-
Ancient Indian Knowledge Tradition
Indian Knowledge System with its comprehensive tradition proposes values, skills and love for homeland and has been sporadic in Indian Educational Curriculum, and through National Education Policy it posits sensible pride for being a citizen of India encapsulating Self-esteem and Tolerance with vivacious frame. Introduction of Indian Knowledge System in curricula silently erodes the tradition inflicted by the foreign invasions, and also it embraces religious and social diversity in the true sense of the term. It will be the torch bearer for India to transmute it into the Viksit Bharat Rashtra by 2047, while we celebrate the centenary of Indian Independence with enormous erosion is colonial mindset in the non-colonial period and the colonial period as well. India as nation will reach out to other nations of the world by being a benchmark of values, tradition and beauteously diverse culture.
– Rajendra Nannavare
President,
Vivekanand Pratishthan, Jalgaon -
Economics of Demand and Supply Function
The book ‘Economics of Demand-Supply Functions’ The first module covers micro-economics, its importance and limitations, concepts related to production, productivity relationships and factors market mechanism/economy. The second module covers demand, theory of demand, individual and market demand curves, elasticity of demand, consumer satisfaction, forecasting of demand. The module third covers equilibrium curve analysis related to consumer behaviour. The module four, covers production function, total, average and marginal product, law of variable quantity and law of quantity product. The fifth module covers factors such as average and marginal costs of production and cost curves, U and L shaped cost curves, internal and external economies and diseconomies. The sixth module covers perfect competition, firms , industries and its short-run and long-run equilibrium. These issues are discussed in depth and comprehensively in this book. This book will definitely be useful for Students, Academicians, Professor, Researchers, Scholars.
-
-
Environmental Studies
We are very glad to present this book on ES-115 “Environmental Studies” in the hands of First Year students of all streams and teachers. The book is strictly compiled according to the National Education Policy (NEP) pattern syllabus framed by the board of studies, KBC NMU, Jalgaon for First Year students and to be implemented from June-2022. The book is written in very simple language giving exhaustive details on topics included there in.
The authors, with their long experience in environmental teaching and research, took up the challenge and brought out a standard text book. The book is written as per the KBC NMU, Jalgaon and the various units associated with it, have been presented in a simple and lucid style to suit the requirements of the course. The exercise as descriptive answer questions and multiple type questions with their answer key are given at the end of each unit for practice are intended to reinforce the knowledge of the students.
This book covers the major environmental aspects as per the syllabus framed by the KBC NMU, Jalgaon, like major environmental ecosystems, natural resources, biodiversity and their conservation, environmental pollution, environmental policies and practices, human communities and environment and guidelines for field work study.
This textbook enables the students to develop an understanding of today’s most important environmental issues. It helps students to grasp the scientific foundation of environmental topics so; they can better understand the nature around them and their impact. This book will be useful to the students of Arts, Science, Commerce, Pharmacy and Management to understand the environment related subjects in their courses. -
-
अर्थशास्त्राचा परिचय
भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास 1991 च्या नवीन आर्थिक धोरणानुसार मिश्र अर्थव्यवस्थेकडून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे होत असताना काही बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी खासगीकरणाची कास धरण्यात आली, पुरवठ्याच्या अर्थशास्त्राला झुकते माप देण्यासाठी पुरेसा अवकाश तयार करण्यात आला. नियोजन आयोगाच्या जागी निती आयोग, भारतीय उच्च शिक्षण आयोग आला. देशी-विदेशी गुंतवणूकदारांना पोषक वातावरण तयार करण्यात आले, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. आताच जुन्या भारतीय दंड संहिते ऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम (2023) इत्यादी कायदा शाखेतील बदल केले गेले. म्हणून शिक्षण धोरणातही बदल ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020′ नुसार करणात आले आहेत. या धोरणाची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून करण्यात येत आहे.
