• ‘घुमान’ मधील बाबा नामदेवजी

    घुमान आणि संत नामदेव यांचे पारस्परिक नाते असे विलक्षण आहे. नामदेवांच्यामुळेच घुमान वसले. काही एक विशिष्ट जीवनकार्य मनाशी निश्चित करुन चांगले वीस वर्षे नामदेव तिथे राहिले. तिथल्या जनसमुदायाशी समरस झाले. तिथली भाषा त्यांनी आत्मसात केली. त्या भाषेत पदरचना करुन आपली आध्यात्मिक अनुभूती त्यांनी शब्दांकित केली. समाजात नवे क्रांतिकारी विचार पेरले. तिथे त्यांना महंतपद प्राप्त झाले. त्यांचा शिष्यपरिवार वाढत गेला. त्यांचे मंदिर बनले. महाराष्ट्रात विठ्ठलाच्या भक्तीने वेडा होऊन नाचणारा एक भावुक भक्त दूरदेशी पंजाबात जाऊन ख्यातकीर्त महात्मा बनला. घुमान या सगळ्याचे साक्षी बनून राहिले.

    – डॉ. निशिकांत मिरजकर

    ‘Ghuman’ Madhil Baba Namdevji

    120.00
    Add to cart
  • ‌‘दासबोधा’तील मानवी मूल्ये

    मानवी जीवनाच्या साफल्यासाठीच ‌‘दासबोधा’ची रचना समर्थांनी केली. ‌‘दासबोधा’तील समर्थांनी सांगितलेली चतु:सूत्री म्हणजे सुखी, संपन्न, समर्थ व सफल जीवनाची गुरुकिल्लीच होय. समर्थकृत ‌‘दासबोध’ हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‌‘दासबोधा’सारखा सार्वकालिक श्रेष्ठ ग्रंथ लिहून संत रामदासांनी स्वत:ची नाममुद्रा मराठी संतसाहित्यात उमटवली. सध्याच्या धावपळीच्या काळात मानवी नातेसंबंधात आलेला दुरावा, अत्याधिक भोगवादाकडे झुकलेले समाजमन, त्यागसमर्पणादि मूल्यांचा ऱ्हास, माणसांची पशुत्वाकडे होणारी वाटचाल या घटना पाहून सर्वंच बाबतीत भ्रमनिरास होत चालला आहे. अशा पार्श्वभूमीवर ‌‘दासबोध’ हा ग्रंथ एक पायवाट दाखवतो. या पायवाटेवरून चालल्यावर माणसे खऱ्या अर्थाने समाधानी होणार आहेत. यातली मानवी मूल्ये मानवाला सातत्याने तो मानव असल्याची जाणीव करून देणार आहेत.

    Dasbodhatil Manvi Mulye

    150.00
    Add to cart
  • ‌‘देव’ माणसं अन्‌‍ ‌‘गुणी’ लेकरं

    भाग : 2 – चंदाकाकांची वही
    सहज संवाद…सर्वांच्या भल्यासाठी!

    सूर्यकांत अन्‌‍ त्याची प्रेमळ, कष्टाळू, मेहनती ‌‘टोळी’…
    अनेकोत्तम आशीर्वाद!
    सूर्यकांत मला भेटला. खूप गप्पा झाल्या. आनंद वाटला. ‌‘टोळी’बद्दल त्याने जे जे सांगितलं ते ऐकून खूप समाधान वाटलं. असो.
    बालगोपाळांसाठी तसेच छोट्या-मोठ्यांसाठी मी काही लिहून ठेवलेय. ते सारं मी तुम्हाला देतोय. ते तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वाचावं. त्याचं मनन करावं वा त्यावर चर्चा करावी. जिथे मदत लागेल तिथे विनयसर आहेतच.
    छोट्या दोस्तांनो, विनयसरांसारखी शिक्षकमंडळी अन्‌‍ आईबाबा वा अनुभवी माणसं तुमच्या आसपास बोलायला, सांगायला, मार्गदर्शन करायला, शाबासकी द्यायला आहेत, ही किती मोठी व महत्त्वाची गोष्ट आहे.
    असो. एकेक पान मन लावून, तेही मोठ्याने वाचा. वेळ मिळेल तेव्हा मला प्रत्यक्ष भेटा वा फोन करत माझ्याशी गप्पा मारा.
    सर्वांना सर्व कामांसाठी शुभेच्छा, आशीर्वाद
    तुमचा,
    चंदाकाका
    (टीप : काही गोष्टी मराठीत, हिंदीत आहेत तर काही इंग्रजीत. आणि हो, जे ‌‘खास पालकांसाठी’ म्हणून लिहिलेय ते त्यांना अवश्य वाचायला द्या. लेखच नव्हे तर पूर्ण पुस्तक त्यांना वाचू द्या. कळलं?)

