“आधुनिक किरकोळ विक्री व्यवस्थापन” (Modern Retail Management) हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.कॉम. भाग-2 साठी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत नवीन शैक्षणीक धोरणानूसार (NEP 2020) प्रणालीवर आधारित पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी माध्यमातून लिहिलेले पाठ्यपुस्तक आपल्या हाती देतांना आनंद होत आहे.
प्रस्तुत पुस्तकात किरकोळ विक्री व्यवस्थापन परिचय, भारतातील किरकोळ विक्री स्थिती, भारतातील किरकोळ विक्री क्षेत्राचा विकास, ग्रीन मार्केटींग, भारतीय अर्थव्यवस्थेत किरकोळ विक्रीचे महत्त्व, विक्री स्थान आणि आराखडा, किरकोळ विक्रीतील नोकरीच्या संधी, मर्चंडइझिंगची उत्क्रांती किंवा विकास, किरकोळ विक्री विशेषाधिकार किंवा मक्ताधिकार, किरकोळ विक्रीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मोहीम व्यवस्थापन, सांकेतीक पध्दती तंत्र इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.