• भक्तीने भगवंताजवळ

    आयुष्यात तुम्ही काहीही निवडलत तरी त्याबरोबर अंगभूत सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी येतातच. काटे नसलेला गुलाब शोधायला जाणे म्हणजे वेडेपणाच. नाण्याची एक बाजू तुम्ही निवडावी कि दुसरी बाजू, तुमच्या वाट्याला येतेच. कष्टविरहीत सुखासीन आयुष्याची अपेक्षा करूच नका. अगदी महात्म्यांनासुद्धा विपदाविरहीत सुखाचं आयुष्य लाभत नाही. असं आयुष्य असुच शकत नाही. महत्त्वाकांक्षा जेवढी मोठी तितके प्रश्नाचे डोंगर मोठे. तुम्हाला फक्त चालायचे असेल तर फारसे प्रश्न येत नाहीतच. जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त क्षमतांना साजेसं जगण्याचं आव्हान स्विकारता तेव्हा तुम्हाला अधिक आणि मोठे प्रश्न सोडवायला लागतात. काठीचं एक टोक उचलले कि दुसरे टोक आपोआप उचलले जाते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. शिखराकडे जाण्याचा रस्ता सोपा नसतो. आणि शिखर ज्याने गाठलं त्यांना ते सोप कधीच गेले नाही.
    भगवंत भक्तीशिवाय राहू शकत नाही. भक्ती भगवंताशिवाय राहू शकत नाही. भक्ती केल्यानेच भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो. आपल्यावर त्यांची कृपा होते. यासाठी प्रत्येक मनुष्याने भगवंताची भक्ती करणे अनिवार्य आहे.त्या योगानेच मनुष्य भगवतस्वरूप होऊन परमेश्वराला प्राप्त होतो.
    तुम्हाला जर आयुष्याचे चटके बसले तर लक्षात ठेवा. परमेश्वराची नजर तुमच्यावर खिळलेली आहे. माणसामध्ये एक प्रेषित दडलेला असतो. परमेश्वर मानव बनला तो एवढ्यासाठीच कि मानवाने पुन्हा ईश्वर बनावं. आयुष्य म्हणजे तुम्हाला पोळुन टाकणारी भट्टी नाही, तर तुमचे रूपांतर शुद्धतम चांदीत होण्यासाठी तुम्हाला झळाळी आणणारी पावक प्रक्रिया होय. ती ‌‘भक्तीने भगवंताजवळ’ या ग्रंथात तुम्हाला दिसेल. हा ग्रंथ एक उपहार आहे.

    Bhaktine Bhagwantajawal

    275.00
    Add to cart
  • भटक्यांची भ्रमणगाथा मांडणारा कादंबरीकार अशोक पवार

    ॥ तीन दगडांच्या चुलीचा भाईबंद! ॥

    अशोक पवार हा तीन दगडांच्या चुलीचा एक भाईबंद. भटक्या-विमुक्तांच्या जगण्यातले दु:ख आपल्या स्वकथनातून आणि कादंबरीलेखनातून मांडणारा आपल्या पिढीतील महत्त्वाचा लेखक.
    संपूर्ण देशात सत्ताधारी वर्गाकडून कार्पोरेट माहोलाच्या प्रभावातून जनतेला महासत्तेची स्वप्ने दाखवली जात असताना आजही या देशातील भटके-विमुक्त जातिसमूह त्यांच्या मूलभूत गरजांपासून मात्र कोसो दूर आहेत! त्यांच्या जगण्यातील प्राणी पातळीवरचा संघर्ष आणि मानवी पातळीवरील त्यांच्या जगण्यातले दु:ख हे अशोक पवारच्या एकूणच कादंबरीलेखनाचे मध्यवर्ती सूत्र आहे. हे सूत्र आपल्याला भारतीय समाजव्यवस्थेचे समाजशास्त्र आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मानवी संवेदन ह्या अंगाने अंतर्मुख होऊन गंभीरपणे विचार करायला भाग पाडणारे आहे.
    या पार्श्वभूमीवर, सामाजिक बांधिलकीच्या अंगाने अशोक पवारच्या कादंबरीलेखनाचे अंत:सूत्र समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या ‌‘इळनमाळ’, ‌‘दर कोस दर मुक्काम’, ‌‘पडझड’, ‌‘तसव्या’ आणि ‌‘भूईभेद’ यांसारख्या कादंबऱ्यांवरील अभ्यासकांचे काही मर्मग्राही लेख एकत्रित करून डॉ. अनंता सूर यांनी संपादित केलेल्या प्रस्तुत ग्रंथातील चिंतन अत्यंत मौलिक स्वरुपाचे ठरावे, असेच आहे. हे चिंतन मराठी साहित्याच्या वाचकमनातील मानवी संवेदनांच्या व समाजशास्त्रीय अन्वयाच्या सहसंबंधाने निश्चितच आकलनाच्या पातळीवरील नव्या दिशा स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल, याबद्दल आश्वस्त करणारे आहे.

    – डॉ. अशोक नामदेव पळवेकर

    Bhatkyanchi Bhramangatha Mandnara Kadambrikar : Ashok Pawar

    325.00
    Add to cart
  • भारतीयांच्या हृदयातले सरदार वल्लभभाई पटेल

    वयाच्या तब्बल चाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्यलढ्यापासून अलिप्त राहिलेल्या सरदारांनी स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश केल्यावर त्यास मिळालेली ऊर्जा, गती, दिशा व अनुषंगाने बदललेली लढ्याची सर्वसमावेशक दशा याचे समग्र, सादयंत शब्दचित्रण लेखिकेने प्रभावीपणे, समर्थपणे चित्तारले आहे.

    महात्माजींच्या अहिंसेचा सार्थ अर्थ आणि हेतू सरदारांमुळे सिद्ध होतो. शारीरिक मानसिकदृष्ट्या समर्थ असूनही अहिंसेने ‘लढा देऊन’ संघटनशक्तीने विघटनशक्तीचे उच्चाटन करण्याचा पराक्रम ‘सरदारच’ करू जाणे या सर्वांचा शब्दवेल्हाळ परिचय करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.