    Dev Manas An Guni Lekar

    125.00
    Add to cart
  • ‌‘मनाचे श्लोका’तील मानवी मूल्ये

    समर्थांचा उपदेश मानवी जीवन सुखकारक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ‌‘मनाचे श्लोक’ ही अजरामर कलाकृती आहे. पृथ्वीवर जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत ‌‘मनाचे श्लोक’मधील उपदेशाची, नितीमूल्यांची अपरिहार्यता अबाधित राहील. ही नितीमूल्ये माणसाला सावरणारी, दिशा देणारी असल्याने मानवी जीवन उन्नत होण्याकामी ती अखिल जगाला दीपस्तंभासम आहेत. ‌‘मनाचे श्लोका’त असलेली – सुसंवादित्व, समाधान, सुविद्या, विश्वास, प्रयत्नवाद, निर्गर्वीता, अद्वैत, विरक्ती, मौन, देहातितता, क्रियाशीलता, कृतिउक्तीसाम्यता, लोभहीनता, दया, निष्कामता यांसारख्या मानवी मूल्यांची आत्यंतिक गरज आजच्या विकल वर्तमानात आहे. या मूल्यांचे आचरण समाजाने केले तर मानवी समूह सुखी होण्यास वेळ लागणार नाही. समर्थांना अभिप्रेत असणारा समर्थ संप्रदाय आकारास येण्यासाठी यातल्या मानवी मूल्यांचे दर्शन जागरूकतेने होणे हीच आजच्या काळाची नितांत गरज आहे.

    Manache Sholkatil Manvi Mulye

    150.00
    Add to cart
  • 1975 नंतरचे मराठी नाटक : आशय आणि रचना

    नाटक ही समूहाने आस्वाद घेण्याची कला आहे. त्याच्या पाठ्याच्या आपल्याकडच्या जडणघडणीच्या प्रेरणा मात्र केवळ पाठ्याच्या एकेक एकेकट्याच्या आस्वादनाच्या असल्यामुळे आपल्याकडे सशक्त असे मंचित पाठ्य निर्माण होऊ शकले नाही. अशा प्रकारे नव्वदपूर्वीच्या मराठी नाटकामध्ये शब्द आणि प्रयोगामध्ये त्याचा उच्चार पर्यायाने वाचिक अभिनय महत्त्वाचा ठरला. सत्तरोत्तर रंगभूमीचे अवलोकन केले असता शब्दाचे महत्त्व कमी झालेले दिसून येते. पण त्याचे कारण या काळात सशक्त असे मंचित पाठ्य निर्माण झाले एवढेच फक्त नाही.

    – प्रा. डॉ. प्रवीण भोळे,
    विभाग प्रमुख, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

    1975 Nantarche Marathi Natak : Ashaya Ani Rchana

    450.00
    Add to cart
  • Covid-19 and The Indian Economy

    250.00
    Add to cart
  • Handbook on NAAC Assessment and Accreditation

    This book is an outcome of the careful study of practices and strategies followed and implemented by the HEIs as directed by NAAC to mark quality performance. Recently, NAAC has introduced a revised assessment and accreditation framework. It has been a grave and seriously discussed issue among the stakeholders in India to accept and exercise the framework and to obtain quality status to the institutes. This revised framework by NAAC has itself become a significant issue and a challenge especially to the institutes located in the semi-urban, rural, tribal and remote areas. Identifying the need and demand of quality discussions on the revised pattern, this initiative is taken up in bringing together experiences, reflections, and contemplation of the stakeholders to contribute quality material on institutional assessment and accreditation process.

    This book, being an edited one deals with recent developments in NAAC assessment and accreditation process as introduced by NAAC after July 2017. It comprises of several resourcefully contributed articles satisfying the need to face NAAC A & A process successfully. This handbook shall prove much fruitful to the Higher Education Institutes across India willing to get assessed and accredited by NAAC in the revised framework and also to those who wish to plan, design, and deploy resourceful strategies to develop quality culture on their campuses.

    350.00
    Add to cart
  • Intellectual Property Rights : Nature and Problems

    Intellectual Property Rights are like any other property rights. The term Intellectual Property refers to creations of the mind: invention; literary and artistic works; and symbols, names, images, and designs used in commerce. These rights are outlined in Article 27 of the Universal Declaration of Human Rights, which provides for the right to benefit from the protection of moral and material interests resulting from authorship of scientific, literary or artistic productions. Intellectual Property is divided into two categories: Industrial Property and Copyright. Industrial Property includes patents for inventions, trademarks, industrial designs and geographical indications. Copyright covers literary works (such as novels, poems and plays), films, music, artistic works (e.g., drawings, paintings, photographs and sculptures) and architectural design. Rights related to copyright include those of performing artists in their performances, producers of phonograms in their recording, and broadcasters in their radio and television programs.

    295.00
    Add to cart
  • Research Methodology

    395.00
    Add to cart
  • Research Methodology for Business

    The present reference book has been written with the objective to enable researchers in developing the appropriate methodology for their research studies. The book will also make them familiar with the art of using different research methods and techniques.
    Regarding the organization, the book consists of four broad chapters. Chapter one is about Introduction of Business Research, which includes the conceptual background of research, business research and research methodology. Chapter two has been exclusively devoted to concept of Research Problem, Hypothesis, Research Design and its related aspects. Chapter three explains the details of data collection, measurement, scaling and processing of data. It also consists of the detailed aspects of classification, tabulation analysis and interpretation of information. Chapter four dwells on various aspects of research report, mode of citation and bibliography.
    The new concepts in research methodology such as plagiarism, role of computers in research, application of statistical tools etc. are explained in understandable manner. Each chapter cover outline at the beginning which will give the brief idea of the topics covered in the chapter. The topics are arranged in numbered paragraphs. Detailed question bank at the end of each chapter is included. The efforts are made to include the authentic and latest material on this subject.

    295.00
    Add to cart
  • अण्णाभाऊ साठे साहित्य व समीक्षा

    कथा, कादंबरी, लोकनाट्य, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारांची ओळख अण्णाभाऊंच्या लेखनातून प्रकर्षाने होते. समाज प्रबोधन हा प्रधान हेतू असला तरीही त्यांच्या लेखनाचा वास्तव गाभा म्हणजे उपेक्षित, शौषित वर्गाच्या वेदनेला हुंकार देणे हाच आहे.

