• वेध… निळ्या… विजेचा…

    हे समग्र लेखन वाचनीय नव्हे तर चिंतनीय आहे. ‘समीक्षा’ म्हटली की ती ‘दुर्बोध’ हवीच, असा एक समज मराठी साहित्यात झाला आहे. अलीकडील तरुण समीक्षक तो खोटा ठरवून आस्वादात्मक समीक्षेला सखोल चिंतनाची, तर्कनिष्ठ चिकित्सेची जोड देऊन एक सृजनशील क्रांती मराठी वाङ्मय प्रांतात करीत आहेत.

    डॉ. संजय कांबळे याच पिढीचे समीक्षक आहेत. एका अलिप्ततेतून ते वाङ्मयीन विवेचन करतात. अनेक संदर्भातून आपली मते ठोसपणे मांडतात. त्यात अभिनिवेश किंवा आग्रह कुठेही नाही. एक प्रकारची रुजुता त्यांच्या लेखनात प्रत्ययाला येते. हीच गोष्ट मला आशादायी आणि महत्त्वाची वाटते.

    – प्रा. डॉ. विनोद गायकवाड
    प्रमुख, पत्रकारिता विभाग,
    प्राध्यापक, मराठी विभाग,
    राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव (कर्नाटक)

    Vedh Nilya Vijecha

    150.00
    Add to cart
  • व्यंकटेश माडगूळकर – माणदेशी माणसं (समीक्षा)

    व्यंकटेश माडगूळरांचे कथा वाङ्मयीन प्रत्येक पिढीतील समीक्षकांसाठी आव्हानच ठरत आले. पण हे वाङ्मयीन आव्हान डॉ. जितेंद्र गिरासे यांनी सर्वार्थाने पेललेले आहे. रामोशा पासून ते मास्तरापर्यंतची ‘माणदेशी माणसं’ डॉ. गिरासे यांनी समर्थपणे आकळली आहेत. त्यामुळे माडगूळकरांच्या व्यक्तिरेखांचे अंतरंग तर अभिव्यक्त झालेच. पण माणदेश आणि खानदेश यांचा वाङ्मयीन अनुबंधही सिद्ध झालाय. प्रादेशिक नकाशे बाद करूनच माणसांची संस्कृती विकसित करावी लागते. या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र गिरासे यांचा ग्रंथ अभिनंदनास पात्र आहे.
    शुभेच्छा व शुभाशिर्वाद!

    – डॉ. श्रीपाल सबनीस,
    अध्यक्ष, 89 व्या अखिल भारतीय मराठी, साहित्य संमेलन, पिंपरी-चिंचवड

    Vyanktesh Madgulkar – Mandeshi Manas (Samiksha)

    85.00
    Add to cart
  • व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वावटळ’ आणि ‘करूणाष्टक’ कादंबरीची समीक्षा

    व्यंकटेश माडगूळकर हे मराठी साहित्यातलं एक अस्सल देणं आहे. ज्या बारकाव्यानिशी त्यांनी मराठी साहित्यात माणदेशचा प्रांत उभा केला त्याच नजरेतून त्यांनी तिथला निसर्ग, प्राणी, पक्षी आणि माणसाचे दैनंदिन व्यवहार टिपले. प्रसंगानुरूप व्यक्तिचित्रणातून तिथल्या साध्या, कणखर, प्रेमळ माणसांना शब्दात मांडले.
    ‘वावटळ’ मधून महात्मा गांधीच्या खुनानंतर जी परिस्थिती शहरांसह खेडोपाडी उद्भवली त्याचे चित्रण माडगूळकर करतात तर ‘करूणाष्टक’ या कादंबरीतून मातृप्रेमाची अव्याहत चालणारी धडपड आपल्या दृष्टिस पडते. त्यामुळे प्रादेशिक ग्रामीण कादंबर्‍या म्हणून आजही त्या तितक्याच मौलिक वाटतात. हेच खरे तर माडगूळकरांच्या कादंबर्‍याचे यश म्हणावे लागले.

    – डॉ. रवी केवट

    Vyanktesh Madgulkaranchya Vavatal aani Karunashtak Kandambarichi Samiksha

    165.00
    Add to cart
  • व्यावहारिक व उपयोजित मराठी

    ‘भाषा आणि जीवन व्यवहार’ यांची सांगड घालणार्‍या या नवीन अभ्यासक्रमात परिभाषेच्या उपयुक्ततेबरोबर औपचारिक व अनौपचारिक लेखन प्रकारांचा परिचय विद्यार्थ्यांना होणार आहे. नोकरी प्राप्त करून घेण्यासाठीचे अर्जलेखन तंत्राबरोबर ‘स्वयंरोजगार प्राप्तीसाठी’ करावयाच्या ‘स्वपरिचय पत्र’ लेखनाचे तंत्र व उपयुक्तता लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आहे. इतिवृत्त व टिप्पणी लेखन तंत्राचा परिचय करून देतांना विद्यार्थ्यांना कार्यालयीन संज्ञापनाबरोबर संगणक क्षेत्रातील मुलस्त्रोत साधनांची ओळख उपयुक्त ठरणारी आहे. कोशलेखन प्रकारांचा परिचय त्यांना नवीन ज्ञानप्राप्तीला मार्गदर्शन करणारा आहे. भविष्यात व्याख्यानक्षेत्रात किंवा नवीन माहितीचे सादरीकरणासाठी ‘पॉवर पॉईंट’ तंत्राच्या उपयोजनाचा वापर आवश्यक ठरणार आहे. त्या तंत्राचाही वस्तुनिष्ठ पद्धतीने परिचय करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ती शैक्षणिक क्षेत्रात उपयुक्त ठरणारी क्षमता विद्यार्थी आत्मसात करतील. तसेच मायक्रोसॉफ्ट, एक्सेल या घटकांबरोबरच विकिपीडियासाठी लेखन तंत्र इ. घटकांचा समावेश प्रस्तुत अभ्यासक्रमात असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांचा विकास साधता येईल.