हे धोरण नव्या अभ्यासक्रम निर्मितीचा पाया असून उद्दिष्टे आधारीत व चांगले परिणामाधारीत (Objectives and Outcomes Base) आहे. अध्ययनकर्ता अर्थशास्त्रीय सिद्धांतांचे आपल्या खासगी व सामाजिक जीवनात अनुकरण करुन सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणूकीची क्षमता स्वतःत विकसित करेल ज्यातून देशाचा एक जबाबदार नागरिक बनू शकेल. अशी अपेक्षा गृहीत धरली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने भविष्याचा वेध घेत प्रथम वर्षासाठी अर्थशास्त्राच्या सर्व मुख्य विषयांच्या आशयाची ओळख व्हावी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र, उपभोक्त्याची वर्तणूक, उत्पादनाचे सिद्धांत, बाजाराची संरचना, पैसा आणि बँका, आंतरराष्ट्रीय व्यापार, सार्वजनिक आय-व्यय, आर्थिक विकास व नियोजन इत्यादी भागांची संकल्पनात्मक थोड्या विस्तृत स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना चार श्रेयांक (Credit) मिळविणे आवश्यक राहणार आहे.
आपणास विदितच आहे की, अर्थशास्त्र मुळातच मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचे अध्ययन करते. बाजारात व्यक्ती उपभोक्ता, उत्पादक, वितरक, संयोजक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. व अर्थव्यवस्था गतिमान करीत असतो. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्याच्या भविष्याला आकार देणार ठरेल यात शंका नाही. -
आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)
आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला 1857 चा उठाव या उठावाची कारणे व परिणामांची यथोचित चर्चा करण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक, धर्मसुधारक, पंडिता रमाबाई यांचे कार्य, यांच्या माहितीसह काँग्रेसची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतातील महान क्रांतिकारकांचे योगदान, भारताची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्य उदय याची माहिती यथोचित दिलेली आहे. भारत गणराज्य बनण्याला यावर्षी (26 जानेवारी 2023) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या राज्यघटना निर्मितीचा प्रवास व वैशिष्ट्यांची माहितीही या ग्रंथातून विद्यार्थी आणि अभ्यासकांना होणार आहे.
-
आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)
भारतातील ‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.
Aadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)
-
आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय
आधुनिक समाजमाध्यमेही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, युट्युब, व्हॉटस्अप, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम, ब्लॉग या आधुनिक समाजमाध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केले नाही तर या समाजमाध्यमांना अधिक विकसित व प्रगत बनवले. 24 तास चालणाऱ्या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांशिवाय आजच्या आधुनिक जीवनाचा विचारच करता येत नाही. म्हणून ही माध्यमे समजावून घेणे आणि त्यावर कसे अभिव्यक्त व्हावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र व कोणती पथ्ये पाळावयाची याची माहिती सदर पुस्तकातून प्राप्त होते. नवागतांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
-
आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र
शोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.
सर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे. -
कृषी भूगोल
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील OE/GE पेपरच्या अभ्यासक्रमानुसार ‘कृषी भूगोल’ हे पुस्तक वाचकांपुढे येत आहे.
कृषी व्यवसाय जगातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय अजूनही काही देशात फारसा विकसित नाही. परंतु काही देशांनी या व्यवसायात खूपच प्रगती केली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात कृषी व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायाचे महत्त्व पाहता भूगोल अभ्यासमंडळाने कृषी भूगोलाचा अभ्यासक्रमात समावेश केला. ही अतिशय चांगली बाब आहे.
पुस्तक लिहिताना अभ्यासक्रमातील विषय वेगवेगळे करुन त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार प्रकरणामध्ये विषय विवेचन करण्यात आले आहे.
सदरचे पुस्तक लिहिताना आमचे सहकारी मित्रांनी खूपच उपयुक्त सूचना केल्या. त्याचा आम्ही पुस्तक लिहितांना विचारात घेतल्या. -
-
खानदेशचा इतिहास
आम्ही ज्या मातीत वाढलो, घडलो त्या मातीला उतराई होण्याच्या निमित्ताने खानदेशचा इतिहास लिहिण्याची कदाचित ही सुवर्णसंधी मला लाभली म्हणून कृतकृतार्थ वाटतेय किंबहुना ती जबाबदारी जाणीवपूर्वक मी घेतली. सदर अभ्यासक्रमाच्या पुस्तकात मानवी वसाहतपूर्व, ताम्रपाषाण वसाहतीपासून तर आजच्या सुवर्णनगरी जळगांव पर्यंत विविध कालखंडातील खानदेशचा इतिहास समाविष्ट केला आहे.
