Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तृतीय वर्ष कला (TYBA) या वर्गाच्या VSC (Vocational Skill Course) अंतर्गत या विषयाच्या जून 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP)...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पाणलोट व्यवस्थापन (Watershed Management)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तृतीय वर्ष कला (TYBA) या वर्गाच्या VSC (Vocational Skill Course) अंतर्गत या विषयाच्या जून 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) या पॅटर्ननुसार अभ्यासक्रमाला अनुसरून लिहिलेले “पाणलोट व्यवस्थापन” हे संदर्भ पुस्तक आमचे विद्यार्थी व प्राध्यापक बंधू भगिनी यांच्या हाती देतांना आम्हास विशेष आनंद होत आहे.
भूगोल हा विषय तसा गतिमान असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, भूगोल अभ्यास मंडळ यांनी याविषयाचा समाजाभिमुख अभ्यासक्रम तयार करताना भूगोलाच्या माध्यमातून अनेक चालू घडामोडींचा परामर्श घेतला आहे. काळानुरूप बी. ए. पदवी पर्यंतचा लागू केलेला अभ्यासक्रम भूगोल अभ्यास मंडळाचा एक आगळा वेगळा प्रयत्न असल्याने आजपर्यंत मराठीतून कमी पुस्तके पाणलोट व्यवस्थापन या विषयावर उपलब्ध आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही हे संदर्भ कम पाठ्यपुस्तक परिश्रम पूर्वक प्रयत्नांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेट वरील माहिती, वृत्तपत्रीय कात्रणे इत्यादींचा वापर केला आहे. या सर्व साधनांचा वापर करून अद्ययावत माहिती मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आमच्या या परिश्रम पूर्वक प्रयत्नाचे स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. 
भूगोल विषयाची बांधिलकी, तज्ञ अभ्यासकांशी चर्चा, अहवाल, चर्चासत्र, आमचा थोडासा अनुभव आणि काही मूळ संदर्भ ग्रंथ यांच्या आधारे क्रमिक पुस्तकाच्या निकषानुसार या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. पर्यावरणीय संकल्पनाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध आकृत्या, नवीन संकल्पना, तक्ते, नवीन संज्ञा सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सदरचे पुस्तक सध्यकालीन पर्यावरणीय घटकांवर आधारित असल्याने विविध स्पर्धात्मक परीक्षांना तसेच नेट /सेट परीक्षांना ही उपयोगी ठरेल असा प्रयत्न केला आहे.

प्रकण 1........................................................................ 9
पाणलोट व्यवस्थापनाची ओळख 1. पाणलोट व्यवस्थापनाची संकल्पना 2. पाणलोट क्षेत्राचे घटक : जमीन, पाणी, आणि वनस्पती 3. पाणलोट क्षेत्राची प्राकृतिक, सामाजिक -आर्थिक वैशिष्टे 4. पाणलोट क्षेत्राचे सीमांकन 5. क्षेत्रफळाच्या आधारावर पाणलोट क्षेत्राचे वर्गीकरण

प्रकण 2.......................................................................27
पाणलोट क्षेत्राची रचना आणि कार्य 1. पाणलोट क्षेत्राची आकारशास्त्रीय वैशिष्टे : रेखीय, क्षेत्रीय, आणि भूआकारात्मक 2. पाणलोट क्षेत्राची हवामानविषयक वैशिष्टे (जलचक्र) : बाष्पीभवन, संघनन, पर्जन्य, अवरोधन, आत झिरपणे, पाझरणे, बाष्पोत्सर्जन, भूपृष्ठिय प्रवाह, साठवण.

प्रकण 3.......................................................................50
पाणलोट व्यवस्थापन 1. भू -मूल्यंकनाची संकल्पना 2. भूी क्षमता मूल्यमापनाची संकल्पना अ) व्याख्या- भूक्षमता / जमीनची उत्पादक क्षमता ब) अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार जमीन क्षमता वर्गीकरण 3. भूी उपयुक्तता मूल्यमापन अ) व्याख्या- भूमी उपयुक्तता 4. अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार भूमी उपयुक्तता.

संदर्भ ग्रंथसूची ................................................................ 70

💬

Chat with us