Welcome to Prashant Publications

Rs. 165.00
Availability: 10 left in stock

‘समाजभाषाविज्ञान’ ही अलीकडच्या काळात विकसित झालेली भाषाविज्ञानाची एक अभ्यासशाखा आहे. भाषा ही सामाजिक निर्मिती असल्याने भाषिक अभ्यासाच्या कक्षा या सामाजिक अभ्यासाशी नाते सांगणार्या ठरल्या आहेत. अशा अभ्यासाचे स्वरूप, त्याची व्याप्ती...

  • Name : समाजभाषाविज्ञान
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789388769082

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

समाजभाषाविज्ञान
- +

‘समाजभाषाविज्ञान’ ही अलीकडच्या काळात विकसित झालेली भाषाविज्ञानाची एक अभ्यासशाखा आहे. भाषा ही सामाजिक निर्मिती असल्याने भाषिक अभ्यासाच्या कक्षा या सामाजिक अभ्यासाशी नाते सांगणार्या ठरल्या आहेत. अशा अभ्यासाचे स्वरूप, त्याची व्याप्ती याबाबत अधिकाधिक मांडणी करण्याची निकड आजही कायम आहे. किंबहुना भाषेचे समाज आणि संस्कृती यांच्याशी असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी अशा अभ्यासदृष्टीची नितांत निकड आहे. यादृष्टीने डॉ. प्रभाकर जोशी यांचे हे पुस्तक लक्ष वेधून घेणारे आहे. समाजभाषाविज्ञान या विषयाचे स्वरूप व व्याप्ती या मुद्यांपासून सुरू होणारे हे पुस्तक या विषयातील मूलभूत संकल्पनांची विस्ताराने मांडणी करणारी आहे. समाजभाषा व संस्कृती, समाज-संस्कृती स्तरांवरील भाषाभेद, पाश्चात्य भाषावैज्ञानिकांचे प्रमुख सिध्दांत, भाषानिर्मितीचे सिध्दांत या तात्विक मुद्यांसंबंधीची विस्ताराने केलेली मांडणी हे या पुस्तकाचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भाषिक प्रश्न आणि लिपी या दोन निराळ्या मुद्यांसंबंधी विवेचन आलेले आहे. सातत्याने या अभ्यासविषयासंबंधी चिंतन-अभ्यास करणार्या डॉ. जोशी यांनी अध्यापक-विद्यार्थी यांच्यासाठी सुलभपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त करून देणारी आहे.