    मानवी जीवनातील संघर्ष, भूकेची व्याकूळता,ख हीनत्वाची भावना, सन्मान आणि स्वाभिमान इ. चा मिलाफ अण्णाभाऊंच्या साहित्यातून होतांना दिसतो. स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेची रचना अण्णाभाऊंना अपेक्षित आहे.

    Annabhau Sathe Sahitya V Samiksha

    120.00
    Add to cart
  • अधांतर एक आकलन

    Adhantar Eka Aakalan

    95.00
    Add to cart
  • अनुभूती

    शिक्षकात कवी असणं यांस मी अहोभाग्य समजतो. कारण शिक्षकाला रंजन आणि प्रबोधन या दोन्ही वाटा एकाच वेळी समृद्ध करीत विद्यार्थी वर्गाचं संगोपन, संवर्धन करावं लागतं. या ध्यासाला जतन करीत जे आतून येतं. आणि शब्दरुप होतं. याचा एक आगळा आनंद असतो. यालाच साहित्यात ‘स्वानंदासाठी’ केलेले लेखन असेही संबोधले जाते.
    सरांनी प्रस्तुत संग्रहातून ज्या ज्या भावनांना वाट करुन दिलीय. त्या वाटेवर सुख-दुःखाच्या दाहक वास्तवाबरोबर अंतरीच्या घावांसह केलेली ‘शल्य’ चिकित्सा वाचकाची अस्वस्थता वाढविणारी ाहे. कवीच्या दुःखाशी संवादी होतांना तो स्वतःच्या दुःखाची कवी दुःखाशी तुलना करीत स्वतःचे दुःख शितल करतो. येथेच कवीचे आणि कवितेचे यश दडलेले असते. म्हणूनच सृजन म्हणजे मानवी मनाच्या तळाशी असणार्‍या जखमांना सावरणारी निसर्गदत्त देणगीच वाटते.

    Anubhuti

    95.00
    Add to cart
  • अबोल झाली सतार (कथासंग्रह)

    Abol Zali Satar (Kathasangrah)

    200.00
    Add to cart
  • अमरस्वर

    माझे ६ वे पुस्तक ‘अमर स्वर’ वाचकांच्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे.
    माणसाचे जीवन कुणाच्या तरी आदर्शानी फुलून यावे. काव्यमय प्रांतात मला थोर विशाल हृदयी अनेक माणसं भेटली. त्यांच्या भेटीने तृप्त झालो. अस्वस्थता वाट्याला आली नाही, की नैराश्य शिवले नाही. सदा न कदा समाधान, आनंद, निखळ
    हास्याचे क्षण वाट्याला आले. वास्तववादी क्षणांना सुख मानुन काही काळ कवटाळलेही म्हणून शब्दांच्या साम्राज्यात वावरणेही झाले.

    २०१६ पासून ‘उन्हं तापली रे’ या पहिल्या काव्यसंग्रहाने समाजात कवी म्हणून ओळख झाली. ‘पाखरा उड उड रे’ या काव्यसंग्रहाने मला एका विशिष्ट उंचीवर आणून ठेवले; ‘नांगरफाळ’, ‘चांदणवेडा’ नंतर श्री. डी. बी. पाटील या द्रष्ट्या
    व्यक्तिमत्त्वाविषयी ‘कीर्तीगंध’ हे पुस्तक स्वतः संपादित केले. ‘अमर स्वर’ याद्वारे जगविख्यात गायिका, गानसम्राज्ञी लतादिदींकरिता त्यांच्या अमरस्मृतींना मनोभावे नमन करण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात देशाकरिता हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांचे स्मरण म्हणून काही कविता या पुस्तकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना माझा हा प्रयत्न नक्कीच भावेल अशी मनोकामना व्यक्त करतो, वाचन संस्कृती वाढीस लागो या सदिच्छांसह…

    सदैव तुमचाच,
    रमेश जे. पाटील

    125.00
    Add to cart
  • अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती

    सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असतांना त्यामध्ये कार्यकारण संबंध असतोच. पण असा संबंध सहजपणे आपल्या लक्षात येेत नाही. असा संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न संशोधन कार्यात होत असतो. संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात होतो. संशोधनाद्वारे नवनवीन कल्पनांची मांडणी केली जाते. त्या अनुरोधाने सखोल पहाणी किंवा प्रयोग करून पूर्वी मान्य असणार्‍या अनुमानांना नवीन रूप दिले जाते. संशोधन हे प्रामुख्याने नवीन ज्ञानाची भर वेळोवेळी घालीत असते. अध्ययनाद्वारे निरीक्षणातून तुलना करून आणि प्रयोगातून सत्यता पडताळून पाहिली जाते.
    सदरील पुस्तकात संशोधनाच्या विविध संकल्पना, सिद्धांत व तंत्रे सर्वांना सहजतेने समजावीत यासाठी साध्या-सोप्या भाषेचा वापरासोबतच शास्त्रीय संकल्पनांच्या मूळ अर्थाला बाधा येणार नाही याचीही दक्षता घेतली आहे.
    सदरील पुस्तक हे विविध विद्याशाखांच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी, नेट/सेट तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

    Arthashastriya Sanshodhan Paddhati

    275.00
    Add to cart
  • अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास (प्रारंभ ते 2000)

    महाराष्ट्रात इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजी सत्तेचा उदय झाला. इंग्रजांनी महाराष्ट्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर नवे शैक्षणिक धोरण अंमलात आणले. शिक्षण प्रसारासाठी नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या. शाळांची निर्मिती केली. एत्द्देशियांना शिक्षण देण्यासाठी, धर्म प्रचारासाठी, विविध विषयांवरची पुस्तके निर्माण केली. विविध स्वरुपात, प्रकारात धार्मिक वाङ्मय मराठी भाषेतून निर्माण केले. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात प्रारंभ काल हा साधारणत: इ.स.1818 मानला जातो. त्याची उत्तर सीमा विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या इ.स. 1874 साली सुरु झालेल्या निबंधमाला’पर्यंत संबोधली जाते.