    ‘अहिंसेचे जनकत्व’ जसे बापूंकडे जाते तसे भारताच्या अखंडतेचे मातृत्व सरदारांकडे जाते. अखंड, एकसंघ, एकात्म भारतीय संघराज्याच्या निर्माणाचा पुरूषार्थ घडवितांनाच्या घटना, प्रसंग घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे समग्र विवेचन परिणामकारकरित्या या पुस्तकात समर्पक व सहज सुलभ शब्दात आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

    भारतीयांच्या हृदयातले ‘सरदार’ वल्लभभाई पटेल हे चरित्र्यपुष्प सरदारांच्या अनेकविध लोकदुर्लभ गुणवैशिष्ट्यांचा अजरामर कस्तुरीसुगंध भारतीय वाचकांपर्यंत खचितच पोहचविणार आहे यात शंका नाही.
    या पुस्तकाच्या अनुषंगाने सरदारांवरील मराठी वाङ्मयात नक्कीच भर पडली आहे. सदर पुस्तक हे समस्त भारतीयांना सरदारांच्या विषयी असलेल्या जिज्ञासेला नक्कीच पूर्ण करेल.

    Bharatiyancha Hridyatle Sardar Vallabhabhai Patel

    399.00
    Add to cart
  • भावतरंग

    श्री. पं. ना. दादांच्या एकूणच पद्य लेखनाकडे पाहता त्यांच्यातला शिक्षक आणि लोकशिक्षक शेवटपर्यन्त मनी हृदयी ठाण मांडून बसतो. सेवानिवृत्तीनंतर ‘आता उरलो उपकारा पुरता’ या उक्तीचे सारतत्व त्यांच्या लेखनकृतीतून गडद होतांना दिसते. बर्‍याचदा नवकवींमध्ये अनुकरणप्रियता स्वलेखनातून प्रकर्षाने जाणवते. पं. ना. दादांच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य म्हणून जी नोंद आवर्जून करता येईल ती म्हणजे त्यांच्या कोणत्याही रचनेत दुसर्‍या इतरेजनांचे अनुकरण नाहीय. त्यांच्या सगळ्या पद्यावर त्यांचीच मुद्रा उमटलेली दिसते.

    आत्मपरीक्षण व आत्ममग्नता या दोन घटकांना त्यांनी लेखनमूळाशी स्थित केलेले बर्‍याच कवितांमध्ये दिसून येते. वर्तमानाची मानसिकता तिचे ग्रासलेपण त्यातून होणारी नितीमूल्यांची पडझड यामुळे कवी वारंवार विषण्ण होतो. प्रसंगी उपहास व उपरोध या भाषिक शस्त्रांचा आधार घेत त्यांचे कवीमन त्या त्या विकृतीला व विकोपाला चांगलेच धारेवर धरते. त्यांच्या भावनांचं हे विरेचन त्यांच्यातल्या सकारात्मकतेचं दर्शन तर घडवितातच शिवाय संस्कृतीरक्षणार्थ त्यांची होणारी मनस्वी तगमगही वाचक मनातून भरून वाहते. हे पं. ना. दादांच्या लेखनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

    – वा. ना. आंधळे

    Bhavatrang

    95.00
    Add to cart
  • भाषा : लेखनकौशल्य आणि शासनव्यवहार

    बदलत्या काळानुसार जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्येही स्थित्यंतर होत जाते. काही क्षेत्रात हे स्थित्यंतर जलद गतीने होते तर काही क्षेत्रात गरजेनुसार पण धीम्या गतीने होत असते. शिक्षणक्षेत्रातही होत जाणारा बदल यास अपवाद नाही. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर आता कौशल्याधारित शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. तो कालसुसंगत आणि अनिवार्य असाच आहे. भाषा आणि साहित्य या विद्याशाखांत आता आंतरविद्याशाखीय अभ्यासाची गरज वाढू लागली आहे. तिची उपयुक्तताही सर्वमान्य झाली आहे. भाषाव्यवहारात तर लेखनकौशल्याला पर्याय नाही. हे लेखनकौशल्य कोणकोणत्या प्रकारचे असते आणि त्याची बलस्थाने काय असू शकतात याचा परिचय ‌‘भाषाः लेखनकौशल्य आणि शासनव्यवहार’ या ग्रंथात वाचायला मिळतो. विशेषतः मुद्रित माध्यमासाठी आणि त्यातही जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडल्या गेलेल्या वृत्तपत्रासारख्या माध्यमात कोणत्या प्रकारची लेखनकौशल्ये आवश्यक आहेत, त्याचे विवेचन या पुस्तकात आढळते. वृत्तपत्रीय लेख, अग्रलेख, स्तंभ वा सदरलेखन, परीक्षण या लेखनप्रकाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये नव्या पिढीतील अभ्यासक डॉ. संदीप कडू माळी यांनी सहजगत्या उलगडून दाखवली आहेत.
    भाषिक कौशल्यविकास आणि शासनव्यवहार, मराठी राजभाषा अधिनियम यासंबंधी मौलिक माहिती या ग्रंथात वाचायला मिळते. मराठीविषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा परिचय प्रत्येक मराठी भाषकाला असायलाच हवा. त्यासंबंधीचा तपशील माहितीपूर्ण असाच आहे.
    डॉ. संदीप कडू माळी हे बहुश्रूत आणि व्यासंगी प्राध्यापक आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रात जबाबदारीने वावरताना कर्तव्यबुद्धीने परिश्रमपूर्वक कार्यरत राहायला हवे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच या ग्रंथाकडे पाहायला हवे.

    – डॉ. मनोहर जाधव
    प्रमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे-411007

    Bhasha – Lekhankaushalya Aani Shasanvyavhar

    135.00
    Add to cart
  • भाषा आणि कौशल्य विकास

    21 व्या शतकात प्रगत कौशल्ये विकसित होत आहेत. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या व्यावहारिक जीवनातही दिवसेंदिवस अमूलाग्र बदल होत आहेत. संपूर्ण जीवनच जणू आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे. असे असताना आपला मराठी विषय आणि भाषा त्यास अपवाद कशी असेल? या जाणिवेने डॉ. संदीप कडू माळी यांच्या अथक प्रयत्नांतून प्रस्तुत ग्रंथ साकारला गेला. वाङ्मयीन मराठीसह काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठे आणि शैक्षणिक परिघामध्ये सध्या व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचे प्रस्थ वाढलेले आहे, याचे आपण सर्वांनीच स्वागत केले पाहिजे. भाषेच्या संदर्भातील प्रगत कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ प्रेरणादायी ठरेल. याशिवाय प्रशासकीय आणि विविध भाषिक कौशल्ये समजून घेण्यासाठी व उपयोजनासाठी विद्यार्थांना आकलन सुलभ होईल अशा पध्दतीने केलेले हे लेखन भाषा आणि कौशल्ये विकासाच्या संदर्भात दिशादर्शक ठरेल, अशी खात्री आहे.

