-
मूलभूत सांख्यिकी (Basic Statistics)
1 x Rs. 315.00
Your cart is empty now.
Your cart is empty now.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचे जीवन शेती, शेतीपूरक व्यवसाय, ग्रामीण उद्योग, सेवा आणि नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती, समस्या आणि विकासाच्या संधी यांचा अभ्यास करणे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ठरते.
‘ग्रामीण अर्थशास्त्र’ या पुस्तकाची निर्मिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. पदवीच्या अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांकरिता मेजर/मायनर अभ्यासक्रमानुसार करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजाव्यात आणि त्या प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाशी जोडता याव्यात, या उद्देशाने विषयाची मांडणी साध्या व स्पष्ट भाषेत करण्यात आली आहे.
या पुस्तकामध्ये ग्रामीण अर्थशास्त्राचा परिचय, ग्रामीण संसाधने व पायाभूत सुविधा, ग्रामीण दारिद्य्र व बेरोजगारी, ग्रामीण बाजारपेठ व पतपुरवठा, ग्रामीण उद्योग व उद्योजकता तसेच ग्रामीण विकासाचे कार्यक्रम या सहा घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विषयाची मांडणी शक्य तितक्या सोप्या, सरळ आणि विद्यार्थीकेंद्रित भाषेत करण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदलत्या परिस्थितीचा विचार करून शेतीबरोबरच ग्रामीण पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, ग्रामीण उद्योग, उद्योजकता, स्वयं-सहाय्यता गट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका यांनाही या पुस्तकात महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भारत समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.