Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

भाषिक कौशल्य विकास आणि एकांकिका

‘विठ्ठल तो आला आला’ - पु. ल. देशपांडे, ‘हंडाभर चांदण्या’ - दत्ता पाटील

 • ISBN: 9789389493498
 • Bhashik Kaushalya Vikas Aani Ekankika
 • Published : October 2020
 • Book Language : Marathi
 • Edition : First
 • Format : Paperback
 • Pages : 144
 • Categories: ,
 • Download Book Ebook Link

Rs.195.00

साहित्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांजवळ वाचन, चिंतन, मनन, लेखन करण्याच्या क्षमता असणे गरजेचे असते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचा स्वतःचा दृष्टीकोन आपल्या आकलनाच्या आधारे तयार करणे, साहित्यकृतींची समीक्षा, चिकित्सा करणे किंवा तिचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणे अशा गोष्टी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असतात. आजच्या काळात हे चित्र आभावानेच दिसते. वरील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजे या विषयीचे विवेचन डॉ. हरेश शेळके यांनी या पुस्तकात केले आहे. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन इ-संवादकौशल्य यासंबंधीची आवश्यकता, फायदे यासंबंधी उहापोह केला आहे. विद्यार्थ्यांना निश्चितच या विवेचनाचा फायदा होईल.
याच पुस्तकातील दुसरा उपविभाग हा नेमलेल्या एकांकिकांची मीमांसा करणारा आहे. एकांकिकेचे स्वरूप घटक संहितामूल्य आणि प्रयोगमूल्य यांसह अनेक अनुषंगिक बाबींची चर्चा लेखकाने केलेली आहे. ही चर्चा एकांकिका हा वाङ्मयप्रकार समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
सदर पुस्तक प्रथम वर्ष बी. ए. च्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असले तरी भाषेच्या उपयोजित विविध घटकांचा अभ्यास करणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

डॉ. मनोहर जाधव
वरिष्ठ प्राध्यापक, मराठी विभाग आणि अधिसभा सदस्य,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007

