-
भारतीय संविधान मूलभूत तत्त्वे आणि स्वरूप
Rs.450.00संविधान म्हणजे एक देशाच्या राजकीय व्यवस्थेचा आधारस्तंभ. ते राज्याच्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, व न्यायमंडळ यांची स्थापना करतो, त्यांच्या अधिकार व कार्ये स्पष्ट करतो, व त्यांची मर्यादा ठरवतो. संविधान जनतेच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे आणि त्यात सुसंगत व न्यायसंगत शासनाची रूपरेषा असते.
लोकशाहीत, राज्यघटनेचा आधार म्हणजे जनता स्वसंविधान तयार करते आणि विविध शासन अंगांना अधिकार प्रदान करते. संविधान हा संस्थात्मक आरसा आहे, जो समाजाच्या विविध स्तरातील मूल्यांचे प्रतिबिंब असतो. त्याच्या अंमलबजावणीवर आणि न्यायालयीन निर्णयांवर संविधानाचा प्रभाव आहे. -
भारतीय संविधानाची ओळख
Rs.395.00भारतीय राज्यघटनेत ‘भारत हा राज्यांचा संघ असेल’ असा उल्लेख आहे. संघराज्यपद्धती ही केवळ संरचनात्मक व्यवस्था नसते; तर तिच्यात विविध लोकगट व त्यांच्या संस्था आपापली वैशिष्ट्ये कायम ठेवून समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र येवून शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भारतीय राज्यघटनेत उदारमतवाद, मिश्र अर्थव्यवस्था, सत्तेचे विकेंद्रीकरण, कायदेशीर वा कार्यालयीन भाषेची तरतूद, स्वतंत्र निर्वाचन आयोग इत्यादींची तरतूद आढळते. परिणामी भारतीय राज्यघटना ही सर्वसमावेशक ठरते.
प्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, भारतीय संघराज्यवाद, कायदेमंडळ, संविधानिक दुरुस्त्या, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि निवडणूक व्यवस्था अशा मूलभूत व राज्यघटनेची ओळख होण्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आलेला असल्याने भारतीय राज्यघटनेची ओळख करून घेतानाच लोकशाही प्रक्रियेचाही अभ्यास होणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबी आहेत यांचाही उहापोह सदरील ग्रंथात आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख होण्याच्या दृष्टीने सोपी, सुटसुटीत अशी ग्रंथरचनेची मांडणी करण्यात आली आहे.
Bharatiya Sanvidhanachi Olkha