    Vyavaharik v Upyojit Marathi

    225.00
    Add to cart
  • व्यावहारिक व उपयोजित मराठी (भाग 3)

    शिक्षणाने केवळ ज्ञानसंक्रमण होत नाही तर विद्यार्थांच्या बुध्दी, आकलन व विचारशक्तीचा विकास होतो. त्यांना अनेक कौशल्यांची प्राप्ती होते, त्यांना चांगल्या सवयी लागतात. त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास होतो. जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना करायला शिकतात. त्यांच्या सर्जनशील शक्तीचा आणि विवकेशीलबुद्धीचा विकास होतो. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे दृष्टीकोन, मूल्ये आणि कौशल्यांची प्राप्ती व उपयोजन शिकविणारे अभ्यासक्रम तयार करावे लागतात. कालसापेक्ष त्यात बदलही करावे लागतात. आजच्या नवसमाज माध्यमांच्या गरजा भागाव्यात आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा प्रधान हेतू यामागे असतो. मराठी भाषेबाबतचा न्यूनगंड, अल्पसंतुष्टता वृत्ती, विचारांतील साचलेपणा, संकुचितपणा, यापेक्षा येणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, ज्ञान-कौशल्यांतील आधुनिकता आणि संकटातून संधी शोधण्याचे कौशल्य जर आपल्याकडे असेल तर भाषेच्या भवितव्याची उगा चिंता करण्याची गरज नाही.

    Vyavharik V Upyojit Marathi (Bhag 3)

    175.00
    Add to cart
  • शामल

    Shamal

    130.00
    Add to cart
  • शास्त्रीय संशोधन पद्धती

    नवीन आणि अनपेक्षित परिस्थिती संशोधकास संशोधन कार्य करण्यास प्रोत्साहित करते. जीवनातील कोणतेही कार्य असो ते पार पाडण्यासाठी प्रथम कार्याचे नियोजन तयार करावे लागते. आपल्या या नियोजनामुळे त्या कार्याला सुसूत्रता येते. त्या कार्याचे पद्धतशीर रचना, मांडणी ठरवावी लागते. वैज्ञानिक पद्धतीनुसार संशोधनाची सुरूवात समस्या सूत्रण किंवा विषय निवड करण्यापासून केली जाते. आणि शेवटी त्या संशोधनातून निष्कर्ष काढून त्याचा अहवाल तयार केला जातो. समग्रातील निवडलेल्या एककाच्या पाहणीवरून समष्टीबाबत सामान्य स्वरूपाचे निष्कर्ष काढता येतात. संशोधनाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योजना आखणे, गृहीतकृत्य असेल तर त्याची चाचणी घेणे किंवा संशोधन प्रश्नाची उत्तरे मिळविणे या वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो. संशोधनात विविध नमुना निवड पद्धतींचा उपयोग नेहमीच केला जातो. सदरील पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक तसेच अध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.

    Shastriya Sanshodhan Paddhati

    150.00
    Add to cart
  • शाहिरी मानवंदना

    महाराष्ट्रातील एकूण लोककला प्रकारातील ‌‘पोवाडा’ हा कला प्रकार अत्यंत प्रभावी, लोकप्रिय व उर्जेची अखंड ज्योत प्रज्वलित करणारा असा कला प्रकार आहे. गद्य व पद्य मिश्रित या काव्य प्रकारात सूर, ताल, छंद, अलंकारिकता, प्रतीकात्मकता, बिंबात्मकता व गेयता यांचे सुंदर व अद्भूत असे मिश्रण आपल्याला बघायला व अनुभवयाला मिळते. अगदी बाराव्या शतकात ज्ञानदेवांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीपासून ते एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकापर्यंत या काव्य प्रकाराने जन मानसाला भूरळ घातली आहे. त्यामुळे पोवाडा या काव्यप्रकाराची प्रत्येक कालखंडात भरभराट झालेली आपणास दिसून येते. एखाद्या राजा महाराजाचे, संत व समाजसुधारकाचे, क्रांतिकारक तथा थोर सेनानी किंवा साहित्यिक कलावंताचे ओजस्वी व ओघवत्या शैलीत चरित्र प्रतिपादीत करण्यासाठी सातत्याने या काव्य प्रकाराचा सहारा घेतला जातो. या काव्य प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा लिहितांना पद्य शैलीमध्ये लिहिला जातो परंतु प्रतिपादीत करतांना गद्य व गेय संगीत शैलीमध्ये प्रतिपादीत केल्या जातो. त्यामुळे दृक व श्राव्य अशा दोन्ही माध्यमांमध्ये पोवाडा या काव्यप्रकाराचे अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे.
    अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लिहिलेले हे पुस्तक त्यातील एक महत्त्वपूर्ण व संग्रही ठेवावे असे पुस्तक आहे. ज्यामध्ये त्यांनी खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी पासून ते दिनबंधू राजीव दिक्षित पर्यंत 74 पोवाडे लिहिले असून शेवटी 75व्या पोवाड्याच्या माध्यमातून संपूर्ण शहिदांना वंदन केले आहे.

    – प्रा. सुनील कुलकर्णी
    संचालक, विद्यार्थी विकास विभाग,
    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

    Shahiri Manvandana (Powada Lekhan)

    295.00
    Add to cart
  • शिवकाव्य

    छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेच, पण त्याचबरोबर ते एक असीम चैतन्य आहेत. त्या चैतन्याला जेवढी प्रामाणिकपणे साद घातली जाते, तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद मिळतो, अशी माझी ठाम धारणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वेगवेगळया साहित्य कृतीतून पोहचत राहणं हे पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. याच श्रुंखलेतला ‌‘शिवकाव्य’ हा जो महाकाव्याचा प्रयत्न आहे, त्या महाकाव्याच्या प्रयत्नासाठी माझ्याकडून मनःपूर्वक आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा!