    इ.स. 1818 नंतरच्या अर्वाचीन मराठी वाङ्मयात इंग्रजी शिक्षणाच्या नव्या जाणिवांबरोबर, जुने वाङ्मय प्रकारही नव्या स्वरुपात साकार झाले. शिक्षणाचा प्रसार, मुद्रणाची व्यवस्था, वाचनाची आवड यांचा परिणाम म्हणून वाङ्मयाची सतत वाढ होत गेली. वाङ्मयाच्या क्षेत्रात नवे विचार, नवे सिद्धांत, नवे संप्रदाय, साहित्य विचार निर्माण झाले. बदलणार्‍या गतीमान मानवी जीवनाबरोबर साहित्याचे स्वरुपही पालटले. मराठी वाङ्मयाची कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, कविता, साहित्य विचार, समीक्षा विचार इत्यादी प्रकारात विपूल प्रमाणात निर्मिती होत गेली. वाङ्मय प्रवाहात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम साहित्य, ख्रिश्चन साहित्य, जनवादी साहित्य इत्यादी प्रवाहान्वये निर्मिती झाली.

    मराठी वाङ्मयात विविध प्रकार आणि प्रवाहांमुळे निर्माण झालेल्या साहित्याने विपुलता आलेली आहे. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर आजचा वर्तमान आहे. आजचा वर्तमान हा उद्याचा भूतकाळ आहे. काळ हा अखंड आहे. माणूस हाच प्रारंभ असून, विश्वाच्या पाठीवर माणूस असेपर्यंत वाङ्मय निर्मिती आहे. त्यामुळे वाङ्मयाचा शेवट अज्ञात आहे; असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही.

    अर्वाचीन कालखंड सुमारे दोनशे वर्षांचा आहे. प्राचीन कालखंडाच्या मानाने तसा लहान आहे. तरीही ह्या कालखंडात विविध प्रवाह, प्रकारांनी विविधापूर्ण वाङ्मय निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन समृद्धतेचा, विपुलतेचा विवेचक परामर्श घेण्याच्या हेतु:स्तव म्हणजेच सदरील पुस्तक लेखन होय.

    Arvachin Marathi Wagmayacha Itihas

    375.00
    Add to cart
  • अशोक पवारांच्या ‘दर कोस दर मुक्काम’, ‘पडझड’ आणि ‘तसव्या’ कादंबरीतील जीवनजाणिवा

    अशोक पवारांनी आपल्या साहित्यातून केवळ बेलदार, पारधी, गावोगावी जाऊन रेडिओ विकणारे, वडार, भविष्य सांगणारे ज्योतिषी, बहुरूपी, भीक मागणारे यांचेच प्रश्न मांडले नाही तर इथले भ्रष्ट राजकारण, सामान्य जनतेला लुटणारे पुढारी, स्त्रियांची अब्रू लुटणारी वासनांध पुरुषप्रवृत्ती, स्त्रीचे अगतिक होऊन जगणे यासारख्या समस्यांनाही वाचा फोडली. त्यामुळे प्रस्थापित साहित्यापेक्षा पवारांचे साहित्य निश्चितच वेगळ्या अंगाचे आणि ढंगाचे ठरले.
    चार-सहा शब्दांची ठसठशीत वाक्यरचना, डोक्याला आणि मनाला सून्न करून सोडणारे अनुभव आणि बाह्य जगातील माणसांची इथल्या संस्कृतीशी बांधलेली परंपरागत वेदना या सार्‍या परिपाकातून पवारांच्या भेदक साहित्याची उभारणी झाली आहे. मानवतावादाची एक सच्ची तळमळ त्यांच्या हृदयात पेटताना दिसते.

    – डॉ. अनंता सूर

    Ashok Pawaranchya ‘Dar Kos Dar Mukkam’, ‘Padjhad’ ani ‘Tasavya’ Kadambaritil Jeevanjaniva

    225.00
    Add to cart
  • अशोक पवारांच्या साहित्यातील लेखनविषयक जाणिवा आणि बोलीभाषा

    साहित्य कृतीतून ज्यावेळी अशोक पवार अभिव्यक्त होतात त्यावेळी मानवाच्या अस्सल जगण्याची प्रतिकृतीच जणू नजरेसमोर ठेवत आहेत असे वाटते. त्यातील एकेक अनुभव वाचकाला देहभान विसरून मेंदूला हादरे देऊ लागतो. इतकी कल्पनाबाह्य आणि मरणालाही न भिता ही माणसं कशी जगत असेल या विचारांनी वाचकाचे मन कासावीस करून सोडते. मनाची ही अस्वस्थताच जिथे वाचकाला विचार करावयास भाग पाडते तेच साहित्य ‘अक्षर साहित्य’ ठरत असते.
    अशोक पवारांचे साहित्य हे याच पठडीतले आहे. त्यामुळे क्षणार्धात ते वाचकांच्या मनाचा ठाव घेते. एकेका माणसाचे अनुभव जाणून घेण्यास ते वाचकाला बाध्य करते.

