Welcome to Prashant Publications

Rs. 295.00
Availability: 10 left in stock

आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वंतत्र अस्तीत्व असणारी प्रमुख शाखा आहे. पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणाऱ्या अनेक घटनाबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रात्यक्षिक भूगोल – II
- +

आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वंतत्र अस्तीत्व असणारी प्रमुख शाखा आहे. पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणाऱ्या अनेक घटनाबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. प्राचीन काळापासून ग्रीक व रोमन भूगोलकारांनी भौगोलीक ज्ञानाचा प्रसार केला. मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कांट या जर्मन तत्ववेत्याच्या भौगोलिक विचारांचा विशेष प्रभाव दिसून आला. त्याचप्रमाणे बफन व बूचर यांचेही भौगोलिक विचारांचे योगदान महत्वाचे ठरले. कालांतराने अठराव्या-एकोणाविसाव्या शतकात भूगोलकारांनी भूगोलाच्या विकासात वैज्ञानिक पद्धतीने सहभाग घेतला. सहाजिकच भूगोलाच्या अभ्यासात वाढ होत जाऊन भूगोलाच्या विस्तारात वाढ होत गेली. त्याचप्रमाणे पृथ्वीगोलावरील असलेली वेगवेगळी स्थळे, भूरूपे, वस्त्या, त्याच्यातील अंतरे, त्याचा आकार, विस्तार, त्या स्थळाची लांबी व रूंदी, प्राकृतिक व सांस्कृतिक सांकेतिक चिन्हे, इत्यादीची मोजमाप करत असतांना त्यातूनच प्रात्यक्षिक भूगोलाचा उगम होवून विस्तार होत गेला. प्रस्तुत पुस्तकात प्रत्येक घटकांचा ऊहापोह साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केल्याने विषय समजण्यास मदत होईल. आवश्यक तेथे आकृत्या व माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याने प्रात्यक्षिक भूगोलाचे ज्ञान व आकलन सहजतेने होईल.

Pratyakshik Bhugol