• काव्यांकुर आस्वाद आणि चिकित्सा

    मराठी कवितेला समृद्ध परंपरा आहे. कवितेच्या विविध प्रकारांनी मराठी कविता विकसित झालेली आहे. या प्रकारांमधून वैविध्यपूर्ण आशयसूत्रे आढळतात. प्रीतिभावना, निसर्ग जाणीव, सामाजिक जाणीव, राष्ट्रभावना ही काही महत्त्वाची आशयसूत्रे. या आशयसुत्रांनी प्रेरीत झालेल्या कवितांचे रसग्रहण ‘काव्यांकुर : आस्वाद आणि चिकित्सा’ या ग्रंथातून आलेले आहे. कविता हा मानवी चित्तवृत्ती चेतवणारा वाङ्मय प्रकार. अर्थाची विविध वलये तो निर्माण करतो. सदर समीक्षाग्रंथात ह्या अर्थवलयांना अक्षररूप देण्यात आलेले आहे.

    Kavyankur Aaswad Aani Chikitsa

    95.00
    Add to cart
  • कौटुंबिक हिंसाचार आणि महिला

    Kautumbik Hinsachar Aani Mahila

    250.00
    Add to cart
  • क्रांतीलहर

    मानव कल्याणाची कविता

    संवेदनशील कवी अजय भामरे यांचा ‌‘क्रांतीलहर’ हा पहिला कवितासंग्रह वाचकांसमोर येत असल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समतेसाठी चळवळ आणि विषमतेसाठी वळवळ अशा दोन गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळतात. विषमतेसाठी चालणारी वळवळ आजही समाजाला पोखरण्याचे काम करीत आहे.
    कवी अजय भामरे या विषमतेविरुद्ध आपल्या शब्दांमधून युद्ध छेडतांना दिसत आहेत. त्यांची कविता मानवाचे कल्याण होण्यासाठी धडपडताना दिसते. एका नवोदित कवीने पहिल्याच कविता संग्रहामध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणे हे अतिशय परिपक्वतेचे लक्षण आहे. त्यांच्या चौरेचाळीस कविता चौरेचाळीस विषयांना समोर आणून समाजाला बदलासाठी आवाहन करताना दिसतात. यावरून कवीची सर्वव्यापी दृष्टी लक्षात येते. आंबेडकरी चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता त्यांच्या प्रत्येक कवितेत प्रतिबिंबित होताना दिसतो.
    चंगळवाद आणि भौतिक वादाने ग्रासलेल्या आजच्या काळात समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणारा हा कवी नामनिराळा वाटतो. त्यांची ‌‘क्रांतीलहर’, ‌‘सत्यशोधक सूर्य’, ‌‘भिमसुर्य’, ‌‘परिवर्तनाची पहाट’, ‌‘क्रांतीचे गीत’ या कवितांमधून तर ते मानव मुक्तीचा जाहीरनामा वाचकांसमोर मांडतात. भारतीय संविधानातील मूल्यांप्रती त्यांची बांधिलकी त्यांच्या प्रत्येक कवितेतून जाणवते.
    फुले-शाहू-आंबेडकरांच्या समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या या कवीला आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!

    प्रा. भरत आत्माराम शिरसाठ
    अध्यक्ष- समतावादी साहित्य शिक्षक मंडळ

    Krantilahar

    110.00
    Add to cart
  • खानदेश : साहित्य आणि संस्कृती

    प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची एक संस्कृती विशिष्टता असते. त्या प्रदेशातील लोकपरंपरा, बोली, आध्यात्मिक आणि वैचारिक प्रभाव यांमधून ती आकाराला येत असते. त्या प्रदेशातील साहित्यनिर्मिती हा देखील त्याचाच एक भाग असतो. या भूमिकेतून ‘खानदेश’ या प्रदेशाचे पृथगात्म संस्कृतीविशेष संशोधन-अभ्यासाच्या प्रक्रियेतून उलगडून दाखविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. प्रदेशविशिष्ट अस्मितांचा जागर करणे, एवढ्या संकुचित अर्थाने याकडे पाहणे उचित नाही. स्वसमाज-संस्कृतीचे निरीक्षण, परीक्षण करून पुनर्मूल्यांकन करण्याची दृष्टी त्यात अभिप्रेत आहे. या दिशेने व्यापक स्तरावरून आणि विविधांगांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर पुस्तकाचा विचार करावा लागतो. खानदेशातील साहित्याच्या अभ्यासावर प्रकाश टाकणार्‍या या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अभ्यासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

