• मानसशास्त्रीय प्रयोग

    मानसशास्त्रीय प्रयोग

    काही वर्षाआधी साधा प्रयोग करण्यासाठी प्रयुक्त बनतो का? म्हटलं तर, सर्वच मंडळी ‘रफु चक्कर’ होवून जायची. ‘नको रे बाबा’, ‘काही फरक पडला तर’, असे धास्तावून म्हणायचे, परंतु आज मानसशास्त्रीय प्रयोगाविषयी ‘नजरा’ बदललेल्या आहे. प्रयोगाबाबतीत ‘उत्सुकता’, ‘आवड’ वाढलेली आहे. ‘आपलाच आपण शोध घेवू’ या जाणिवेने मंडळी समोर येत आहे. अलीकडे ‘चिकीत्सक’ वृत्ती वाढते आहे. त्यातूनच नव्या कल्पना उदयास येत आहे. ‘मानसशास्त्रीय प्रयोग’ हा शिस्तबद्धरीत्या व नियंत्रीत वातावरणात करावा लागतो. त्यामुळे प्रत्यक्षात अनेक अडचणींना समोर जावे लागते.

    या पुस्तकामध्ये, मानसभौतिकी, संवेदन, अध्ययन, स्मृती, विस्मरण, अवधान, भावना, विचार प्रक्रिया, नेतृत्व, मानसिक कार्य, प्रतिक्रिया काळ, साहचर्य इत्यादी घटकांवर अनेक प्रयोग इत्थभूत माहितीसह दिलेले आहे. यातून मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होईलच तसेच स्वतःचे चिकीत्सक अध्ययन करणार्‍या व्यक्तींना सुद्धा हे पुस्तक पर्वणीच ठरेल.

    Manasshasriya Prayog

    Rs.295.00
    Add to cart
  • मार्गदर्शन आणि समुपदेशन

    मार्गदर्शन आणि समुपदेशन

    आधुनिक माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानातील विकासामुळे मानवी जीवनातील सामाजिक व वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात महत्वाचे बदल होत आहेत. सामान्य जीवन गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षणक्षेत्रात देखील खूप बदल होत आहेत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे मानवाला आपल्या समस्यांचे निराकरणात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि समुपदेशनद्वारा होवू शकते. मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे.

    Margadarshan Aani Samupdeshan

    Rs.275.00
    Add to cart