Your cart is empty now.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार, 2026-2027 या वर्षापासून टी.वाय.बी.ए. मानसशास्त्र विषयाकरीता नविन अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. यात सेेस्टर 5 व 6 करीता - मनोविकृतीशास्त्र हा अभ्यासक्रम अंतर्भूत केलेला आहे. नवीन अभ्यासक्रम आला की, विद्यार्थ्यांची तारांबळ उडणे साहजिक आहे. कारण नव्या अभ्यास क्रमात काळानुरूप नव्या बाबी बहुतेक करून समाविष्ट झालेल्या असतात. त्याचे अवलोकन व अभ्यास करताना अनेक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. कोणताही घटक हा एका पुस्तकातून पूर्ण होत नाही. त्यातून वेळ, पैसा, श्रम हे जास्तीचे खर्च होतात, ही अडचण लक्षात घेता अभासक्रमावर आधारीत विद्यार्थ्यांची ज्ञानाची गरज पूर्ण व्हावी. या हेतूने ‘मनोविकृतीशास्त्र’ या पुस्तकाचे प्रयोजन आहे. मनोविकृत मानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा असून मानवी असामान्य वर्तन, मानसिक प्रक्रिया आणि मानसिक विकारांचा शास्त्रीय अभ्यास करते. व्यक्तीच्या मानसिक विकारांचे स्वरूप, लक्षणे, कारणे आणि परिणाम समजून घेणे हा या विषयाचा प्रमुख उद्देश आहे. या अभ्यासक्रमामध्ये मनोविकृत मानसशास्त्राची मूलतत्त्वे, असामान्य वर्तनाचे निकष आणि मानसिक विकारांचे विविध दृष्टिकोन यांचा अभ्यास केला जातो. तसेच चिंतासंबंधित विकार, ताण व आघातसंबंधित विकार यांची लक्षणे, कारणमीमांसा आणि उपचारपद्धती समजावून घेतल्या जातात. देहलक्षण व संबंधित विकार तसेच विघटनात्मक विकारांचे स्वरूप, प्रकार आणि व्यवस्थापन यांचाही यात समावेश आहे. मानसिक विकारांचे निदान, नैदानिक मूल्यांकन आणि योग्य उपचारांचे महत्त्व या अभ्यासातून स्पष्ट होते. एकूणच, या विषयाच्या अध्ययनामुळे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन मानसिक विकारग्रस्त व्यक्तींकडे वैज्ञानिक, संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. या अभ्यासक्रमामध्ये मनोवृत्ती विकार, नैराश्य, द्विध्रुवीय विकार तसेच झोप व आहाराशी संबंधित विकारांचा अभ्यास केला जातो. याशिवाय व्यक्तिमत्त्व विकारांचे विविध प्रकार, त्यांची कारणमीमांसा आणि उपचारपद्धती समजावून घेतल्या जातात. तसेच भ्र विकार, स्किझो फ्रनिया आणि इतर मनो विकृ ती विकारांचे निदान व व्यवस्थापन यांचा सविस्तर अभ्यास केला जातो. एकूणच, या विषयाच्या अध्ययनामुळे मानसिक आरोग्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन, जागरूकता आणि मानसिक विकारग्रस्त व्यक्तींबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.