    – डॉ. आशुतोष पाटील

    Khandesh : Sahitya Aani Sanskruti

    325.00
    Add to cart
  • खानदेशचे मराठी साहित्य कथा आणि कथाकार

    ‘कथा’ हा आदिम साहित्यप्रकार आहे. शेकडो वर्षे मौखिक वाङ्मयात कथा जीवंत होती. भारतीय साहित्यात कवितेनंतर कथा हा वाङ्मयप्रकार मोठ्या प्रमाणात लिहिला गेला. मराठी साहित्यातही कथेला विशेष स्थान आहे. इंग्रजी वाङ्मयाच्या अनुकरणातून आलेल्या लिखित मराठी कथेला स्वतःचा चेहरा प्राप्त व्हायला बराच काळ जावा लागला.
    स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वि.स. खांडेकर, ना.सी. फडके यांसारख्या कथाकारांनी मराठी कथेला लोकप्रियता मिळवून दिली. पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडात नवकथाकार गंगाधर गाडगीळ, जी.ए. कुलकर्णी यांनी कथेचा चेहरा-मोहराच बदलवून टाकला. ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी अशा साठोत्तरी कालखंडातल्या विविध प्रवाहातील तसेच नव्वदोत्तर कालखंडातील कितीतरी कथाकारांनी मराठी कथेला नवा आशय-विषय देत एक नवा आयाम प्राप्त करून दिला.
    खानदेशातील कथाकारांचाही मराठी कथेला समृद्ध करण्यात खारीचा वाटा आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आजतागायत मराठी कथा वाङ्मयात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या बारा कथाकारांच्या कथांचा हा ऐवज म्हणजे खानदेशी मराठी कथा वाङ्मयाचा आरसा आहे.

    Khandeshche Marathi Sahitya : Katha & Kathakar

    150.00
    Add to cart
  • खानदेशचे मराठी साहित्य कवी आणि कविता

    या पुस्तकात खानदेशातील निवडक कवींच्या कविता आहे. हे सारे कवी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहेत आणि साधारणपणे विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिकीकरणाच्या काळात लिहिणार्‍या कवींच्या पिढीपर्यंतचा विचार सदर संपादनात केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेचा विचार केल्यास नवकवितेपासून ते नव्वदनंतरच्या कवितेपर्यंतच्या प्रवासात आकाराला आलेल्या कवींच्या कविता ह्यात आहेत. गणेश कुडे ते रावसाहेब कुवर या कविपरंपरेकडे या दृष्टीने बघता येते. पण हे बारा कवी व त्यांची कविता म्हणजे गेल्या सहा दशकांत खानदेशातून लिहिणार्‍या कवितेचे एक निवडक व प्रातिनिधिक दर्शन आहे. खानदेशातून लिहिल्या गेलेल्या आणि आजही लिहिल्या जाणार्‍या कवितेचा तो एक लहानसा भाग आहे. या अंगाने विचार करताना सदर संपादनातील निवडक कवींच्या कवितांकडे वळण्याआधी खादेशातील आधुनिक कवितेच्या परंपरेचे अवलोकन करणे अपरिहार्य ठरते.

    Khandeshche Marathi Sahitya Kavi ani Kavita 

    125.00
    Add to cart
  • खानदेशातील दलित साहित्य

    दलित साहित्यामध्ये कविता, कादंबरी, नाटक, जलसे या प्रकाराव्यतिरिक्त खानदेशी दलित साहित्यामध्ये वैचारिक लिखाणही झालेले दिसते. दलित साहित्याची थोरवी व दलित साहित्याची अटळ निर्मिती संदर्भात प्रा. सुषमा तायडे (अहिरे) आपल्या संशोधनांनी निष्कर्ष नोंदवतात, ‘दलित साहित्यातील अनुभवाची जी भूमी आहे. तिच्यावर अजून कोणी पाय ठेवला नव्हता तो प्रथम दलित साहित्यिकांनी ठेवला आहे. ह्या दाहक सामाजिक वास्तवाच्या रुपात काही बदल होत नाही. तोपर्यंत दलित साहित्याची निर्मिती अटळ व अपरिहार्य आहे. दलित साहित्य म्हणून जे लिहिले जाईल ते सर्व श्रेष्ठ साहित्य असे मी मानत नाही आणि कुणी तसे मानूही नाही पण एक मात्र निश्चित की मराठीला आंतरराष्ट्रीय दर्जा, मान्यता मिळवून देण्याची जबाबदारी ही निखालसपणे दलित साहित्यिकांवर येऊन पडलेली आहे.’ संशोधनांती हा काढलेला निष्कर्ष तंतोतत तर्कसुसंगत, यथोचित असून दलित साहित्यिकांना ही मोठी जबाबदारी आता पेलायची आहे. हे मात्र निश्चित!

    Khandeshatil Dalit Sahitya

    425.00
    Add to cart
  • खानदेशातील साहित्य

    खानदेशाला साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. विविध वाङ्मयप्रकार व प्रवाहात खानदेशी साहित्यिकांनी आपला ठसा उमटविलेला आहे. मराठीतील चौथा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. भालचंद्र नेमाडेंच्या रुपाने खानदेशाला मिळाला व कधीकाळी मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी असलेला ‘खानदेश’ पुन्हा मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आलेला आहे. प्रारंभापासून आजतागायत या समृद्ध साहित्याची समीक्षा मात्र अभावानेच झालेली दिसून येते. त्यामुळे खानदेशी साहित्याच्या अभ्यासकांना अडचणी निर्माण होत आलेल्या आहेत. ‘खानदेशातील साहित्य’ हा ग्रंथ मात्र खानदेशी साहित्याच्या अभ्यासकांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

    सदर संपादित ग्रंथात विषयाचे सर्वस्पर्शित्व विशेषत्वाने दिसून येते. उपेक्षित राहिलेल्या कवी, लेखक, वाङ्मयप्रकार, नियतकालिके, लोकवाङ्मय यांवर नव्या दमाच्या अभ्यासकांनी नव्याने टाकलेला प्रकाश निश्चितच कौतुकास्पद आहे.

