• साहित्य विचार (भारतीय व पाश्चात्य)

    साहित्य विचार (भारतीय व पाश्चात्य)

    साहित्य आणि समाज यांचे जवळचे संबंध आहेत. कारण लेखक हा समाजाचाच घटक असतो. समाजात वावरताना त्याला भलेबुरे अनुभव येतात त्याचे चित्र तो साहित्यकृतीतून रेखाटतो म्हणून साहित्य म्हणजेच जीवनाचा आरसा होय असे म्हटलेले आहे आणि ते योग्य आहे.
    ‌‘साहित्य विचार’ ह्या पुस्तकाची निमिर्ती ही विद्यार्थी हित लक्षात घेऊन करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणामध्ये साहित्याविषयी विचार मांडण्यात आलेला आहे. प्रत्येक प्रकरणाची सविस्तर, सुलभ व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे. या ग्रंथात साहित्याचे स्वरूप, काव्य शब्दांची व्याप्ती, संस्कृत साहित्यकारांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे तसेच पाश्चात्य साहित्यकारांची साहित्य लक्षणे, मम्मटाची साहित्य प्रयोजने, पाश्चात्यांची साहित्य प्रयोजने, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, चमत्कृती, व्युत्पत्ती, स्फूर्ती आणि साहित्य प्रकाराची संकल्पना, साहित्याची भाषा, साहित्य आणि समाज, साहित्याची अभिरुची तसेच रसविचार, रीतिविचार, अलंकार विचार, वक्रोक्ती विचार इत्यादी घटकांचा सविस्तर आढावा प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे.
    प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, मराठीचे अध्यापन करणारे प्राध्यापक बंधुनाही अध्यापनासाठी निश्चित उपयुक्त ठरेल.

    – प्रा. डॉ. आनंदा बाबबुराव सोनवणे

    Sahitya Vichar (Bhartiya va Pachhyatya)

    Rs.275.00
    Add to cart
  • साहित्य समीक्षा विचार

    साहित्य समीक्षा विचार

    ‘अनुभूतीचा आविष्कार’ म्हणजेच साहित्य होय. लेखकाला झालेली ही ‘कलात्मक अनुभूती’ सार्वत्रिकतेचा स्पर्श झाल्यामुळे आनंददायी असते. रसिक वाचक तिचा आस्वाद घेतो. त्यातील ‘जीवनानुभव’ समजून घेऊन आपली जाण समृद्ध करतो. म्हणूनच मानवी जीवनात ‘साहित्य’ क्षेत्र महत्त्वाचे ठरते. ‘साहित्य विचारा’इतकेच महत्त्व ‘साहित्य समीक्षे’ला आहे. समीक्षा व्यापार हा ‘साहित्यकृती’शी संबंधित आहे. लेखक-रसिक वाचक-समीक्षक त्या साहित्यकृतीतील आशय समजून घेऊन आपले अनुभवविश्व समृद्ध करतात. समीक्षक विशिष्ट साहित्यकृतीचे संदर्भात सर्वसमावेशक अशा मूल्यमापनातून आपला ‘मूल्यनिर्णय’ देतो तेव्हा समीक्षा साकारते. साहित्य व समीक्षा हे अभ्यासक्षेत्र परस्पराश्रयी आहे. या दोन्ही क्षेत्रातील मूलभूत संकल्पना समजून घेतल्या म्हणजे त्याच्या निर्मितीची क्षमता आत्मसात करता येते.
    प्रस्तुत पुस्तकातून साहित्य व्यापाराशी संबंधित भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्राची संकल्पना, व्याख्या, साहित्याची प्रयोजने, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, साहित्यांची भाषा, शैलीविचार इ. घटकांचा परिचय करुन देत असतानाच ‘साहित्य आणि समीक्षा’ यांचे परस्पर संबंध, समीक्षा संकल्पना, समीक्षेची भाषा, समीक्षापद्धती यांचाही यथायोग्य परिचय करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

    Sahitya Vichar V Samiksha

    Rs.225.00
    Add to cart