-
मूलभूत व सामाजिक मानसशास्त्र
Rs.195.00मानसशास्त्र हे वर्तनाचा आणि मानसिक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करणारे प्रगत असे शास्त्र मानले जाते. मानसशास्त्राचा कसा विकास होत गेला, मानसशास्त्राबद्दल समाजात असणारे अनेक गैरसमज त्यापैकी एक म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र आहे का? आजही अनेक विचारवंत या शास्त्राला शास्त्र मानावयास तयार नाही. मानसशास्त्र देखील एक प्रगत असे शास्त्र आहे. तसेच वेगवेगळ्या कालखंडात मानसशास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीने झाला, मानसशास्त्राच्या विविध शाखा आणि महत्वाच्या अभ्यास पद्धतीचा अभ्यास करणार आहोत.
सदर पुस्तकातील पहिल्या तीन प्रकरणात मानसशास्त्राचा परिचय, बोधात्मक प्रक्रिया व प्रेरणा व्यक्तीमत्व आणि बुद्धीमत्ता या तीन प्रकरणातून जास्तीत जास्त व सखोल माहिती उदाहरण, प्रयोगासह देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने नवीनच लागू केलेल्या व अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच सामाजिक मानसशास्त्राची ओळख, वैयक्तीक पातळीवरील प्रक्रिया समुह गतिकी या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक मानसशास्त्राची ओळख या प्रकरणात भारतातील सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास व वर्तनाचा बोधात्मक दृष्टीकोन यासारख्या नवीन घटकांचा सविस्तरपणे उल्लेख केला आहे. तसेच दुसर्या प्रकरणात आक्रमकता कारणे आणि आक्रमकता प्रतिबंध यासारख्या नवीन घटकांसह नियंत्रणांची साधने यांचाही उहापोह करण्यात आला आहे. समूह गतिकी या प्रकरणात समुहात सहभागी होण्याचे फायदे सहकार्य व संघर्ष आणि सोबत नव्यानेच मदत वर्तनात वाढ कशी करावी या सारखे मुद्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Mulbhut v Samajik Manasshastra
-
मूलभूत शैक्षणिक आणि प्रायोगिक मानसशास्त्र
Rs.575.00शिक्षणशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय; किंबहुना शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक समाजशास्त्र हे खरेतर शिक्षणशास्त्राचे आधार विषय. प्रस्तुत ग्रंथात मानसशास्त्राचे विविध अर्थ व स्वरुप, मानसशास्त्रातील विविध संप्रदाय, मानवी वर्तनाचे प्रकार – सहजप्रवृत्त वर्तन, संपादित वर्तन, काही सामान्य प्रवृत्ती; अनुवंश व परिस्थिती, व्यक्तिविकास, नैतिक विकास, व्यक्तिमत्त्व, मानसिक आरोग्य, समूह मानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया, मेंदू आधारित अध्ययन, ज्ञानरचनावाद व अध्ययन, स्मरण आणि विस्मरण, विचार-प्रक्रिया, बुद्धिमत्ता व बुद्धिमापन, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बालगुन्हेगारी, विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे शिक्षण, अध्यापनाचे व अध्यापकाचे मानसशास्त्र या घटकांचे सविस्तर विवेचन दिलेले असून प्रस्तुत ग्रंथ हा शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यास, प्राध्यापकास, एम.पी.एस.सी. किंवा सेट-नेट करणाऱ्या उमेदवारास व शिक्षण क्षेत्रात अधिकारपदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
Mulbhut Shaikshanik Ani Prayogik Manasshastra