• पर्यावरण भूगोल

    पर्यावरण भूगोल

    मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याची स्वयंचलित व स्वनियंत्रित यंत्रणा निसर्गाजवळ आहे. परंतु अलीकडच्या काळात निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे असंतुलन निर्माण झाले. त्यातून अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्यात. ह्या पर्यावरणीय समस्या विश्वव्यापी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळेच 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या जागतिक परिषदेत पर्यावरणीय समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली व तेव्हापासूनच जगातील सर्व देशांचे लक्ष ह्या जागतिक समस्येकडे वेधले गेले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक असल्याची जाण प्रत्येक राष्ट्र, शासन व समाजाला होऊ लागली. यातूनच पर्यावरण अभ्यासास महत्त्व प्राप्त झाले. पर्यावरणविषयक जागृती व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला पर्यावरणाचे महत्त्व कळावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करू शकतो? पर्यावरण संतुलन ढासळल्यामुळे किती भयानक समस्या निर्माण झाल्यात? या संबंधीची माहिती प्रत्येकास व्हावी, या दृष्टिकोनातूनच प्रस्तुत पुस्तकाची मांडणी केली आहे.
    या पुस्तकाच्या माध्यमातून जैवविविधतेचे महत्व, राष्ट्रीय पर्यावरण धोरण, धोरणावर आधारित अंमलबजावणी, वने व वन्यजीवांचे संवर्धन, विकसित व विकसनशील देशातील पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न अशा महत्वपूर्ण मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व स्वच्छ पर्यावरणासाठी या सर्व बाबींचे आकलन समाजाला होणे आवश्यक आहे. ही माहिती समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सारे प्रयत्न करू या.

    Paryavran Bhugol

    Rs.175.00
    Add to cart
  • पर्यावरण शिक्षण

    पर्यावरण शिक्षण

    20 व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात खर्‍या अर्थाने पर्यावरण शिक्षणाच्या संकल्पनेला गती मिळाली. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती आहे. मानव, प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्या सभोवतालच्या परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरणात केवळ एकाच घटकाचा समावेश होत नाही तर त्यात अनेक प्रकारचे घटक असतात. यामध्ये भौतिक, जैविक व रासायनिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो. पर्यावरण स्थळ-काळानुसार बदलते. एका सजीव जातीला अनुकूल असलेले पर्यावरण दुसर्‍या सजीव जातीला प्रतिकूल असू शकते. सद्य:स्थितीत नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अनिर्बंध वापरामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज या नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य पद्धतीने जतन केले तरच भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आपल्याला भावी पिढीसाठी हा निसर्गाचा ठेवा सुरक्षित ठेवायचा असेल तर नैसर्गिक साधनसंपत्तीचे व एकूणच पर्यावरणाचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

    पर्यावरण आणि पर्यावरण प्रदूषण हा आज कळीचा मुद्दा झालेला आहे. या प्रदूषणापासून आपणच आपल्या सुंदर पृथ्वीला वाचवायचे असेल तर सामूहिक बदलांऐवजी वैयक्तिक बदल महत्त्वाचे आहेत. आपण वेळीच याबाबत दक्ष राहिलो नाही तर येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी धोकादायक असणार आहे. आपला आजचा प्रत्येक दिवस पर्यावरण रक्षणासाठी मोलाचा आहे. प्रत्येक मानवाने आपली जीवनशैली बदलली तर स्वतःपासून केलेला हा बदल एक चळवळ बनायला वेळ लागणार नाही.

    सदरील पुस्तकात पर्यावरण व पर्यावरण शिक्षणाशी संबंधित सर्वच मुद्यांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सखोल विचारमंथनातून अभ्यास व संशोधनातून प्रस्तुत पुस्तक तयार झालेले आहे. विविध उदाहरणे तसेच सध्याच्या वेब युगाचा विचार करुन भरपूर प्रमाणात आकृत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यासक, संशोधकांनासुद्धा पुस्तकाचा उपयोग होणार आहे.

    Paryavaran Shikshan

    Rs.180.00
    Add to cart