• कार्यक्रम व्यवस्थापन आणि योजना प्रणाली

    गृहअर्थशास्त्र या विषयाअंतर्गत विचार करता हा विषय मानवी जीवन सुबद्ध करण्यास फार उपयुक्त ठरतो. या अनुषंगाने या विषयांमध्ये मानवी जीवनात येणाऱ्या बऱ्याचशा घटकांचे अध्ययन केले जात असते. त्यापैकी कार्यक्रम व्यवस्थापन, कार्यक्रमाची गरज, महत्व, कार्यक्रम व्यवस्थापनाचा आधुनिक काळातील कल, कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रकार यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रम, सहकारयुक्त कार्यक्रम, व्यावसायिक कार्यक्रम, कार्यक्रम व्यवस्थापनाची तत्वे, कार्यक्रमाचा आराखडा, कार्यक्रम व्यवस्थापनाचे औद्योगिक स्थान, कार्यक्रम व्यवस्थापन नियोजन प्रक्रिया, कार्यक्रम व्यवस्थापनाद्वारे नोकरीचे मार्ग, नोकरीचे आवश्यक मार्गदर्शन, कार्यक्रम व्यवस्थापनाची जाळे या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.
    सदर पुस्तकात कार्यक्रम संघ, कार्यक्रम प्रशिक्षण, व्यवसाय आणि कल, शैक्षणिक, राजकीय, वैज्ञानिक कार्यक्रम, समिती, त्याची रचना, कार्य, जबाबदारी, कार्यक्रम व्यवस्थापकाचे गुण, कार्यक्रम व्यवस्थापन प्रणालीचा विकास, कार्यक्रम नियोजनाचे मूल्यांकन आदि विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.

    170.00
    Add to cart
  • कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट

    गृहव्यवस्थापन आणि अंतर्गत सजावट करतांना महिलांना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी महाविद्यालयीन स्तरापासूनच विद्यार्थिनींना व भावी गृहिणींना तसेच स्वतः व्यवसाय उभारणाऱ्या गृहिणीना सहकार्य करण्याच्या उद्देशाने लिखित हि पुस्तिका असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचे महत्व, विविध शाखा, कौटूंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया, रंग व रंग योजना, पुष्परचना, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कार्यसरलीकरणाचे महत्त्व, घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र, फर्निचर मांडणी, फर्निचर निवड व त्याची काळजी, जलसंधारण सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट, स्वयंरोजगार, गृहअर्थशास्त्रातील रोजगार संधी, महिला सक्षमीकरणात जिल्हा उद्योग केंद्र, स्वसहाय्यता गटाचे योगदान, महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका ब्लॉकचा परिचय, ब्लॉक प्रिंटींग तयार करणे, स्कार्फ, उशी, टेबल क्लॉथ हे सर्व प्रात्यक्षिक या सर्वभागाचा या पुस्तकात समावेश केला आहे. याचा उपयोग करुन उत्सुक महिला आवडीप्रमाणे व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतील. सदर पुस्तक हे विद्यार्थिनी, गृहिणी तसेच अध्यापकाकरिता उपयुक्त ठरणार आहे.

    Kautubik Sansadhanache Vyavsthapan V Antarik Sajawat (Part 1)

