Your cart is empty now.
एखाद्या कवीच्या समग्र कवितांची शैलीवैज्ञानिक समीक्षा केलेला मराठीतील कदाचित हा पहिलाच प्रयत्न ठरावा.
शैलीविज्ञानावर सैद्धांतिक मांडणी केलेले लेखन मराठीत फारच थोडे आहे. उपयोजन केलेली समीक्षाही तशी दुर्मीळच. प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे बहिणाबाईंचा ध्यास घेतलेले, अनेकांगी अभ्यास असलेले चिंतनशील व वस्तुनिष्ठ विचार करणारे अभ्यासक आहेत. ऐतिहासिक, वर्णनात्मक, सामाजिक भाषाविज्ञान तसेच तुलनात्मक भाषाविज्ञान, बोलीभाषाविज्ञान आणि व्याकरण यांचे गाढे अभ्यासक या नात्याने त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्याशिवाय अशा विषयाला हात घालण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही. या मौलिक ग्रंथामुळे अभ्यासकांनाही दिशा प्राप्त होईल असा विश्वास वाटतो. शैलीविज्ञानाच्या अंगाने बहिणाबाईच्या गाण्यांचा अभ्यास मराठी समीक्षेत झालाच नव्हता ती उणीव ‘बहिणाईची गाणीः शैलीवैज्ञानिक समीक्षा’ या मौलिक संशोधन ग्रंथाने भरून काढली आहे. या क्षेत्रातील अभ्यासक, समीक्षकांसाठी हा ग्रंथ ‘माईलस्टोन’ ठरावा.