Bhashik Kaushalya Vikas Aani Ekankika

 1. भाषिक कौशल्यविकास : 1.1 प्रास्ताविक, 1.2 उद्दिष्ट्ये, 1.3 नैसर्गिक : आकलनसह श्रवण, 1.3.1 श्रवण म्हणजे काय, 1.3.2 श्रवणाचे स्वरुप, 1.3.3 श्रवणाचे फायदे, 1.3.4 श्रवण प्रक्रियेतील अडथळे, 1.3.5 श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय
 2. अर्जित : संभाषण, वाचन, लेखन इ. संवाद कौशल्य : 2.1 उद्दिष्ट्ये, 2.2 संभाषण, 2.2.1 संभाषण म्हणजे काय, 2.2.2 संभाषण परिणामकारक होण्यासाठी उपाय योजना, 2.2.3 प्रभावी संभाषण कौशल्याचे फायदे, 2.3 वाचन, 2.3.1 वाचन म्हणजे काय, 2.3.2 वाचनाचे महत्त्व, 2.3.3 वाचन प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक, 2.3.4 वाचन करताना आकलन चांगले होण्यासाठीच्या बाबी, 2.3.5 वाचनाचे प्रकार, 2.3.6 वाचनावेळी चुकीच्या सवयींचे निराकरणाचे उपाय, 2.3.6 वाचनाचे फायदे, 2.4 लेखन, 2.4.1 लेखनाची आवश्यकता, 2.4.2 लेखनाचे महत्त्व, 2.4.3 लेखन करताना येणार्‍या अडचणी, 2.4.4 चांगले लेखन करण्यासाठीची कौशल्ये, 2.4.5 लेखनासाठी पूर्वतयारी कशी कराल?, 2.5 इ-संवाद कौशल्य, 2.5.1 वेबसाईड, 2.5.2 ई-मेल, 2.5.3 ब्लॉग, 2.5.4 ई-बुक्स (पुस्तक), 2.5.5 ऑडिओ बुक्स (बोलती पुस्तके) , 2.5.6 ई-पेपर (ऑनलाईन न्यूजपेपर) , 2.5.7 यू-ट्युब, 2.5.8 फेसबुक, 2.5.9 व्हाटस्अप, 2.5.10 टेलीग्राम, 2.5.11 ट्विटर, 2.5.12 गुगल मीट, 2.5.13 गुगल क्लासरुम, 2.5.14 सिस्को वेबेक्स, 2.5.15 स्काईप, 2.5.16 लिंक्डइन, 2.5.17 पिन टेरेस्ट, 2.5.18 मोबाईल फोन, 2.5.19 इन्स्ट्राग्राम
 3. प्रगत : सारांश लेखन, सारग्रहण : 3.1 उद्दिष्ट्ये, 3.2 सारांश लेखन, 3.2.1 सारांश लेखन म्हणजे काय, 3.2.2 सारांश लेखन करताना घ्यावयाची काळजी, 3.2.3 सारांश लेखनाचे महत्त्व, 3.2.4 सारांश लेखनाची तंत्रे, 3.2.5 सारांश लेखन उतारा व त्यांचे एकतृतीयांश लेखन, 3.3 सारग्रहण, 3.3.1 सारग्रहण करताना घ्यावयाची काळजी
 4. एकांकिका स्वरुप : 4.1 प्रास्ताविक, 4.2 उद्दिष्ट्ये, 4.3 एकांकिका म्हणजे काय?, 4.4 एकांकिका स्वरूप, 4.5 एकांकिकेचे विशेष
 5. एकांकिका घटक : 5.1 संहितेच्या अंगाने नाटक / एकांकिकेचे घटक, 5.1.1 विषयसूत्र, 5.1.2 संविधानक, 5.1.3 पात्रचित्रण, 5.1.4 संवाद, 5.2 सादरीकरणाच्या अंगाने नाटक / एकांकिकेचे घटक, 5.2.1 अभिनय, 5.2.2 नेपथ्य, 5.2.3 रंग वेशभूषा, 5.2.4 प्रकाश योजना, 5.2.5 वातावरणनिर्मिती, 5.2.6 संगीत
 6. एकांकिका : संहितामूल्य व प्रयोगमूल्य : 6.1 एकांकिका संहितामूल्य, 6.2 एकांकिका प्रयोगमूल्य
 7. पाठ्यपुस्तक : मराठी एकांकिका : 7.1 प्रास्ताविक, 7.2 उद्दिष्ट्ये, 7.3 एकांकिका विश्लेषण : ‘विठ्ठल तो आला आला’ – पु.ल. देशपांडे, 7.3.1 लेखक परिचय, 7.3.2 एकांकिकेतील पात्रे, 7.3.3 एकांकिकेविषयी, 7.3.4 ‘विठ्ठल’ या व्यक्तिरेखेचा परिचय, 7.3.5 एकांकिकेचे विशेष, 7.3.6 सारांश, 7.4 एकांकिका विश्लेषण : ‘हंडाभर चांदण्या’ – दत्ता पाटील, 7.4.1 लेखक परिचय, 7.4.2 एकांकिकेतील पात्रे, 7.4.3 एकांकिकेविषयी, 7.4.4 ‘संभा’ या व्यक्तिरेखेचा परिचय, 7.4.5 एकांकिकेचे विशेष, 7.4.6 सारांश
 8. भाषा उपयोजनाची विविध आविष्कार रुपे : 8.1 प्रास्ताविक, 8.2 उद्दिष्ट्ये, 8.3 संवाद लेखन, 8.3.1 संवाद लेखन म्हणजे काय?, 8.3.2 प्रभावी संवाद कौशल्यासाठी महत्त्वाचे उपाय, 8.3.3 संवाद प्रक्रियेतील अडथळे, 8.3.4 प्रत्यक्ष संवाद लेखनाचे उदाहरण, 8.4 कल्पना विस्तार, 8.4.1 कल्पना विस्तार करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी, 8.4.2 कल्पना विस्तार म्हणजे काय?, 8.4.3 कल्पना विस्ताराचे उदाहरण, 8.5 घोषवाक्य लेखन, 8.5.1 निवडक विषयांवरील घोषवाक्य लेखन, 8.6 भाषांतर, 8.6.1 भाषांतर म्हणजे काय?, 8.6.2 भाषांतराची गरज / आवश्यकता, 8.6.3 भाषांतरातील अडथळे, 8.6.4 भाषांतराचे प्रकार, 8.6.5 इंग्रजी उतारार्‍याचे मराठी भाषांतर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भाषिक कौशल्य विकास आणि एकांकिका”
Shopping cart