    – डॉ. शिरीष पाटील

    Khandeshatil Sahitya

    350.00
    Add to cart
  • खानदेशातील साहित्य व समाजदर्शन

    खानदेशची भूमी ही साहितयक्षेत्रात संपन्न अशी भूमी आहे. यात बालकवींपासून तर आजच्या साहित्यिकांपर्यंत अनेक दिग्गज असे साहित्यिक निर्माण झालेत. या सर्व साहित्यिकांनी आपल्या लेखनाने खानदेशचे नाव अवघ्या देशात वाढवले आहे. या खानदेशातील साहित्यिकांचा अभ्यास हा संपूर्ण भारतात होत आहे हे विशेष. खानदेशचे सुपूत्र व नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक मा. भालचंद्रजी नेमाडे यांना साहित्यक्षेत्रातला प्रतिष्ठीत असा बहुमान प्राप्त झाला. अशा अनेकांनी आपल्या लेखणीने लेखन करुन खानदशाचे वास्तव व जिवंत असे वर्णन केले, त्यातून त्यांनी आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडले आहे.

    या साहित्यिकांनी आपल्या लेखनातून या भागाच खरेखुरे असे चित्रण केलेले दिसून येते. यातूनच या भागातील शेतीची समस्या, बेरोजगारीची समस्या, येथील समाजजीवन यांचे सक्षम असे लेखन झाले आहे.

    Khandeshatil Sahitya v Samazdarshan

    195.00
    Add to cart
  • खान्देश रत्नावली

    Khandesh Ratnavali

    100.00
    Add to cart
  • खान्देशची काव्यधारा

    Khandeshchi Kavyadhara

    45.00
    Add to cart
  • खारं आलनं

    Khara Aalan

    195.00
    Add to cart
  • खैरलांजी, भीमा-कोरेगांववरील हल्ला आणि इतर कविता

    विद्रोह, आकांत, आक्रोश, उद्रेक, विध्वंस, या शब्दांशी परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा जवळचा संबंध आहे. वरकरणी हे शब्द अतिरंजित भाव प्रकटीकरण दर्शक जरी वाटत असले तरी उपेक्षितांच्या व वंचितांच्या वाट्याला आलेल्या वेदना प्रखरतेने मांडण्यासाठी याच शब्दांनी मोलाची भूमिका निभावली आहे. हेच शब्द कवी भरत शिरसाठ यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी साथ देतात. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतून मानवी जीवनातील हा संघर्ष सातत्याने मांडला गेला आहे. परिवर्तनवादी साहित्य हे भावनात्मक स्वत्व, अभित्व आणि स्वाभिमान यासाठी झुंजणारे साहित्य आहे. रंजन-मनोरंजन हा परिवर्तनवादी चळवळीचा उद्देश नाही. संत चोखा, संत कबीर, संत रवीदास यांपासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबांपर्यंतच्या बहुजनवादी संतांनी आपल्या वाणीने लोकांना जागृत केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधानाच्या रुपाने आमच्या हातात मानवमुक्तीची हुकमी चाबी दिली आहे. तरीही आजदेखील अन्याय हा शब्द येथील उपेक्षितांच्या जगण्याशी चिकटलेलाच आहे. ते एक तप्त वास्तव आहे. म्हणून संवेदनशिल मनाचे कवी प्रा. भरत शिरसाठ यांच्या काव्यसंग्रहातून खैरलांजीचं जळतं सरण आम्हाला पहायला मिळत आहे. जातीजातींमधील पेटलेल्या वास्तवांचे विस्तव स्वतंत्र चुलीत धगधगताां आज आम्ही बघत आहोत. ही धग कधी शमेल, हा एक मोठा प्रश्न आहे. बहुजनांच्या अनुपरिवर्तनासाठी ही विझणारी धग एक क्रांतीगीत असणार आहे.

    Khairlanji, Bhima-Koregaonvaril Halla Ani Itar Kavita

    100.00
    Add to cart
  • गझलनामा

    ‘गझल’ हा तंत्रशरण काव्यप्रकार असला तरी त्यात काही शेर उत्स्फूर्तपणे आलेले असतात. गझलेतला प्रत्येक शेर (द्विपदी) म्हणजे स्वतंत्र कविता असते. गझल नेहमीच वाचणार्‍याला अंतर्मूख करते नि विशुद्ध आनंदाचा अनुभव देते.
    या संपादनातील राजा महाजनांची गझल ही स्वतःला आणि वाचकांना आत्मशोधाच्या वाटेवर चालायला भाग पाडते. वा.न.सरदेसाई यांची गझल जीवनविषयीचे अतिशय अर्थपूर्ण भाष्य करते. जीवनाच्या लयीशी वाचकाची लय जोडून देते. वाचकाला विचाशील करते. तर सामजिक, राजकीय, धार्मिक आणि एकूणच भोवतालाच्या व्यंग, बिसंगतीवर वा. ना. आंधळे यांची गझल अचूकपणे बोट ठेवले आणि स्वस्थ समाजासाठी विचार करायला लावते.
    या तीन ज्येष्ठांच्यानंतर प्रत आणि प्रमाण या दोन्ही अंगाने खानदेशातील गझल आता मराठी सारस्वतांसाठी, रसिकांसाठी दखलपात्र झाली आहे.