अभिमानाची गोष्ट म्हणजे प्राचीन काळी सम्राटांनी आपल्या मांडलिकांच्या मार्फत (निकुंभ, मौर्य, आभीर, गवळी), तर सुलतान काळात फारुकी सुलतानांनी, मुघलकाळात दख्खनच्या सुभेदारांनी, मराठाकाळात कमाविसदार-सरंजामदारांनी प्रशासन करत राज्यकारभार खानदेशात चालवला. त्यानंतर कंपनी व ब्रिटिश सरकारने राज्यकारभार केला.
या विविध कालखंडात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय प्रभावाची घुसळण (मिश्रण) खानदेशात फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. सातपुडा पर्वत ते सातमाळ्याची डोंगर रांग, तापी व तिच्या उपनद्यांचे खोरे(पांबोगिता-पांझरा, बोरी, गिरणा, तापी), कान नदी, कानबाईचा उत्सव, कान्हाचा जागर आणि अहिराणी लोकबोली इत्यादीने समृध्द प्रदेश म्हणजे खानदेश.
इथला भिल्ल, कोळी व तत्सम आदिवासी ते बारा बलुता-अठरा अलुता तसेच कुणबी-मराठा, गुजर, लेवा, राजपूत, माळी इ. कृषक जाती-जमाती, मुस्लिम व व्यापारी ज्ञातीसमूह या सगळ्यांच्या सहिष्णू, सर्वसमावेशक व सलोख्याचा, गर्वाने मन फुलावे असा हा उज्वल इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याचा आनंद काही औरच आहे. -
खान्देश कथाप्रबोध
या सर्वच कथा खान्देश परिसरातल्या आहेत. बोली भूगोलाचा विचार केला तर ह्या कथा मध्यप्रदेश, गुजराथी प्रदेशातील सीमेलगतच्या बोलीच्या भूगोलातील आहेत. त्यामुळे जशा त्या आशयाने नाविन्यपूर्ण आहेत तशाच त्या अभिव्यक्ती शैलीनेही नाविन्यपूर्ण आहेत.
सदर संग्रहातल्या कथा वाचताना आपण खान्देशच्या बोलीतील किती मोठी श्रीमंती हरवून बसत आहोत, याची तीव्र जाणीव होते. ही जाणीव हा कथासंग्रह तरूण्ा वाचकांच्या मनात रुजवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे.– दत्ता भगत
-
खान्देश काव्यप्रबोध समीक्षा
‘कविता’ हा चिंतनशील वाङ्मयप्रकार आहे. प्रत्येक कविता ही कविच्या खासगी अनुभवातून जन्मास आलेली असली तरी तिचे स्वरूप हे वैयक्तीक न राहता वैश्विक होते. साहित्य हे कालातित असल्याने प्रत्येक कविता ही नव्या कालखंडात नव्या अर्थासह आशयमान होते. कविता ही बहुअर्थी असल्याने आशयाचे विविध पदर त्यातून उलगडत असतात. कविता ही अत्युच्च संवेदनेतून येत असल्याने कवितेतील निवेदन हे सरळ स्पष्ट व निवेदनात्मक नसते तर प्रतिमा, प्रतिके यातून कमी शब्दात ती अभिव्यक्त होत असते. अशा वाङ्मय प्रकारचे अध्ययन आणि अध्यापन करणे हे सोपे नसते. अलिकडच्या काळात परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थी हा ‘टेक्नोसॅव्ही’ होत चाललेला आहे. परिणामी तो कवितेच्या अस्सल अनुभवापासून दूर जात आहे. कवितेचा अनुभव हा खासगी असला तरीही सर्वव्यापक असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला कवितेत गोडी निर्माण व्हावी, कवितेचे अध्ययन सोपे व्हावे याकरीता सदर समीक्षाग्रंथाची निर्मिती केलेली आहे.