    – डॉ. अमोल रामसिंग कोल्हे

    Shivkavya

    95.00
    Add to cart
  • शैक्षणिक संशोधन शोध सारांश

    Shaikshanik Sanshodhan Shodh Saransh

    425.00
    Add to cart
  • शोध स्त्रीप्रतिमांचा

    भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात ‘स्त्रीप्रतिमा’ ही संकल्पना लक्षात घेताना धर्म, संस्कृती आणि समाज यांच्या विविध अंगोपांगांमधील गुंतागुंत लक्षात घ्यावी लागते. ह्या संदर्भात पाश्चात्य स्त्रीवादाची परिमाणे पुरेशी ठरु शकत नाहीत. मुळात भारतीय स्त्रीचा विचार एकरेषीय पद्धतीने करता येऊ शकत नाही. वर्ग, जात यांच्या स्तरभेदांनुसार आकारास येणारे भारतीय समाजचित्र कळत नकळतपणे स्त्रीचे जगणेही त्यानुरुप बद्ध करीत जाते. अशा या स्त्रीची प्रतिमा नेमकेपणाने जाणून घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. या दृष्टीने मराठीतील लेखिकांचे यासंदर्भातील आकलन जाणून घेण्याचा विचार मनात आला. लेखिका आपल्या कथा-कादंबर्‍यांमधून ज्या स्त्रीचे एकंदर स्वरुप कसे आहे, याबाबत जाणून घेण्याच्या भूमिकेतून सदर अभ्यासाला चालना मिळाली.

    Shodh Stripratimancha

    160.00
    Add to cart
  • श्री एकनाथ महाराजांची निवडक भारुडे

    संतसाहित्याची चिकित्सा स्वातंत्र्यपूर्ण काळापासून आजतागायत चालू आहे. समाजशास्त्रीय दृष्टीने संतसाहित्याचे अवलोकन करताना नाथवाड्ःमयातील भारुड रचनेचा आवर्जून उल्लेख केला जातो. नाथांसारख्या व्युत्पन्न कवीची ही रचना सर्वसामान्यांना आकलन होण्याच्या दृष्टीने लिहिलेली आहे. समाजाच्या विविध स्तरातील सामान्य माणसे नाथांनी आपल्या कवितेत उभी केली. त्यांची दुःखे, त्यांची वेदना, त्यांचे मन भारुडामधून व्यक्त झाले. दुसर्‍या बाजूने विचार केला तर समकालीन सामान्य जनांचा एक पट नाथांनी भारुडांमधून चित्रित केला. नाथकालीन समाजचित्रण या दिशेनेही भारुडांचा विचार करता येईल. भारुड या वाड्ःमय प्रकाराचे एक अंग लिखित संहितेचे असले तरी दुसरे अंग सादरीकरणाचे आहे. नृत्यनाट्याच्या माध्यमातून भारुडे सादर करणारी परंपरा महाराष्ट्राने सांभाळली. लोकसूहाचे प्रबोधन करणे, लोकसमूहाला दिशा देणे, सामान्य जनांना विचार प्रवृत्त करणे असाही विचार नाथांच्या भारुडांमध्ये बघता येतो. नाथांनी जेवढे विविध रचनाबंध काव्य लेखनासाठी हाताळले, तेवढे क्वचितच दुसर्‍या कवीने हाताळलेले आढळतील. महाराष्ट्रात बहुरुढ झालेल्या भारुडाने महाराष्ट्राची बहुजिनसी संस्कृती आपल्या डोळ्यासमोर उभी केली. अध्यात्म आणि समाजदर्शन या दोन्ही अंगानी महाराष्ट्राची सत्त्वशील परंपरा जनत करण्याचे काम भारुड वाड्ःमयाने केले आहे. केवळ मनोरंजन हे नाथांच्या भारुडाचे प्रयोजन कधीच नव्हते. नाथकालीन प्रबोधनाच्या कल्पना समजावून घेण्याच्या दृष्टीने ही भारुडांचा अभ्यास महत्वाचा ठरावा.

    Shri Ekanath Maharajanchi Nivadak Bharude

    70.00
    Add to cart
  • श्री गजानन प्रार्थना स्तोत्र

    खेमराज हरी खडके यांचा योगसाधनेचा प्रदीर्घ अभ्यास आहे. योगविद्या धाम नाशिक या संस्थेतुन योगशिक्षक ही पदवी घेतल्यानंतर योग प्रबोध, योगप्रविण व योगपंडित अशा एक एक वरचढ पदव्या संपादन केल्या. त्याचवेळी त्यांनी निसर्गोपचाराचाही अभ्यासक्रम पूर्ण केला व ते तेव्हापासून योगोपचार व निसर्गोपचाराचे उपचार रूग्णांवर करीत आहेत. ते पूर्णवेळ निसर्गोपचाराचे डॉक्टर व योगशिक्षक आहेत.
    अध्यात्मातही त्यांची विशेष रूचि असून श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांचे ते निष्ठावान भक्त आहेत. श्रीपंतांच्या वाङ्मयावरही त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे. श्री पंत गुरुचरित्र पोथीचा मराठी अनुवादही त्यांनी केलेला आहे.

