुप्त, वाकाटक व सातवाहन सम्राटांनी परकीय आक्रमणांना यशस्वीरित्या थोपविण्याचा प्रयत्न केला. गुप्त काळाला प्राचीन भारताच्या इतिहासात ‘सुवर्णकाळ’ म्हणून ओळखले जाते. इ.स. 1318 साली यादवांचे राज्य सुलतानाच्या ताब्यात गेले. मराठी मुलखात नाथ, महानुभाव व वारकरी संप्रदायांचा प्रभावच महाराष्ट्रीय संस्कृतीच्या अभ्युदयाला व मराठी भाषेच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरला.
हर्षवर्धनाच्या मृत्यूपासून मुस्लिम विजयापर्यंतचा भारतीय इतिहास राजपुतांच्या प्रभावामुळे ‘राजपूत युग’ या नावाने ओळखला जातो. प्राचीन भारतातील शिक्षणपद्धतीची माहिती संहिता, उपनिषदे, धर्मशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य व धर्मसूत्रावरून होते. काळाचा दीर्घ विस्तार, भावनांची समृद्धता, भाषेचे सौंदर्य व परिष्कृत कल्पनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय साहित्य अप्रतिम आहे. धर्म हाच प्राचीन भारतात कायद्याचा मुख्य आधार मानला जात होता. भारतात विविध जनपदांची सत्ता असल्याने परंपरागत कायदा सर्वत्र एकसारखाच न राहता विभिन्न प्रकारचा राहिला. प्राचीन भारतात विविध उद्योगधंद्याचा विकास झालेला होता.
सदरील ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांचेही सविस्तर विवेचन केले आहे.
प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Prachin Bharatacha (Praranbh Te CE 1318)
-
भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1756)
इ.स.1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी भारतात सर्वप्रथम मुस्लिम सत्तेची स्थापना केली. त्यांनी स्थापना केलेले राज्य सुलतानशाही या नावाने ओळखले जाते. जहिरूद्दीन बाबर यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीचे राज्य इ.स.1526 मध्ये जिंकून घेतले व त्याठिकाणी मुघल वंशाची स्थापना केली. दिल्लीचे सुलतान आणि मुघल सम्राटांनी संपूर्ण भारतावर राज्य केले. त्यांच्या काळात जी प्रादेशिक राज्ये होती ती सुलतानशाही व मुघलांची मांडलीक राज्ये होती. मुघल साम्राज्य इ.स.1857 पर्यंत अस्तित्वात असले तरी ते इ.स.1707 पर्यंतच प्रबळ व शक्तीशाली होते. यानंतर मात्र या साम्राज्याचा र्हास झाला. मध्ययुगात जी अनेक राज्ये स्वतंत्रपणे राज्य करीत होती. त्यापैकीच एक दक्षिण भारतातील मराठा राज्य होते. हे राज्यही शक्तिशाली राज्य होते. मुघल बादशाहाने सुद्धा स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी मराठा राज्यावर टाकली होती. तसा त्यांच्यात इ.स.1752 मध्ये एक करारही झाला होता. मुघल बादशाहाच्या संरक्षणासाठीच मराठ्यांनी अहमदशहा अब्दाली विरूद्ध युद्ध केले व ते त्यांच्याकडून पराभुत झाले. या पराभवामुळे व युद्धातील जीवित हानीमुळे मराठा राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर येथून पुढे मराठा राज्यही र्हासाकडे वाटचाल करू लागले. इ.स.1818 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने मराठा राज्य जिंकून घेतले. मध्ययुगात दिल्लीचे मुघल व महाराष्ट्रातील मराठा राज्य महत्वाचे होते. या दोन्ही राज्याच्या कालखंडातील भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक इतिहासाची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.
Bharatacha Itihas (1206-1756)
-
भारताचा इतिहास (इ.स. 1757 ते 1947)
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने इ.स.1757 मध्ये प्रथम बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला. पुढे हळूहळू संपूर्ण भारत देशावर आपली सत्ता स्थापन केली. इ.स.1857 मध्ये भारतीयांनी कंपनी सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यामुळे भारतात कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश सम्राटाची सत्ता आली. ब्रिटिश सरकारने इ.स. 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या कालखंडात भारताची भौतिक प्रगती झाली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणही झाले. परिणामी क्रांतिकारकांनी क्रांतिकारी चळवळ करून आणि जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा देऊन भारत देशाला ब्रिटनच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त केले. याच काळात भारतात सामाजिक व धार्मिक चळवळीही झाल्या. या सर्व घटकांचा इतिहास या ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, नेट, सेट व तत्सम स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.
