Welcome to Prashant Publications

Rs. 225.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. त्याअंतर्गत शैक्षणिक सत्र 2026-27...

  • Name : भारतीय वित्तीय संस्था (Financial Institutions of India)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBCom
  • Manufacturing : November 2026
  • Total Pages : 164 Pages
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय वित्तीय संस्था (Financial Institutions of India)
- +

विद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. त्याअंतर्गत शैक्षणिक सत्र 2026-27 करिता बी. कॉम. तृतीय वर्ष पाचवे सत्रकरिता Business Dynamics चा प्रमुख विषय (Major subject) म्हणून भारतातील वित्तीय संस्था या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. विद्यापिठाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. 
भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय संस्थांची रचना, कार्ये, महत्त्व, नियमन आणि आर्थिक विकासातील योगदान समजून घेण्यासाठी हा विषय आवश्यक आहे.त्यासाठि “भारतातील वित्तीय संस्था” हे पुस्तक विद्यार्थ्यांना भारतीय वित्तीय व्यवस्थेची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात बँका, विमा संस्था, विकास वित्तीय संस्था, सूक्ष्म वित्त संस्था, वित्तीय नियामक संस्था तसेच FinTech यांचा अभ्यास करण्यात आला आहे. वित्तीय संस्थांची भूमिका, कार्ये, महत्त्व, नियमन, आधुनिक प्रवाह आणि वित्तीय समावेशन यांची माहिती उदाहरणांसह दिली आहे. विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन सुलभ व्हावे आणि या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण केले आहे. परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरावे यासाठी प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. 

विभाग 1 : भारतातील वित्तीय संस्थांचा परिचय.................................7
1.1 वित्तीय संस्थांचा अर्थ, स्वरुप आणि कार्ये
1.2 वित्तीय संस्थांचे वर्गीकरण आणि रचना
1.3 आर्थिक विकासामध्ये वित्तीय संस्थांची भूमिका
1.4 भारतातील वित्तीय क्षेत्रातील सुधारणा

विभाग 2 : बँकिंग वित्तीय संस्था............................................40
2.1 अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये बँकिंग वितीय संस्थांची भुमिका
2.2 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि परदेशी बँका
2.3 विकास वित्तीय संस्था : सिडबी आणि एक्झिम बँक
2.4 नाबार्डः उद्दिष्टे आणि कार्ये

विभाग 3 : बँकेत्तर वित्तीय संस्था ..........................................68
3.1 बँकेत्तर वित्तीय कंपन्याः अर्थ आणि वैशिष्ट्ये
3.2 भारतातील विमा संस्था
3.3 म्युच्युअल फंडः संकल्पना आणि प्रकार
3.4 सूक्ष्म वित्तीय संस्था आणि स्वयं सहायता गट

विभाग 4 : वित्तीय संस्थांचे नियमन आणि उद्योन्मुख प्रवाह...............115
4.1 वित्तीय संस्थांची नियामक (नियंत्रणात्मक) चौकट
4.2 भारतीय रिझर्व बँक, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण यांची भूमिका
4.3 डिजिटल बँकिंग आणि फिनटेक
4.4 भारतातील वित्तीय संस्थांमधील अलीकडील प्रवाह आणि आव्हाने

💬

Chat with us