-
भारताचा इतिहास (इ.स. 1750 ते 1857)
Rs.275.00प्राचीन काळापासून भारताचे पाश्चिमात्य देशांशी व्यापारी संबंध होते. 18 व्या शतकाच्या मध्यकाळात भारतीय समाज एकसंघ नव्हता तो अनेक गटात विखुरलेला होता. निरनिराळ्या जातींच्या गटात रोटी-बेटी व्यवहार बंद होते. तरी देखील आर्थिक क्षेत्रात भारत संपूर्ण जगात संपन्न राष्ट्र गणले जात होते. भारतातील राजकीय स्थिती अनुकूल असल्याने इ.स. 1526 मध्ये बाबरने सुलतान इब्राहीम खान लोदीचा पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुगलांच्या सततच्या आक्रमणाने भारताची स्थिती अत्यंत दयनीय झाली. ब्रिटिशांनी भारतावर कब्जा केल्यानंतर 1757 ते 1857 या काळात त्यांनी अनेक बदल केले. मात्र प्रशासकीय व कायदेशीर सुधारणा राबवत असतांना आपल्या स्वार्थाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ब्रिटीशांच्या हिंदुस्थानातील आगमनानंतर पन्नास वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे समीकरण बिघडून हजारो लाखो कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गाची अक्षरक्ष: वाताहत झाली. याची परिणती 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात झाली, पण त्यात अपयश आले.
प्रस्तुत पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालमधील सत्ता स्थापनेच्या अगोदरपासून ते भारतातील इ.स. 1857 च्या उठावाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास अतिशय मुद्देसूदपणे मांडला आहे.Bharatacha Itihas – Ad 1750 to 1857
– डॉ. गोकूळ पाटील
-
भारताचा इतिहास (इ.स. 1757 ते 1947)
Rs.375.00ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने इ.स.1757 मध्ये प्रथम बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला. पुढे हळूहळू संपूर्ण भारत देशावर आपली सत्ता स्थापन केली. इ.स.1857 मध्ये भारतीयांनी कंपनी सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यामुळे भारतात कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश सम्राटाची सत्ता आली. ब्रिटिश सरकारने इ.स. 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या कालखंडात भारताची भौतिक प्रगती झाली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणही झाले. परिणामी क्रांतिकारकांनी क्रांतिकारी चळवळ करून आणि जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा देऊन भारत देशाला ब्रिटनच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त केले. याच काळात भारतात सामाजिक व धार्मिक चळवळीही झाल्या. या सर्व घटकांचा इतिहास या ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, नेट, सेट व तत्सम स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.
Bharatacha Itihas (1757-1947)