Bharatacha Itihas (1757-1947)
-
भारतातील प्रवास आणि पर्यटन
प्राचीन काळापासून ‘प्रवास’ ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आढळून येते. हळू-हळू मानव उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला, तसतसे त्याचे भ्रमंतीचे उद्देश्य तसेच वाहतूकीची साधनेही बदलत गेलीत. मोटारी, रेल्वे, विमान, जहाज इ. प्रगत व आधुनिक वाहतूकीची साधने उपलब्ध होत गेल्याने जगभर प्रवास करणे सुकर होत गेले. परिणामतः पर्यटन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वपूर्ण आर्थिक उद्योगक्षेत्र म्हणून विकसित झाले. सुक्ष्म नियोजन केल्यास पर्यटन क्षेत्राच्या साहाय्याने देशाचा आर्थिक व एकूणच सर्वांगीण विकास साध्य करणे कठीण नाही. भारतासारख्या भौगोलिक विविधता, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वप्राप्त देशात पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य स्थळे आहेत.
प्रस्तुत पुस्तकात पर्यटनाचा अर्थ, स्वरूप, उद्दिष्ट्ये, प्रकार, भूमिका, नियोजन, वाहतूक साधने, निवास व्यवस्था, मार्गदर्शक या संबंधीचे सचित्र विवेचन सविस्तररित्या केलेले असून भारतातील महत्त्वपूर्ण व निवडक अशा धार्मिक स्थळे, लेण्या, किल्ले, स्मारके इत्यादींची उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे.Bharatatil Pravas And Paryatan
-
भारतातील वस्तुसंग्रहालयांचा परिचय
वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. युरोपात कालांतराने अनेक खाजगी वस्तुसंग्रहालये स्थापन झाली. फे्ंरच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये खाजगी संग्रहालयाचे रूपांतर सार्वजनिक संग्रहालयात करण्यात आले आणि ही प्रथा कालांतराने भारतात सुरू झाली. भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालने इ.स. 1814 मध्ये पहिले वस्तुसंग्रहालय कलकत्ता येथे स्थापन केले आणि या संग्रहालयात सर्व प्राचीन वस्तूंचा संग्रह करून ठेवण्यात आला. यानंतरच्या काळात वस्तुसंग्रहाच्या कक्षा रुंदावल्या आणि पारंपरिक संग्रहालयाची जागा आधुनिक संग्रहालयाने घेऊन पारंपरिकरीत्या वस्तूंचा संग्रह करण्याची पद्धती मागे पडून राष्ट्रीय, प्रांतीय, स्थानिक, संस्थात्मक पातळीवर वस्तूंचा संग्रह करून वस्तुसंग्रहालये हे ज्ञान देणार्या संस्था बनलेल्या आहेत. भारतातील विविध वस्तुसंग्रहालयात पाच हजार वर्षांच्या कलाविषयक, सांस्कृतिक व समृद्ध इतिहासाचा ठेवा जपून ठेवलेला आहे. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने व विषयवार आकर्षक पद्धतीने वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. संग्रहालयामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडण्यास मदत होते. मानवी स्वभाव, संस्कृती, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, करमणुकीची साधने, आहार-विहार इत्यादींसारख्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडते. प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक व पुरातत्वविषयक वस्तुसंग्रहालयाचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Bharatatil Vastusangrahalyancha Parichay
-
भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळींचा इतिहास