    525.00
    Add to cart
  • गृहअर्थशास्त्र आणि रोजगार संधी

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेऊन दिल्यानुसार प्रस्तुत ‌‘गृहअर्थशास्त्र व रोजगार संधी’ या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार तयार केलेले असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचा इतिहास, गृहअर्थशास्त्र परिभाषा, गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण, गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी, गृहअर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा, कौटुंबिक संसाधने, घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन, कुटुंबनिवास, फर्निचर, अंतर्गत सजावट, पुष्परचना याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन हा विषय सोपा करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थिनी व अध्यापकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.
    गृहअर्थशास्त्र आणि अंतर्गत सजावट याचा एकंदरीत विचार करता, गृहअर्थशास्त्र म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे गृह आणि अर्थ याचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य तो ताळमेळ बसवणारे शास्त्र म्हणजे गृहअर्थशास्त्र होय. गृहअर्थशास्त्राचा प्रारंभ हा बऱ्याच कालावधीपासून झालेला असून विकास प्रक्रियेचा प्रारंभ हा आणखी विस्तारित होत आहे. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी येणाऱ्या सर्व प्रक्रियेचा अंतर्भाव गृहअर्थशास्त्र विषयांमध्ये होत असतो. मानवाचा विकास व्हावा याकरिता मानवी जीवनामध्ये अनेकविध घटक असतात. त्यापैकी गृहव्यवस्थापन, अन्न व आरोग्यशास्त्र, वस्त्रशास्त्र, निर्णय प्रक्रिया, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जलसंधारणाची गरज, कचरा विल्हेवाटेची गरज, अंतर्गत सजावटीची संकल्पना, घरगुती पोशाख निवड व काळजी, पुष्परचनेचे विविध प्रकार या सर्वांचे अध्ययन यामध्ये अंतर्भूत असल्याने हा विषय गृहिणीबरोबर विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग व सर्वसामान्य पातळीवर सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या अनुषंगाने या विषयाची मांडणी केलेली असून ही पुस्तिका सामान्य वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

    375.00
    Add to cart
  • मानव विकास (भाग 1)

    श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती, येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून 27 वर्षापासून कार्यरत असून एक सामाजिक जाण असणाऱ्या प्राध्यापक म्हणून त्या सुपरिचित आहे. त्यांनी 2012 ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, विद्याशाखा सदस्य आहेत. आजपर्यंत 30 शोधनिबंध वेगवेगळ्या नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक चर्चासत्र, परिषदा, कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला असून त्यामध्ये त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहे. याआधी पुस्तकेही प्रकाशित झाली आहे. त्या श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र रिसर्च सेंटरच्या प्रमुख आहेत. त्या समाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. त्या लोकमत सखीमंच त्या समन्वयक होत्या. दर्यापूर येथील श्रीमती वेणुताई पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहे.

    195.00
    Add to cart
  • मानव विकास (भाग-2)

    पालकत्व म्हणजे खरतर घरामध्ये नित्यनेमाने घडणारे विविध छोटे मोठे प्रसंग, मतभेद, संघर्ष आणि अचानक उद्भवणार्‍या घटनावरील प्रतिसादांची एक न संपणारी मालिकाच असते. चांगल्या पालकत्वासाठी आवश्यकता आहे ती कौशल्याची. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखीमेचे झाले आहे. आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले असतात असा समज समाजामध्ये आढळतो. बालकाचा रंग, रुप, आकार, बौध्दिक क्षमता आपल्या आई वडिलाशी मिळते जुळते असते. वास्तविक शरीररचना व बाह्यवेषभूषेवरून चांगले अगर वाईट व्यक्तित्व ठरविणे दोषपूर्ण ठरेल. मानवी विकासाच्या विविध पैलूचा अभ्यास करतांना व्यक्तित्व इतरांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा व अभिवृत्ती यांना अनुसरून निश्चित होईल. व्यक्तिपरत्वे व्यक्तीत्व बदलत जाईल. नेतृत्व हे व्यक्तीसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष आहे. समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्व आहे.
    सदरील पुस्तकात अनुवंशिकता, वातावरण, विकासात यांची भूमिका, वातावरणाचे प्रकार, संयुक्त, विभक्त कुटुंबाची विकासात भूमिका, व्यक्तीमत्व संरक्षण यंत्रणा, स्वत्वकल्पना, प्रकार, नेतृत्व, प्रकार, गुण, बालकाच्या वर्तनसमस्या लैंगिक शिक्षण, महत्व, अपंग बालकाच्या शैक्षणिक अडचणी, किशोरावस्थेतील शारिरिक भावनिक बदल, सवयी, पालकत्व, प्रकार पालकबालक संबंध, महत्व, बालसंगोपनाच्या पद्धती, पालकांना आव्हान इ. विविध मुद्द्यांचा यथोचित समावेश केला आहे.

