-
भारताचा इतिहास (इ.स. 701 ते 1525)
Rs.295.00प्राचीन काळापासून भारतावर शक, हूण, कुशाण, ग्रीक, अरबांनी आक्रमणे केली. अरबांचे आक्रमण इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठीच असल्यामुळे तुर्की व मोगल आक्रमकांकरिता मार्गदर्शक ठरले. मुस्लिम आक्रमकांना तत्कालिन भारतीय सत्ताधिशांनी वीरतेने तोंड दिले, पण गझनी, घोरी, ऐबक, खिलजी, तुघलक यासारख्यां आक्रमकांच्या कपटनीतीला ते बळी पडले. तत्कालिन भारतीयांमध्ये एकतेचा, दूरदर्शीपणाचा प्रचंड अभाव होता. हिंदूंचा वारंवार पराभव का होतो आहे याचे योग्य विश्लेषण ते करू शकले नाही. आपापसातील भाऊबंदकी, सत्तासंघर्ष, हेवेदावे यातच भारतीयांची प्रचंड शक्ती खर्च झाली. मुस्लिम आक्रमणामुळे सामान्य जनता कंगाल झाली. भयभीत झाली. त्यांच्या धर्मप्रसार, राजकीय हेवेदावे, सततचा रक्तरंजीत संघर्षामुळे सामान्यांना कोणीही वाली राहिला नाही. स्त्रियांची अवस्था आणखीनच भयावह झाली. आक्रमकांसोबतच आलेल्या स्थापत्य, कला, उद्योगधंदे, आर्थिकता व तांत्रिकता, समाजमान्य पद्ध्ातींचा भारतीय संस्कृतीबरोबर सरमिसळ झाली.
-
भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 700 पर्यंत)
Rs.350.00प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकियांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्येात्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रीयांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Bharatacha Itihas (Praranbhapasun Te C.E. 700 Paryant)