    50.00
    Add to cart
  • श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती

    Shree Sant Ekanathanchya Abhangatil Bhakti

    399.00
    Add to cart
  • श्री संत रत्नमाला

    • संसारी जनांपेक्षा साधक श्रेष्ठ, साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ, सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ मानले जातात. संत ही पदवी सर्वात मोठी आहे. संत हे पवित्रतेमध्ये गंगेपेक्षा महान आहेत. – ह.भ.प. न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री
    • अंतर्यामीच्या आमल अंतरात आसणार्‍या अखिल अल्पमती अन्तःकरणस्थांच्या अपरंपार, अवर्णनीय आनुकंपेमुळेच अशांच्या आत्मोध्दारास्तव ईश्वराने, आपल्या आचरणाने अज्ञानांपासून आत्मज्ञान्यांपर्यतांना आनंदविणार्‍या आत्मान्तःस्थांना अवनीवर अवतरविलेले आहे. – ह.भ.प. प्रज्ञाचक्षु मुकूंदकाका जाटदेवळेकर
    • माणसाच्या मनातील सत्प्रेरणा जागृत करणार्‍या साध्या सात्विक भक्तीची शिकवण संतांनी समाजाला दिली. – ह.भ.प. वेदांताचार्य नारायण महाराज
    • मानवी जीवनामधे जीवन प्रवास करत आसतांना अनेक मार्ग, दिशा, वळणे लागतातच. असा खडतर चढ-उतार पार करतांना संतांची संगती असेल तर मार्ग सुखरूपपणे पार पडतो. – ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कराळे
    • संतांची चरित्रे उद्बोधक असतात. ही चरित्रे माणसाच्या मनावर चांगले संस्कार करणारे एक फार श्रेष्ठ साधन आहे. – ह.भ.प. रामगिरी महाराज
    • संत सर्वांचे मंगल, सर्वांचे भले व सर्वांना सुखी करतात. संतांच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी आपापसात स्नेहाने, परस्परांशी प्रेमाने चांगला व्यवहार व चांगले कर्म करावे. – ह.भ.प. रामायणाचार्य ढोक महाराज
    • संतांचे कार्य व त्यांच्या स्मृती समाजाला भविष्यकाळात अतिशय गरजेच्या व मार्गदर्शक ठरणार आहेत. – अ‍ॅड. भास्करराव आव्हाड
    • संत महंतांना समाजचिंतक व समाज सुधारकांची दृष्टी लाभलेली असते. त्यांचे कार्य अखील मानवी जीवनाला दिशादर्शक व प्रेरणादायी आसते. – प्रा. डॉ. लिला गोविलकर
    • परतत्वाचा चिरंतन निवास आसलेला गर्भगिरी ही सिध्दांची, संतांची आणि दृढश्रध्दावंतांची सात्विक भूमी. या भूमीतील चिरनिवासी, संजीवक परतत्व स्वयंस्फुरकतेने साकारते आणि योगीराज अवतरत असतात. – प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

    Shree Sant Ratnamala

    150.00
    Add to cart
  • श्रीरामभक्त हनुमान

    Shrirambhakta Hanuman

    150.00
    Add to cart
  • श्रीसंत आदिशक्ती ॥मुक्ताई गाथा॥ (अर्थ व संक्षिप्त चरित्रासह)

    श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरती

    नित्यमुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ।
    आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते ॥धृ॥
    विठ्ठल-रूक्मिणी आईबाप तंव कठीण व्रतचरणी ।
    निवृत्ति सोपान ज्ञानदेव हे बंधू बुधवाणी ।
    संतमंडळी मुक्ताई तूं सान ज्ञानवंते ॥1॥
    शिष्यपुत्र तंव चांगदेव हा चौदा शतकांचा ।
    विसोबा खेचर शिष्योत्तम हरी गर्व नामयाचा ।
    मुक्ताई तूं स्वयंमुक्त भवबंध विमुक्ते ॥2॥
    प्रथम विरक्ति निवृत्तीची ज्ञानवंत होणे ।
    सायुज्याच्या सोपानाने मुक्त श्रेष्ठ होणे ।
    मुक्ताई तूं हीच शिकवणी नित्य आम्हा दे ॥3॥
    संतांची तूं मुक्त विरक्ति भक्तांची भक्ति ।
    ज्ञानाचे गे ज्ञान आणि तूं कर्मयोग मुक्ति ।
    ‘दाशरथी’ची साध्य-साधना तूंच सर्व माते ॥4॥

    – अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरीकृत (दाशरथी)

    Shrisant Aadishakti || Muktai Gatha || (Artha V Sankshipta Charitrasah)

    350.00
    Add to cart
  • संक्रमण

    Sankraman

    160.00
    Add to cart
  • संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास

    मध्ययुगीन कालखंडात मराठी वाङ्मय हे वेगवेगळ्या रूपांत अवतरलेले दिसते. या काळात मराठी वाङ्मयनिर्मितीला सुरुवात झाली. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ व पहिला पद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ यांची याच काळात रचना झाली. महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोन महत्त्वाच्या संप्रदायांचा उगमही याच काळात झाला. महाराष्ट्राचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन या संप्रदायांनी समृद्ध केले आहे. त्यातून समाजात मानवी जीवनमूल्ये रुजली. शाहिरी वाङ्मय हा संत-पंत वाङ्मय प्रवाहांपेक्षा एक वेगळाच वाङ्मयप्रवाह मध्ययुगात जन्माला आला. बखर वाङ्मयाने इतिहास आणि वाङ्मय यांचे अनोखे नाते निर्माण केले. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे वाङ्मय, पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय अशी विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती या कालखंडात विपुल प्रमाणात झाली.प्रस्तुत पुस्तकात महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे पद्य वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय यासोबतच या वाङ्मय प्रवाहांमधील काही निवडक ग्रंथकार व काही निवडक साहित्यकृती तसेच महत्त्वाचे ग्रंथकार व त्यांच्या साहित्यकृती, ग्रंथकाराचे लौकिक जीवन व वाङ्मयीन कर्तृत्व यांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक हे वाचकांना व अभ्यासकांना वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल यात शंका नाही.

