Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार, 2025-2026 या वर्षापासून टी.वाय.बी.ए. मानसशास्त्र विषयाकरीता नविन अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. यात सत्र 5 (NEP) करीता सायबर व माध्यम...

  • Name : सायबर आणि माध्यम मानसशास्त्र (Cyber and Media Psychology)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 128 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सायबर आणि माध्यम मानसशास्त्र (Cyber and Media Psychology)
- +

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार, 2025-2026 या वर्षापासून टी.वाय.बी.ए. मानसशास्त्र विषयाकरीता नविन अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. यात सत्र 5 (NEP) करीता सायबर व माध्यम मानसशास्त्र हा अभ्यासक्रम अंतर्भूत केलेला आहे.
नवीन अभ्यासक्रम आला की, विद्यार्थ्यांची तारांबळ उडणे साहजिक आहे. कारण नव्या अभ्यास क्रमात काळानुरूप नव्या बाबी बहुतेक करून समाविष्ट झालेल्या असतात. त्याचे अवलोकन व अभ्यास करताना अनेक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. कोणताही घटक हा एका पुस्तकातून पूर्ण होत नाही. त्यातून वेळ, पैसा, श्रम हे जास्तीचे खर्च होतात, ही अडचण लक्षात घेता अभासक्रमावर आधारीत विद्यार्थ्यांची ज्ञानाची गरज पूर्ण व्हावी. या हेतूने ‘सायबर व माध्यम मानसशास्त्र’ या पुस्तकाचे प्रयोजन आहे.
आजचे युग हे माहिती, इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे युग आहे. स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील संवाद, विचार, भावना, वर्तन आणि सामाजिक संबंधांमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. या बदलांचा मानवी मानसशास्त्रावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी सायबर मानसशास्त्र हे महत्त्वाचे अभ्यासक्षेत्र विकसित झाले आहे. ऑनलाइन ओळख, डिजिटल स्व-प्रतिमा, अनामिकता, सामाजिक तुलना, Fear of Missing Out (FoMO), आत्मसन्मान, इंटरनेटचे व्यसन, सोशल मीडियाचा अतिवापर, डिजिटल थकवा, ऑनलाइन व आभासी संबंध, सायबर छळ आणि ट्रोलिंग यांसारख्या विविध बाबींचा सायबर मानसशास्त्रात अभ्यास केला जातो. तसेच डिजिटल डिटॉक्स, संज्ञानात्मक-वर्तणूक तंत्रे, ऑनलाइन समुपदेशन आणि डिजिटल कल्याण यांसारख्या उपाययोजनांद्वारे डिजिटल जीवन अधिक संतुलित व आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न केला जातो.
माध्यम मानसशास्त्र हे दूरदर्शन, चित्रपट, वृत्तमाध्यमे, जाहिराती, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा व्यक्तीच्या आकलन, अवधान, स्मरण, भावना, अभिवृत्ती आणि वर्तनावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करते. माध्यमांद्वारे मन वळविणे, जाहिरात, प्रचार-अपप्रचार, हिंसा तसेच समाजोपयोगी संदेश यांचा व्यक्ती आणि समाजावर परिणाम होतो. त्याचबरोबर शरीरप्रतिमा, लिंगविषयक व सांस्कृतिक रूढी, परासामाजिक संबंध आणि तरुणांची संवेदनशीलता यांसारख्या समस्यांचाही विचार केला जातो. त्यामुळे खोटी किंवा बनावट माहिती ओळखणे, तथ्य पडताळणी करणे, माध्यमांचा सजग व जबाबदार वापर करणे आणि नैतिक पद्धतीने आशयनिर्मिती करणे यासाठी माध्यम साक्षरता अत्यंत आवश्यक ठरते. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सायबर व माध्यमांच्या मानसशास्त्रीय परिणामांचे शास्त्रीय आकलन होऊन आधुनिक डिजिटल समाजात सजग, जबाबदार आणि मानसिकदृष्ट्या निरोगी डिजिटल नागरिक म्हणून वावरण्यास आवश्यक ज्ञान व कौशल्ये प्राप्त होतील.

घटक - 1............................................................7
सायबर मानसशास्त्राचा आढावा
(Overview of Cyber Psychology)
1.1 सायबर मानसशास्त्राचा परिचय
सायबर मानसशास्त्राचा अर्थ व परिचय
सायबर मानसशास्त्राचे स्वरूप
सायबर मानसशास्त्राची व्याप्ती
सायबर मानसशास्त्राची उपयुक्तता व प्रासंगिकता

1.2 ऑनलाइन ओळख आणि स्व-प्रतिमा सादरीकरण
डिजिटल ओळख
अनामिकता
सामाजिक तुलना
काहीतरी चुकून जाण्याची भीती
आत्मसन्मानाशी संबंधित समस्या

1.3 समस्यात्मक डिजिटल वर्तनाचे परिणाम
इंटरनेटचे व्यसन
सोशल मीडियाचा सक्तीने/अतिवापर
डिजिटल थकवा

1.4 सायबर वर्तन आणि आंतरवैयक्तिक संबंध
ऑनलाइन संवाद
आभासी संबंध
सायबर छळ
ट्रोलिंग
सायबर वर्तनाचे मानसशास्त्रीय परिणाम

1.5 उपाययोजना, हस्तक्षेप आणि कल्याणविषयक पद्धती
डिजिटल डिटॉक्सच्या उपाययोजना
संज्ञानात्मक-वर्तणूक तंत्रे
ऑनलाइन समुपदेशनाची साधने
डिजिटल कल्याण

घटक - 2...........................................................58
माध्यम मानसशास्त्र
(Psychology of Media)
2.1 माध्यम मानसशास्त्राचा परिचय
माध्यम मानसशास्त्राचा अर्थ
माध्यम मानसशास्त्राची व्याप्ती
माध्यम मानसशास्त्राची उत्क्रांती

2.2 आकलन, अवधान, स्मरण, भावना आणि अभिवृत्तीवर माध्यमांचा प्रभाव
आकलनावर माध्यमांचा प्रभाव
अवधानावर माध्यमांचा प्रभाव
स्मरणावर माध्यमांचा प्रभाव
भावनांवर माध्यमांचा प्रभाव
अभिवृत्ती निर्मितीवर माध्यमांचा प्रभाव

2.3 वर्तन आणि समाजावर माध्यमांचा प्रभाव
मन वळविणे / प्रभावीकरण
जाहिरात
प्रचार / अपप्रचार
हिंसा
समाजोपयोगी माध्यमांचे परिणाम

2.4 माध्यमे, ओळख आणि प्रतिनिधित्वाशी संबंधित समस्या
शरीरप्रतिमेशी संबंधित समस्या
लिंगविषयक रूढी
सांस्कृतिक रूढी
परासामाजिक संबंध
तरुणांची असुरक्षितता / संवेदनशीलता

2.5 माध्यम साक्षरता, सामना करण्याच्या रणनीती आणि माध्यम वापरातील नीतिमत्ता
माध्यम साक्षरतेची कौशल्ये
खोट्या बातम्या / बनावट माहिती
तथ्य पडताळणीची तंत्रे
सजगतेवर आधारित माध्यम वापर
नैतिक पद्धतीने आशय निर्मिती
जबाबदार माध्यम सहभाग

💬

Chat with us