    – प्रा. डॉ. संदीप विठ्ठलराव सांगळे

    Bhasha Ani Kaushalya Vikas

    125.00
    Add to cart
  • भाषिक कौशल्य विकास

    भाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्‍यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.

    डॉ. पंडित विद्यासागर
    माजी कुलगुरू
    स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड

    Bhashik Kaushalya Vikas

    125.00
    Add to cart
  • भाषिक कौशल्य विकास आणि एकांकिका

    साहित्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांजवळ वाचन, चिंतन, मनन, लेखन करण्याच्या क्षमता असणे गरजेचे असते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचा स्वतःचा दृष्टीकोन आपल्या आकलनाच्या आधारे तयार करणे, साहित्यकृतींची समीक्षा, चिकित्सा करणे किंवा तिचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणे अशा गोष्टी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असतात. आजच्या काळात हे चित्र आभावानेच दिसते. वरील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजे या विषयीचे विवेचन डॉ. हरेश शेळके यांनी या पुस्तकात केले आहे. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन इ-संवादकौशल्य यासंबंधीची आवश्यकता, फायदे यासंबंधी उहापोह केला आहे. विद्यार्थ्यांना निश्चितच या विवेचनाचा फायदा होईल.
    याच पुस्तकातील दुसरा उपविभाग हा नेमलेल्या एकांकिकांची मीमांसा करणारा आहे. एकांकिकेचे स्वरूप घटक संहितामूल्य आणि प्रयोगमूल्य यांसह अनेक अनुषंगिक बाबींची चर्चा लेखकाने केलेली आहे. ही चर्चा एकांकिका हा वाङ्मयप्रकार समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
    सदर पुस्तक प्रथम वर्ष बी. ए. च्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असले तरी भाषेच्या उपयोजित विविध घटकांचा अभ्यास करणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

    डॉ. मनोहर जाधव
    वरिष्ठ प्राध्यापक, मराठी विभाग आणि अधिसभा सदस्य,
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007

    Bhashik Kaushalya Vikas Aani Ekankika

    195.00
    Add to cart
  • मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास

    मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा कालखंड प्रारंभापासून ते मराठी सत्तेच्या अखेरपर्यंत आहे. या सहा-साडेसहा शतकांमध्ये सुरुवातीला तेराव्या शतकात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. नंतर बहामनी सत्ता, शिवकाळ, पेशवाई अशा सत्ता बदलत गेल्या. या सत्तांबरोबरच तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक वातावरण बदलत गेले. या बदलांचे प्रतिबिंब त्या-त्या काळच्या वाङ्मयात पडले. यादवकाळ, बहामनीकाळ, शिवकाळ व पेशवेकाळ या राजकीय कालखंडांची सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी येथे विस्ताराने सांगितली आहे. या चारही कालखंडातील महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय व इतर संप्रदायातील वाङ्मय व महत्त्वाचे ग्रंथकार यांचा येथे निर्देश केलेला आहे. त्याचप्रमाणे पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय, बखर वाङ्मय व गद्य वाङ्मय या मध्ययुगीन वाङ्मयप्रवाहांचीही सविस्तर चर्चा केली आहे. ग्रंथकारांच्या चरित्राचा धावता आढावा घेऊन साहित्यकृतींच्या विवेचनाला महत्त्व दिले आहे. यादृष्टीने हे लेखन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.

    Madhyayugin Marathi Vadmayacha Sthul Itihas

    375.00
    Add to cart
  • मनाच्या बनामंधी

    शीतल पाटील यांचा हा पहिलाच कवितासंग्रह मोठ्या आत्मविश्वासाने खान्देशी मराठी कवितेत पदार्पण करीत आहे. ‌‘मायभूमी अन्‌‍ मायबोली दोन्ही जुळ्या बहिनी’ असे अभिमानाने सांगणाऱ्या ह्या कविता बहिणाबाई चौधरी परंपरेतला एक देखणा प्रयोग वाटला. मराठीच्या बोलींमध्ये दडलेले शब्दभांडार किती समृद्ध आहे, याची प्रचीती ह्या कविता वाचणाऱ्यांना प्रकर्षाने जाणवेल. आमच्या पिढीला त्या वेळच्या रटाळ प्रेमकविता लिहिणाऱ्या कवयित्रींनी उबग आणला होता. आता शीतल पाटील सारख्या शेतकऱ्याच्या मुलींनी मोठीच क्रांती करून आपल्या मातीतले वेल्हाळ देशीपण दाखवायला लागल्यापासून इंग्रजीच्या वापराने आणि शहरीकरणाने बुडायला घातलेल्या मराठी भाषेचे ऐश्वर्य टिकवून धरले आहे. ‌‘सुखदुःखाची घागर ज्याच्या त्याच्या पाठीवर’ अशा कष्टकऱ्यांच्या प्रतिमांनी आणि ह्या आधी प्रमाणभाषेत कधीही न आलेल्या खान्देशी बोलीतील शैलीप्रयोगांनी ह्या संग्रहातली प्रत्येक कविता देखणी झाली आहे. बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या झाल्या कृत्रिम पद्यरचना करणाऱ्या तेव्हाच्या कवींना बांगड्या भरायला लावल्या. आता तशा कवयित्री आणखी वाढतील आणि मराठी कविता अधिकाधिक मातृधर्मी होईल अशी चिन्हे ह्या कवितांमध्ये दिसू लागली आहेत, ही उत्साहवर्धक प्रगती आहे. शीतल पाटील सर्वत्र वाचल्या जावोत, ही शुभेच्छा!

