गृहअर्थशास्त्र या विषयाअंतर्गत विचार करता हा विषय मानवी जीवन सुबद्ध करण्यास फार उपयुक्त ठरतो. या अनुषंगाने या विषयांमध्ये मानवी जीवनात येणाऱ्या बऱ्याचशा घटकांचे अध्ययन केले जात असते. त्यापैकी कार्यक्रम व्यवस्थापन, कार्यक्रमाची गरज, महत्व, कार्यक्रम व्यवस्थापनाचा आधुनिक काळातील कल, कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रकार यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रम, सहकारयुक्त कार्यक्रम, व्यावसायिक कार्यक्रम, कार्यक्रम व्यवस्थापनाची तत्वे, कार्यक्रमाचा आराखडा, कार्यक्रम व्यवस्थापनाचे औद्योगिक स्थान, कार्यक्रम व्यवस्थापन नियोजन प्रक्रिया, कार्यक्रम व्यवस्थापनाद्वारे नोकरीचे मार्ग, नोकरीचे आवश्यक मार्गदर्शन, कार्यक्रम व्यवस्थापनाची जाळे या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.
सदर पुस्तकात कार्यक्रम संघ, कार्यक्रम प्रशिक्षण, व्यवसाय आणि कल, शैक्षणिक, राजकीय, वैज्ञानिक कार्यक्रम, समिती, त्याची रचना, कार्य, जबाबदारी, कार्यक्रम व्यवस्थापकाचे गुण, कार्यक्रम व्यवस्थापन प्रणालीचा विकास, कार्यक्रम नियोजनाचे मूल्यांकन आदि विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.