Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 (NEP-2020) नुसार बी.ए. भाग-III मानसशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. या अभ्यासक्रमांतर्गत सेमिस्टर VI (Level-5.5) साठी DSC-17...

  • Name : प्रायोगिक मानसाशास्त्र (Experimental Psychology)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : November 2026
  • Total Pages : 132 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रायोगिक मानसाशास्त्र (Experimental Psychology)
- +

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 (NEP-2020) नुसार बी.ए. भाग-III मानसशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. या अभ्यासक्रमांतर्गत सेमिस्टर VI (Level-5.5) साठी DSC-17 (T/P) PSY-323 प्रायोगिक मानसशास्त्र (प्रात्यक्षिक) हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मानसशास्त्रातील विविध मानसिक प्रक्रिया, प्रायोगिक पद्धती, प्रायोगिक नियंत्रण आणि मनोभौतिकी यांचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार अध्ययन करताना विद्यार्थ्यांना विविध संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. अनेकदा अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाची सविस्तर माहिती एकाच पुस्तकात उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतात. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा समावेश असलेले, सोप्या आणि सुबोध भाषेत लिहिलेले तसेच परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रायोगिक मानसशास्त्रातील संकल्पना समजून घेता याव्यात, त्यांचा प्रत्यक्ष अभ्यास करता यावा आणि मानसशास्त्रीय संशोधनाची शास्त्रीय दृष्टी विकसित व्हावी, हा प्रस्तुत पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रमुख हेतू आहे.
प्रायोगिक मानसशास्त्र हे मानसशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण अध्ययनक्षेत्र असून, मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. प्रस्तुत पुस्तकाच्या पहिल्या घटकामध्ये प्रायोगिक मानसशास्त्राचा संक्षिप्त इतिहास, स्वरूप, व्याप्ती, गरज, उद्दिष्टे, अभ्यासाच्या पद्धती, वैशिष्ट्ये, मर्यादा, संशोधनातील नैतिकता आणि त्रुटींचे स्रोत यांचे विवेचन केले आहे. दुसऱ्या घटकामध्ये चलांची संकल्पना, व्याख्या व प्रकार, प्रायोगिक नियंत्रणाचे महत्त्व, स्वतंत्र, अवलंबित व बाह्य चलांचे नियंत्रण, अवलंबित चलांचे मापन आणि प्रायोगिक नियंत्रणाच्या विविध तंत्रांचा आढावा घेतला आहे. या घटकांमुळे विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय प्रयोगांचे नियोजन, अंमलबजावणी, नियंत्रण आणि निष्कर्षांचे शास्त्रीय विश्लेषण यांविषयी आवश्यक ज्ञान प्राप्त होईल.
पुस्तकाच्या तिसऱ्या घटकामध्ये अवधान आणि प्रत्यक्षीकरण या महत्त्वपूर्ण मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करताना अवधानाचे स्वरूप, व्याप्ती, प्रकार, वैशिष्ट्ये, 6 | प्रशांत पब्लिकेशन्स 
विस्तार, विभाजन, चढ-उतार, विचलन तसेच बॉटलनेक सिद्धांत, स्वयंचलित व नियंत्रित प्रक्रिया आणि वैशिष्ट्य एकत्रीकरण सिद्धांत यांचे विवेचन केले आहे. त्याचबरोबर प्रत्यक्षीकरणाचे स्वरूप, प्रक्रिया, वैशिष्ट्ये, अंतराचे प्रत्यक्षीकरण आणि प्रतिक्रिया वेळेचे प्रकार व निर्धारक स्पष्ट केले आहेत. चौथ्या घटकामध्ये मनोभौतिकीचे स्वरूप, व्याख्या, मूलभूत संकल्पना, परिवर्तनशील, स्थिर व आकस्मिक त्रुटी, मर्यादा पद्धत, स्थिर उद्दीपकांची पद्धत आणि सरासरी त्रुटीची पद्धत यांचा समावेश केला आहे. तसेच वेबरचा नियम, फेक्नरचा नियम, सिग्नल डिटेक्शन सिद्धांत (SDT) आणि त्याचे उपयोग यांचे स्पष्टीकरण दिले आहे. वैद्यकीय, औद्योगिक, जाहिरात आणि क्रीडा क्षेत्रांतील मनोभौतिकीचे उपयोग तसेच मानवी संवेदनात्मक प्रतिसादांच्या अभ्यासातील तिचे महत्त्व यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. या सर्व घटकांच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, निरीक्षणकौशल्य आणि संशोधनवृत्ती विकसित होण्यास मदत होईल.

प्रकरण 1........................................................................9
प्रायोगिक मानसशास्त्राचा आढावा
An Overview of Experimental Psychology
1.1 प्रायोगिक मानसशास्त्र : संक्षिप्त इतिहास, स्वरूप आणि व्याप्ती
1.2 प्रायोगिक मानसशास्त्राची गरज आणि उद्दिष्टे
1.3 प्रायोगिक मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती
1.4 प्रायोगिक मानसशास्त्राची वैशिष्ट्ये आणि मर्यादा
1.5 प्रायोगिक मानसशास्त्रातील नैतिकता आणि त्रुटींचे स्रोत

प्रकरण 2.......................................................................46
प्रायोगिक नियंत्रणाची तंत्रे
Techniques of Experimental Control
2.1 चल : स्वरूप, व्याख्या आणि प्रकार
2.2 प्रायोगिक नियंत्रणाचे महत्त्व
2.3 चल आणि बाह्य चलांचे नियंत्रण
2.4 अवलंबित चलांचे मापन
2.5 प्रायोगिक नियंत्रणाची तंत्रे

प्रकरण 3.......................................................................67
अवधान आणि प्रत्यक्षीकरण प्रक्रिया
Processes of Attention and Perception
3.1 अवधान : स्वरूप, व्याप्ती आणि प्रकार
3.2 अवधानाची वैशिष्ट्ये
• अवधानाचा विस्तार
• अवधानाचे विभाजन
• अवधानातील चढ-उतार
• अवधानाचे विचलन
3.3 अवधानाचे सिद्धांत
• अडथळा / बॉटलनेक सिद्धांत
• स्वयंचलित प्रक्रिया विरुद्ध नियंत्रित प्रक्रिया
• वैशिष्ट्य एकत्रीकरण सिद्धांत
3.4 प्रत्यक्षीकरण : स्वरूप, प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये
3.5 अंतराचे प्रत्यक्षीकरण आणि प्रतिक्रिया वेळ, घटक आणि प्रकार

प्रकरण 4.....................................................................106
मनोभौतिकी
Psychophysics
4.1 मनोभौतिकी : स्वरूप, व्याख्या आणि मूलभूत संकल्पना
4.2 मनोभौतिकीतील त्रुटी
• परिवर्तनशील त्रुटी
• स्थिर / सातत्यपूर्ण त्रुटी
• आकस्मिक त्रुटी
4.3 मनोभौतिकीच्या पद्धती
• मर्यादा पद्धत
• स्थिर उद्दीपकांची पद्धत
• सरासरी त्रुटीची पद्धत
4.4 वेबरचा नियम, फेक्नरचा नियम आणि सिग्नल डिटेक्शन सिद्धांत
SDT चे उपयोग
4.5 मनोभौतिकीचे उपयोग
• वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग
• औद्योगिक क्षेत्रातील उपयोग
• जाहिरात क्षेत्रातील उपयोग
• क्रीडा क्षेत्रातील उपयोग
• मानवी संवेदनात्मक प्रतिसादाच्या अभ्यासातील मनोभौतिकीचे
महत्त्व

💬

Chat with us