    – भालचंद्र नेमाडे,
    मुंबई

    Manachya Banamandhi

    150.00
    Add to cart
  • मराठी कथेची वाटचाल

    आलेला अनुभव सांगणे, कथन करणे ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. सांगणे आणि ऐकणे ही त्याची सहजप्रवृत्ती आहे त्यातूनच त्याच्या सांस्कृतिक जडणघडणीच्या काळापासून गोष्ट जन्माला आली. मानवी जीवन गतीशील व परिवर्तनशील असल्याने त्याच्या बदलत्या जीवनमूल्यांबरोबर त्याच्या साहित्यादि कलेच्या निर्मितीत व स्वरूपात बदल होत गेलेले आहे, कथा साहित्याच्या बाबतीतही तेच पाहायला मिळते. म्हणून संस्कृत कथा, लोककथा यांच्या मौखिक परंपरेपासून सुरू झालेली कथा बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार अबाधितपणे वाटचाल करीत राहिली.
    आधुनिक काळात शिक्षण व मुद्रणाची माध्यम आलीत. साहित्य प्रसाराची साधने म्हणून नियतकालीके नंतर प्रकाशन संस्था सुरू झालीत. स्वतंत्र मराठी साहित्याच्या निर्मितीला बहर येत गेला. त्यात कथा साहित्याने फार मोठी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. प्रत्येक पिढीत कथाकारांचे त्यात लक्षवेधी योगदान आहे. बहुजन समाजातील कथाकारांनी विशिष्ट विचारधारा म्हणून कथेचा प्रवाह अधिक प्रवाही व खळाळता ठेवलेला आहे. आजतागायत मराठी कथा नवनवे रुप घेऊन वाचकांसमोर येतच आहे. अशा कथा साहित्याच्या उगमापासून तर आजपर्यंतचा प्रवास कसा होत गेला, हे ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या डॉ. शकुंतला भारंबे-फेगडे यांनी मराठी कथेची वाटचाल म्हणून या समीक्षा ग्रंथात सांगितला आहे. त्याचा साहित्याचे विद्यार्थी व संशोधक अभ्यासक यांना संदर्भ साधन म्हणून उपयोग होईल यात शंकाच नाही.

    – डॉ. मनोहर सुरवाडे

    Marathi Kathechi Vatchal

    125.00
    Add to cart
  • -10%

    मराठी पेपर क्र. 2

    Original price was: ₹550.00.Current price is: ₹495.00.
    Add to cart
  • -10%

    मराठी पेपर क्र. 3

    Original price was: ₹695.00.Current price is: ₹625.00.
    Add to cart
  • मराठी भाषा आणि भाषाविज्ञान

    पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात भाषाविज्ञान हा विषय आज प्राधान्याने शिकविला जातो आहे. प्रारंभी नवीन असणारा हा विषय आता कोणत्याही भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी अपरिहार्य झालेला आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा पाया घालणाऱ्या फेर्दिनां द स्योसुर या भाषाअभ्यासकापासून आजपावेतो भाषाविज्ञानाने अनेक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला दिसतो. संगणक विज्ञान, भाषा नियोजन, कोष विज्ञान आदिसारख्या संपूर्ण मानवी जीवनाला व्यापून टाकणाऱ्या या विषयाचे स्वरूप आज आंतर-अभ्यासक्षेत्रीय झालेले आहे. सर्वच भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पायाभूत ठरणारा हा विषय असल्याने आज तो आवश्यक ठरलेला आहे. सदर पुस्तकात भाषेची उत्पत्ती, भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि कार्य, स्वनिम व रूपिम विचार, वाक्यविचार, मराठीची वर्णमाला, मराठीचे ध्वनीपरिवर्तन, मराठीचे अर्थपरिवर्तन, प्रमाण मराठी भाषा आणि बोली या घटकांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या व शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे भाषाविज्ञान सुलभ पद्धतीने शिकता यावे, यादृष्टीने या पुस्तकाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Marathi Bhasha ani Bhashavidnyan

    175.00
    Add to cart
  • मराठी लेखिकांची ग्रामीण कथा स्वरुप व समीक्षा

    ‌‘मराठी लेखिकांची ग्रामीण कथा : स्वरुप व समीक्षा’ हा डॉ. शकुंतला भारंबे-फेगडे यांचा पीएच.डी. प्रबंध आणि त्याविषयीच्या संदर्भ साधनांचा पुन्हा नव्याने चिकित्सक मांडणी करणारा समीक्षा ग्रंथ आहे. स्वयंसिद्ध, कल्पक व प्रतिभावान मराठी स्त्रियांच्या कथात्म कलाकृतींचा एक अभ्यासक स्त्रीने घेतलेला हा आस्वाद स्वरूप धांडोळा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक काळात भारतीय स्त्री जीवनात स्थित्यंतरे होत गेले. आधुनिक स्त्री पुरुषप्रधान समाज व्यवस्थेच्या दास्यातून मुक्त होऊन मोकळा श्वास तिला घेता आला. तेव्हा तिने अंगभूत प्रतिमा गुणांना विकसित करण्याची धडपड केली. साहित्यिक गुण दाखवून आणि यश प्राप्त करून तिने साहित्याच्या क्षेत्राला स्वतःची ओळख निर्माण केली. कथा-कहाण्यांच्या मौखिक परंपरेपासून तर आधुनिक लघुकथा, नवकथा आणि साठोत्तरी कथाप्रवाह या कथा साहित्याच्या प्रत्येक वळणावर स्त्रियांनी त्यांचा सहभाग नोंदविलेला आहे.
    साठोत्तरी कालखंडात ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन, विज्ञान आणि बालसाहित्य अशा विविध संज्ञा व विचार धारांच्या अनुषंगाने मराठी साहित्याचे प्रवाह खळखळत पुढे आले. त्यातही लेखिकांनी जमेल तसे नव्हे, तर लक्ष वेधून घेणारे साहित्य निर्माण केलेले आहे. त्यापैकीच ग्रामीण साहित्यप्रवाहातील कथा साहित्याची निर्मितीही मराठी लेखिकांनी केलेली आहे. त्याचा शोध घेऊन डॉ. शकुंतला भारंबे-फेगडे यांनी केवळ प्रबंधच तयार केला नाही, तर त्याशिवाय साक्षेपी समीक्षा देखील केलेली आहे. त्यातूनच प्रस्तुत ग्रंथ आकारास आलेला असून समीक्षेच्या क्षेत्रात त्याचे मोल खूपच आहे. कारण त्यांनी बदलते भारतीय स्त्रीजीवन, मराठी लेखिकांच्या कथांची वाटचाल, लेखिकांच्या ग्रामीण कथांच्या प्रेरणा, त्यांचे स्वरूप, त्यातील ग्रामीण अनुभवविश्व, वातावरण, खेड्यातील माणसे, ग्रामीण भाषा यांसह लोकजीवन व लोकसंस्कृती या विषयीचे विश्लेषण त्यांनी केलेले आहे. त्यामुळे हा ग्रंथ एक संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासनीय झालेला आहे. तितकाच वाचनीयदेखील आहे. रसिक, वाचक व अभ्यासक त्याचे स्वागत करतील यात शंकाच नाही.

