Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रकाशन व्यवसाय आणि सृजनशील लेखन या दोन घटकांवर हा अभ्यासक्रम आधारलेला असून भाषासाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही दोन्ही घटके केवळ अभ्यासच नव्हे तर, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी उपयोगाची आहे. लेखक, वाचक,...

  • Name : व्यावसायिक कौशल्ये (Professional Skills)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - 5 & 6
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 118 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यावसायिक कौशल्ये (Professional Skills)
- +

प्रकाशन व्यवसाय आणि सृजनशील लेखन या दोन घटकांवर हा अभ्यासक्रम आधारलेला असून भाषासाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही दोन्ही घटके केवळ अभ्यासच नव्हे तर, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी उपयोगाची आहे. लेखक, वाचक, साहित्य चळवळ आणि ग्रंथप्रसारांमध्ये प्रकाशन व्यवसायाने भरीव योगदान दिलेले आहे. ज्ञान आणि अभ्यासाच्या क्षेत्रात प्रकाशन व्यवहार नसता तर, मानवी ज्ञान हे संकुचित वर्तुळात बंदिस्त असते. ज्ञानाचा व्यापक अवकाश निर्माण करण्यामध्ये प्रकाशन व्यवसायाने मोलाची भूमिका बजावलेली आहे. आज हा व्यवहार व्यवसाय म्हणून व्यापक झालेला आहे. माध्यम मुद्रित असो किंवा डिजिटल पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वृद्धिंगत होत आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये भाषाभ्यासाच्या माध्यमातून व्यवसायाची बीजे रूजली जावी आणि या कौशल्यावर आधारीत रोजगार त्यांना प्राप्त व्हावा याकरीता प्रकाशन व्यवहाराचे मूलतंत्र सदर पुस्तकात सविस्तरपणे मांडलेले आहे. किंबहुना प्रकाशन व्यवसायाची बाराखडीच येथे मांडलेली आहे.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांचा स्फोट झालेला असून सातत्याने नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती लोकांमध्ये वाढलेली आहे. लोकांच्या या उत्सुकतेचे क्षमण करण्याची क्षमता ही सृजनशील लेखन करणारा व्यक्तीच करू शकतो. सृजनशील लेखन म्हणजे नाविन्यपूर्ण लेखन. हे लेखन फक्त व्यक्तीच निर्माण करू शकतो. कल्पनाविलास आणि विचारशक्ती असली की सृजनशील लेखन जन्माला येते. विविध प्रसारमाध्यमांमध्ये सृजनशील लेखन करणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे म्हणून मग, सृजनशील लेखनाची मूलतत्त्वे नेमकी कशी आहेत याचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे.

1. ग्रंथनिर्मिती व्यवहाराचे स्वरूप ........................................... 9
1.1 प्रकाशन व्यवहारः घटक, स्वरूप व कार्य
1.2 मुद्रणप्रत, मुद्रित शोधन, मुद्रक, वितरक
1.3 ग्रंथ नोंदणी, आवृत्ती, पुनर्मुद्रण

2. ग्रंथ मुद्रणपूर्व प्रक्रिया ...................................................43
2.1 हस्तलिखित
2.2 मुखपृष्ठ व सजावट
2.3 मुद्रण प्रक्रिया

3. सृजनशील लेखनाचे स्वरूप ............................................57
3.1 सृजनशील लेखन संकल्पना
3.2 सृजनशील लेखनाची मूलतत्त्वे
3.3 सृजनशील लेखन आणि सामाजिक सहसंबंध

4. सृजनशील लेखनाची व्याप्ती ............................................74
4.1 सृजनशील लेखनाची प्रक्रिया
4.2 सृजनशील लेखनातील समस्या
4.3 सृजनशील लेखनाची वैशिष्ट्ये

5. उपयोजनात्मक सृजनशील लेखन.......................................79
5.1 कविता लेखन
5.2 कथा लेखन
5.3 नाटक लेखन

6. सृजनशील लेखन प्रक्रियेतील घटक...................................104
6.1 कथानक
6.2 पात्रचित्रण व वातावरणनिर्मिती
6.3 निवेदनशैली

संदर्भ ग्रंथ....................................................................116

💬

Chat with us