    – डॉ. अनंता सूर

    Ashok Pawaranchya Sahityatil Lekhanvishyak Janiva Aani Bolibhash

    195.00
    Add to cart
  • अष्टांग-योग (मराठी) भाग 1

    समिक्षा आणि अभिप्रायांमधून प्राप्त झालेले सार :
    एक सांभाळून ठेवण्याजोगे पुस्तक…

    – मैरी जे. के. स्टालवर्ट

    एका गंभीर असूनही रोचक अशा विषयावर असलेले पुस्तक खरोखरीच डॉ. सहर एक प्रतिभावान व्यक्ती आहेत. एक ‌‘संपूर्ण मनुष्य’ ज्यांच्यासाठी मानवी अध्यात्मिक विषयामधला कोणताही पैलू अनोळखी नाही.

    – प्रो. जुजुकी ओकासा

    हे पुस्तक वाचणाऱ्या कोणाही व्यक्तीला हे जाणवल्यावाचून राहणार नाही की तो एका भविष्यवेत्या प्रतिभावंताच्या सान्निध्यात आहे. जो एकाचवेळी विश्वात आणि प्रबुद्ध असा लेखकही आहे.

    – अर्ल पी. के. रुधरफोर्स

    सरतेशेवटी आपल्याजवळ आता एका अश्या लेखकाचं पुस्तक आहे की ज्याने ह्या पुस्तकांत लिहिलेल्या प्रत्येक अध्यात्मिक अवस्थेचा स्वतः अनुभव घेतलेला आहे.

    – योगी राज कृष्णा, हिमालय वन विश्वविद्यालय

    लेखकाने तिबेटीयन गुढ योगामधील सर्वात गहन अश्या रहस्यांची दिक्षा घेतलेली आहे. सहर हे आपल्या ह्या आजच्या युगातले ‌‘मिलारेपा’ (तिबेटातील सर्वात प्रसिद्ध असे योगी) आहेत.

    – लामा टिलकू

    सध्या हयात असणाऱ्या कोणत्याही विद्वानापेक्षा सदर योग आणि बौद्ध धर्माचे अधिक चांगले जाणकार आहेत.

    – प्रो. डॉ. तारापोरे

    हे पुस्तक (सहर ह्यांचे) बऱ्याच जणांमध्ये आत्मज्ञान जागवेल.

    – स्वामी रामचंद्र

    सहर जी विज्ञानातील सर्वात आधुनिक शोधांचा उपयोग प्राचीन ज्ञानाच्या पुष्ठ्यर्थ करतात. त्यांच्यासाठी दोन्ही प्रकारचे ज्ञान सहजसाध्य आहे.

    – गुरु सत्यानंद

    मानवी जीवनाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी सदर ह्यांनी केलेल्या ह्या कार्याची आलोचक सुद्धा प्रशंसा करतात.

    – प्रिंसिपल जॅक्सन

    वाचक जसजसा हे पुस्तक वाचत जातो, हे पुस्तक त्याच्यावर आपला प्रभाव टाकत जातं. हे महान पुस्तक कालातीत आहे आणि मुमुक्ष्‌ंना (जे सत्याचा शोध घेतात) ह्या पुस्तकाची नक्कीच शिफारस करता येईल.

    – डीन इंगेरसोल

    Ashtang-Yog

    250.00
    Add to cart
  • असहमति के रंग

    अशोक नामदेव पळवेकर की कविता अपने समकालीन सामाजिक-राजकीय वास्तव की एक प्रगल्भ कालसंहिता है|
    भारतीय समाज व्यवस्था में आज का वास्तव प्रस्तुत करते हुए यह कविता आसपास के साधारण मनुष्यों के जीने में तनावों के साथ ही समाज में निहित धार्मिक-जातिय असहिष्णुता, क्रौर्य, दहशत, पुरुष सत्ताक हिंस्रता और हाल के समय सत्ताधिशों के बर्ताव में सामाजिक-राजकीय पाखंड व मूलतत्त्ववादी विचार प्रणाली से फैलने वाला धार्मिक-साँस्कृतिक उन्माद, कट्टरवाद आदि के अत्यधिक प्रभाव में ध्वस्त हो रही जनतांत्रिक यंत्रणा के सामाजिक व मानवीय मूल्य, साथ ही सरमायादारी आक्रमकता, सत्ताशरण माध्यम-प्रशासन-न्याय यंत्रणा वग़ैरह के भिन्न-भिन्न वास्तव रूप भी अत्यंत उग्र व आक्रमक स्वरूप में अपनी स्वतंत्र शैली से अभिव्यक्त करती है|
    आंबेडकरवादी जीवन दृष्टि में संवेदनशीलता इस कविता का स्वभाव होते हुए विश्व मानवतावाद के व्यापक परिघ-केन्द्र से इस कविता की आँवल नाल जुड़ी हुई है| अतः यह कविता आसपास के मानवीय दुःख-प्रतीतियों से कतई सहजभाव से एकरूप होती है, और न्याय-अन्याय के कड़े संघर्ष में न्याय के पक्ष में अपनी निर्णायक भूमिका घोषित करती है| विवेकशील लड़ाकूपन इस कविता का एक महत्त्वपूर्ण पहलु होने से मानवीय स्तर पर विश्व संवेदना एवं जीवन एहसासों का ऐतिहासिक संचित इस कविता में अव्याहत प्रवाहित होते हुए दिखता है, और सामाजिक दुःख भान का एक करुणामय व विद्रोही दर्शन उस में प्रगल्भता से साकार होता है|
    इस कविता में तत्त्वचिंतन और समकालीन वास्तव का सारा ही भान ध्यान में रखते हुए यह कविता यानी अपने समकाल के सामाजिक-राजकीय पर्यावरण में अत्यंत कडुआ एवं गर्म रंग दर्शानेवाली भिन्न-भिन्न स्थिति गति के काल-कोलाहल का एक मौलिक धन है|