    Marathi Lekhikanchi Gramin Katha : Swarup va Samiksha

    250.00
    Add to cart
  • मराठी वाङ्मय प्रकारांची सैद्धांतिक रचना व अध्यापन पद्धती

    आशयाच्या मांडणी तंत्रानुसार वाङ्मय प्रकारांचे वर्गीकरण केले जाते. तेच आज सर्वमान्य आहे. संस्कृत पंडितांनी मात्र मांडणी तंत्रापेक्षा ‘आशयाची भव्यता’ लक्षात घेऊन वाङ्मयाचे वर्गीकरण केले. उत्तमोत्तम, उत्तम, मध्यम आणि अधम काव्यप्रकारात जगन्नाथ पंडिताने वर्गीकरण केले. आनंदवर्धनाने ‘ध्वनितत्त्व असलेले, सुचक’ काव्य उत्तम असल्याचे सूचित केले. आधुनिक काळात ही तत्त्वे स्वीकारली जात नाही. पाश्चिमात्यांनी इंग्रजी साहित्यांत स्वीकारलेल्या तंत्रांचा आधार घेऊन वाङ्मयप्रकारांचा स्वीकार केला जातो. प्रा. अ. बा. मंचरकरांनी साहित्य प्रकारांची स्वरुप वैशिष्ट्ये सूचित करतांना कथनात्मकता – नाट्यात्मकता आणि काव्यात्मकता या तीन मूळधर्मांचा आधार घेऊन वाङ्मय प्रकारातील वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न केला. त्याद्वारे प्रत्येक साहित्य प्रकारांच्या संकल्पनेतील विविधता लक्षात घेता येते.

    Marathi Wadamya Prakaranchi Saiddhantik Rachana V Adhyapan Paddhati

    495.00
    Read more
  • मराठी विज्ञानसाहित्य

    Marathi Vidnyansahitya : Swarup, Vyapti V Badalate Pariprekshya

    450.00
    Add to cart
  • मराठी व्याकरण व लेखन

    मराठी साहित्याच्या अभ्यास – संशोधन क्षेत्रात भाषिक अभ्यासाचे प्रमाण सातत्याने अल्पच आहे. मराठीचा अभ्यास म्हणजे केवळ मराठी साहित्याचा अभ्यास अशी दृढ होत गेलेली वृत्ती यास कारणीभूत आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या अभ्यासाचे विस्तृत क्षेत्र नेहमीच परिघावर राहिलेले दिसते. अभ्यासक्रमातही भाषिक दृष्टीने केल्या जाणार्‍या अभ्यासांना फारशी जागा नसते, ही वस्तुस्थिती आहे. त्यात पुन्हा भाषेचे लिखित रूप ज्या व्यवस्थेवर भक्कमपणे उभे असते त्या व्याकरणाचा गांभीर्यपूर्वक केल्या जाणार्‍या अभ्यासाचे दुर्भिक्ष भयानक स्वरूपाचे आहे. शालेय पातळीवर निर्माण होणारी मराठी व्याकरणाची नावड आणि पदवी पातळीवरील अभ्यासात त्याकडे केलेले दुर्लक्ष आज प्रकर्षाने जाणवत आहे. मराठी व्याकरण हा विषय आता केवळ स्पर्धा परीक्षांपुरता उरला आहे की काय? अशी शंका मनात यावी अशी एकंदर परिस्थिती आहे. याबद्दल दिलासा देणारी बाब सदर पुस्तकामुळे घडत आहे, ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. नव्या पिढीतील एका अभ्यासकाने मराठी भाषेचे मर्म जाणून घेण्याच्या भूमिकेतून घेतलेला व्याकरणाच्या आकलनाचा आणि प्राप्त आकलनातून व्याकरणविषयक मर्मदृष्टी रुजविण्याचा घेतलेला ध्यास वाखाणण्याजोगा आहे. व्याकरणिक संकल्पना, समर्पक उदाहरणांसह त्यांचे स्पष्टीकरण आणि आकलनाची पडताळणी करून घेण्यासाठी लगेच दिलेले प्रश्र या मांडणीतून मराठी व्याकरण सुकर व नेटक्या पद्धतीने समजावून सांगणारे हे पुस्तक आहे.

    – आशुतोष पाटील

    Marathi Vyakaran V Lekhan

    150.00
    Add to cart
  • मराठी व्रतकथा : आकलन व समीक्षा

    Marathi Vratkatha : Aakalan va Samiksha

    395.00
    Add to cart
  • मराठी समकालीन कथा (आस्वाद आणि आकलन)

    प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद, प्रत्यय, अनुभव नित्यनूतन असतो. देश, काल, परिस्थिती, व्यक्तीसापेक्षही असतो. म्हणून आस्वाद आणि आकलनाची प्रक्रिया ही केवळ एक ज्ञानप्रक्रिया नाही तर ती एक संस्कारप्रक्रियाही ठरतेे.
    कलेच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यास स्थूलपणे मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृती यांच्या क्रमश: परिचयाची आवश्यकता असल्याने आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्यासंबंधी रुची निर्माण करणे, विद्यार्थ्याच्या वाङ्मयीन अभिरुचीचा विकास करणे, वाङ्मयाचा आस्वाद घेण्याची डोळस क्षमता विकसित करणे. साहित्याभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करणे या सर्वांसाठी त्यांना ललित वाङ्मयाची पार्श्वभूमी, विकास आणि प्रकारांचे स्वरूप समजावणे हा प्रधान हेतू लक्षात घेवून कथा वाङ्मय प्रकार आणि काही निवडक कथा अभ्यासासाठी अभ्यासक्रमात लावण्यात आल्या आहेत. वाङ्मय प्रकार समग्रपणे समजण्यासाठी कथांचे आस्वादन आणि आकलन या पुस्तकातून देत आहोत.