    Gajhalnama

    60.00
    Add to cart
  • गावांजली

    प्रा. डॉ. ज्ञानेेश्वर शिवाजी सूर्यवंशी (1 जून 1969) मूळचे मुडी प्र डा., ता.अमळनेर, जि.जळगांव, महाराष्ट्र येथील रहिवासी असून सध्या ते विद्यावर्धिनी महाविद्यालयात भूगोलशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा 24 वर्षे शिकविण्याचा, 20 वर्षे संशोधनाचा, 17 वर्षे प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी 2002 मध्ये क.ब.चौ.उ.म.वि., जळगांव कडून आदिवासींचे आरोग्य भूगोलशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली. नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2019 पर्यंत ते विद्यावर्धिनी महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी डिसेंबर 2015 ते ऑक्टोबर 2016 पर्यंत ते क.ब.चौ.उ.म.वि., जळगांवच्या आजीवन शिक्षण मंडळाचे संचालक होते. त्यांना भारतीय प्रगत अध्ययन संस्था, शिमला कडून 2009-11 ची शिष्यवृत्ती प्राप्त होती. तसेच भारतीय दूरस्थ संवेदन संस्था, डेहराडून मध्ये 2006 ला त्यांनी प्रशिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी 10 संशोधन प्रकल्प विविध संस्थांना सादर केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17 विद्यार्थीनी पीएच.डी. व एम.फील. पूर्ण केले आहे. लेखन व संपादनात त्यांनी 187 पेक्षा अधिक संदर्भ ग्रंथ, संपादित पुस्तके व नियतकालिके, पुस्तके, संशोधनात्मक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत. सुमारे 16 पेक्षा अधिक परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळाचे आयोजन त्यांनी केले आहे. द.कोरिया, मलेशिया, श्रीलंका येथील परिषदांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. डॉ. सूर्यवंशी हे क.ब.चौ.उ.म.वि. च्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य (2016-19) होते. तसेच ते भूगोल अभ्यास मंडळ व विज्ञान विद्याशाखा सदस्य म्हणून 10 वर्षे कार्यरत होते. त्यांना दिव्य मराठीचा ‌‘आदर्श शिक्षक’ (2020), क.ब.चौ.उ.म.वि. चा ‌‘उत्कृष्ट प्राचार्य’ (2017), अमेरिकन विज्ञान संस्थेकडून ‌‘प्रवास अनुदान’ (2013), म.भू.प., पुणेचा ‌‘तरुण भूगोलतज्ज्ञ’ (2012), भारतीय सामाजिक संस्था, नवी दिल्ली कडून ‌‘तरुण सामाजिक शास्त्रज्ञ’ (2011), क.ब.चौ.उ.म.वि. कडून उत्कृष्ट ‌‘रासेयो कार्यक्रम अधिकारी’ (2008) यासारखे पुरस्कार प्राप्त आहेत. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भूगोल संस्थाचे आजीव सभासद असून कार्यकारिणी सदस्य आहेत.शोशत विकास, अधिवासीचे आरोग्य व भूऔषधशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय असून सामाजिक चळवळीत त्यांनी दायित्व दिले आहे. अलीकडे त्यांनी ‌‘काव्यांजली’ व ‌‘निसर्गावली’ हे काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत.

    125.00
    Add to cart
  • गुफेतील वाट

    बाई च्या गैरहजेरीत जसं सुपारी ठेऊन माणूस पूजा करू शकतो तसं माणसाच्या गैरहजेरीत नारळ ठेऊन बाईने पूजा का करू नये??
    ‌‘पायावरचे पोट’ या कथेत कलेक्टर झालेल्या लेकीने आईला विचारलेला हा एक प्रश्नच नव्हे तर समाजातील एकट्या स्त्रियांच्या हक्काच्या दिशेने पुढे टाकलेलं एक पाऊल आहे.
    ‌‘गुफेतील वाट’ हा कथा संग्रह सामान्य माणसाच्या अंतर्मनाची हाक आहे. लेखिकेने एक स्त्री या नात्याने स्त्रियांचे प्रश्न, त्यांचे समाजातील स्थान, त्यांची धडपड आणि त्यांचे अंतर्मन, प्रत्येक कथेतून ताकदीने वाचकासमोर मांडले आहे.
    हा कथा संग्रह वाचकाला अंतर्मुख तर करतोच पण समाजाला एक दिशा ही देतो. काही कथा आपल्या आजूबाजूलाच घडताय अस जाणवत. पण त्याच बरोबर माणसाच्या बोथट झालेल्या जणीवांना धार देण्याचं कामही हा कथा संग्रह करतो.
    स्थानिक प्रश्नापासून सुरु झालेला हा कथा संग्रह आंतरराष्ट्रीय प्रश्नापर्यंत केव्हा पोहचतो हेच वाचकाला कळत नाही. स्थानिक असो की आंतरराष्ट्रीय, जातधर्म लिंग काहीही असो ‌‘मानवी मूल्य’ किती महत्वाची आहेत, हे यात अधोरेखित करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.
    सीमा भारंबे यांच्या अक्षरलेखणीस, मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