-
-
परिचयात्मक अर्थशास्त्र
मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचं अध्ययन करण्याचं महत्त्वाचं कार्य अर्थशास्त्र करते. ही मानवी वर्तणूक उपभोक्ते, उत्पादक, वितरक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. त्यांचे कार्य अर्थव्यवसथेला गतिमान करणार ठरते. यातून अर्थशास्त्रीय ज्ञानशाखा उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण यांचे सैद्धांतिक विश्लेषण करतात. यासाठी रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्रीय अभ्यास शाखांचे दोन भागात विभाजन केले आहे. (1) सूक्ष्मलक्षी अध्ययन (2) समग्रलक्षी अध्ययन. हे विभाजन आर्थिक विकासाची धोरणे निश्चित करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या दोन्ही अभ्यासशाखांच्या आधारावरच ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या क्रमिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांची व त्यांची व्यावहारिक प्रासंगिकता कशी महत्त्वपूर्ण आहे याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्यात अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी, त्याला आपल्या भविष्याला आकार देता यावा व सामान्य माणसांच्या आर्थिक प्रश्नांची त्याच्यात समज निर्माण व्हावी, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने धडपड करावी हा प्रयत्न आहे.
म्हणून या पुस्तकात मागणी, पुरवठा, रोजगार, पैसा, आधुनिक बँकींग, व्यापार, सरकारचे उत्पन्न-खर्च, आर्थिक विकास, नियोजन आयोग, निति आयोग, व्यावसायिक जीवनातील सांख्यिकीचे योगदान, या संकल्पनांची त्याला ओळख होण्यास मदत होईल. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.Parichyatmak Arathashastra
-
पर्यावरण अभ्यास
21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरण अभ्यास या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा. -
पर्यावरणशास्त्र परिचय
21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरणशास्त्र परिचय या संदर्भग्रंथात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, एड्स बाबतीतील जनजागृती व सद्य परिस्थिती, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.Paryavaranshastra Parichay
-
प्राकृतिक भूगोल
प्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.
प्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.Prakurtik Bhugol
-
प्राकृतिक भूगोल
प्राकृतिक भूगोल या पुस्तकात भूगोलाच्या विविध अंगाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीचे अंतरंग, भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबंधित सिद्धांत, खडक आणि विदारण, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याशिवाय वातावरणाचा अर्थ, वातावरणाची घटना आणि संरचना, तापमान, सौरशक्ती, वायूभार, वारे व वाऱ्याचे प्रकार, आर्द्रता, वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार, महासागर तळरचना, या तळरचनेमध्ये हिंदी व अटलांटिक महासागराच्या तळरचनेचा अभ्यास, सागरी प्रवाह, हिंदी व अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाचे चक्र इत्यादी घटकाविषयी अतिशय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.Prakurtik Bhugol
-
प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण आणि जलावरण)
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतूदींच्या अनुषंगाने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकृतीबंधानुसार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश असलेले ‘प्राकृतिक भूगोल’ हे पुस्तक विद्यार्थी मित्र, अभ्यासक आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
प्रस्तुत ग्रंथात प्राकृतिक भूगोलाची ओळख, आपली पृथ्वी, खडक व विदारण पृथ्वीच्या शक्ती, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वाटा यांचे स्पष्टीकरण तसेच वातावरणाचा परिचय, सौरशक्ती आणि हवेतील तापमान, वातावरणीय दाब आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, जलावरणाचा परिचय, महासागरजलाच्या हालचाली इत्यादी घटकांचे योग्य विश्लेषण, आकलन करुन लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनाचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून हा ग्रंथ भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. -
प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण व जलावरण)
सूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे अवघे विश्व कसे निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले, विश्वाची व्याप्ती किती आहे आदींसारखे अनेक प्रश्न मानवाला सुरुवातीपासून भेडसावत होते. त्याअनुषंगाने प्राचीन काळापासून ते आजतागायत पुष्कळशा परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत. अठराव्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. पृथ्वीचे अंतरंग हे निसर्गातील सर्वात मोठे गुढ आहे. भूकवचात बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने काही शक्ती अथवा प्रेरणा करीत असतात हे स्पष्ट होते.