    कथा म्हणजे काय, कथेचे स्वरूप, कथेची पार्श्वभूमी आणि विकास, कथेचे घटक आणि कथेचे प्रकार व इतर साहित्यप्रकारापेक्षा कथेचे वेगळेपण कसे आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न आहे. कथेतून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश प्राप्त होतो तसेच त्याचबरोबर समकालीन समाजदर्शन होते, समाज जाणीवांचे आकलन होते, सामाजिक वास्तव आणि समस्या समजतात, सभोवताली घडण्यार्‍या चांगल्या वाईट घडामोडी यांचे समाजातील मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि प्रभाव कळतात. यातून त्यांच्या जीवनाची जडणघडण व्हावी आणि सामाजिक जाणिवा वृद्धिंगत व्हाव्यात ही प्रांजळ इच्छा आपली असते. त्यासाठी या समकालीन कथांचा आस्वाद घेवून आकलन करून देण्याचा प्रपंच.

    Marathi Samkalin Katha (Aswad Ani Akalan)

    125.00
    Add to cart
  • मराठी साहित्यातील ‘कर्ण’ जीवन

    महाभारतातील पांडवांच्या पक्षाला ‘कृष्ण’ महत्वाचा आहे त्याप्रमाणे कौरवांच्या पक्षाला ‘कर्ण’ महत्वाचा आहे. दोघांच्याही भूमिकांनी महाभारताच्या जडणघडणीत मोलाचे कार्य केले आहे. कृष्णजीवना इतकेच ‘कर्णजीवनाचे’ आकर्षण प्रतिभावानांना नेहमीच निर्माण झाले आहे. कर्णजीवनात त्याच्या व्यक्तिमत्वातील ‘सुष्ट आणि दुष्ट’ वृत्तीचा संघर्ष आहे. त्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोन भिन्नतेतून ‘कर्णजीवन’ विविधांगी झाले. साहित्य वाङ्मय प्रकारातून ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न प्रतिभावानांनी कसा केला आहे. याचे अभ्यासपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तक मांडणीतून लेखिकेने केला आहे. रसिक वाचकांना मराठी साहित्यातील कादंबरी, नाटक, चरित्रग्रंथ, ललितगद्य ग्रंथ इत्यादी वाङ्मय प्रकारांतील प्रमुख 15 ग्रंथातील आशयाद्वारे ‘कर्णजीवन’ एकत्रितपणे समजून देण्याचा लेखिकेचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. अभ्यासकाच्या भूमिकेतून कर्णजीवनावर आधारित पंधरा साहित्यग्रंथाचे केलेले हे विश्लेषण रसिक वाचकांना त्या-त्या ग्रंथवाचनाचा पुनःप्रत्यय देणारे ठरणार आहे.
    पीएच.डी. साठी सादर केलेल्या प्रबंधाचे पुस्तकरुपाने डॉ. वैशाली गालापुरे प्रकाशन करीत असल्याचा आनंद आहे. त्यांचे अभिनंदन! रसिक वाचक त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करतीलच!
    ‘शुभास्ते पंथानः सन्तु । शुभं भवतु ॥’

    Marathi Sahityatil ‘Karna’ Jeevan

    250.00
    Add to cart
  • मराठीचा भाषिक अभ्यास

    इ.स.दहावे शतकात यादव काळात मराठी भाषा-संस्कृतीची जडण-घडण झाली. यादव काळातील या मराठी भाषेचा ‌‘अमृतातेहि पैजा जिंके’ अशा शब्दात गौरव केला जातो. मराठीचे हे वैभव कालिक, राजकीय स्थित्यंतरांनी नष्ट झाले. बहामनीकाळात मुस्लिम राजवट व त्यांची ‌‘उर्दू-फारसीमिश्रित हिन्दी’ या भाषासंपर्कामुळे मराठी भाषा भ्रष्ट झाली. शिवकाळात तीने आपले पूर्वरुप प्राप्त केले. पेशवेकाळ व आंग्लकाळातील अन्यभाषिकांच्या संपर्कात तिचे स्वरूप बदलत गेले. आजच्या मराठी प्रमाणभाषेचा या स्थित्यंतराशी संबंध आहे.
    मराठी भाषेची पूर्वपीठिका, उत्पत्ती कालखंड, निश्चितीची साधने, त्यासंदर्भातील वैद्य-गुणे वाद, भाषा उत्पत्तीचे सिद्धान्त व भाषाकुल संकल्पना, मराठी भाषेवर झालेला अन्य भाषा परिणाम, प्रमाणभाषा व बोलीभाषा सहसंबंध, मराठीचे शब्दभांडार, मराठीचे कालिक भेद व प्रान्तिक भेद, भाषा आणि लिपी इ. घटकांचा संबंध ‌‘मराठीचा भाषिक अभ्यास’ या अभ्यासक्षेत्राशी निगडीत आहे. एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. स्पर्धात्मक परीक्षेत त्यांचा समावेश आहे. म्हणूनच विद्यापीठीय मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जातो. प्रस्तुत पुस्तकात या विषय घटकांच्या संदर्भात मान्यवर अभ्यासकांनी मांडलेल्या विचारांचा आधार घेतला आहे. नव्या पिढीतील मराठी अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना व भाषाभ्यासकांना अभ्यासपूर्ण विवेचनासाठीच प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन!

    – प्रा. डॉ. प्रभाकर जोशी

    Marathicha Bhashik Abhyas

    275.00
    Add to cart
  • महात्मा ध्यास व्हावेत तरुणांचे

    पूजा व प्रार्थनेसाठी आदर्श गुणांनी संपन्न अशी सगुण मूर्ती डोळ्यासमोर असावी लागते. यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेची निवड करता येऊ शकते. समाज ज्यांच्यासाठी मंदिर होते, सत्य हाच ज्यांचा परमेश्वर होता, सेवा ज्यांची प्रार्थना होती, अहिंसा ज्यांची भक्ती होती, मानवता टिकवण्याचा ज्यांचा संकल्प होता, नैतिकता ज्यांचा श्वास होता आणि निष्काम कर्म ज्यांचा ध्यास होता त्या राष्ट्रपित्या महात्म्याच्या चारित्र्याची निरलस व निष्पाप मनाने साधना करणे म्हणजे पूजा किंवा प्रार्थना ठरू शकते. पूजा चरित्राची व्हावी, चित्रांची नव्हे. महात्म्याच्या चरित्रांचे वाचन व मनन व्हावे हा प्रामाणिक हेतू “महात्मा – ध्यास व्हावेत तरुणांचे” या पुस्तिकेचा आहे.