    – देवेंद्र भंगाळे

    Gufetil Wat

    135.00
    Add to cart
  • गुरूकूल संस्कार

    प्राचीनकाळापासून गुरुकुलाची परंपरा भारतीय द्वीपकल्पात सुरू आहे. त्यातून निर्माण झालेली भारतीय संस्कृती वेगळी, सुविद्य, सुविचारी आणि नीतिमुल्यांना जोपासणारी आहे म्हणूनच विश्वात ही भारतीय संस्कृती अग्रस्थानावर आहे. भारतीय संस्कृतीचा लिखीत ठेवा म्हणजे प्राचीन धर्मग्रंथे-वेद, उपनिषदे, पुराणे होत. संस्कृतीच्या महानविचारसूत्रांचेच पुढे प्रतिकात रुपांतर झालेले आहे. आचारसंहिता सामान्यालाही कळावी यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उत्सव सुरू झाले. भारतीय व्यक्तीमध्ये पुरुषार्थ कायम असून बुद्धीसंपदा जोपासली गेली आहे. जीवनप्रवाह योग्यरितीने व्हावा यासाठी आश्रमव्यवस्था निश्चित केलेली आहे. भारतीय शिक्षणपद्धती सर्वांसाठी खुली असून त्यातील ज्ञान-दानाचेच वृद्धींगत होत आहे. आपल्या गुरुकुलात सर्व प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले जातात. शिक्षणातील उत्सवांच्या पाठीशी असलेली दृष्टी जर पकडली गेली, त्याची पार्श्वभूमी असलेल्या मंत्रांचे जर मनन झाले तर या सांस्कृतिक इतिहासाच्या निर्मात्या ऋषीसमोर मानव कृतज्ञताबुद्धीने नतमस्तक होते. या ठिकाणचे उत्सव प्रसन्नतेचे प्रेरक, प्रेमाचे पोषक धर्माचे संरक्षक आणि भावनांचे संवर्धक, ऐक्याचे साधक आहेत.

    Gurukul Sanskar

    95.00
    Add to cart
  • गुर्जरी लोकगीते : काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन

    गुर्जरी लोकगीतांचे काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन या संदर्भ ग्रंथात गुर्जरी बोलीभाषेतील लोकगीतांच्या माध्यमातून भाषाशास्त्रीय दृष्ट्‌‍या व्याकरण तपासले असून गुजरी लोकगीतांत अलंकार आल्याने भाषेतील सौंदर्यस्थळं शोधता आले. गुर्जरी लोकसाहित्यातील लोकगीत या प्रकारात समाजाच्या चालीरीती, राहणीमान, विधी-विधान यांचे वर्णन असून ठिकठिकाणी विविध भाव-भावनांचेही दर्शन होताना आढळून येते. त्या अनुषंगाने गुर्जरी लोकगीतांतील काव्यसौष्ठव, भावदर्शन व त्यांचे मूल्यमापन करून गुर्जरी बोलीभाषेच्या अभ्यासाचे महत्त्व सदर ग्रंथाद्वारे पटवून दिले आहे.

    Gurjari Lokgite : Kavyasauthav, Bhavdarshan v Mulyamapan

    150.00
    Add to cart
  • गुलामगिरी मूल्य आणि अन्वयार्थ

    डॉ. कैलास वानखडे यांनी ‌‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ लिहितांना या ग्रंथातील मूल्यात्मकता आणि सामाजिकता यांची आस्वादक मीमांसा करण्याची जी वैचारिक भूमिका घेतली आहे, ती स्तुत्य असून; त्यामुळे ‌‘गुलामगिरी’ या ग्रंथांचे क्रांतिकारकत्व नव्या पिढीला पुन्हा ज्ञात होईल. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी ग्रंथातील मूल्यदर्शनाचा प्रामुख्याने वेध घेतला आहे. कारण, हा ग्रंथ जोतीरावांच्या प्रगल्भ सामाजिक चिंतनातून साकार झालेला असून; तो केवळ हिंदू धर्मशास्त्राची चिकित्सा करत नाही तर तथागत बुद्धांनी दिलेल्या मूळ भारतीय संस्कृतीची मूल्ये रूजवितो. त्यामुळे सदर ग्रंथाला वैचारिक व वाङ्मयीन मूल्ये प्राप्त झाले. ही मूल्य केवळ मूल्य नाहीत तर ती जीवन सुखी करण्यासाठी उपकारक ठरलेली ‌‘मानवी जीवनमूल्ये’ आहेत, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले ते फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ‌‘गुलामगिरी’ हा मूळ ग्रंथ समजून घेण्यासाठी ‌‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ वाचकांसाठी मार्गदर्शक वाटाड्या ठरणार आहे.
    डॉ. कैलास वानखडेंची तर्कशुद्ध मांडणी, समीक्षेची आस्वादकदृष्टी उत्तम आहे. यामुळे जिज्ञासू व चोखंदळ अभ्यासकांनी सदर ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवावा, इतका संदर्भयुक्त आहे.

