-
पुरवठा साखळी व्यवस्थापन
Rs.210.00सध्याच्या युगाच्या मागणीनुसार आपण अनुकूलन स्वीकारले पाहिजे. म्हणून, एखाद्या विषयाच्या अभ्यासक्रमातील कोणताही बदल हा विकासाची नैसर्गिक प्रगती आहे. जेव्हा तो विषय नवीन विविध मार्गांनी शिकवला आणि शिकला जातो तेव्हा ज्ञान विकसित होते. कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने द्वितीय वर्षातील एम. कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाचा अवलंब केल्यामुळे, विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण साहित्य प्रदान करणे ही आमची जबाबदारी आहे.
द्वितीय वर्षातील एम. कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले “पुरवठा साखळी व्यवस्थापन” हे पाठ्यपुस्तक सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. स्वयं-शिक्षण स्वरूपातील हे पुस्तक, विद्यार्थी-अनुकूल दृष्टिकोनाचे काटेकोरपणे पालन करते. यात कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांमधील परीक्षा प्रश्नांचा समावेश आहे, जे सर्वसमावेशक परीक्षेची तयारी सुलभ करते. -
पुराभिलेखागार
Rs.160.0021 व्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरातील सर्व तर्हेची माहिती महाजालामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेली असली तरी जुनी कागदपत्रे जपणारे पुराभिलेखागार आजही महत्वाचे आहेत. पुराभिलेख म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आलेख दर्शविणारी साधने.
इ.स.पू. 327 च्या सुमारास अलेक्झांडरबरोबर भारतात आलेल्या निआर्कसने ‘हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात’ असे लिहून ठेवले आहे. भारतात मध्यकाळापासूनच कागदपत्रे जतन करून ठेवण्याची पध्दत रूढ असल्याचे दिसून येते. पूर्वी संस्थानात कायम सांभाळून ठेवण्याजोगी कागदपत्रे लाल रुमालात बांधत तर पस्तीस, बारा व तीन वर्षे राखून ठेवण्याची कागदपत्रे पांढर्या रुमालात बांधत असत. इ.स. 1818 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली. यावेळी करण्यात येत असलेला सरकारी पत्रव्यवहार, जनतेचे तक्रार अर्ज व इतर कागदपत्रे सरकार दरबारी जमा होऊ लागली.
सदरील पुस्तकात अभिलेखागारविषयक सर्व उपयुक्त माहितीसोबतच मुंबई अभिलेखागार, मुंबई, पुण्याचे पेशवे दफ्तर (पुणे अभिलेखागार) आणि इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथील पुराभिलेखागारांचाही समावेश आहे. ‘डिजिटल अभिलेखागार’ या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थी, शिक्षक व नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल असा विश्वास आहे.Purabhilekhagar