    300.00
    Add to cart
  • असहमतीचे रंग

    अशोक नामदेव पळवेकर यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक-राजकीय वास्तवाची एक प्रगल्भ कालसंहिता आहे.
    भारतीय समाजव्यवस्थेतील आजचे वास्तव मांडताना ही कविता सभोवतालच्या सामान्य माणसांच्या जगण्यातील ताण-तणावांसोबतच समाजातील धार्मिक-जातीय असहिष्णुता, क्रौर्य, दहशत, पुरुषसत्ताक हिंस्रता आणि अलीकडच्या काळातील सत्ताधीशांच्या वर्तनातील सामाजिक-राजकीय पाखंड व मूलतत्त्ववादी विचारसरणीतून फोफावत जाणारा धार्मिक-सांस्कृतिक उन्माद व कट्टरतावाद इत्यादींच्या आत्यंतिक प्रभावाखाली उद्ध्वस्त होत जाणारी लोकशाही यंत्रणेतील सामाजिक व मानवी मूल्ये; तसेच भांडवली आक्रमकता, सत्ताशरण माध्यमे-प्रशासन-न्याययंत्रणा वगैरेंची वेगवेगळी वास्तवरुपेही अत्यंत उग्र व आक्रमक स्वरुपात आपल्या स्वतंत्र शैलीने अभिव्यक्त करते.
    आंबेडकरवादी जीवनदृष्टीतील संवेद्यता ही या कवितेची प्रकृती असून विश्वमानवतावादाच्या व्यापक परिघ-केंद्राशी या कवितेची नाळ जुळलेली आहे. त्यामुळेच ही कविता सभोवतालच्या मानवी दुःखजाणिवांशी अगदी सहजीभावाने एकरुप होते; आणि न्याय-अन्यायाच्या टोकदार संघर्षात न्यायाच्या बाजूने आपली निर्णायक भूमिका जाहीर करते. विवेकशील लढवय्येपण हा या कवितेचा एक महत्त्वाचा पैलू असल्याने मानव्यपातळीवरील विश्वसंवेदना व जीवनजाणिवांचे ऐतिहासिक संचित या कवितेतून अव्याहतपणे प्रवाहित होताना दिसते; आणि सामाजिक दुःख जाणिवेचे एक कारुण्यमय व विद्रोही दर्शन त्यातून प्रगल्भपणे साकार होते.
    या कवितेतील तत्त्वचिंतन आणि समकालीन वास्तवाचे एकूणच भान लक्षात घेता ही कविता म्हणजे आपल्या समकाळाच्या सामाजिक-राजकीय पर्यावरणातील अत्यंत कडवट व उष्ण रंग दर्शविणाऱ्या वेगवेगळ्या स्थितिगतीच्या कालकल्लोळाचा एक मौलिक ऐवज आहे.

    Asahmatiche Rang

    395.00
    Add to cart
  • असे सोमेश्वर पुरातन

    श्रीस्कंदपुराणाने प्रभासक्षेत्रातील सोमेश्वराचा उल्लेख केलेला आहे आणि श्रीसंत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून केलेला सोमेश्वराचा उल्लेख हा श्रीस्कंदपुराणातील सोमेश्वराचा आहे. त्यामुळे श्रीस्कंदपुराणातील सोमेश्वर, श्रीसंत नामदेव महाराजांच्या अभंगातील सोमेश्वर आणि श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील सोमेश्वर हा एकच आहे, हे पटवून देण्यासाठी अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) यांनी ‘असे पुरातन सोमेश्वर’ हा ग्रंथनिर्मितीकरीता केलेला खटाटोप वाखाणण्याजोगा आहे. अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) यांनी वयाची 68 वर्ष ओलांडली असून ते 90 टक्के अंध आहेत. असे असले तरी आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या संत वाङ्मयाच्या अभ्यासाच्या बळावर त्यांनी आपल्या दांडग्या स्मरणशक्तीने तोंडी सांगावे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुलोचनाबाई चौधरी यांनी ते लिहून घ्यावे अशा पद्धतीने ‘असे सोमेश्वर पुरातन’ हा ग्रंथ सिद्धीस आला आहे. श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्तस्थळाचे महत्त्व अधोरेखित व्हावे या हेतूने तयार करण्यात आलेला हा ग्रंथ वाचक, भाविक, मुमुक्षु, वारकरी सांप्रदायिक यांच्यासाठी तसेच संत वाङ्मयाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी किंबहुना सर्वांसाठी निश्चितच उपयोगी पडेल अशी खात्री आहे.

