
कृषी भूगोल आणि प्रात्यक्षिके
Rs.130.00सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024-25 पासून बदललेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (NEP 2020) OE (Open Elective) प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील भूगोल या विषयामधून घेतलेल्या प्रथम वर्षे कला व वाणिज्य या विद्यार्थ्यांसाठी (सेमिस्टर 1 व 2) कृषी भूगोल व कृषी भूगोलाचे प्रात्यक्षिक हे क्रमिक पुस्तक सर्व स्तरातील विदयार्थी, प्राध्यापक बंधूं व भूगोल प्रेमी यांना सुपूर्द करताना आम्हाला विशेष आनद होत आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक व सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याचा विचार करून सदर लिखाण करण्यात आलेले आहे.
भूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद, चालू घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. कृषी भूगोल या विषयाचा अभ्यास केल्या नंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये कृषी भूगोल विषया विषयी गोडी निर्माण होईल. प्रस्तुत पुस्तकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला असून योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास क्रमाशी निगडीत संज्ञा यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना तसेच स्पर्धात्मक परीक्षा या शिवाय नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे. प्राध्यापक मित्र, अभ्यासक व विद्यार्थ्यांनी या पुस्तकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल व पुढील आवृत्तीत निश्चितपणे यथायोग्य बदल केले जातील.
साधनसंपदा भूगोल व पर्यावरण
Rs.225.00साधनसंपदा भूगोल व पर्यावरण हे पुस्तक भूगोल व पर्यावरणाच्या संदर्भात एक सुस्पष्ट व संक्षिप्त मार्गदर्शन आहे. साधनसंपदा, भूगोल व पर्यावरण याबद्दलचे ज्ञान सुलभ आणि सुसंगत भाषेत विद्यार्थ्यांसाठी मांडले गेले आहे. यामध्ये संसाधनांची संकल्पना, वर्गीकरण, संसाधन भूगोलाचा परिचय, वन आणि जल संपदा, भू संपदा, खनिज आणि ऊर्जा संसाधने, मानवी साधनसंपदा, संसाधने आणि आर्थिक विकास तसेच भारत आणि महाराष्ट्रातील विविध संसाधनांचे वितरण आणि उपयोग यावर व्यापक विवेचन करण्यात आले आहे.
प्रस्तुत पुस्तकात या सर्व घटकांची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक आणि अभ्यासक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल. तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा आणि नेट/सेट परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल.


