-
पर्यावरणशास्त्र परिचय
Rs.375.0021 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरणशास्त्र परिचय या संदर्भग्रंथात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, एड्स बाबतीतील जनजागृती व सद्य परिस्थिती, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.Paryavaranshastra Parichay
-
पर्यावरणीय भूगोल
Rs.325.00पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर काही कालावधीनंतर येथे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. या सजीवांच्या उत्क्रांतीमधूनच मानवाची देखील निर्मिती झाली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, हे घटकांची गरज असून हे घटक सजीवांना त्यांच्या सभोवतालच्या परिसरातून मिळतात. पर्यावरण ही संकल्पनाच बहुव्यापक, बहुसमावेशक व बरीच गुंतागुंतीची आहे. पर्यावरण एक किवा अनेक सजीवांचे बनलेले असते. तसेच ते एक किंवा अनेक घटकांनी मिळून बनलेले असते. पर्यावरण ही संकल्पना स्थल व कालसापेक्ष आहे. कारण भूपृष्ठावर सर्वत्र सारखेच पर्यावरण नसते. अलीकडे पर्यावरण ही बहुचर्चित संकल्पना बनली असून ती अध्ययनाचा, संशोधनाचा व चिंतेचा एक प्रमुख विषय ठरत आहे.
सदरील पुस्तकात पर्यावरणीय भूगोलाचा परिचय, परिसंस्था, जैवविविधता व तिचे संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरणीय समस्या, पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणे इ. महत्त्वपूर्ण घटकांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.Paryavaraniya Bhugol