प्रस्तुत ग्रंथात काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, पृथ्वीचे अंतरंग, खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, खडक आणि विदारण, नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य, वातावरण आणि सौरशक्ती, वायुभार आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, सागरतळ, समुद्रप्रवाह इ. विविध मुद्यांचा परामर्ष घेतलेला असून साध्या-सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.Prakurtik Bhugol (Shilavaran, Vatavaran V Jalavaran)
-
प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा
भारताची प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा हा जगाला प्रेरणादायक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आधारे, आपल्या तरुणपिढीला प्राचीन भारतीय ज्ञान, मूल्यं आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
यात गुरुकुल परंपरेच्या माध्यमातून आचार्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचा उलगडा केला आहे. योगसाधना, ज्योतिष, साहित्य, संगीत, कला, दर्शनशास्त्र, नीतीशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, पारंपरिक चिकित्सा, आरोग्य, संरक्षण आणि युद्धकलेसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य विषय : प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली व ज्ञानस्रोत, प्राचीन भारतीय विद्यापीठांचे योगदान, प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय कला व सांस्कृतिक परंपरा.
विद्यार्थ्यांच्या उपासना, व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, मानवतेचा आदर आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले आहे. -
प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली
मानवी सभ्यतेत ज्ञानाचे व शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या मानवी समुहाने आत्मसात केलेले ज्ञान हे त्याच्या प्रगतीचे व मानवी सभ्यतेचे द्योतक असते. भारतीय ज्ञानप्रणालीचे शिक्षण संक्रमणातील स्थान व एकूणच शैक्षणिक उत्क्रांतीतील महत्त्व व मानवी सभ्यतेचे ऐतिहासिक उल्लेख लक्षात घेता भारतीय ज्ञानप्रणाली व तिचे महत्व जाणून घेणे अगत्याचे आहे. मौखिक ज्ञान परंपरा, मानवी संस्कृतीला विविध आयाम प्रदान करणाऱ्या चालीरीती, सण-उत्सव, धार्मिक ग्रंथ, परंपरागत व्यवसाय, प्राचीन तंत्रज्ञान याद्वारे भारतीय ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांकडे संक्रमित होतांना दिसते. अर्थात भारतीय ज्ञानप्रणालीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. या ज्ञानप्रणालितूनच भारत एक राष्ट्र म्हणून सांस्कृतिक एकात्मतेच्या बहुसांस्कृतिक धाग्यात जोडला गेला आहे. भारतीय राष्ट्रवादाचे अधिष्ठान ‘भारतीय संस्कृतीत’ आहे, असे डॉ. राममनोहर लोहिया यांनी म्हटले आहे.
– राजेंद्र नन्नवरे
वन्यजीव अभ्यासक -
भारतीय राज्यघटना आणि राजकारणाची ओळख
भारतीय राज्यघटनेची निर्मिती 1946 ते 1950 या कालखंडात घटना समितीकडून झालेली असली तरी राज्यघटना निर्मिती पूर्वी ब्रिटिश राजवटीने केलेल्या कायद्याच्या माध्यमातून लोकशाहीपूरक वातावरण भारतात निर्माण होण्यास प्रारंभ झालेला होता. राज्यघटना निर्मितीवेळी प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकास साध्य करणे आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेचे ध्येय मानले गेले. नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क प्रदान करताना मार्गदर्शक तत्त्वांचेही आरेखन केले गेले. भारतीय घटनेद्वारा नागरिकाचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित करताना भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्तीदेखील केली गेली. भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने देशाची सत्ता कार्यकारी मंडळाकडे आली. भारताचे कार्यकारी मंडळ सामुहिकरीत्या संसदेला जबाबदार असते. लोकशाहीची संस्थात्मक चौकट यशस्वी व गतिमान बनविण्यासाठी न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ही महत्त्वपूर्ण साधने मानली जातात. हे निकोप लोकशाहीचे प्रमुख अंग मानले गेले.
Bhartiya Rajyaghatana Aani Rajkaranachi Olakh
-
भारतीय राज्यघटना शासन आणि राजकीय व्यवस्था
26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. घटनाकारांनी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यामध्ये विभागणी करतानाच मूलभूत अधिकार व हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांचेही समावेशन केले गेले. अधिकार-कर्तव्ये परिभाषित करतानाच भारतीयांच्या भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्ती देखील केली गेली. राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असले तरीही पंतप्रधानांचे महत्त्व ठळकपणे दिसून येते. निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केलेल्या निवडणूकांमध्ये मतदानाद्वारे निवड झालेल्या लोकप्रतिनिधींकडून मंत्रिमंडळाची नियुक्ती होते. लोकसभेमध्ये बहूमत असेपर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकते. याप्रकारे लोकशाहीत जबाबदारीचे तत्त्व विकसित झाल्याने कायदेमंडळांकडून कायदे केले जातात, कार्यकारी मंडळाकडून कायद्यांची अंमलबजावणी होते आणि न्यायमंडळ अंमलबजावणी प्रक्रियेची पाहणी करते म्हणजे न्याय देते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्त्वांसाठी हे आवश्यक ठरते.
