• उद्यमिता विकास

    उद्यमिता विकास

    उद्यमिता म्हणजेच उद्योजकता होय. गुणवत्ता पूर्ण उद्योजकता ही कारखान्यातून तयार करता येत नाही, तर ती उद्योजकीय संस्कारातून व उद्योजकीय प्रशिक्षणातून घडविता येते. व्यवसाय चालविण्यासाठी भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कामगारांची आवश्यकता असते हे आपण सहज मिळवू शकतो परंतु उद्योजकता किंवा उद्यमिता ही आयात करता येत नाही म्हणून उद्योजकता ही देशातल्या देशात निर्माण होत असते. उद्योजकता तयार होण्यासाठी उद्योजकीय संस्कार व उद्योजकीय प्रशिक्षण देवून उद्योजक निर्माण करू शकतो. उद्योजकता ही देशाला व समाजाला आर्थिक सुबत्ता प्राप्त करुन देते. तसेच देशाची प्रगती विकासाकडे वाटचाल करीत असते. म्हणून आजच्या तरूणपिढीत उद्योजकता रूजावी यासाठी जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणूनच उद्यमिता विकास याचे शिक्षण सर्वच विद्याशाखांमधून महाविद्यालयीन युवकांना दिले पाहिजे. उद्योजकतेला सर्वच देशांमधून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशाला विकसित होण्यासाठी उद्यमिता किंवा उद्योजकतेचे शिक्षण दिले पाहिजे.

    Rs.170.00
    Add to cart
  • उद्यमीता विकास