    – डॉ. जगदीश पाटील, भुसावळ

    Ase Someshwar Puratan

    150.00
    Add to cart
  • अहिरानी लोकसाहित्य दर्शन (खंड – तिसरा) ‌‘वानोया’

    अहिरानी लोकसाहित्य दर्शन
    (खंड – तिसरा) ‌‘वानोया’

    खान्देशातील महाराष्ट्राला परिचित असलेले, ख्यातनाम ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ज्यांना ‌‘साहित्य अकादमी-2000′ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांचा हा 84 वर्षांच्या काळातील तिसरा खंड. 1958 सालापासून सर्वप्रथम लोकसाहित्य संकलन व संशोधन करून, मराठी वाचकांना अहिराणी साहित्याची गोडी कळावी व एक आदर्श संस्कृतीशी परिचय व्हावा या उदात्त हेतूने प्रेरीत होवून महाराष्ट्रातील निरनिराळ्या दिवाळी अंक, दैनिकात विविध विषयांवर सुमारे 100 लेख प्रसिद्ध केले. त्यांचे अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 (सण आणि उत्सव), खंड-2 (नाती-गोती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई-32 ने प्रकाशित केले असून त्या ग्रंथांचा एम.ए.द्वितीय वर्षाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. खान्देशच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विषय, जावय-आसरा-बोन, जलमदिन-पाँची-बारस, डाग-डागीना, प्रथा-रुढी-रितीरिवाज, इत्यादींचा ‌‘वानवळा’ वाटायला आता ते निघालेले आहेत. समस्त सुज्ञ मराठी वाचकांनी त्यांची चव अवश्य चाखावी!

    – डॉ. रमेश सुर्यवंशी, कन्नड

    425.00
    Add to cart
  • आठवणींच्या हिंदोळ्यावर

    प्रगतीची चाके लावून चार पावले चालून आल्यावर पदरी निवांतपण पडलं की, आठवणींना जाग येते. त्याही स्वयंकेंद्रित झालेल्या असतात एव्हाना. आयुष्याच्या पटावर विखुरलेल्या सुखांच्या सोबत वावरतांना उसासे टाकायची कला अवगत करून घेतलेली असते त्यांनीही. समाधानाच्या दोनचार चांदण्या अंगणी चमकू लागल्या की, झगमगाटात आयुष्याचे एकेक कोपरे उजळल्यासारखे वाटतात. स्वयंघोषित प्रगती अन्‌‍ स्वयंनिर्णित शहाणपण दिमतीला असलं की, काळाचे कोपरे कारण नसताना कोरले जातात. पटलाआड दडलेल्या कवडशांचा धांडोळा घेतला जातो. असतं तेव्हा नाहीच मोल वाटत असलेल्या गोष्टींचं. नसल्या की, त्यांचं महत्त्व वाढू लागतं अन्‌‍ सुरु होतो हरवलेपण शोधण्याचा प्रयत्न.

    Athavaninchya Hindolyavar

    350.00
    Add to cart
  • आत्मा आणि इतर कथा

    मुंबईच्या ऊच्चभ्रू समाजात वावरणारी यामिनी आणि सातपुड्यातल्या खेड्यातली केसर… सिडनीत राहणारा तो आणि धर्म, जात, देश, ओळख हरपलेली गुडिया… टेस्टट्युब बेबी स्पेशालिस्ट देवयानी आणि तिची मोलकरीण चंदा… लौकिकाच्या पलिकडील कसला अनाम खजिना शोधणारी रेवा आणि तिची मैत्रिण… लहानगा सिद्धार्थ आणि त्याचे पपा ह्यांच्या ह्या कहाण्या. एका समान धाग्याने ते बांधले गेले आहेत. आत्मसन्मान जपणारे हे लोक. आत्मा आणि इमानासाठी लढणारे… ते यशस्वी होतात की नाही याचा आढावा ह्या कथासंग्रहात घेतलाय डॉ. अलका कुलकर्णी यांनी.

    Aatma and Itar Katha

    175.00
    Add to cart
  • आधार – नैराश्यात हरवलेल्यांना

    प्रस्तुत काव्यसंग्रहात सुरुवातीच्या कविता दु:ख, नैराश्य, अपयश यांवर लिहिल्या असून सरतेशेवटी जीवनात घडलेल्या आध्यात्मिक परिवर्तनामुळे लेखिकेने जे काही अनुभवले ते सर्व कवितांच्या माध्यमातून शब्दबद्ध केले. या ग्रंथाच्या माध्यमातून हृदयातल्या भावना व्यक्त करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला आहे. काही कारणांमुळे मला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सर्वांना जो अनुभव येतो तोच मलाही आला. आलेल्या अपयशाने मला जगाचा परिचय करवून दिला. जीवनामध्ये मला खूप यातनांमधून जावे लागले, पण अशातही अनेक वर्षे मी माझे मन स्थिर ठेवू शकले ते केवळ आध्यात्मिक ज्ञानामुळे आणि अखंड हरिनाम स्मरणामुळे… धैर्य, उत्साह व दृढनिश्चयाने मार्ग आक्रमिला… आणि म्हणूनच आज माझा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून नवनव्या कल्पना सतत सुचत असतात. त्यासंबंधीच्या कवितादेखील प्रस्तुत काव्यसंग्रहात वाचकांना आढळून येतील.

