Welcome to Prashant Publications

Rs. 335.00 10% OFF
Availability: 10 left in stock


विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP-2020) श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत...

  • Name : आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र - International Economic
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - V | Eco
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 240 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र - International Economic
- +


विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP-2020) श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘तृतीय वर्ष अर्थशास्त्र’ विषयामध्ये Major Core म्हणून सत्र 5 साठी ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ Eco 301 MJ (T) हा विषय 4 क्रेडीटसाठी लेखी पेपर म्हणून पदवी स्तरावर निश्चित केलेला आहे. ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ या पुस्तकातील प्रकरण-1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रः अर्थ, व्याख्या, व्याप्ती आणि महत्त्व, आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ व महत्त्व आणि आर्थिक वृद्धी व आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका याची माहिती देलेली आहे. तर या पुस्तकातील प्रकरण- 2 रे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातनवादी सिद्धांतांमध्ये, ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत, डेव्हीड रिकार्डो यांचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत, आधुनिक सिद्धांतामध्ये हेक्श्चर ओहलीन यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत, लिओनटिफ यांचा विरोधाभास, स्टोल्पर-सॅम्युएल्सन प्रशुल्क सिद्धांत, आंतर-उद्योग व्यापार इ. सिद्धांतांचे विश्लेषण केले आहे. तसेच प्रकरण 3 व्यापार धोरण यामध्ये व्यापाराचे लाभ, व्यापारशर्ती-अर्थ, प्रकार, व्यापारशर्ती निर्धारित करणारे घटक, विकसनशील देशांना व्यापारशर्ती प्रतिकूल असल्याची कारणे, व्यापारतोल व व्यवहारतोल संकल्पना, व्यवहारतोल घटक, व्यवहारतोल असंतुलन कारणे व त्यावरील उपाययोजना यासबंधी सविस्तर माहिती स्पष्टीकरण केले आहे.
तसेच शेवटचे प्रकरण 4 थे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक करार यामध्ये जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टये व करार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेची भूमिका व कार्ये, प्रादेशिक व्यापार करार, सार्क, ब्रिक्स स्वरूप आणि कार्ये, द्विपक्षी व्यापार धोरण, 1997 चे आशियाई वित्तीय संकट, जागतिक वित्तीय संकट 2008, युरो क्षेत्र संकट याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.

1. आंतरराष्ट्रीय अर्थशास्राची ओळख ......................................7
(Introduction Of International Economics)
1.1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र - अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व.
(International Economics - Meaning, Scope and Importance)
1.2 आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार.
(Inter-regional and International Trade)
1.3 आंतरराष्ट्रीय व्यापार - अर्थ आणि महत्त्व
(International Trade - Meaning and Importance)
1.4 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक वृद्धी
(International Trade and Economic Growth)

2. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत .........................................40
(International TradeTheories)
2.1 सनातनवादी सिद्धांत: (ॲडम स्मिथ आणिडेव्हीड रिकार्डो)
2.2 आधुनिकसिद्धांत (हेक्श्चर-ओहलिनचा सिद्धांत)
2.3 लिओनटिफचा विरोधाभास, स्टोल्पर-सॅम्युएल्सन प्रशुल्क सिद्धांत
2.4 आंतर-उद्योग व्यापार

3. व्यापाराच्या शर्ती ........................................................70
(Terms of Trade)
3.1 व्यापाराच्या अटी/ अटी : अर्थ, प्रकार, महत्त्व
(Terms of Trade)
3.2 व्यापाराच्या अटींचे निर्धारक घटक
(Determinant of Terms of Trade)
3.3 विकसनशील देशांसाठी व्यापाराच्या अटी प्रतिकूल असण्याची कारणे
(Causes of Unfavorable Terms of Trade to Developing Countries)
3.4 प्रतिकूल व्यापाराच्या अटी सुधारण्यासाठीचे उपाय
(Measures to correct the Unfavorable Terms of Trade)
3.5 व्यापार तोल आणि व्यवहार तोल - संकल्पना
(Balance of trade and Balance of payments - Concepts)
3.6 व्यवहार तोल - घटक (Balance of payments - Components)
3.7 व्यवहार तोलामधील असमतोल, कारणे आणि परिणाम
(Disequilibrium of Balance of Payments, Causes and Consequences)
3.8 व्यवहार तोलामधील असमतोल सुधारण्यासाठीचे उपाय
(Measures to correct Disequilibrium in the Balance of Payments)

4. आंतरराष्ट्रीय व्यापार करार.............................................117
(International Trade Agreements)
4.1 जागतिक व्यापार संघटना (WTO) : उद्दिष्टे आणि करार; आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) व जागतिक बँक (WB) : भूमिका आणि कार्ये. (WTO: Objectives and Agreements, IMF, WB: Role Functions)
4.2 प्रादेशिक व्यापार करार; सार्क (SAARC) व ब्रिक्स (BRICS) - स्वरूप आणि कार्ये; द्विपक्षीय व्यापार करार. (Regional Trade Agreements, SAARC, BRICS -Nature and Functions, Bilateral Trade Agreements.)
4.3 आशियाई वित्तीय संकट (1997), जागतिक वित्तीय संकट (2008), युरो क्षेत्रातील संकट (Asian Financial Crisis, 1997, Global Financial Crisis, 2008, Euro Zone Crisis.)

💬

Chat with us