    – डॉ. अशोक रा. इंगळे
    सदस्य, मराठी अभ्यास मंडळ,
    संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

    150.00
    Add to cart
  • ग्रंथरुपी ग्रंथपाल

    ‘ग्रंथरुपी ग्रंथपाल’ या आत्मचरित्रपर लेख संग्रहात शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्रंथालयात कार्यरत असणार्‍या ग्रंथपालांच्या लेखांचा समावेश आहे.
    या मधील बहुसंख्य ग्रंथपालांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गरिबीची परिस्थिति, परंतु गरिबीवर मात करत सतत पुढील शिक्षण घेण्याचा ध्यास घेऊन बहुतेकांनी बी.लिब, एम.लिब पदव्या प्राप्त केल्या आहेत. एवढेच नव्हे तर नेट/सेट परीक्षा देखील उत्तीर्ण करुन कायमस्वरुपी नोकर्‍या प्राप्त केल्या आहेत तर अनेकांनी याही पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजली जाणारी पीएच.डी पदवी देखील प्राप्त केली आहे. या ग्रंथपालांनी त्यांच्या उच्च शिक्षणाचा उपयोग वाचकांना उत्तम संदर्भ सेवा देण्यासाठी केला आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालय सेवा देण्याचे पवित्र कार्य गेल्या दोन-तीन दशकांपासून करत आले आहेत. काही ग्रंथपालांना त्यांनी वाचकांना दिलेल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल पुरस्कारही सुध्दा प्राप्त झाले आहेत. अशा ग्रंथपालांच्या या यशोगाथा नवीन पिढीला प्रेरणादायी जरुर ठरतील.

    Grantharupi Granthapal

    250.00
    Add to cart
  • घनगडी

    Ghangadi

    499.00
    Add to cart
  • घर वावर

    ‌‘घरवावर’ना हाऊ बहर फक्त महाराष्ट्रनी मातीम्हा दरवळी आसं नहीसे, तर आहिरानी भाषाना मानूस जगम्हा जठे कोठे व्हई तठे-तठे हाऊ आस्सल मातीना सुगंध दरवळनार से. कवी/साहित्यिक आनी आहिरानी भाषाना सेवक कार्यकर्ता म्हनीसन मी प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी यास्नाकडे देखस. सुर्यवंशी सुर्यना वंशज शेतस तं जगभर उजेड पडीन ना!
    गाव शिवनी कथा सांगस सदाभाऊ
    घर वावरनं दु:ख मांडस सदाभाऊ
    कवी सदाशिव सुर्यवंशी येस्ले कवितास्नं पूर्न भान से. त्यास्ना जगाम्हाच एक न्यारी धून से, तिले लय से, ताल से आनी पक्का सूर से. कवितास्ना विविधांगी प्रकारले त्यास्नी असा काही तऱ्हे बांधेल से जसा पैठनीना कसदार कलावंत पैठनीमा आपली कला उतरावस आसं वाटत ऱ्हास की, त्या पैठनीमधला मोर आपला घरना ओटावरच नाची ऱ्हायनात. कवी.सदाशिव सुर्यवंशी यास्नी ‌‘घर वावरनी’ हायी कविता काळीजमा नाचस आनी डोयामा साचस. मना लाडका धाकला भाऊ सदाले काळीजभर शुभेच्छा देस आनी संपूर्न संस्कृतीना पट लिखाबद्दल विनम्र सलाम करस!

    – लोककवी प्रशांत मोरे
    मुंबई

    Ghar Vavar

    150.00
    Add to cart
  • चकवा एक आकलन

    ‘चकवा’ केवळ प्रांतविशिष्ट अनिष्ट रूढींबद्दल बोलणारी कादंबरी नाही.

    केवळ प्रांतीय आदिमजीवनाचे दर्शन घडविणारी कादंबरी नाही.

    आदिवासी साहित्य प्रवाहातील अवशिष्ट कादंबरी म्हणजे चकवा.

    स्त्रीवादाच्या प्रांगणात पहिल्यांदाच दाखल होणार्‍या सेवलीची करूणगंभीर कहाणी म्हणजे चकवा.

    विज्ञानयुगाकडे झेपावणार्‍या समाजाला अजून खूप काही करायचे राहिले आहे हे आवर्जून सांगणारी, वैज्ञानिक जाणिवा पेरणारी, प्रबोधनाचा पिंड जोपासणारी, खानदेशातील सकस प्रतिभेची चुणूक दाखविणारी, अपूर्व भाषिक प्रयोग राबविणारी, सोकॉल्ड समाजसेवकांचा बुरखा फाडणारी, व्यवस्थेला नागडं करणारी, कार्यकर्तीचा जिवंत अनुभव चितारणारी आणखी बरेच काही करणारी…

    Chakva Eka Akalan

    125.00
    Add to cart
  • चंद्राने चांदणीला विचारले होते (कवितासंग्रह)

    प्रत्येक कवितेमधील युवती विचार आणि विचारानेच समाजाचे वैचारीक जीवन समृद्ध करण्याचे ध्येय बाळगणारी आहे. तिला उच्च राहणीमान आणि गाडीबंगल्याचा सोस नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा असला म्हणजे पुरे, फालतु चंगळवादी जीवनशैली तिला नको आहे. समाजासाठी जगणार्‍या स्त्रीया का धरतील चंगळवादी जीवनशैलीचा सोस?
    कविता क्रमांक ‘सात’ मधील शिवरंजनी वाचकांच्या मनावर आपला क्रांतिकारी विचारांचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही तसेच तिच्या हळव्या मनाची हळवी भावना वाचकांच्या हृदयावर आपली गुलाबी मोहोर उमटवेलच यात शंका नाही.