    80.00
    Add to cart
  • महाराजा सयाजीराव गायकवाड

    “उनके विजन में भारतीय विचारधारा की अक्षुण्ण परंपरा और आधुनिक विचारों के समन्वय की अद्भुत शक्ति है| मुझे लगता है यही गुण एक शासक के रूप में उन्हें दूसरों से अलग करता है!”

    – साहित्य नोबेल पुरस्कृत रवींद्रनाथ टैगोर

    “मला त्यांनी जे शिक्षण दिले. त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांच्याइतके अस्पृश्य जातीसाठी दुसरे कोणीही कार्य केले नाही!”

    – संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    मी बनारस हिंदू विद्यापीठाचा ‌‘महाराजा सयाजीराव गायकवाड अध्यासनाचे’ पहिले प्राध्यापक होतो. एवढेच नाही तर सयाजीराव त्या विद्यापीठाचे कुलपती होते. त्या विद्यापीठाच्या उभारणीत महाराजांचा मोठा वाटा आहे!

    – राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

    श्रीसंत तुकाराम हे सयाजीरावांचे आवडते कवी होते. त्यांनी माझ्याकडून अनेक वेळा तुकारात गाथा वाचून घेतली. एकदा बडौदा संस्थानात दुष्काळ पडल्यावर तुकोबांच्या गाथ्यातील दुष्काळावरील जे अभंग होते. त्यावर चर्चा करून उपायाचा शोध घेतला!

    – ‌‘रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई

    “महाराष्ट्रातील शंभर वर्षातील कर्तृत्ववान व्यक्तीत पहिलं नाव घ्याव लागत सयाजीरावाचं.”

    – इतिहासाचार्य राजवाडे

    Maharaja Sayajirao Gaikwad (Khandeshna Ahirani Dhorkya Raja Jhaya)

    275.00
    Add to cart
  • महाराष्ट्रातील बोली व भाषा

    वास्तविकत: बोली ही जननिष्ठ प्रमाण आहे. बोली ही जन्मतः मानवी मनाशी जुळलेली आहे. तिचे स्वरुप अत्यंत संवेदनशील चेतनामय आहे. या संवेदनशील मनाला बोलीचे सदस्य रुप आनंदित करतेच. रसास्वाद, आकलनबद्ध सुक्ष्म निरीक्षणातून बोलीचा मधूरबाज सर्वसामान्यांना आपलेसा करुन जातो. महाराष्ट्रात व त्यांच्या सीमावर्ती भू-भागात फार प्राचीन काळापासून सुमारे दोन हजार वर्षाच्या आधीपासून लोकांमध्ये मराठी बोलींचा वावर होता असे दाखले मिळाले आहेत. भाषा आणि बोली यांचे जिव्हाळ्याचे नातेसंबंध सर्वांना माहित असले तरी दोहींचे स्वरूप तेवढेच जटील व गुंतागुंतीचे आहे. या समस्येची थोडी फार उकल भाषाशास्त्राच्या अभ्यासकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतू बोली आणि भाषा वर्गीकरणाने सर्वच प्रश्न सुटले नाहीत. प्रस्तुत ग्रंथात बोली व भाषेच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा महत्त्वपूर्ण विचार मांडलेला आहे. बोलीची प्रादेशिकता व स्वरुप यांची सुंदर मांडणी लेखकांनी अधोरेखीत केली आहे. कोणत्याही भारतीय भाषा अभ्यासकांचे चटकन लक्ष वेधून घेणारा हा संकलित लेखांचा संग्रह प्रामुख्याने बोलीविषयक आहे.

    Maharashtratil Boli Va Bhasha

    395.00
    Add to cart
  • महिला आणि मानवी हक्क

    आज भारताला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे पुर्ण झालीत. परंतू आज भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्यविष्यक, शैक्षणिक स्थितीचा आढावा घेताना धक्कादायक चित्र समोर येते. भारतीय महिला आजही मानवी हक्काच्या समान हक्कांसंदर्भात पिछाडीवर आहेत हे कटू वास्तव डोळ्याआढ करता येवू शकत नाही. आपल्या अधिकाराप्रती महिलांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. संवैधिानिक तरतूदी आणि कायदे असून सुद्धा महिलांचे शोषण आणि अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

    भारतात एकीकडे महिलांच्या समान हक्कांच्या, विकासाच्या दृष्टीने कायदे केल्या जात आहेत, योजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे महिलांवरील होणार्‍या विविध अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, शारिरिक मानसिक अत्याचार अशा विविध अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या अत्याचारांपासून स्त्रियांचे संरक्षण करणारे कायदे आहेत परंतू त्यांच्यातील त्रुटीमुळे अपराध्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भितीच वाटत नाही.

    Mahila Ani Manvi Hakk

    425.00
    Add to cart
  • महिला सबलीकरण

    महिला सबलीकरण ही काळाजी गरज आहे, परिस्थितीनुरूप सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. या बदलानुसार महिला सबलीकरणावर जागतीक पातळीवर चर्चा होत आहे. महिला सबलीकरणासाठी कार्यक्रम व ध्येय धोरणे राबवले जात आहेत. त्यातून महिला विकासाचा तसेच महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, वैचारिक, कौटुंबिक, व्यावसायिक व सांस्कृतिक अशा विविध घटकांचा विचार केला जात आहे. विश्वातील अर्धी मानवी शक्ती स्त्री आहे, ती शक्ती देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खरे तर महिलांमध्ये आत्मविश्वास व साहस निर्माण करणे हा महिला सबलीकरणाचा मुख्य हेतू होये. म्हणून इ.स. 1975 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून साजरे केले गेले. तसेच भारतानेही 2001 हे वर्ष महिला सबलीकरण वर्ष जाहीर करून महिलांबाबत वेगवेगळ्या योजना आखल्या, त्यातूनच महिलांचे जीवनमान व दर्जा कसा उंचावता येईल व त्यांची सर्व क्षेत्रात प्रगती कशी साधता येईल याचा सर्वंकष विचार करण्यात आला.
    महिला सबलीकरणाचा जागर आज थेट ग्रामीण भागात पोहचला आहे. भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढवून त्यांच्या सबलीकरणाची प्रक्रीया निर्माण करण्याच कार्य सर्वप्रथम भारतीय सामाजिक विचारवंतांनी केले. आपल्या वैचारिक प्रबोधनातून तसेच प्रत्यक्ष कृतीतून महिला सबलीकरणाला सुरूवात झाली. एवढे सर्व असतांना देखील समाजातील बुरसटलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, निरक्षरता व धर्माधंता यामुळे स्त्रिया दबलेल्या अवस्थेत जीवन जगत आहे. आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश, संशोधन, अर्थाजन अशा पायर्‍या चढत तिने अंतराळात झेप घेतली आहे. असे असले तरी आजही स्त्रीचे ‘सती’ जाणे सुरू आहे. फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलेली आहे. स्त्रियांचे योगदान हे कुटूंबापासून ते देशसेवेपर्यंत आहे. या दृष्टिने स्त्रियांची स्थिती व समस्या यावर वैचारिक मंथन होणे गरजेचे आहे. महिला सबलीकरण हा फक्त चर्चेचा विषय व ठरता त्याला कृतीची जोड मिळाली पाहिजे.