Bharatiya Rajyaghatana – Shasan ani Rajkiya Vyavastha
-
भारतीय राज्यव्यवस्था
भारतीय राज्यव्यवस्था या पुस्तकात केंद्रीय कार्यकारी मंडळ, केंद्रीय कायदेमंडळ, राज्य कार्यकारी मंडळ, राज्य कायदे मंडळ, भारतीय न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया या विषयी विस्तृत माहितीचा देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्थेशी निगडीत अनेक घटक पदवी, पदवीत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नेट/सेट परीक्षेतील अभ्यासक्रमात देखील समाविष्ट आहेत. म्हणून उपरोक्त पुस्तकाची रचना विद्यापीठीय अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षा या दोन्हीसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल या हेतूने केलेली आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यव्यवस्थेशी निगडीत संकल्पना समजण्यास मदत होईल. तसेच अभ्यासू प्राध्यापक व विद्यार्थ्यांना अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल.
-
भारतीय लष्करी इतिहास
भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अतीप्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. आधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैशिक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. प्रस्तुत ग्रंथात युद्धविषयक निरनिराळे घटकांचे योग्य विश्लेषण करून, आकलन करून लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
-
भारतीय लष्करी इतिहास (भाग 2)
मुघल आक्रमक बाबरने तोफांचा वापर केल्याने त्याला भारतात विजय मिळवून मुघल साम्राज्य स्थापन करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मुघल व आदिलशहा यांना आव्हान मिळाले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत आधुनिक युद्धतंत्राचा उपयोग करण्याचा मराठ्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. एकोणिसाव्या शतकात महाराजा रणजीतसिग यांनी शिख सेनेच्या रूपाने ब्रिटिशांसमोर मोठे आव्हान उभे केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात स्थापन केलेले सैन्य हे आजच्या आधुनिक सेनादलांचे प्रारंभिक स्वरूप मानावे लागेल. भारतात आलेल्या एका व्यापारी कंपनीने ऐतदेशीय लोकांचेच सैन्य स्थापन केले. या सैनिकांनीच इंग्रजांना हा देश जिंकून दिला… म्हणूनच विद्यार्थ्यांनी भारताचा लष्करी इतिहासाचे अध्ययन केल्याने ते राष्ट्रीय संरक्षणाबद्दल जागरूक होतील. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय लोकांनी दीर्घकाळ सीमांच्या संरक्षणाकडे व एकूणच देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेले आहे. परिणामी त्यांना परकीयांची गुलामगिरी करावी लागली. त्यामुळे त्यांना देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांची जाणीव करून देणे आवश्यक ठरते.
-
भारतीय संविधान मूलभूत तत्त्वे आणि स्वरूप
संविधान म्हणजे एक देशाच्या राजकीय व्यवस्थेचा आधारस्तंभ. ते राज्याच्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, व न्यायमंडळ यांची स्थापना करतो, त्यांच्या अधिकार व कार्ये स्पष्ट करतो, व त्यांची मर्यादा ठरवतो. संविधान जनतेच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे आणि त्यात सुसंगत व न्यायसंगत शासनाची रूपरेषा असते.