    Manav Vikas

    150.00
    Add to cart
  • मानव विकास व शासकीय कार्यक्रम

    मानव विकासाचा एकंदरीत विचार करता, मानव विकास काय ते प्रथम पहायला हवे. मानवाच्या विविध विकासाचा व वाढीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानव विकास होय. मानवी जीवनाचा प्रारंभ गर्भधारणेपासून होतो. गर्भधारणा ते किशोरावस्था या काळात मानवाची वृद्धी व विकास होतो. विकास प्रक्रियेचा प्रारंभ मात्र गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत सुरु असतो. निसर्गात असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवसृष्टीमधील श्रेष्ठतम अशी सृजनात्मक प्रक्रिया जेव्हा घडली तेव्हाच मनुष्य निर्मिती झाली. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. विकास प्रक्रियेवर आंतरिक तसेच बाह्य घटकांचा प्रभाव पडत असतो. बालवयात शारीरिक व मानसिक क्षमतांच्या स्वरूपात क्रमिक परिवर्तन होतात त्याला विकास म्हणता येईल. अशा प्रकारे मानवाच्या सर्वांगीण विकासाचे व विविध अवस्थेतील परिवर्तनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र हे मानव विकासशास्त्र होय असे म्हणण्यास हरकत नाही.

    Manav Vikas V Shaskiya Karyakram

    525.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती आणि बौद्धिक संपदा

    नवीन अभ्यासक्रमावर आधारित संशोधन पद्धती व बौद्धिक संपदा हे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय? संशोधन कसे व का करावे? संशोधनाच्या पद्धती कोणत्या? याचे सविस्तर ज्ञान देण्यास उपयुक्त असून संशोधन करताना संशोधकाने कोणत्या नियमाचे पालन करावे? कोणत्या बाबी लक्षपूर्वक हाताळाव्या याचे सविस्तर ज्ञान बौद्धिक संपदा या प्रकरणाद्वारे करून देण्यास पूरक आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पीएच.डी. करताना संशोधनाबद्दल जे ज्ञान संशोधकांना आवश्यक असते. शोध प्रबंध तयार करताना कशाप्रकारे तयार करावा. प्रबंध तयार करताना आवश्यक घटक याची पूर्तता कशी करावी याविषयीचे ज्ञान, या सर्वांच्या पायऱ्या, याचे पूर्वज्ञान व पूर्वतयारी या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून होणार असून सदर पुस्तिका विद्यार्थ्यांना, संशोधकांना तसेच प्राध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.

    395.00
    Add to cart
  • -11%

    संशोधन मार्गदर्शिका

    संशोधन मार्गदर्शिका (पीएच.डी. कोर्सवर्क) यात मॅडरेट 1 संशोधन पद्धतीचे 10 मार्कचा सेमिनार तर 10 मार्कची असाइन्मेंट, मॅडरेट 2 मध्ये ओळख माहिती तंत्रज्ञानाची (ICT) याचे पाचही युनिटवर सेमिनार, असाईन्मेंट असून यातील एकच सेमिनार 50 मार्कांकरिता आहे. मॅडरेट 3 रिसेन्ट ट्रेड इन सब्जेक्ट यात सेमिनार, असाइन्मेंट असून यातील एक सेमिनार 50 मार्काकरिता आहे. मॅडरेट 4 रिव्हीव्ह ऑफ लिटरेचर यात सुद्धा सेमिनार व असाईन्मेंट आहे. मॅडरेट 5 यावर आपल्या अध्ययन विषयावर एक सेमिनार 50 मार्कांकरिता आहे व यावरच RRC करिता सिनोप्सीस आवश्यक आहे. प्रत्येक संशोधकासाठी पीएच.डी. मार्गदर्शिका हे एक उत्कृष्ट पुस्तक ठरणार आहे.

    Original price was: ₹225.00.Current price is: ₹200.00.
    Add to cart