    Mahila Sabalikaran

    550.00
    Add to cart
  • महिलांविरुद्ध हिंसा : सुरक्षा व कायदा

    प्रा. डॉ. शोभा पद्माकर शिंदे या ऑक्टोबर 2017 ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून इंग्रजीच्या प्राध्यापिका व स्त्री अभ्यास केंद्राच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्या भाषा अभ्यास प्रशाळेच्या संचालिका होत्या. स्त्री अभ्यास केंद्राच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठात एम.ए. स्त्री अभ्यास व लिंगभाव संवेदनशिलता हे अभ्यासक्रम सुरू केले. प्रा. शोभा शिंदे यांनी इंग्रजी विषयाची सहा पुस्तके लिहिली असून, वीस पुस्तके संपादित केली आहेत व 50 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. अमेरिका, इंग्लंड, युरोप, आर्यलँड, मलेशिया, श्रीलंका येथे त्यांनी अभ्यास दौरे केले आहेत.
    प्रा. शोभा शिंदे या जयहिंद महाविद्यालयात दहा वर्ष उपप्राचार्य व फोर्ड फाऊंडेशन प्रकल्पाच्या संयोजक होत्या. विद्यापीठात त्यांनी अध्यक्ष – इंग्रजी अभ्यास मंडळ, अध्यक्ष – स्त्री अभ्यास मंडळ, विद्या परिषद सदस्य व अधिसभा सदस्य म्हणून पदे भुषविली. त्यांना इंग्रजी अध्यापनासाठी इंदस फाऊंडेशन, अमेरिका यांच्यातर्फे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
    त्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष मंडळाच्या आठ वर्षे सदस्य होत्या. धुळ्याच्या का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्राच्या त्या विश्वस्त-सचीव आहेत. स्त्रीयांच्या प्रश्नांविषयी त्यांनी शाळा-महाविद्यालय व महिला मेळाव्यामध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत.

    Mahilanviruddh Hinsa : Suraksha v Kayda

    325.00
    Add to cart
  • माऊली

    Mauli

    200.00
    Add to cart
  • माझी सावित्रीमाई आणि आजची स्त्री

    होय. मी ही म्हणेल, माझी सावित्रीमाई जगाची शिलेदार आहे. आणि आम्हा स्त्रीजातीसाठी मिळालेली अमूल्य अशी जीवनदायिनी आहे. माझी सावित्रीमाई म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी आपल्या देशात पहिली शाळा सुरू करणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पत्नी या भारताची पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवयित्री, साहित्यिक, भारताची पहिली धर्मपरिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारणारी महिला म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय.
    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सर्वांना आणि सर्वच वाचकांना ज्ञात आहे. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य सर्वांना माहित आहे. तरी पण ‌‘माझी सावित्रीमाई आणि आजची स्त्री’ या पुस्तकात काय वेगळ असणार. असे असंख्य प्रश्न तुम्हा वाचकांना नक्कीच पडले असणार.

    Mazi Savitrimai Aani Ajachi Stree

    55.00
    Add to cart
  • माणसं (वैचारिक गद्य)

    Manase (Vaicharik Gadya)

    200.00
    Add to cart
  • माणूस जाळण्याच्या अटीवर

    जाब विचारणे हे मूल्य संघर्षशील माणसांना प्रेरणा देणारे असते. जीवनाचे यथार्थ सत्य जाणून घेण्यासाठी माणसांच्या संघर्षाच्या तळापर्यंत पोहचावं लागतं. सामाजिक सत्याचं सौंदर्य दर्शन आणि माणूसपणाला समजून घेणारं संवेदनशील मन ही काव्यनिर्मितीची नैतिकता आहे.
    प्रा.सदाशिव सुर्यवंशी यांची कविता याच अंगातून वैविध्यांनी वाढीस लागली आहे. जागतिकीकरणात नव्याचे आकलन आणि त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी, त्याला स्वीकारण्याचे धाडस केवळ परिवर्तनप्रवाही विचारांमध्येच आहे. जुन्या पानगळीची कृतज्ञता मनात ठेवून नव्या पालवीचं स्वागत हे सत्यदर्शी, सजग, सृजनात्मक वृत्तीच्या जडणघडणीचे द्योतक आहे.
    धर्माधिष्ठीत रूढी, परंपरांच्या जोखडाखाली अडकून पडलेलं माणूसपण, माता भगिनींवरील अमानवी अत्याचार, जनसामान्यांच्या शोषणाचा, त्यांच्या लढ्याचा, जय-पराजयाचा आणि कृषी संस्कृतीच्या नात्यांमधील घटकाचा धांडोळा डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांच्या अभिव्यक्तीतून ठळकपणे आलेला जाणवतो.
    निसर्गाचं, मानवी हक्कांचं आणि मूल्यांचं होणारं अध:पतन, भोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण, अस्मानी आणि सुलतानी संकटांचं चित्रण मोजक्या शब्दात, नेमका आशय गुंफत संयमित भाषेत मांडला आहे. बोलीच्या वाङ्मयीन सामर्थ्याचा उठाव म्हणजेच ‌‘माणूस जाळण्याच्या अटीवर’ हा काव्याविष्कार.
    मराठी साहित्यात या संग्रहाचं प्रेमपूर्वक स्वागत.

    – नारायण पुरी
    तुळजापूर

    Manus Jalnyachya Ativar

    125.00
    Add to cart