    Chandrane Chandnila Vicharale Hote (Kavitasangrah)

    75.00
    Add to cart
  • चंद्रास्त

    ‘चंद्रास्त’ च्या रूपाने मराठीतील सामाजिक आशयाचं खंडकाव्य कवी प्र.श्रा.चौधरी यांनी लिहिलं. मराठी ग्रामीण कवितेत ‘चंद्रास्त’ खंडकाव्य मैलाचा दगड ठरलं आहे. मजुरांच्या जगण्यातील वास्तव चित्रण यात कवीने केलेले आहे. ग्रामीण जगण्यातील सुक्ष्मता यथार्थपणे टीपलेले असून गतिमान कथानक, लयदार मुक्तछंद, ओघवती भाषा, कथनपरता, चिंतनशीलता या काव्यगुणांमुळेच मराठी साहित्यविश्वातील अनेक दिग्गज साहित्यिकांनी ‘चंद्रास्त’ची दखल घेतलेली आहेच शिवाय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर वर्गाच्या अभ्याक्रमात समाविष्ठ केल्यामुळे नव्या पिढीतील अभ्यासकांना ‘चंद्रास्त’ या अभिजात कलाकृतीचा आस्वाद घेता येणार आहे.

    – शिरीष पाटील

    Chandrast

    95.00
    Add to cart
  • चीरा (काव्यसंग्रह)

    तुझ्या प्रथमदर्शनी प्रेमाची अव्यक्त, अदृश्य, सृजन प्रेमोर्जा प्रेरणेत मिसळली. 84 वर्षाच्या आयुष्यात कामगाराच्या कविता, अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 ते 3, सण आणि उत्सव, नाती-गोती, वानोया या चीरा घडविल्या. सन्मानात ‌‘साहित्य अकादमी, दिल्ली’ (2000) पर्यंत वर चढत गेलो. खान्देशभूषण, समाजभूषण, अहिराणीरत्न, खान्देशरत्न या बिरूदावल्या ‌‘पालक’-तक्ता झाल्या. यशाचा उंच बुरुज निर्माण होतांना तूच भली मोठी भरभक्कम ‌‘चीरा’ राहीली.

    125.00
    Add to cart
  • जागतिकीकरणाचा प्रभाव

    जागतिकीकरणाचा प्रभाव तपासतांना भाषा, साहित्य, समाज, अर्थ, क्रीडा, पर्यावरण, राजकारण आणि प्रशासन या घटकांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या विविध आयामांतून समाजरचना गतिमान व्हावी; तसेच प्रगतीचे आलेख रेखाटता यावेत अन्यथा निरर्थक धावण्याची स्पर्धा मूल्यहीनता निर्माण होण्यास कारणीभूत ठरु शकते. मूल्यसंवर्धनासाठी गतिमान विवेकी विज्ञानवादाची आवश्यकता आहे. जागतिकीकरण तेव्हाच प्रभावशाली बनू शकेल.

    – प्रा. डॉ. म. सु. पगारे

    Jagtikikaranacha Prabhav

    250.00
    Add to cart
  • जावे गुंफित अक्षरे

    कवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) हे एक निरागस, निगर्वी, अतिसंवेदनशील असं साधंभोळं तद्वतच श्रद्धाळू व्यक्तिमत्त्व आहे. खेडेगावात जन्मलेल्या आणि तिथेच आपलं बालपण व्यतीत केलेल्या कवयित्रीने ग्रामीण जीवनाशी आपली बांधिलकी जपली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना, सालोसाल नापिकी याचा त्यांच्या नेणीवेत खोलवर उमटलेला ठसा, त्या शहरात आल्यावरही पुसला गेला नाही.
    मुळात ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतरित झालेल्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला आता गाव राहिलं नाही! तिकडचा निसर्ग, तिथलं जीवन, एकमेकांना धरून चालणारी तिथली माणसं, गावभर लहरणारी मायेची झुळुक या साऱ्यांना अलीकडची पिढी पारखी झाली आहे. खेडेगावातील माणुसकीच्या पंगती शहरातून उठताना दिसत नाहीत; हे बदलतं वास्तवही कवयित्रींनी शब्दातून मांडलं आहे. आपल्या बोलीभाषेतून जीवनाचं तत्त्वज्ञान सोपं करून सांगणाऱ्या खानदेशातील बहिणाबाईंच्या लेकींची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. त्यांचं आत्मभान जागृत होत, त्या आपल्या मातीशी इमान राखत सकस लेखन करू लागल्या आहेत, ही लेवागणबोली आणि एकूणच मराठी भाषेसाठी जमेची बाजू आहे.
    आनंदाच्या भ्रामक कल्पना गोंजारत, संवेदना लोप पावत चालल्याच्या वर्तमानात, माणसातलं माणूसपण हरवत चालल्याच्या काळात माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करत ही कवयित्री शब्दधन पेरीत चालली आहे. ‌‘सारी एकाच धरतीची लेकरं’ असं मानणाऱ्या, समतेची भावना जोपासत माणसं जोडणाऱ्या, ‌‘भावनेचा होता गुंता – कविता होऊन सोडवितो’ असं म्हणणाऱ्या ‌‘जावे गुंफित अक्षरे’ हा कवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) यांचा पहिलावहिला कवितासंग्रह तमाम मराठी वाचकांना भावेल असाच आहे.
    आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंगांची अंतर्मनात सातत्याने नोंद घेत त्यांना शब्दरूप देत साकारलेल्या या कवितासंग्रहाची साहित्यविश्वानं निश्चितच दखल घ्यावी, अशी कवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) यांची काव्यप्रतिभा आहे. त्यांना मनापासून सदिच्छा!