    Madhyayugin Marathi Vangmayacha Itihas

    250.00
    Add to cart
  • संत एकनाथांच्या अभंगातील लोकतत्व

    डॉ. अपर्णा साबणे यांनी संत एकनाथांच्या व्यक्तित्वातील तसेच त्यांच्या अभंगातील हे वेगळेपण विचारात घेऊन संत एकनाथांच्या अभंगांचा लोकतत्त्वीय दृष्टीने अभ्यास करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. संत एकनाथांच्या अभंगांचा लोकतत्त्वीय अभ्यास करताना त्यांनी काव्य म्हणून अभंगाकडे पाहण्याची रसिकता व वाङ्मयीन आस्वादाची दृष्टीही बाळगली ही विशेष. त्यामुळे त्यांचा अभ्यास रुक्ष न होता, नाथांच्या अभंगांचा काव्यात्म आस्वादाचा प्रत्यय देणारा झाला आहे. हे प्रथम सांगावेसे वाटते.
    डॉ. अपर्णा साबणे यांनी एकनाथांच्या स्फुटरचना, कथा काव्य, चरित्र काव्य, विविधस्वरुपी अभंग, भारुडे इत्यादींच्या स्वरुप-विशेषांची समीक्षा करून या रचनांतील लोकतत्वे उलगडून दाखविण्याचा या लोकतत्त्वांच्या स्वीकारातून अभंगांना प्राप्त झालेला वेगळेपणा, त्यांतील लोकपण इत्यादी वैशिष्ट्यांची सोदाहरण चर्चा केलेली आहे.

    – प्रा. डॉ. शरद व्यवहारे

    Sant Ekanathanchya Abhangatil Loktatva

    210.00
    Add to cart
  • संत चोखामेळा आणि मी एक समीक्षा

    महाराष्ट्राच्या वैचारिक जडण-घडणीमध्ये मध्ययुगीन कालखंडाचे आणि संत चळवळीचे महत्त्वपूर्ण योगदान रहिले आहे. सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया या काळामध्ये अधिक गतिमान झाली. कारण विविध जाती-धर्मातील संतांचा प्रवर्ताचा विचार यासाठी कारणीभूत ठरला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने गलितगात्र झालेला भारतीय समाज या चळवळीने थरारुन उठला. नामदेवापासून तुकाराम महाराजांपर्यंतच्या सर्व संतांनी समाजाच्या दंभावर प्रहार केला. या सर्व संतांमध्ये तत्कालीन परिस्थितीचा विचार करु जाता शुद्रातीशुद्रामधून आलेल्या संत चोखामेळ्याचे कार्य ठळकपणे नजरेत भरणारे आहे. मात्र चोखोबांच्या या वेगळ्या भूमिकेचा शोध महाराष्ट्राने घेतलाच नाही. या पार्श्वभूमीवर ‘संत चोखामेळा आणि मीः एक समीक्षा’ या समीक्षा ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित होण्यासारखे आहे.’

    Sant Chokhanmela Ani Mi Eka Samiksha

    160.00
    Add to cart
  • संत साहित्य संशोधन काही आयाम

    संत साहित्याचे विविध आयाम संशोधनदृष्ट्या तपासतांना समाजसमूहासाठीचे विविधांगी उद्बोधन नजरेसमोर येते. या उद्बोधन परंपरेतून समाजप्रबोधनाच्या दिशा दृश्यमान होतांना दिसतात. दृश्यमान होणार्‍या या दिशा प्रकाशमान सत्याला स्पर्श करीत राहातात. डॉ. भाऊसाहेब गमे आणि प्रा. धनराज धनगर यांच्या संपादनातून प्रकाशमान दिशांचे स्पष्ट होणे अधिकाधिक अधोरेखित होते.

    – प्रा. डॉ. म. सु. पगारे

    Sant Sahitya Sanshodhan Kahi Aayam

    225.00
    Add to cart
  • संतप्रबोधन

    संत आणि महाराष्ट्र हे नातं अतूट आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारविचारांनी अखिल मराठी जगताचं जगणं समृद्ध अन्‌‍ सुगंधित केलं. संत विचार कालातीत आहेत. प्रत्येक काळात त्यांनी सकारात्मक मार्ग दाखविला. भेदाभेदाला तिलांजली देत माणसाला माणूसपण दिलं. कीर्तन परंपरेनं तर संत विचारांची पताका कायम फडकवत ठेवली. संतनगरी शेगाव येथील निवासी ह.भ.प. डॉ. श्री. हरिदास आखरे यांनी केवळ उक्तीच नव्हे, तर कृती आणि लेखणीतूनही सद्विचार मांडला. त्यांच्या दैनंदिन जगण्यातून वारकरी जीवनपद्धतीला प्रकट केलं. वारकरी तत्त्वज्ञान त्यांनी अतिशय तन्मयतेनं प्रस्तुत केलं. जगण्याचा भाग बनविलं.
    विविध माध्यमांमध्ये वेळोवेळी लेखणीतून पसरलेला हा सुगंध या पुस्तक रूपात एकत्र आला आहे. अतिशय सुलभ व लाघवी भाषालंकारानं नटलेला हा संग्रह एक विचारकस्तूरी आहे!

