Welcome to Prashant Publications

Rs. 395.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात अंकेक्षणप्रणाली आणि नैतिकता...

  • Name : अंकेक्षणप्रणाली आणि नैतिकता - (Auditing and Ethics)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBcom | V
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 312 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अंकेक्षणप्रणाली आणि नैतिकता - (Auditing and Ethics)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात अंकेक्षणप्रणाली आणि नैतिकता हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. 
यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

प्रकरण 1........................................................................9
अंकेक्षण आणि व्यावसायिक नीतिमत्तेचा पाया
(Foundation of Audit & professional Ethics)
1.1 अंकेक्षणाची उत्क्रांती, विकास आणि तत्त्वे
1.2 अंकेक्षणाचा अर्थ, उगम, स्वरूप, उद्दिष्ट्ये, फायदे आणि मर्यादा
1.3 अंकेक्षणाचे प्रकार: अंतर्गत लेखापरीक्षण, वैधानिक लेखापरीक्षण, खर्च लेखापरीक्षण, व्यवस्थापन लेखापरीक्षण, आयकर कायदा आणि जीएसटी कायद्यांतर्गत कर लेखापरीक्षण.
1.4 लेखापरीक्षक: लेखापरीक्षकांची पात्रता, अर्हता, अपात्रता, मानधन, अधिकार, हक्क, कर्तव्ये, जबाबदाऱ्या
1.5 व्यावसायिक नीतिमत्ता
1.6 वर्गातील चर्चेसाठी प्रात्यक्षिक घटक

प्रकरण 2.......................................................................67
लेखापरीक्षण प्रक्रिया, लेखापरीक्षण दस्तऐवजीकरण आणि जोखीम मूल्यांकन (Audit Process, Documentation and Risk Assessment)
2.1 लेखापरीक्षण नियोजन आणि लेखापरीक्षण कार्यक्रम
2.2 लेखापरीक्षण पुरावे आणि लेखापरीक्षण दस्तऐवजीकरण
2.3 कार्यपत्रके आणि लेखापरीक्षण संचिका
2.4 अंतर्गत नियंत्रण आणि अंतर्गत तपासणी प्रणाली
2.5 लेखापरीक्षण जोखीम-अंतर्निहित जोखीम, नियंत्रण जोखीम, शोध जोखीम
2.6 लेखापरीक्षणातील महत्त्वता
2.7 मालमत्ता आणि दायित्वांचे प्रमाणन व पडताळणी
2.8 लेखापरीक्षकाचे अभिप्राय आणि लेखापरीक्षकाच्या अभिप्रायाचे प्रकार
बिनअटीचा / स्वच्छ अभिप्राय - सशर्त अभिप्राय, प्रतिकूल अभिप्राय, अभिप्राय देण्यास नकार
2.9 वर्गातील चर्चेसाठी प्रात्यक्षिक घटक

प्रकरण 3.....................................................................166
डिजिटल लेखापरीक्षण, न्यायवैद्यक लेखापरीक्षण आणि उदयोन्मुख प्रवाह
(Digital Auditing, Forensic Audit and Emerging Trends)
3.1 संगणक सहाय्यित लेखापरीक्षण तंत्रे
3.2 ERP वातावरणातील लेखापरीक्षण
3.3 डिजिटल व्यवहार आणि ई-कॉमर्स लेखापरीक्षण
3.4 लेखापरीक्षणामधील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विश्लेषण
3.5 न्यायवैद्यक लेखापरीक्षण : अर्थ, व्याप्ती आणि फसवणूक शोध तंत्रे
3.6 सायबर सुरक्षा आणि लेखापरीक्षकांच्या जबाबदाऱ्या
3.7 प्रात्यक्षिक घटक आणि वर्गचर्चेसाठी समकालीन प्रकरणे

प्रकरण 4.....................................................................236
कॉर्पोरेट गव्हर्नन्स, व्यावसायिक नीतिशास्त्र आणि शाश्वतता
(Corporate Governance, Business Ethics and Sustainability)
4.1 कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अर्थ व महत्त्व
4.2 भागधारक आणि त्यांच्याप्रती नैतिक जबाबदाऱ्या
4.3 व्हिसलब्लोइंग आणि सतर्कता यंत्रणा
4.4 कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व
4.5 विपणन, वित्त, मानव संसाधन व्यवस्थापन आणि डिजिटल व्यवसायातील नैतिक समस्या
4.6 शाश्वतता आणि नैतिक व्यावसायिक पद्धती
4.7 नैतिक नेतृत्व आणि जबाबदार निर्णयप्रक्रिया
4.8 प्रात्यक्षिक घटक आणि वर्गातील समकालीन प्रकरणांचा अभ्यास
4.9.1 भारतीय कंपन्यांच्या CSR अहवालांचे मूल्यमापन
4.9.2 व्यावसायिक नैतिक आव्हानांवरील गटचर्चा

प्रकरण 5.....................................................................261
अंकेक्षण, शाश्वतता आणि नीतिशास्त्र यामधील उद्योन्मुख प्रवाह
(Emerging Trends in Auditing, Sustainability and Ethics)
5.1 पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन अहवाल
5.2 शाश्वतता अंकेक्षण
5.3 हरित अंकेक्षण
5.4 शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संस्थांमध्ये हरित अंकेक्षण
5.5 ऊर्जा अंकेक्षण (Energy Audit - मूलभूत संकल्पना)
5.6 पर्यावरणीय अनुपालन अंकेक्षण
5.7 कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) आणि शाश्वतता
5.8 शाश्वत व्यावसायिक पद्धतींमधील नैतिक मुद्द

संदर्भ ग्रंथसूची...............................................................309

💬

Chat with us