-
मुद्रित एवं इलेक्ट्रॉनिक माध्यम लेखन और संपादन
1 x Rs. 234.00
Your cart is empty now.
Your cart is empty now.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या दृष्टीने ‘पंचायतराज’ ह्या पुस्तकात सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. भारताच्या लोकशाहीचा जिवंत चेहरा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या कामकाजातून दिसतो. ग्रामीण स्वशासनाची प्राचीन परंपरा, ब्रिटिश काळातील स्थानिक स्वराज्याचे प्रयोग, स्वातंत्र्योत्तर काळातील विविध समित्या आणि अखेरीस 73 व्या घटनादुरुस्तीने मिळालेला घटनात्मक दर्जा या संपूर्ण प्रवासातून लोकशाही तळागाळात रुजली आहे. या पुस्तकात ‘ग्रामीण स्वशासनाची उत्क्रांती’, प्राचीन ग्रामव्यवस्था, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आणि बलवंतराय मेहता, व्ही. पी. नाईक, एल. एन. बोंगीरवार, अशोक मेहता, पी. बी. पाटील समित्यांच्या शिफारशींचा संक्षिप्त, आढावा घेण्यात आला आहे.
प्रस्तुत पुस्तकात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत-ग्रामसभा यांची रचना, अधिकार आणि कार्ये तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी आणि सरपंच, ग्रामसेवक यांच्या भूमिकांचा व आव्हानाचा व्यावहारिक ऊहापोह केला आहे.ग्रामीण भारतातील निरक्षरता, भ्रष्टाचार, डिजिटल विभागणी यांसारख्या आव्हानांसोबतच मनरेगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांसारख्या योजनांची संधीही आहे. या योजनांची अंमलबजावणी व मूल्यांकनात पंचायत राज संस्थांची भूमिका, त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी आवश्यक सुधारणा यांचा संक्षिप्त पण विचारपूर्ण आढावा प्रस्तुत पुस्तकात घेण्यात आला आहे पंचायतराज वर उपलब्ध असलेल्या विविध संदर्भ ग्रंथांच्या आधार घेवून प्रस्तुत पुस्तक लिहिण्यात आले आहे.