-
भारताचा भूगोल
Rs.275.00भारत हा एक प्राचीन संस्कृती व वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा लाभलेला महान देश आहे. भारताचा इतिहास गौरवशाली आहे. भारत हा विशाल खंडप्राय देश असून विविधतेने नटलेला आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय, दक्षिणेस विस्तृत हिंदी महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर व पश्चिमेस अरबी समुद्र शिवाय अंतर्गत भागातील भूरचनेतील विविधता यामुळे भारताचे हवामान वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतात जगातील बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानाचे आविष्कार पाहायला मिळतात. पश्चिम आशिया व पूर्व आशियाच्या मध्यभागात भारत स्थित असून हिमालय पर्वताच्या दक्षिणेस हिंदी महासागरपर्यंत पसरलेला भारत हा आशिया खंडाचा एक उपखंड समजला जातो. भारताचा लोकसंख्या बाबतीत जगात चीन नंतर दूसरा क्रमांक लागतो. भारतातील खनिज व शक्ती साधनसंपत्तीचे वितरण विषम झालेले आहे. भारताचे शेजारील देशांदरम्यान भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहेत.
Bharatacha Bhugol
-
भारताचा भूगोल
Rs.225.00भारत हा जगातील विविधेत एकता दर्शविणारा एकमेव देश आहे. जगातील ङ्गप्रमुख लोकशाही राष्ट्रफ म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. भौगोलिकदृष्ट्या भारतातील सर्व प्रकारची विविधता अधिक महत्त्वाची आहे. जगातील विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, भारतात आढळतात. प्राकृतिकदृष्ट्या भारतातील पर्वत, पठारे, मैदाने, दर्या, वाळवंट, इत्यादीबाबतची विविधता भारतात आढळते. हवामानातील विविधता भारतात आढळते. हवामानातील विविधता तर तीव्रतेने जाणवते. भौगोलिक आणि प्राकृतिक विविधतेबरोबर भारतातील वांशिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक विविधताही मोठ्या प्रमाणात आहे. जगातील सर्व वंशाचे धर्मांचे लोक भारतात आहेत. सामाजिक आणि आर्थिक विषमताही भारतात आढळते. अनेक भाषा, बोलीभाषा, वेगवेगळ्या रुढी, परंपरा, सण, उत्सव, इत्यादीबाबत भारतात विविधता आढळते. अशा विविधतेतून एकता साध्य करणारे राष्ट्र म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. सदरील पुस्तकातून भारताच्या अभ्यासासोबत जगातील देशांचाही तोंडओळख सहजपणे होईल.
Bharatacha Bhugol