    Aadhar – Nairashyat Haravalelyanna

    135.00
    Add to cart
  • आधुनिक भारतीय भाषा : मराठी

    भाषा शिकणार्‍या विद्यार्थ्यांना माध्यमांची भाषा सांगणं, माध्यम समजावून सांगणं आणि संवादाच्या या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. जग बदलतं त्याच प्रमाणात परस्परसंबंध बदलतात आणि भाषाही बदलत जाते. भाषेच्या विद्यार्थ्यांना आंतरशाखीय समज नसेल, तर त्यांना संवादाचे प्रयोजन समजत नाही आणि परिणामही समजत नाहीत.
    हे पुस्तक महत्त्वाचे आहे. कारण, ते विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने आधुनिक करते. नव्या जगाची भाषा शिकवते. व्यवहाराशी नाते जोडत, बदलांना आत्मसात करत पुढे जाण्यासाठी सज्ज करते. हे पुस्तक केवळ नव्या माध्यमविश्वाचे बाह्यरूप सांगत नाही, तर बदलाच्या या प्रक्रियेचे अंतर्बाह्य विश्लेषण करते. विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने आधुनिक करते. म्हणून या अभ्यासक्रमाच्याच नव्हे, तर सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. कारण ‘माध्यम’ आणि ‘संज्ञापन’ समजल्याशिवाय बदलणार्‍या जगाचे भान येणार नाही!
    माझे तरूण सन्मित्र डॉ. हरेश शेळके तसेच डॉ. गीतांजली चिने या प्राध्यापकांनी परिश्रमपूर्वक सिद्ध केलेल्या या ग्रंथाचे मी त्यामुळेच स्वागत करतो.

    संजय आवटे
    राज्य संपादक, ‘दिव्य मराठी’ 2016 मध्ये भरलेल्या भूतान येथील
    सहावे विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

    Adhunik Bhartiya Bhasha : Marathi

    175.00
    Add to cart
  • आधुनिक मराठी वाङ्मयाचा विश्लेषणात्मक इतिहास (1920 ते 1960)

    आधुनिक मराठी वाङ्मयाचे परिशीलन करण्याचे विविधांगी प्रयत्न आजवरच्या अनेक अभ्यासकांनी केलेले असतांना पुन्हा या वाङ्मयेतिहासाचा धांडोळा घेण्याचे प्रयोजन तसे केवळ नैमित्तिक नाही.
    येथल्या विश्लेषणाचे नमुनेदाखल एकच उदाहरण द्यावेसे वाटते. बहिणाबाईच्या कवितेची बोली अभ्यासकांच्या मते अहिराणी ही आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी मुळीच नाही. बहिणाबाईची काव्यगत बोली अहिराणी नाहीच हे येथे सप्रमाण मांडले आहे. आजवर मान्यवर समीक्षकांनी जोपासलेला बहिणाबाईंच्या काव्य बोली संदर्भाती भ्रम जर या ग्रंथिकेने दूर केला तर लेखकाचे श्रम सार्थकी लागतील.

    Adhunik Marathi Vangmayacha Visleshanatmak Itihas (1920 to 1960)

    195.00
    Add to cart
  • आधुनिक साहित्य : स्वरूप आणि समीक्षा

    वाचकांमधून चांगल्या समीक्षकांची निर्मिती होत असते. चांगला समीक्षक हा काही वेळेला सहित्यिकही असू शकतो. परंतु तो साहित्यिकच असला पाहिजे असे काही बंधन नाही. परंतु साहित्यिक असणार्‍याच्या संवेदनेच्या पार्श्वभूमीवर आस्वादकता तीव्र असल्यावर तो साहिथतयकांवर अवाजवी टीका करणार नाही, असा एक समज असतो. नाहीतर समीखक साहित्यिकांचा विरोधकच आहे, असे स्वरुप निर्माण करण्याचा प्रयत्न करतांनाही काही मंडळी दिसतात. अलीकडे तर काही साहिथत्यकांचे आणि समीक्षकांचे कंपू तयार होत असून ते एकमेकांची अकारण ‘वाहवाऽऽ’ करीत सुटले आहेत. त्यामुळे अस्सल आणि प्रज्ञावंत साहित्य उपेक्षित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

    Aadhunik Sahitya Swarup Aani Samiksha

    325.00
    Add to cart
  • आधुनिक साहित्यप्रकार कादंबरी : रारंग ढांग

    भाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्‍यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.

    डॉ. पंडित विद्यासागर
    माजी कुलगुरू
    स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड

    Adhunik Sahityaprakar Kadambari – Rarang Dhang

    175.00
    Add to cart
  • आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक वामनदादा कर्डक

    अनंता सूर या नव्या दमाच्या अभ्यासकाने संपादित केलेले ‌‘आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक: वामनदादा कर्डक’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे ही अत्यंत आनंददायी घटना आहे. वामनदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संदर्भ या संपादनाला आहे. हे मौलिक संपादन करून अनंता सूर यांनी वामनदादांना कृतज्ञतापूर्वक अभिवादनच केलेले आहे. या मौलिक कार्यासाठी मी त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो.
    वामनदादा महाप्रतिभावंत होते. बाबासाहेबांचे इहकेंद्री समन्यायी तत्त्वज्ञान त्यांनी लोकांच्या मनांमध्ये प्रस्थापित केले. आंबेडकरी चळवळीतील चढउतारही त्यांनी जिवाच्या आकांताने मांडले. बाबासाहेबांनी उभारलेल्या संग्रामात त्यांनी महायोद्ध्याची भूमिका केली. बाबासाहेबांच्या चळवळीतले ते सौत्रान्तिक महाभिक्खू होते. त्यांच्या हयातीतच वामनदादा एक अनोखी आणि तेजःपुंज महाआख्यायिका झाले होते. या महाआख्यायिकेचा वेध घेणारे अनेक मान्यवरांचे लेख वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळतील. या लेखांसोबतच वामनदादांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण आणि वामनदादांसंबंधीच्या दोन मुलाखतीही या पुस्तकात वाचायला मिळतील.
    या मौलिक पुस्तकाचे संपादक अनंता सूर यांना वामनदादांचे सर्वच चाहते मनापासून धन्यवाद देतील ही खात्री मला आहे.

    – यशवंत मनोहर

    350.00
    Add to cart