    – संदीप भारंबे,
    कार्यकारी संपादक, सकाळ, विदर्भ

    Santprabhodhan

    250.00
    Add to cart
  • संतांची अभंगवाणी मध्ययुगीन निवडक संत

    महाराष्ट्राच धार्मिक जीवनात विठ्ठल हा एक परवलीचा शब्द आहे. अकराव्या शतकापूर्वी कृषी जीवन जगताना नदीच्या वाळूत विठ्ठल नामाचा गजर करीत समतेची हाक देत मानवतेच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तुळशीचा हार, कपाळी गंध, हातात टाळ एवढ्या गणवेशातील काही समाजधुरीनांनी ही शाळा सुरु केली. आणि पाहता पाहता ही शाळा मानवतेचे विद्यापीठ बनले. माणूस, माणूसकी, मानवता हे अभ्यासक्रमातील घटक अर्भयासण्यासाठी आषाढी कार्तिकीला शेतीची कामे आटपून संसारी माणसे मानवतेची पताका घेऊन दिंडी दिंडीने या शाळेत येऊ लागलेत. या वारीत सहभागी होणारे वारकरी अठरा पगड जातीधर्माचे होते. मानवतेच्या विद्यापीठाचे वारकरी म्हणून पंढरीची वाट चालू लागले. विठू नामाच्या शाळैचे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या सोबतीला गोरोबा, विसोबा, मुक्ताई, जनाई, सोयरा असे अनेक मान्यवर होते. त्यांनी वारकरी संप्रदाय विकसीत केला. व माणसाला माणूसकीची शिकवण दिली.
    आज महाराष्ट्रात पंढरीरायाचे दर्शन घेणारे सर्व भाविक मानवतेचा व शांततेचा वसा घेऊन वारी करतात. वारीला धार्मिक अर्थ असला तरी सामाजिक दृष्ट्या ही एक चळवळ आहे. मानवतेचा तो एक लाँगमार्च आहे. एक इव्हेंट आहे. हे तत्त्वज्ञान अखंडपणे संस्कारीत व्हावे म्हणून समाजभाषेतून लिहिणार्‍या कवींना संत म्हणून समाज गौरवाने मिरवितो. प्राणीमात्रा विषयी अपार करुणा, दया, प्रेम असलेल्या या संतांचे कार्य व तत्त्वज्ञान काव्यरुपाने अभ्यासतांना भाषा, समाज, संस्कृती यांची शिकवण मिळते. हे कार्य तुकडोजी महाराज, गाडगेबाबांच्या रुपाने अंखडपणे सुरु राहिले कारण संतांचे हे काव्यच मुळी अभंग आहे.

    Santanchi Abhangawani Madhyayugin Nivadak Sant

    55.00
    Add to cart
  • संतांचे शब्दामृत

    प्रस्तुत ग्रंथात ‌‘श्रीतुकाराम गाथा’ मधून निवडक अभंग घेऊन त्यावर भाष्य करण्यात आले आहे. क्षणोक्षणी हाचि करावा विचार, सुख पाहता जवापाडे, म्हणऊनि शरण जावे, कन्या सासुऱ्याशी जाये, बोल बोलता वाटे सोपे, बळियाचे अंकित, मढे झाकुनिया करिती पेरणी, असो खळ ऐसे फार हे निवडक व जीवनविद्या शिकविणारे अभंग घेतलेले आहेत. सर्वच अभंग जीवनाला योग्य वळण देणारे आहेत. म्हणून संतसंगतीची तातडी जीवनात करावी. कारण की आयुष्य हे क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल सांगता येत नाही. जीवनाची क्षणभंगुरता लक्षात घेऊन तातडीने संतसमागम करावा. म्हणजे पुढील विघ्ने टळतील. मनाला शांतता लाभेल. आपल्या हातून वाईट कार्य घडणार नाही.संपूर्ण विश्वालाच या संत विचारांची गरज आजही आहे. हा संत वारसा आपण सर्वांनी चालविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केलेले कार्य उत्कृष्ट आहे. सर्वांनी मनापासून वाचावा, जीवनाचे मोल समजून घ्यावे व भविष्याकडे योग्य वाटचाल करावी. प्रस्तुत ‌‘संतांचे शब्दामृत’ हा ग्रंथ जगत्‌‍मान्य-वाचकप्रिय होईल, यात शंकाच नाही.

    Santanche Shabdamrut

    125.00
    Add to cart
  • सत्यशोधक आणि इतर कथा

    प्रा. भरत शिरसाठ यांचे कथाविश्व समाज संस्कृतीच्या अंतरंगाचे सम्यक आकलन करुन त्यामधील कळीचे प्रश्न मांडू पाहते. जुनी दलित कथा, कविता एकाच जात वर्गाला ठोकत राहिली. पण हा नव्या जाणिवेचा कथाकार संपूर्ण जात व्यवस्थाच शत्रू मानून तिला संपविण्यासाठी ब्राह्मण्यरहित ब्राह्मणांचाही स्विकार करते.
    मराठी कथाविश्वाला परिवर्तनवादी नवे सम्यक वळण देण्याची क्षमता प्रा. भरत शिरसाठ यांनी ‌‘सत्यशोधक आणि इतर कथा’ या कथासंग्रहाद्वारे सिद्ध केलीय. या कथेतील माणसं अस्सल आहेत. त्यांची जीवनशैली सत्वनिष्ठ व सत्यनिष्ठ आहे. बहुधार्मिक, सांस्कृतिक शुद्धता व एकात्मतेचा हा नवा कथाप्रयोग मराठी साहित्यात शिखरस्थ कला सौंदर्याचे उधळण करणारा आहे. कारण मानवाची समग्र क्षमता व सर्वांचे सर्वार्थाचे कल्याण दुःख मुक्त मानवतेच्या ध्येयवादातून लेखकाला अपेक्षित आहे. म्हणूनच भरत शिरसाठ जगावेगळा कथाकार आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा!

