-
साहित्यातील मानवतावाद
Rs.395.00माणसाच्या सर्वकष कल्याणाचा विचार मानवतावादात येतो. माणसाच्या सर्व समस्यांचे निराकरण मानवतावादात अपेक्षित आहे. माणूस हा मानवतावादाचा केंद्रबिंदू आहे. माणसाला कोणत्याही गटा-तटात किंवा भेदोभेदात अडकवणे चुकीचे आहे. धर्म, पंथ, जात, लिंग, वंश, देश, प्रदेश, अशा कोणत्याही भेदांत विघटिकत करुन माणसाचा विचार होऊ नये, कोणत्याही नैसर्गिक सुविधेपासून, लाभापासून माणसाला वंचित ठेवणे, ही मानवतावादविरोधी क्रिया आहे.
साहित्य म्हणजे उच्चभ्रूंची मक्तेदारी का? साहित्य म्हणजे उच्चवर्गीयांच्या ऐय्याशी भावना का? साहित्य म्हणजे गोर्या वर्णाच्या लोकांचा उत्सव का? साहित्य म्हणजे श्रीमंताचा बडेजाव का? साहित्य म्हणजे फक्त साक्षर लोकांची अनुभूती का? साहित्य म्हणजे आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालेल्या लोकांची संकुचित सामाजिक जाणीव का? साहित्य म्हणजे गोरगरिबांची लाचारी तर नव्हे, साहित्य म्हणजे दुःखितांचा अनावर हुंकार तर नव्हे. साहित्य म्हणजे नाडलेपण, गाडलेपण तर नव्हे. साहित्य म्हणजे दीनदलितांची पिळवणूक तर नव्हे, साहित्य म्हणजे सामान्य माणसाची, किंबहुना असाक्षर माणसाची उपेक्षा तर नव्हे, साहित्य म्हणजे हजारो वर्षांपासूनच्या गुलामीत डांबलेल्या प्रत्येक घरातील स्त्रियांचे मुकेपण तर नव्हे, साहित्य म्हणजे खेडूतांना गावंढळ संबोधून संस्कृती प्रवाहाच्या बाहेर ढकलणे तर नव्हे?
साहित्य लिहिणारा माणूस असतो, साहित्य वाचणारा माणूस असतो. साहित्यातून अभिव्यक्त होणाराही माणूसच असतो ; साहित्य वाचणारा माणूस असतो. साहित्यातून अभिव्यक्त होणाराही माणूसच असतो:; त्यामुळे साहित्य माणसाचे आहे; ते संस्कारित असणे गरजेचेच आहे. माणसासाठी साहित्य मानवतावादी पद्धतीने अभिव्यक्त झाले, तर मानवतावादी संस्कृती प्रवाहाला सक्षमता प्राप्त होऊ शकते!Sahityatil Manavatavad
-
साहित्यास्वाद
Rs.395.00मराठी साहित्याला प्रदीर्घ असा इतिहास आहे. मध्ययुगीन मराठी वाङ्मय, अर्वाचीन मराठी साहित्य, आधुनिक साहित्य, नवसाहित्य, साठोत्तरी साहित्य, नव्वदोत्तरी (जागतिकीकरणाच्या काळातील) साहित्य अशा पद्धतीने मराठी साहित्याची वाटचाल झालेली दिसून येते. मराठी साहित्याचा हा संपूर्ण इतिहास, हा संपूर्ण परीघ विस्ताराने मराठी साहित्य व भाषा या विषयात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतेलेल्या विद्यार्थ्यांना, मराठी विषयाचा शिक्षक, सहाय्यक प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना माहीत असायला हवा. म्हणून मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील नेट व राज्य पातळीवरील सेट या परीक्षांमधील अभ्यासक्रमाच्या दहाव्या घटकामध्ये त्या त्या कालखंडातील मराठीतील सर्वोत्कृष्ट अशा 24 साहित्यकृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. या दहाव्या घटकातील साहित्यकृती, त्यावरील समीक्षा एकाच पुस्तकात कुठेही उपलब्ध होत नाही. तेव्हा विद्यार्थी, अभ्यासक यांची ही गरज लक्षात घेऊन हा समीक्षा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. मराठी विषयाच्या अभ्यासू, चिकित्सक, साक्षेपी अभ्यासकांनी आपल्या लेखांमधून त्या-त्या साहित्यकृतीचे विविध पैलू, त्या साहित्यकृतीतील कथानक, आशय याचा समाजाशी, विविध विचारप्रणाल्यांशी असलेला संबंध, त्यांचे मराठी साहित्यविश्वात असलेले नेमके स्थान, महत्त्व यांचे सूक्ष्म असे विवेचन करून त्यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यातून गेल्या 835 वर्षांतील महत्वाच्या ग्रंथांचा, लेखकांचा आढावा, वाटचाल डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे हा ग्रंथ वाचक, विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल व ते या ग्रंथाचे मनापासून स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.
– डॉ. राहुल भालेराव पाटील
Sahityaswad