इसवी सनाच्या अठराव्या शतकात ब्रिटिश समाजात प्रबोधन झाले होते. समाजाचे आधुनिकीकरण ही झाले होते. परंतु भारतातील समाज मात्र सामाजिक आणि धार्मिक अंधश्रद्धेत गुरफटला गेला होता. धर्म व समाजात अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा व चालीरितीचे प्राबल्य निर्माण झाले होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली अस्पृश्यांना वाईट व अपमानास्पद वागणूक दिली जात होती, तर स्त्रियांवर अनेक प्रकारचे निर्बंध लावले जात होते. समाजात बालविवाह, सती प्रथा, जातीभेद, अस्पृश्यता इत्यादी प्रथा प्रचलित होत्या. या सर्व प्रथा समाजाला घातक होत्या. धर्मातही अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा रुढ झालेल्या होत्या. त्यामुळे धर्माचे मूळ तत्त्वज्ञान बाजुला पडले होते. म्हणूनच मूळ धर्म काय आहे, हेही समाजाला समजावून सांगणे आवश्यक होते. अशावेळी ब्रिटिश धर्म व संस्कृतीने प्रभावित झालेल्या भारतीय विद्धानांनी भारतात धर्म आणि समाज सुधारणा चळवळ सुरु केली. या चळवळीचे जनक राजा राममोहन रॉय ठरतात. पारशी, शीख व मुस्लिम समाजांतही समाज सुधारणा चळवळी झाल्या. दलितांचा उद्धार, अस्मृपश्ता निर्मूलन व स्त्रियांच्या उन्नतीसाठीही चळवळी झाल्या. या सर्व चळवळींचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला आहे.
Bharatatil Samajik V Dharmik Sudharna Chalwalincha Itihas
-
भारतीय कला आणि वास्तुकला
प्राचीन भारताच्या इतिहासात कलेला महत्वाचे स्थान होते. प्रागैतिहासिक काळापासूनच मानवाला कलेची आवड आहे. कला विविध प्रकारची असते. गुप्त काळात कला आणि स्थापत्याच्या क्षेत्रात भरीव स्वरुपाची प्रगती झाली. प्राचीन काळात मूर्तिकला, वास्तुकला, संगीत कला, नृत्यकला आणि चित्रकलेत मानवाने चांगलीच प्रगती केली होती.
कला ही मानवाच्या आवडीचा विषय आहे. मानवी जीवनाच्या सर्वोत्कृष्ट साधनांचे रूप कलेच्या माध्यमाने प्रकट होते. कला ही मानवाच्या सृजन आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या कल्पनेवर अवलंबून असते. मानवी जीवनात जे सुखद आणि आनंददायी अनुभव मिळालेले असतात, तेच कलेच्या माध्यमातून प्रकट होतात. कला ही कलाकाराच्या आंतरिक भावना, अनुभव, विचार व कल्पनेवर अवलंबून असते. स्थापत्य, वास्तू, काव्य, शिल्प, चित्र, नाट्य, संगीत इ. प्रकारांना ‘कला’ असे अभिधान आहे. मौर्य काळापासून वास्तुशिल्प कलेचा प्रारंभ झाला. मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन त्याचा प्रचारही केला. मौर्य काळापासूनच डोंगरात चैत्य आणि विहार नावाच्या नवीन वास्तू निर्माण करण्यास प्रारंभ झाला. बौद्ध धर्माशी संंबंधित चैत्य व विहार, जैन धर्माशी संबंधित जैन मंदिरे आणि हिंदू धर्माशी संबंधित अनेक देवदेवतांची मंदिरे अस्तित्वात आली. मानवाने हिंदू, बौद्ध, जैन आणि लौकिक मूर्तिशिल्पांची निर्मिती केली. वास्तुकलेतही चांगलीच प्रगती झालेली होती. वास्तुकलेत मंदिरे, विहार, स्मारके, स्तूप आणि लेणी स्थापत्याचा समावेश होतो. कांची, महाबलीपूरम, ऐहोळी, गांधार, पट्टदकल, वेरुळ, कंधार, कार्ले, भाजे, अजिंठा, पितळखोरा, बाघ, सांची, सारनाथ, अमरावती, आग्रा, फतेहपूर सिकरी, भुवनेश्वर आणि कोणार्क ही भारतातील कलेची केंद्रे होती. याशिवाय अनेक ठिकाणी विभिन्न प्रकारच्या कलेचा विकास झाला. या कलेला अनेक राजघराण्यांनी आश्रय दिला. यामध्ये सातवाहन, गुप्त, वाकाटक, राष्ट्रकूट, बदामी व कल्याणीचे चालुक्य, यादव, गंग आणि चोल घराणे उल्लेखनीय ठरते. प्रस्तुत ग्रंथात प्राचीन आणि मध्ययुगातील निवडक कला व वास्तुकलेचा इतिहास दिलेला आहे.