    – डॉ. श्रीपाल सबनीस

    Satyashodhak aani Itar Katha

    100.00
    Add to cart
  • समकालिन स्त्रीलेखिका

    Samakalin Strilekhika (Gauri Deshpande Ani Priya Tendulkar)

    150.00
    Add to cart
  • समकालीन साहित्य मीमांसा

    साहित्यकृती ही विशिष्ट वाङ्मयप्रकारांतर्गत आविष्कृत होत असली तरी तिची म्हणून काहीएक स्वायत्तता असते. म्हणूनच अनेक अंगाने तिचे विश्लेषण संभवते. अनेकानेक समीक्षा पध्दतीने साहित्यकृतीची मीमांसा शक्य आहे तथापि साहित्यकृतीचा आशय हा चिकित्सेचा गाभा आणि दिशा सूचित करतो. मीमांसकाने साहित्यकृतीच्या अंतरंगातील हे सत्व ओळखले की साहित्यकृतीचे वाङ्मयीन मूल्य आणि सौंदर्य उलगडता येते.
    डॉ. वासुदेव वले यांनी विविध वाङ्मयप्रकारातील लक्षवेधी साहित्यकृतींचा असाच सामर्थ्यशाली आढावा या ग्रंथात घेतला आहे. प्रथितयश साहित्यिकांच्या साहित्याची ही ‌‘समकालीन साहित्य मीमांसा’ सर्जनशील तर आहेच पण आस्वादाच्या रसरशीतपणाचा प्रत्यय देणारीही आहे. डॉ. वासुदेव वले यांनी या समीक्षाग्रंथातून आपला वेगळा मीमांसक दृष्टिकोन अभ्यासकांसमोर ठेवला आहे. तो लक्षणीय आणि म्हणून महत्त्वाचा आहे.

    – प्रा. डॉ. मनोहर जाधव
    मराठी विभाग प्रमुख/अधिष्ठाता मानव्य विद्या/
    प्रमुख- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन,
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

    Samkalin Sahitya Mimansa

    295.00
    Add to cart
  • समतेचे शिलेदार

    एकविसाव्या शतकातील येणारा काळ हा जातीय, धार्मिक, वांशिक भेद तसेच सांस्कृतिक भेद याने प्रभावित होत आहे. परिणामी राज्या-राज्यांमध्ये, देशा-देशांमध्ये प्रचंड संघर्षाचे चित्र निर्माण होत आहे. सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध हे त्या आक्रमक संघर्षाचेच प्रतिबिंब आहे. मानवी मनातील संघर्ष केवळ समतेच्या विचारानेच थोपवता येऊ शकतो. समतेच्या अनुषंगाने एक व्यापक समाज मन तयार होण्यास नक्कीच मदत होईल. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये समतेचे विचार रुजवले गेले तर येणारी पिढी ही जातीभेद, धर्मभेद व संस्कृतीभेद यांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी व राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी तयार होईल यात तिळमात्र शंका नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मुल्यांची जोपासना करून प्रस्ताथित समाज व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या, समतेची मशाल हाती घेऊन अखिल विश्वाच्या कल्याणासाठी स्वतःच्या देहाची, यत्कींचीतही तमा न बाळगता सर्वस्वाचा ज्यांनी त्याग केला, त्या महान व्यक्तिंची माहिती सदरच्या छोटेखानी पुस्तकात दिलेली असून विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्तम संस्कार निर्माण होण्यास प्रस्तुत पुस्तक सिद्ध होणार आहे.

    Samateche Shiledar

    55.00
    Add to cart
  • समाजभाषाविज्ञान

    ‘समाजभाषाविज्ञान’ ही अलीकडच्या काळात विकसित झालेली भाषाविज्ञानाची एक अभ्यासशाखा आहे. भाषा ही सामाजिक निर्मिती असल्याने भाषिक अभ्यासाच्या कक्षा या सामाजिक अभ्यासाशी नाते सांगणार्‍या ठरल्या आहेत. अशा अभ्यासाचे स्वरूप, त्याची व्याप्ती याबाबत अधिकाधिक मांडणी करण्याची निकड आजही कायम आहे. किंबहुना भाषेचे समाज आणि संस्कृती यांच्याशी असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी अशा अभ्यासदृष्टीची नितांत निकड आहे. यादृष्टीने डॉ. प्रभाकर जोशी यांचे हे पुस्तक लक्ष वेधून घेणारे आहे. समाजभाषाविज्ञान या विषयाचे स्वरूप व व्याप्ती या मुद्यांपासून सुरू होणारे हे पुस्तक या विषयातील मूलभूत संकल्पनांची विस्ताराने मांडणी करणारी आहे. समाजभाषा व संस्कृती, समाज-संस्कृती स्तरांवरील भाषाभेद, पाश्चात्य भाषावैज्ञानिकांचे प्रमुख सिध्दांत, भाषानिर्मितीचे सिध्दांत या तात्विक मुद्यांसंबंधीची विस्ताराने केलेली मांडणी हे या पुस्तकाचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भाषिक प्रश्न आणि लिपी या दोन निराळ्या मुद्यांसंबंधी विवेचन आलेले आहे. सातत्याने या अभ्यासविषयासंबंधी चिंतन-अभ्यास करणार्‍या डॉ. जोशी यांनी अध्यापक-विद्यार्थी यांच्यासाठी सुलभपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त करून देणारी आहे.

