मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन परंपरेत संतांचे कार्य आणि संतांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. भारताची भूमी ही निर्मळ भावनेची आणि श्रद्धेची आहे. या निर्मळ भावनेतूनच भक्तीप्रवाह निर्माण झाला. या सात्विक प्रवाहाने भारताचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. भक्तीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे कार्य या प्रवाहाने केले. महाराष्ट्राच्या भूमीत नवविचारांची बीजे पेरली गेली. समतेचे, बंधुत्वाचे पीक आले. समाजाच्या सर्व स्तरातील असंख्य स्त्रीपुरुष तेथे एकत्र आले. वर्णभेद, जातीयता, स्त्रीला कोणतेच स्थान नाही अशा परिस्थितीमध्ये कसलाही विचार न करता आत्मोन्नतीसाठी संत कवयित्रिंनी जी परमेश्वराची भक्ती केली ती अत्यंत महत्वाची आहे. त्यांना मनःशुद्धी महत्वाची वाटली म्हणून त्यांनी भक्तीमार्ग स्विकारला. या संत कवयित्रीच्या अभंगामधून प्रतिबिंबित होते.
खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या काळात संपूर्ण कुटूंबव्यवस्थेवर आघात होत आहेत ही व्यवस्थाच छिन्नभिन्न होत आहे. आत्महत्या, खून, मारामारी, आतंकवाद, भ्रष्टाचार याला उधाण आले आहे. दूरदर्शन विविध वाहिन्या, सोशल मिडीया यांच्या प्रचारामुळे व दुरुपयोगामुळे तरुण पिढी दिशाहीन होत आहे. सर्व दूर भीती आणि असुरक्षिततेमुळे तरुण पिढी संयम हरवून तणावग्रस्त झाली आहे. अशा असुरक्षित वातावरणातून तरुणांना सावरण्यासाठी मध्ययुगीन प्रबोधन परंपरेचे प्रभावी साधन म्हणून संत साहित्याची गरज भासते.
संत कवयित्रींची अभंगवाणी अभंग, अक्षय, अविनाशी, अक्षरवाणी आहे. संत कवयित्रींची अभंगवाणी, ‘एक भक्तिकाव्य, भक्तिसाठी, भक्तितून, भक्तिकरिता, निर्माण झालेले अभंगकाव्य, अभंगवाणी अभंगगाथा होय.’
Prachin Marathi Sant Kavyitri