• पालकत्व शिक्षण

    पालकत्व शिक्षण

    पालकत्व शिक्षण या पुस्तकात एकूण चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यात पालकत्व शिक्षणाचा अर्थ, स्वरुप, व्याप्ती, उद्दिष्ट्ये, मार्ग, गरज, महत्व तसेच पालकांचा बालकाच्या शिक्षणात व शाळेत सहभाग, पालक शिक्षक संघ, पालकांची भूमिका व जबाबदार्‍या, कुटूंबाचा, सामाजिक व आर्थिक स्थितीचा परिणाम, पालकत्व शैली, पालकत्व शिक्षणातील नवप्रवाह यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

    या पुस्तकातून पालकत्व शिक्षणाबद्दल अपेक्षित व तपशीलवार मुद्देसूद माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून संपूर्ण अशी माहिती किंवा ज्ञान आपणास मिळणार नाही. परंतु याचा शिक्षण क्षेत्रातील उपयोग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना या पुस्तकाद्बारे एकाच ठिकाणी पालकत्व शिक्षणाचे साहित्य उपलब्ध होईल व त्यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल अशी खात्री आहे.

    Palaktva Shikshan

    Rs.160.00
    Add to cart
  • पालकत्व शिक्षण

    पालकत्व शिक्षण

    पालक बनणे हे व्यक्तीच्या जीवनात खूप आनंद देणारी बाब आहे, तरी पालकत्वाची जबाबदारी पार पाडणे तेवढीच कठीण आहे. आपल्या बालकाला वाढवणे, त्याच्या योग्य विकासाला दिशा देणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. आपल्या मुलांसोबत चांगला संवाद असणे आजच्या इंटरनेटच्या युगात दुरापास्त झाले आहे. पालक अशिक्षित असो वा सुशिक्षित, गरीब वा श्रीमंत सर्वांना आपापल्या बालकांविषयी काही ना काही समस्या, शंका जाणवतात. या शंका कशा दूर कराव्यात. समस्या कशा सोडवाव्यात हे कोणत्याही स्तरावरील शिक्षणात शिकवले जात नाही. कारण पालकत्व ही नैसर्गिक गोष्ट मानली जाते.

    पालकत्वाचे शिक्षण ही संकल्पना भारतीयांसाठी नवीन आहे. पाश्चात्य देशात या शिक्षणाची मुळे रूजली आहेत. भारतात परंपरेने कुटुंबाकडून बालकाचे संगोपन, शिस्त, त्याचे भविष्य याविषयी निर्णय घेतले जातात. इथेच पिढीतील अंतराची ठिणगी पडते. बालहक्कांची घुसमट होते, हे सर्व होवू नये म्हणून पालकत्व शिक्षणाची रूजवात भारतात झाली.

    प्रस्तुत पुस्तकात पालकत्व शिक्षण संकल्पना, अर्थ, गरज, महत्व, व्याप्ती, पालक शिक्षणाचे विविध दृष्टिकोन, विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले उपागम, पालकांची भूमिका, जबाबदार्‍या यांचे तपशीलवार विवेचन केलेले आहे. भारतातील समाजात अस्तित्वात असलेल्या विविध कुटुंबातील आंतरक्रिया बालकांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, भारतातील पालक शिक्षण, पालकत्व शैली, पालकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा बालकावर होणारा परिणाम या बाबी नवीन नसल्या तरी त्यांची मांडणी पालक, शिक्षणाच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

    Palakatv Shikshan

    Rs.195.00
    Add to cart