    – प्रा. किसन वराडे, अंबरनाथ

    Jave Gunfit Akshare

    150.00
    Add to cart
  • जिभाऊ : प्रा. डॉ. विजय पवार यांची चरित्रगाथा

    नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये ते ‘जिभाऊ’ या नावाने परिचित होते.
    साडेतीन दशकांचा काळ सरांच्या सहवासात राहिले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मी प्रत्यक्षपणे अनुभवले, त्यांचा विनम्र पण करारी स्वभाव. स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, दुसर्‍यांना सतत मदत करण्याची धडपड आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे नेण्याची त्यांची वृत्ती, मलाही फार आवडायची. म्हणून मी सतत त्यांच्या सोबत असायची.
    जेव्हा त्यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला तेव्हा त्यांच्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मला परिचय झाला. गरीब म्हणून लाचारी न पत्करता प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचं धाडस व कसबही त्यांच्याकडे होते. संपूर्ण आयुष्य ते स्वाभिमानाने जगले. त्यांच्या नावातच ‘विजय’ असल्यामुळे हार पत्करणे त्यांना कधी रुचलेच नाही.

    Jibharu : Prof. Dr. Vijay Pawar Yanchi Charitragatha

    150.00
    Add to cart
  • जोहार, जिद्द, तहान, फरिश्ता (आत्मकथा आणि कथा)

    जन्म : 03 जानेवारी 1946, बोरगांव, जळगांव (खान्देश).
    जन्मदाते : श्रीमती नादरबाई, श्री. गबाजी ढोलू सोनवणे.
    शिक्षण : बी.ए., बी.एड्. राष्ट्रभाषा प्रवीण.
    अभिरूची : चित्रकला, अभिनय, गायन, लेखन, भ्रमण, समाजसेवा.
    सेवा कार्य : कोकण व खान्देशात प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुखपदी कार्य.
    संपर्क : ‌‘कलाकुंज’, नागसेन नगर, पाचोरा, जि. जळगांव.
    मोबाईल : 97665 67930.
    शैक्षणिक- सामाजिक कार्य :
    प्रौढ साक्षरता, वस्तीशाळा, कुटूंब कल्याण, जनगणना, शैक्षणिक प्रकल्प, शाळांचे अंतरंग व बाह्यांग सौंदर्यात कलात्मक भर, लोकजागर, शैक्षणिक दिंडी व कृषी तसेच लोकसाहित्य प्रदर्शनांचे आयोजन व सहभागिता
    पुरस्कार सन्मान :
    1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप (भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली).
    2. आदर्श शिक्षक पुरस्कार (महाराष्ट्र शासन, मुंबई).
    3. जिद्द, तहान, फरिश्ता या स्वरचित कथांना राज्यस्तरीय पुरस्कार व प्रसिद्धी.
    4. आनंददायी तसेच कला प्रधान शिक्षण, साक्षरता अभियान, लोक जागर व राज्य-जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य व कृषी प्रदर्शनात विविध सन्मान.

    150.00
    Add to cart
  • ज्ञानदीप (भाग 2)

    या पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य असे की, यात समाविष्ट केलेले वैचारिक, ललित लेख व कविता विविधांगी स्वरुपाचे आहेत. अशा विविध विषयांतून विद्यार्थ्यांची वाङ्मयीन अभिरुची वाढावी तसेच सामाजिक बांधिलकी, मानवता, नीनिमत्ता, औद्योगिकता, पर्यावरण, विज्ञाननिष्ठा, जागतिकीकरण, देशभक्ती यांचे भान निर्माण व्हावे, त्याच प्रमाणे मराठी भाषेबद्दलची आस्था आणि एकूण आपलेपणाची विसरत चाललेली नाती या बद्दलची पुन्हा ओढ निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या दृष्टीने या पुस्तकातील लेख आणि कविता संपादित केल्या आहेत.

    Dnyandip (Bhag – 2)

    60.00
    Read more