Bharatiy Kala Aani Vastukla
-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1858 ते 1947)
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ.स. 1757 मध्ये भारतात आपली सत्ता स्थापन केली, परंतु इ.स. 1857 मध्ये भारतीय संस्थानिकांनी कंपनीच्या विरोधात उठाव केल्यामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आली व येथे ब्रिटिश राजसत्ता स्थापन झाली. पुढे भारतात राष्ट्रवादाचा उदय होऊन इ.स. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरु केली. हीच चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळ होय. या चळवळीचे नेतृत्त्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांनी केले. याच चळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस व क्रांतिकारकांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. शेवटी इ.स. 1947 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातला स्वातंत्र्य मिळाले. या ग्रंथात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1858 te 1947)
-
मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1000 ते 1857)
इ.स. 1206 पासून इ.स. 1757 पर्यंतचा भारताचा कालखंड हा मध्ययुग समजला जातो. अरब मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणाच्यावेळी भारतात विभिन्न राज्ये होती. त्यांच्यात राजकीय एकतेचा अभाव होता. या काळात मुसलमान आक्रमक इस्लाम धर्माचा झेंडा हातात घेऊन आपल्या सैन्यानिशी भारताच्या सरहद्दीवर येऊन धडकले. मुहम्मद बिन कासिम, महंमद गझनी, कुतुबुद्दीन ऐबक, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक या आक्रमकांनी अनेक आक्रमणे करून संपत्तीची लूट केली. तुघलक साम्राज्याच्या विघटनातून दक्षिणेत बहमनी व विजयनगर साम्राज्याचा उदय झाला. इ.स. 1526 साली बाबर यांनी भारतावर आक्रमण करून दिल्ली सल्तनतचा शेवट केल्याने मुघल सत्तेचा ध्वज फडकू लागला. भारतात इस्लामी सत्ता स्थापन होण्यापूर्वी भारतीय कलेचा विकास झालेला होता. मध्ययुगात होऊन गेलेल्या अनेक साधुसंतांनी आपल्या काव्याद्वारे जनतेला उपदेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेविरुद्ध संघर्ष करुन मराठा सत्तेची स्थापना केली. तद्नंतर छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी अमूल्य योगदान देवून मुघल सत्ता खिळखिळी केली. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये महाराजा रणजितसिंह यांनी मुघलांना प्रखर विरोध करून स्वतंत्र शीख सत्तेची पायाभरणी केली. तद्नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कटकारस्थाने करून भारतात सत्ता स्थापन केली. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सल्तनत आणि मुघल काळातील राजकीय इतिहास, सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती, प्रशासन, कला, वास्तुकला व स्थापत्य कलेची सविस्तर माहिती दिली आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Madhyayugin Bharatacha Itihas
-
मराठा सत्तेचा उदय (इ.स. 1630 ते 1707)
Maratha Sattecha Uday (1630 A.D. to 1707 A.D.)
-
मोगलकालीन भारताचा इतिहास (१५२६ ते १७०७)
जहिरूद्दीन मोहम्मद बाबर यांनी २१ एप्रिल १५२६ रोजी दिल्लीचे सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव करुन भारतात मोगल राजघराण्याची सत्ता स्थापन केली. हे राज्य इ.स. १७०७ पर्यंत प्रभावी होते. तर इ.स. १७०७ पासून १८५७ पर्यंत नामधारी होते. या काळात दिल्ली ही राज्याची राजधानी होती. मोगल घराण्यात जहिरूद्दीन बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात मोगलकालीन भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती आणि प्रशासन, कला व वास्तुकलेचा आढाव घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Mogalkalin Bhartacha Ithihas (1526 te 1707)
-
विसाव्या शतकातील जगाचा इतिहास (1942 ते 1992)
Visavya Shatakatil Jagacha Itihas (1942 te 1992)