लोकशाहीत, राज्यघटनेचा आधार म्हणजे जनता स्वसंविधान तयार करते आणि विविध शासन अंगांना अधिकार प्रदान करते. संविधान हा संस्थात्मक आरसा आहे, जो समाजाच्या विविध स्तरातील मूल्यांचे प्रतिबिंब असतो. त्याच्या अंमलबजावणीवर आणि न्यायालयीन निर्णयांवर संविधानाचा प्रभाव आहे. -
भारतीय सेनादलांच्या विद्यमान घडामोडी
आजच्या काळात भारत आणि जगातील अनेक देशांच्या लष्करी पद्धतींमध्ये ग्रीक-रोमन युद्धपद्धतीचा प्रभाव आहे. एकविसाव्या शतकात युद्धतंत्रात माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विविध आधुनिक शस्त्रे यांचा समावेश झाला आहे, ज्यामुळे भारतीय सेनादलांच्या घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
प्राचीन भारतात संरक्षण आणि युद्धकला प्रगल्भ होती. रामायण, महाभारत आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यामध्ये याबाबतच्या महत्त्वाच्या विचारांची माहिती आहे. दुर्दैवाने, भूतकाळातील या ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारताला अनेक वेळा पराभव भोगावे लागले.
समरांगण सूत्रधारासारख्या ग्रंथांमधून प्राचीन भारतीय सैन्याची रचना, युद्धकलेची तत्त्वे आणि तंत्रज्ञान समजून घेता येते. भारताच्या संरक्षण यंत्रणेची रचना सरंजामशाहीवर आधारित होती, ज्यामुळे समाजातील इतर घटक संरक्षण कार्यात कमी सहभागी झाले.
भारतीय सेनादलांच्या विद्यमान घडामोडी या पुस्तकात विद्यार्थ्यांना सेनादलांच्या नावीन्यपूर्ण बाबी, भारतीय लष्करी दलांशी संबंधित वस्तुस्थिती आणि तथ्ये, आधुनिक युद्धाच्या आवश्यकतेनुसार होणारे बदलही याविषयी माहिती तसेच राष्ट्रप्रेमाचे कर्तव्य लक्षात घेऊन, राष्ट्ररक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना सेनादलांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. -
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपलाही काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन केले. आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध घडामोडींची माहिती या ग्रंथातून होणार आहे. या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या, सुटसुटीत भाषेत, मुद्देसूद केलेली आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थी, वाचकांना समजण्यास सोपे जावे म्हणून प्रत्येक ठिकाणी चौकटींची रचना करून त्यात मुद्दे दिले आहेत. चित्रांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात भारतात ब्रिटिशांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्तास्थापनेपर्यंतचा, 1857 चा उठाव, कारणे आणि परिणाम, भारतातील सामाजिक, धार्मिक, सुधारकांचे कार्य, काँग्रेसची स्थापना, मवाळ-युग, टिळक युग, गांधी युग, भारतातील क्रांतीकारक, मुस्लिम लिग व भारताची फाळणी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी पाठविलेल्या विविध समित्या, यांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय भारताची फाळणी आणि स्वातंत्र्याचा कायदा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्यांचीही माहिती आलेली आहे. एकूणच भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळून 1950 मध्ये घटना लागू होऊन भारत लोकशाहीप्रधान देश बनण्यापर्यंतची ऐतिहासिक माहिती म्हणजे हा ग्रंथ!
Bharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)
-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स.1857 ते इ.स.1950)
भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशाप्रसंगी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा वेध घेणे आवश्यक ठरते. इ.स.1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीचे युद्ध करून बंगालमध्ये प्रथमच कंपनीची सत्ता स्थापन केली. बक्सारच्या युद्धाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होवून तिने ब्रिटीशाविरूद्ध सनदशीर मार्गाने चळवळ सुरू केली. 1905 पर्यंत हे ठीक होते. पण त्यानंतर जहाल मतवाद भारतात निर्माण झाला. चतुःसूत्रीचा स्वीकार करावा असा गजर जहालवाद्यांनी सुरू केला. त्यातून सुरत येथे काँग्रेस फुटली. 1916 मध्ये लखनौच्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल एकत्र आले. 1920 मध्ये म.गांधीजी युगाला प्रारंभ झाला. अहिंसा, सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. असहकार, कायदेभंगाचे युग अवतरले. अनेकांना फासावर लटकावले. कारण त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. म.गांधीजींना तो मार्ग पसंत नव्हता. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध चालु असतांना म.गांधीजी यांनी चलेजाव आंदोलनाची घोषणा केली तर तिकडे जपानचे सहाय्य घेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून जय हिंदची घोषणा केली. अशा अनेक घटना हिंदुस्थानात घडल्या. त्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्याची कहानी म्हणजे हा ग्रंथ होय.
Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)
-