    Samaj Bhasha Vidnyan

    165.00
    Add to cart
  • समीक्षा पद्धती आणि उपयोजन

    सम्यक ईक्षा ती समीक्षा असे म्हटले जात असले तरी त्यात सम्यक् दृष्टीकोन किती हा प्रश्नच आहे. साहित्याचा प्रांत बहुरंगी असल्याने समीक्षासुध्दा बहुरंगी वा बहुआयामी बनते. समीक्षेच्या क्षेत्रात अनेक पध्दती किंवा संप्रदाय रुढ झालेले आहेत. संतप्रणाली, पंडिती परंपरा, केशवसूत संप्रदाय, मर्ढेकरी किंवा नेमाडपंथी असे शब्दप्रयोग या क्षेत्रात आढळतात. असे संप्रदाय वा अशा परंपरा आजच्या साहित्याला खरोखरच उपयुक्त ठरतील का? व्यक्तिनिष्ठ लेखनाची गती आज वाढत गेल्याचे चित्र दिसते. समीक्षेच्या संदर्भात एक प्रश्न सातत्याने मनात येतो तो असा की, आपल्या समीक्षा विचाराच्या परंपरेत आरंभकाळात संस्कृत साहित्यशास्त्राचा पगडा दिसतो. पण नंतरच्या काळात म्हणजे ब्रिटीश राजवटीत या समीक्षेने नवी वाट चोखळली, त्यामुळे इंग्रजी विचारांचा प्रभाव लक्षात येतो. म्हणजेच मराठी समीक्षा एका बाजूने संस्कृतच्या आधाराने व दुसज्या बाजूने इंग्रजीच्या आधाराने विकसित झाली. मग मराठीला मराठीची समीक्षा आहे का? हा प्रश्न पडतो. ज्याचे नेमके उत्तर देणे अवघड जाते.

    Samiksha Paddhati Ani Upyojan

    295.00
    Add to cart
  • सम्यक समीक्षा

    डॉ. संजय कांबळे हे तिसर्‍या पिढीतील आंबेडकरी साहित्यकारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर पहिल्या व दुसर्‍या पिढीतील आंबेडकरी साहित्यकारांचा प्रभाव पडला हे नाकारता येत नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. कृष्णा किरवले, प्रा. केशव मेश्राम, रा. ग. जाधव इत्यादी मूर्धन्य साहित्यकार, समीक्षकांनी मांडलेले समीक्षणाचे आदर्श, सिद्धांत डोळ्यापुढे ठेवून दुसरी व तिसरी पिढी समीक्षा क्षेत्रात वाटचाल करीत आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी साहित्य तपासण्याचे निकष बदलले पाहिजे असे जे ठासून सांगितले, ते निकष दुसरे तिसरे कोणते नसून विशुद्ध आंबेडकरवादी विचारसरणी होय.
    मानवतावादाची जोपासना, धर्मग्रंथातील कालबाह्य विचारांची चिरफाड, भारतीय संविधानातील मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्नशीलता, बुद्धाच्या प्रज्ञा, शील, करुणेच्या भावतत्वांचे परिशीलन करुन साहित्यनिर्मिती व त्या साहित्यातील गुणावगुणांचे विवेचन ज्या निकषांच्या आधारे करायचे ते सर्व आंबेडकरवादाच्या संकल्पनेत लिहित आहे. हे डोळ्यापुढे ठेवून डॉ. संजय कांबळे यांची लेखन सरपट धावत आहे असे अनेक विचार प्रचोदक लेखन डॉ. संजय कांबळे यांनी लिहून दिशादर्शी व्हावे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो.

    – डॉ. अनिल गजभिये,
    जेष्ठ आंबेडकरीवादी समीक्षक, विचारवंत, इंदूर (मध्यप्रदेश)

    Samyak Samiksha

    150.00
    Add to cart
  • संवाद आणि लेखन कौशल्ये

    मानवाच्या उत्क्रांतीत संवाद आणि लेखन या मानवी कौशल्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ही कौशल्ये मानवाला सहजपणे हस्तगत होत नाहीत तर प्रयत्नपूर्वक शिकावी लागतात. माहिती तंत्रज्ञानाच्या या कालखंडात संवाद आणि लेखन कौशल्यांमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. करिअरीस्ट असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही दोन्ही कौशल्ये हस्तगत करणे आवश्यक आहे. ही कौशल्ये कशी हस्तगत करावी?, संवाद कसा करावा?, लेखन कसे करावे? याचा उहापोह ‘संवाद आणि लेखन कौशल्ये’ या ग्रंथात केलेला आहे. नव्याने लेखन करणार्‍यांसाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

    Sanvad and Lekhan Kaushalya

    95.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती

    संशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्‍या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.
    सदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.

    Sanshodhan Paddhati

    675.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती (प्री पीएच.डी. कोर्स वर्क व संशोधकांना उपयुक्त)

    संशोधन पद्धती हे संशोधन करण्याच्या तंत्राविषयी माहिती देणारे शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रातील संशोधन हे विज्ञान शाखेतील संशोधनाइतकेच शास्त्रशुद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी संशोधनाच्या तंज्ञाची माहिती असणे आवश्यक आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांमध्ये अलिकडे संशोधनाचे महत्त्व वाढतच आहे. आधुनिक युगात आणि जगात संशोधनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तेव्हा संशोधन करतांना संशोधकाला संशोधन कार्याबद्दल माहिती व्हावी. संशोधन करताना संशोधकाला विषयाची पद्धतशीर माहिती असणे आवश्यक असल्यामुळे प्री पीएच.डी. अभ्यासक्रमाला भारतातील सर्व विद्यापीठामध्ये प्री. पीएच.डी. कोर्ससाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा पेपर अनिवार्य केला आहे. तेव्हा मराठी माध्यमाच्या संशोधकांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठीच्या पुस्तकाची होणारी परवड लक्षात घेऊन हे पुस्तक निर्माण करण्याचा लेखकांचा प्रयत्न आहे.
    सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता व तटस्थता राखणे तसे कठीण आहे, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक घटनांचे शासत्रीय पद्धतीने अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे शक्य होते. प्री पीएच.डी. च्या संशोधकांना संशोधनाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सामाजिक संशोधनासंबंधीचे ज्ञान सरळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे हाच उद्देश यामागे आहे. त्याचबरोबर संशोधन विषयक दृष्टीकोन या घटकांतर्गत येणार्‍या नेट सेट परीक्षेतील मागील प्रश्नपत्रिकेंमध्ये प्रश्नांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

    Sanshodhan Padhati

    150.00
    Add to cart