Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध विद्याशाखांतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत श्रेयांक व सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तृतीय...

  • Name : मूलभूत सांख्यिकी (Basic Statistics)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : November 2026
  • Total Pages : 222 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मूलभूत सांख्यिकी (Basic Statistics)
- +

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध विद्याशाखांतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत श्रेयांक व सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तृतीय वर्ष कला (TYBA) अर्थशास्त्र विषयातील Major DSE, Theory-EL (B), अंतर्गत सत्र-5 साठी संकेतांक:- 613211 नुसार ‘मूलभूत सांख्यिकी’ हा विषय 4 श्रेयांकांसाठी निश्चित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विषयाचे सैद्धांतिक ज्ञान तसेच प्रत्यक्ष माहितीचे विश्लेषण करता यावे, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा अत्यंत सोप्या, सुबोध व सविस्तर भाषेत आढावा घेतला आहे. पुस्तकातील घटक 1 मध्ये सांख्यिकीची व्याख्या, व्याप्ती, महत्त्व, मर्यादा व अर्थशास्त्रातील तिची कार्ये मांडली आहेत. घटक 2 मध्ये सामग्री संकलनाचे प्रकार: प्राथमिक व दुय्यम, आणि संकलनाच्या पद्धती: जनगणना, नमुना निवड, प्रश्नावली व अनुसूची स्पष्ट केल्या आहेत. घटक 3 मध्ये सामग्रीचे वर्गीकरण, सारणीयन आणि वारंवारता वितरणाची मांडणी केली आहे. घटक 4 व 5 मध्ये अनुक्रमे केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे : समांतर मध्य, मध्यका व बहुलक आणि अपस्करणाची परिमाणे: मध्य विचलन व प्रमाण विचलन, या घटकांचे गणितीय स्पष्टीकरण व उपयोग समाविष्ट केले आहेत. तसेच घटक 6 मध्ये निर्देशांकाचा अर्थ, प्रकार आणि त्याच्या रचनेच्या पद्धती यांचा सखोल समावेश करण्यात आला आहे.
या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर आधारित ज्ञान न देता, सांख्यिकीय पद्धतींचे व्यावहारिक उपयोजन, गणितीय संकल्पनांचे स्पष्टीकरण आणि माहितीचे शास्त्रीय विश्लेषणात्मक आकलन व्हावे यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच अर्थशास्त्रातील विविध संकल्पना, आकडेवारी, तक्ते, आलेख व त्यांचे विश्लेषण करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक ठिकाणी उदाहरणे आणि स्पष्टीकरणांचा वापर करण्यात आला आहे. तसेच, या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मूल्यांकनासाठी नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रश्न देण्यात आले आहेत. दीर्घोत्तरी 
प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, टिपा, संकल्पनात्मक प्रश्न तसेच आवश्यक त्या ठिकाणी तक्ते व आकृत्यांच्या आधारे सराव करण्यासाठी प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन, लेखनकौशल्य, आकडेवारीचे विश्लेषण आणि परीक्षेची तयारी या सर्व बाबतीत हे पुस्तक उपयुक्त ठरेल 

प्रकरण 1..............................................................7
सांख्यिकी ओळख
(Introduction to Statistics)
1. सांख्यिकीचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती
2. सांख्यिकीचे महत्त्व आणि मर्यादा
3. अर्थशास्त्रातील सांख्यिकीची कार्ये

प्रकरण 2............................................................32
माहिती संकलन
(Collection of Data)
1. माहितीचे प्रकार: प्राथमिक आणि दुय्यम सामग्री
2. माहिती संकलनाच्या पद्धती: (जनगणना पद्धत आणि नमुना निवड पद्धत)
3. माहिती संकलनाचे मार्ग: प्रश्नावली आणि अनुसूची पद्धत

प्रकरण 3............................................................68
माहितीचे वर्गीकरण आणि सारणीकरण
(Classification and Tabulation of Data)
1. माहितीचे वर्गीकरण: अर्थ आणि प्रकार
2. सारणीकरण: अर्थ, उद्दिष्टे आणि प्रकार
3. वारंवारता वितरण

प्रकरण 4...........................................................111
केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे
(Measures of Central Tendency)
1. केंद्रीय प्रवृत्तीचा अर्थ आणि वैशिष्ट्ये
2. समांतर मध्य (सरासरी): उपयोग, गुण, दोष आणि गणना
3. मध्यक आणि बहुलक: उपयोग, गुण, दोष आणि गणना

प्रकरण 5...........................................................147
अपस्करणाची /विचलनाची परिमाणे
(Measures of Dispersion)
1. अपस्करणाचा अर्थ आणि महत्त्व
2. मध्य विचलन: उपयोग, गुण, दोष आणि गणना
3. प्रमाण विचलन: उपयोग, गुण, दोष आणि गणना

प्रकरण 6...........................................................180
निर्देशांक
(Index Numbers)
1. निर्देशांकाचा अर्थ आणि उपयोग
2. निर्देशांकाचे प्रकार
3. निर्देशांक रचनेच्या पद्धती (साधी एकत्रित पद्धत आणि मूल्य गुणोत्तर पद्धत)

नमुना प्रश्नपत्रिका...................................................213

संख्यात्मक सराव प्रश्न..............................................215

संदर्भ ग्रंथसूची......................................................219

💬

Chat with us